Latest News

चालू घडामोडी सप्टेंबर २०१६

११.०९.२०१६
अर्थसत्ता
बिर्ला समूहाचे ई-व्यापारात पाऊल!
* आदित्य बिर्ला समूहाने चर्चेतील ई-व्यापार क्षेत्रात शिरकाव केला असून उंची वस्तूंच्या विक्रीकरिता माहिती तंत्रज्ञान दालन सुरू केले आहे.
* समूहाच्या ‘क्युरो कार्टे डॉट कॉम’ या नव्या व्यवसायाची जबाबदारी अनन्या बिर्ला यांच्या रूपात समूहातील तिसऱ्या पिढीकडे देण्यात आली आहे.
* अनन्या या आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्या आहेत. २२ वर्षीय अनन्या यांनी या उपक्रमाची घोषणा गुरुवारी मुंबईत केली. ‘क्युरो कार्टे डॉट कॉम’ येत्या रविवारपासूनच विविध उत्पादने उपलब्ध होणार आहेत.
* भारतासह फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, थायलँड, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया आदी देशांतील विविध ७० गटातील महागडय़ा लाईफस्टाईल वस्तू या मंचावर असतील, असे यावेळी सांगण्यात आले.
* देशातील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकलेतील काही वस्तूंचीही विक्री या मंचावरून होईल.
क्रीडा
ईशान नक्वीचे अजिंक्यपद
* राज्य बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याचा ईशान नक्वी आणि पुण्याचा वरुण खानविलकर जोडीने पुण्याच्या समीर भागवत आणि सुधांशू मेडसीकर जोडीचा २-० असा पराभव केला.
* या विजयाच्या जोडीवर ईशान -वरुणने महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात अजिंक्यपदावर नाव कोरले.
पॅरालिंपिकमध्ये तिरंगा मरियप्पनला सुवर्ण; वरुणलाही ब्राँझ
* मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंचउडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
* याच प्रकारात तिसऱ्या स्थानावर राहिलेला उत्तर प्रदेशचा २१ वर्षांचा वरुणसिंग भाटी कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तो एका पायाने पोलिओग्रस्त आहे.
* पाच वर्षांच्या वयात शाळेत जातेवेळी भरधाव बसने धडक देताच उजवा पाय गमावून बसलेल्या २१ वर्षांच्या थंगवेलूने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेत सुवर्ण जिंकले.
* या प्रकारात भारताला सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
* याआधी १९७२ च्या हेडेलबर्ग स्पर्धेत जलतरणात मुरलीकांत पेटकर तसेच २००४ च्या अथेन्स स्पर्धेत भालाफेकीत देवेंद्र झांझरिया याने भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केली होती.
* विशेष म्हणजे या प्रकारात सुवर्णपदकाचा दावेदार मानला जाणारा अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला मात्र (१.८६ मीटर) रौप्य मिळाले.
* महत्त्वाची बाब म्हणजे कांस्य पदक पटकावणारा वरुण भाटी याने सुध्दा १.८६ मीटर मीटर उंच उडी मारली. पण काऊंटबॅकमध्ये त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले.
रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकानंतर अमेरिकन ओपनमध्ये कर्बर अजिंक्य
* रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर अमेरिकन खुल्या टेंनिस स्पर्धेत महिला गटातील अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या करेलीना प्लीस्कोव्हाला तीन सेटमध्ये ६-३ व ४-६ व ६-४असे नमवुन जर्मनीच्या अंजिलिक केर्बरने विजेतेपद पटकावले.
* केर्बरचे हे दूसरे ग्रैंडस्लैम विजेतेपद आहे.
* या विजेतेपदानंतर केर्बरने पजागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांवर झेप घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय
‘एनएसजी’प्रश्नी चीनच्या आडमुठेपणाला भारताचे जी-२० परिषदेत उत्तर
* अणुपुरवठादार देशांच्या गटातील (न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप- एनएसजी) भारताच्या प्रवेशमार्गात अडसर निर्माण करणाऱ्या चीनला भारताने जी-२० परिषदेत पॅरिस हवामान कराराच्या मसुद्याला मान्यता न देता उत्तर दिले आहे.
* देशाची ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी भारताला अणुऊर्जा निर्मितीवर भर देण्यावाचून गत्यंतर नाही आणि अणुभट्टय़ांसाठी लागणारे युरेनियम इंधन आणि प्रगत तंत्रज्ञान मिळवण्यासाठी एनएसजीचे सदस्यत्व मिळवणे उपयुक्त आहे.
* ४८ सदस्य असलेल्या या गटात सर्व सदस्य देशांच्या सहमतीने प्रवेश मिळतो. एकाही सदस्य देशाने नकाराधिकार वापरला तर नव्या देशाला प्रवेश मिळत नाही.
* या वर्षी भारताच्या एनएसजी प्रवेशाच्या मार्गात चीनने नकाराधिकार वापरून अडथळा आणला. त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताने अनोख्या मार्गाचा अवलंब केला.
* गेल्या आठवडय़ात चीनमध्ये पार पडलेल्या जी-२० देशांच्या परिषदेत गतवर्षी पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत ठरलेल्या मसुद्याला महत्त्वाच्या देशांकडून संमती मिळवून यजमान चीन श्रेय मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
* त्यानुसार चीन आणि अमेरिकेने जी-२० परिषदेच्या पूर्वसंध्येला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांच्याकडे पॅरिस मसुद्याचे संमतीपत्र सुपूर्द केले. यजमान चीनसाठी पाठ थोपटून घेण्याची ही नामी संधी होती. मात्र भारताने चीनच्या त्या आनंदात मीठ कालवले.
* डिसेंबर २०१६ पर्यंत पॅरिस मसुद्याला संमती मिळवण्यासाठी अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. चीनमधील परिषदेत या विषयावर झालेल्या ४० तासांच्या चर्चेनंतरही बडय़ा देशांच्या दबावापुढे न झुकता भारताने आपला विरोध कायम ठेवला. त्याला तुर्कस्ताननेही पाठिंबा दिला.
* त्यात हवामान कराराला विरोध करणे हा उद्देश नसून चीनला श्रेय मिळवण्यापासून वंचित ठेवणे हा अंतस्थ हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले. खनिज तेलावर दिले जाणारे अनुदान बंद करण्यासाठी सर्व देशांनी पॅरिसमध्ये २०२५ सालाची अंतिम मुदत स्वीकारली होती.
* ती मान्य करण्यासही भारताने चीनमधील परिषदेत नकार दिला. अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन प्रमुख प्रदूषणकारी देशांची सहमती मिळाली असती तर चीनसाठी ते मोठे यश मानले गेले असते.
राष्ट्रीय
लढाऊ विमानांच्या खरेदीतही लाचखोरी
* मागील "यूपीए‘ सरकारच्या काळात लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ब्राझीलच्या विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत करण्यात आलेला आणखी एक संरक्षण करार लाचखोरीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
* "एम्ब्राएर‘ या कंपनीकडून लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी २० कोटी ८० लाख डॉलरचा करार करण्यात आला होता.
* या व्यवहारातदेखील मोठ्या प्रमाणावर लाचखोरी झाल्याचे उघड झाल्याने तपास यंत्रणांची झोप उडाली आहे.
* संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले असून, संबंधित व्यवहाराची कागदपत्रेदेखील मागविली आहेत.
* "डीआरडीओ‘ने २००८ मध्ये तीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ब्राझीलच्या "एम्ब्राएर‘ या कंपनीसोबत करार केला होता, ही विमाने एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (एईडब्लू अँड सी) या यंत्रणेने सुसज्ज आहेत.
* या करारामध्ये "डीआरडीओ‘ला स्वदेशी बनावटीचे रडार विकसित करण्याची परवानगी देण्यात आली होती, यालाच "देसी अवॅक्‍स‘ असेही संबोधण्यात येते.
* आता या संपूर्ण व्यवहाराचीच चौकशी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थानात एकच ज्यू, ८५ पारसी
* राजस्थानची एकूण लोकसंख्या ६.८५ कोटी असून त्यात एक ज्यू आणि पारसी समुदायाच्या ८५ लोकांचा समावेश आहे.
* धार्मिक जनगणनेच्या अहवालातून ही माहिती समोर आली.
* पारसी लोक ब्रिटीश राजवटीत १०० वर्षांपूर्वी राजस्थानात आले.
* मात्र, आता हा समुदाय राजस्थानातून विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
* पारसी लोक रेल्वेमार्गाच्या कामासाठी अजमेर येथे आले होते.
* १८७० ते १८९० दरम्यान येथील पारसी लोकांची संख्या ३००च्या आसपास होती. ती २०११ मध्ये घटून ८५ झाली.
* अजमेरच्या पुष्कर येथे ज्यू धर्मियांचा चांगला राबता होता.
* १९४८ मध्ये आधुनिक इस्रायलची निर्मीती होण्याच्या आधीपासून ज्यू लोक येथे रहात होते.
* गेल्या काही दशकांपासून पुष्कर येथे अन्य धर्मियांच्या तुलनेत ज्यू लोक अधिक संख्येने येत आहेत.
* पुष्कार हे भारतातील ज्यूंच्या प्रमुख नऊ केंद्रांपैकी एक केंद्र आहे.
* संपूर्ण देशात ज्यू नागरिकांची संख्या ५०० हून थोडी अधिक आहे.
* राजस्थानचा नागरिक असलेल्या एकमेव ज्यू व्यक्तीचा छडा लागू शकला नाही.
* हडोती विभागात एकेकाळी बौद्ध धर्म प्रचंड पसरला होता.
* मात्र, या धर्माचे आता केवळ १२ हजार अनुयायी येथे आहेत.
महाराष्ट्र
'मसाप'च्या पुरस्कारांचे औरंगाबादेत आज वितरण
* मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारांचे आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
* "मसाप‘च्या डॉ. नांदापूरकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.
* या वेळी नरेंद्र मोहरीर वाङ्‌मय पुरस्कार डॉ. दिलीप धोंडगे यांच्या तुकोबाच्या अभंगांची शैलीमीमांसा, नरहर कुरुंदकर वाङ्‌मय पुरस्कार सुशील धसकटे यांच्या "जोहार‘ या कादंबरीस, म. भि. चिटणीस वाङ्‌मय पुरस्कार उल्का महाजन यांच्या "कोसळता गावगाडा‘ या वैचारिक ग्रंथास, कुसुमावती देशमुख काव्यपुरस्कार मोहन कुंभार यांच्या "जगण्याची गाथा‘ या काव्यसंग्रहास; तर रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार माधव शिरवळकर यांच्या पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीकरिता प्रदान करण्यात येणार आहे.
रोहयोसाठी केंद्राचे ३१० कोटी
* जयकुमार रावल यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची नुकतीच भेट घेऊन राज्यासाठी १०  हजार कोटी रुपयांची मागणी केली होती.
* त्यातून पहिल्या टप्प्यात ३१० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या वेळी रोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर; तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* रावल म्हणाले, ""राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी रोहयोने नवीन ११ कलमी कार्यक्रम आखला असून, या ११ कलमी कार्यक्रमाची २ ऑक्‍टोबरपासून सुरवात करण्यात येणार आहे.
* यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट रोहयो विभागाने ठेवले आहे.
* या निधीतून त्यात सिंचन विहिरी, शेततळी, व्हर्मी, नाडेप कंपोस्टिंग, फळबाग लागवड शौचालय, शोष खड्डे, पारंपरिक जलाशयांची दुरुस्ती व नूतनीकरण, गाळ काढण्याची कामे, रोपांची निर्मिती व वृक्षलागवडीची कामे, ग्राम सबलीकरणातंर्गत क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावांअंतर्गत रस्ते, घरकुल, गुरांसाठी गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळीपालन शेड, मस्त्य व्यवसायाकरिता ओटे, अशी कामे करण्यात येणार आहेत.
एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवी शक्कल, ‘गोल्डन अवर्स’ योजना लागू
* मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात व वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे.
* आता  महामार्ग पोलिसांनी ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
* वीकेंड आणि सुट्ट्यांच्या वेळी एक्स्प्रेस वेवर ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्यात येणार आहे.
* या योजनेअंतर्गत ठरावीक तासांसाठी  अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे.
* शनिवारी आणि रविवारी एक्सप्रेस-वेवर वाहनांची संख्या जास्त असते त्यामुळे या योजनेचा वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी फायदा होईल असे सांगितले जात आहे.
* महामार्ग पोलिसांनी शनिवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.
* या आधी एक्सप्रेस वे वर ड्रोन विमानाचा व सीसीटीव्हीचा प्रयोग करण्यात आला आहे.
* या चाचण्यांमधून ड्रोनच्या तुलनेत सीसीटीव्ही अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.
सातारा भूषण पुरस्कार ललिता बाबरला जाहीर
* रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट आणि सातारकर नागरिकांतर्फे दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार रिओ ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी माणची आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिला जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांनी दिली आहे.
* या पुरस्काराचे हे २६ वे वर्षे आहे.
* यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, राजमाता सुमित्राराजे भोसले, प्रा. शिवाजीराव भोसले, हभप बाबा महाराज सातारकर, गुरुवर्य बबनराव उथळे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, यमुनाबाई वाईकर, गिरीश कुबेर आदींना या पुरस्काराने गौरविले आहे.
* गेल्या रौप्यमहोत्सवी वर्षी रयत शिक्षण संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला होता.
* २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हापूससाठीचे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ रत्नागिरीत
* रत्नागिरी एमआयडीसीत मँगो प्रोसेसिंग क्लस्टरचे कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
* कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असून, यासाठी १५ कोटी २७ लाख ८ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यातील ११ कोटी ६२ लाख ७२ हजार रुपये अनुदान केंद्र शासन देणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार देणार आहे.
* पुढील हंगामाआधी हे फॅसिलीटी सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
* रत्नागिरी व देवगड ही ठिकाणे हापूसची पंढरी म्हणून ओळखली जातात.

* रत्नागिरी अल्फान्सो व देवगड अल्फान्सो हे जगभरात नावाजलेले असून, जागतिक स्तरावर या उत्पादनाचा दर्जा व मानके प्रमाणित करण्यासाठी या केंद्राचा उपयोग कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे.
१२.०९.२०१६
अर्थसत्ता
भारतीय वंशाच्या चार प्रमुख उद्योजकांचा अमेरिकेत गौरव
* भारतीय वंशाच्या चार प्रमुख अमेरिकन उद्योजकांचा चेंबर ऑफ कॉमर्सकडून उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला.
* अमेरिकी असलेल्या तीन उद्योजकांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
* भारत व अमेरिका यांच्यात व्यापाराच्या माध्यमातून मैत्रीचे पूल या उद्योजकांनी उभे केले आहेत असे सांगण्यात आले.
* येथील एका कार्यक्रमात इंडो अमेरिकन चेंबर कॉमर्स या ग्रेटर ह्य़ूस्टनच्या संस्थेने उद्योजकांचा सत्कार केला.
* वर्षांतील तरूण यशस्वी उद्योजक म्हणून मलिशा पटेल (वय ३६) यांचा सत्कार करण्यात आला त्या मेमोरेल हेरमान हॉस्पिटल या सुगरलँड येथील संस्थेच्या मुख्य कार्यसंचालन अधिकारी आहेत.
* महिला उद्योजक पुरस्कार रेवती पुराणिक यांना देण्यात आला.
* त्या तेल व वायू क्षेत्रातील उपकरणे तयार करणाऱ्या ऑइलफील्ड मशीन कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी आहेत.
* लिंडॉलबसेल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश पटेल यांना वर्षांतील प्रमुख उद्योजक पुरस्कार देण्यात आला तर शिपकॉम वायरलेस कंपनीचे अबेझार एस तय्यबजी यांचाही गौरव करण्यात आला.
* जीवनगौरव पुरस्कार शेलचे माजी अध्यक्ष मार्विन ओडम, ह्यूस्टन मायनॉरिटी सप्लायर डेव्हलपमेंटचे माजी अध्यक्ष रिचर्ड हुबनेर, अँडर्सन कॅन्सर सेंटरचे माजी अध्यक्ष डॉ. जॉन मेंडलन यांना देण्यात आला.
* त्यांनी भारत व अमेरिका यांच्यात व्यापार मैत्री वाढवल्याचे सांगण्यात आले.
* बिल्डींग ब्रिजेस कार्यक्रमास ७०० पाहुणे उपस्थित होते त्यात महावाणिज्यदूत डॉ. अनुपम रे, ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या कुलुगरू रेणू खटोर यांचा समावेश होता.
* काँग्रेस सदस्या शीला जॅकसन ली, अल ग्रीन, पीट ओल्सन, हॅरिस परगण्याचे न्यायाधीश एड एमेट्स ह्यूस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर, जॅक ख्रिसती, ख्रिस ब्राऊन आदी यावेळी उपस्थित होते.
* ह्यूस्टनमधील किमान ७०० कंपन्या भारतात उद्योग व्यापार करीत आहेत.
सप्टेंबरमध्ये बाजारात येणार तीन आयपीओ
* आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शोरन्स कंपनी, एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि जीएनए एक्सल्स या तीन कंपन्या या महिन्याच्या सुरुवातीस आयपीओच्या माध्यमातून ७००० कोटी रुपये उभे करणार आहेत.
* एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या शेअर्ससाठी सोमवारी बोली सुरू होईल, तर जीएनए एक्सल्सचा १४ रोजी व आयसीआयसीआयचा आयपीओ १९ रोजी खुला होईल.
* आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शोरन्स कंपनी ६,०५७ कोटी रुपये, एलअँडटी ८९४ कोटीे, तर जीएनए एक्सल्स १३० कोटी उभारणार आहे.
ईपीएफवर यंदा ८.६ टक्के व्याज?
* कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) चार कोटींपेक्षा अधिक सदस्यांना चालू आर्थिक वर्षात आपल्या पीएफवर ८.६ टक्क्याने व्याज मिळू शकते.
* ईपीएफने २०१५-१६ साठी ८.८ टक्के व्याज दिले आहे. त्या वेळी अर्थ मंत्रालयाने ८.७ टक्के व्याज देण्याचे मत व्यक्त केले होते.
* अर्थमंत्रालयाचे असे मत आहे की, ईपीएफवरील व्याजदर हे अन्य लघु बचत योजनांशी मिळतेजुळते असावेत. कामगार मंत्रालयाने त्याप्रमाणे हे व्याजदर ठरवावेत.
* विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात व्याजदर ८.६ टक्के ठेवण्याबाबत कामगार मंत्रालय आणि अर्थमंत्रालयात एकवाक्यता आहे.
* ईपीएफओने चालू आर्थिक वर्षासाठी उत्पन्नाच्या अंदाजावर अद्याप अभ्यास केलेला नाही.
* ईपीएफओचे केंद्रीय न्यासी बोर्ड (सीबीटी) उत्पन्नाच्या अंदाजावरच व्याजदराचा निर्णय घेते. त्यानंतर अर्थमंत्रालय शिक्कामोर्तब करते.
भारतात एअरटेलचे सर्वाधिक ग्राहक
* तब्बल १०३.५ कोटी नागरिक भारतामध्ये मोबाईल वापरत आहेत. जून महिन्यापर्यंतची देशातील मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती ट्रायने प्रसिद्ध केली आहे.
* जून महिन्यापर्यंत भारतात मोबाईल आणि लँडलाईन वापरणारे एकूण १०५.९८ कोटी नागरिक आहेत.
* मे २०१६ मध्ये हीच संख्या १०५.८ कोटी इतकी होती.
* मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नजर टाकली तर एअरटेलच्या ग्राहकांमध्ये १४ लाखांची वाढ होऊन एकूण संख्या २५.५७ कोटी झाली आहे.
* या यादीमध्ये एअरटेलच पहिल्या क्रमांकावर असून या यादीनुसार व्होडाफोनचे १९.९४ कोटी तर आयडियाचे १७.६२ कोटी ग्राहक आहेत. बीएसएनएलकडे एकूण ८.९५ कोटी ग्राहक आहेत.
क्रीडा
अनुराग ठाकूर यांच्या हस्ते गेलच्या ‘सिक्स मशीन’चे प्रकाशन
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या हस्ते वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या ‘सिक्स मशीन’ या आत्मकथेचे प्रकाशन करण्यात आले. * व्हायकिंग-पेंग्विन यूकेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
* पुस्तक प्रकाशनावेळी गेल म्हणाला, आपले पहिले पुस्तक प्रकाशन करताना मी खूप उत्साहीत आहे. मी आशा करतो की हे पुस्तक दूरदूरपर्यंत पोहोचेल.
* क्रिकेटच नव्हे तर त्याशिवाय खूप साऱ्या गोष्टी, किस्से आणि रहस्य आहेत जी मला सांगायची होती.
* अनुराग ठाकूर याप्रसंगी म्हणाले, ख्रिस गेलचे ‘सिक्स मशीन’ पुस्तकाचे शीर्षक त्याला खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करते.
* त्याने क्रिकेट विश्वात जी एक ओळख बनवली आहे त्याचा साक्षीदार बनणे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
* गेल असा खेळाडू आहे ज्याला स्कोर शीटच्या आधारे मोजले जाऊ शकत नाही.
आयसीसी टी-२० क्रमवारीत कोहलीच 'एक नंबर'
* आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-२० ची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली असून भारताच्या विराट कोहलीने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे.
* टी-२० च्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने (७६३) तिसरे स्थान मिळवले आहे.
* आयसीसी क्रमवारीत ८२० रेटींग मिळवत विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले असून ७७१ रेटिंगसह ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच दुसऱ्या  स्थानावर आहे.
* आयसीसीने जारी केलेल्या टॉप १० फलंदाजांमध्ये विराटशिवाय अन्य कोणत्याही भारतीयाला स्थान मिळवता आलेले नाही.
* टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री ७४३ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे.
* भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह (७३५) आणि फिरकीपटू आर.अश्विन (६८४) अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
* दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने ७४० रॅकिंगसह दुसरे स्थान पटकावले आहे.
तंत्र-विज्ञान
मंगळावरील भूस्तरांची रंगीत छायाचित्रे
* नासाच्या मंगळावर पाठवण्यात आलेल्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हर या गाडीने तेथील जुन्या भूगर्भशास्त्रीय स्तरांची रंगीत छायाचित्रे पाठवली आहेत.
* सध्या रोव्हर गाडी मरे ब्युटीस भागात असून तो माउंट शार्प पर्वताचा खालचा भाग आहे.
* मास्टकॅमने ८ सप्टेंबरला ही छायाचित्रे घेतली असून रोव्हर चमूने सर्व छायाचित्रांची एकत्रित जुळणी केली आहे.
* क्युरिऑसिटीच्या चमूने मंगळाच्या नैऋत्येला अमेरिकी वाळवंटासारखा भाग असल्याचे म्हटले आहे, क्युरिऑसिटी प्रकल्पातील वैज्ञानिक अश्विन वासवदा यांनी सांगितले की, मंगळावर ब्युटीस व मेसाज नावाचे भाग वर आलेले दिसतात ते पूर्वीच्या वालुकाश्मांचे अवशेष आहेत. माउंट शार्पचा खालचा भाग तयार होत असताना त्यांची निर्मिती झाली.
* ब्युटेस नावाच्या भागाचा अभ्यास केल्याने मंगळावरील वालुकाश्मांची माहिती मिळू शकते. भूजलामुळे त्यांची रासायनिक रचना बदलली होती व त्यामुळे क्षरण झालेला भूभाग तयार झाला.
* क्युरिऑसिटी गाडीने मरे ब्युटीस भागाची जी छायाचित्रे पाठवली आहेत ती अलीकडची असली तरी महिनाभरापूर्वीही अशी छायाचित्रे पाठवण्यात आली होती.
* क्युरिऑसिटी गाडीने दक्षिणेकडील ब्युटीस भागाची सफर करताना छायाचित्रे काढली होती. रोव्हर गाडीने तेथे उत्खनन सुरू केले असून ते पूर्ण झाल्यावर ती माउंट शार्पच्या दक्षिणेला दूरवर जाईल.
* क्युरिऑसिटी गाडी माउंट शार्प येथे २०१२ मध्ये उतरली होती व २०१४ मध्ये तेथील काही भागांचे पुरावे पाठवले होते या भागात सरोवरांना अनुकूल स्थिती होती व मंगळ एकेकाळी जीवसृष्टीस योग्य असेल तर तिथे २ अशी सरोवर होती असे मानले जाते.
* माउंट शार्पच्या पायथ्याशी काही खडकांचे खर असून ते काही अब्ज वर्षांपूर्वी तळ्यांमध्ये तयार झाले असावेत.
* तेथे एकेकाळी वस्तीयोग्य स्थिती होती तर ती नाहीशी कधी व केव्हा तसेच कशी झाली यावर संशोधन सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय
वैध अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून मान्यतेची उ. कोरियाची मागणी
* उत्तर कोरियाने केलेल्या ताज्या आणि आतापर्यंतच्या सगळ्यात मोठय़ा अणुचाचणीबद्दल त्याला शिक्षा देण्याबाबत जागतिक महासत्तांचा विचार सुरू असतानाच, आपल्याला ‘वैध’ अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, ही आपली मागणी त्या देशाने पुन्हा एकदा रेटली आहे.
* उत्तर कोरियाने केलेल्या गेल्या दशकभरातील सर्वात मोठय़ा अशा पाचव्या अणुचाचणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेधाचे स्वर उमटत असताना आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत र्निबधाचे प्रयत्न होत असतानाच, आपली आण्विक सज्जता ‘गुणवत्तेत आणि संख्येत’ वाढवण्याचा निर्धारही प्याँगयाँगने दोन दिवसातच व्यक्त केला.
* उत्तर कोरियाच्या अणुचाचणीविरुद्ध ‘शक्य तितकी कठोर’ उपाययोजना करण्याबाबत वॉशिंग्टन व टोकियो विचार करत आहेत, असे जपानमध्ये पोहचलेल्या अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले.
* अमेरिकेकडून आपल्या स्वातंत्र्याला आण्विक धोका असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला क्षेपणास्त्र चाचणी व अणुचाचणी करणे आवश्यक आहे, असे उत्तर कोरियाने आग्रहाने सांगितले आहे.
* आपल्या देशाबाबत बराक ओबामा यांचे ‘पूर्णपणे दिवाळखोरीचे’ धोरण आहे, असे प्याँगयाँगमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले.
* अण्वस्त्रसज्ज देश म्हणून उत्तर कोरियाचे सामरिक महत्त्व अमान्य करण्याचा ओबामा  प्रयत्न करत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा सीमा खुली
* आखाती देशांबरोबरील पाकिस्तानचा व्यापारमार्ग बंद करण्याचा इशारा अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी दिल्यानंतर पाकिस्तानने आज अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा सीमा खुली केली, यामुळे अफगाणिस्तानला भारतात व्यापार करणे सोयीचे जाणार आहे.
* मात्र, त्यांना भारतातून माल परत नेण्यास पाकिस्तानने परवानगी दिलेली नाही.
* व्यापारी वाहतुकीसाठी एकमेकांच्या भूमीचा वापर करण्याच्या करारामध्ये भारतालाही सहभागी करून घेण्याची अफगाणिस्तानने केलेली मागणी मात्र पाकिस्तानने धुडकावली आहे.
* भारताबरोबरील वाद आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी मान्य करता येत नसल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे.
कॅलिफोर्नियातील संताची भविष्यवाणी; २ ऑक्टोबरला पृथ्वीचा अंत
* कॅलिफोर्नियातील एक संत हेरॉल्ड कॅपिंग यांनी एक गणिती हिशोब मांडत २ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता पृथ्वीच संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
* फॅमिली रेडिओ नेटवर्कच्या माध्यमातून ८९ वर्षांचे कॅपिंग हे दैनंदिन भविष्यवाणी करतात.
* या वेळी त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा पृथ्वीचा नाश होईल तेव्हा पृथ्वीवरील सुमारे २ टक्के इतकी लोकसंख्या कमी होईल.
* कॅपिंग हे व्यवसायाने सिव्हील इंजिननियर असून, सध्या ते सेवानिवृत्त आहेत.
* यापूर्वीही पृथ्वी नष्ट होण्याची भविष्यवाणी कॅपिंग यांनी केली होती.
* ६ सप्टेबर १९९४ या तारखेला जग संपणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली होती. मात्र, आकलनात गोंधळ झाल्याचे सांगत त्यांनी या तारखेवरून घुमजाव केले होते.
* दरम्यान, त्यांनी नव्याने भविष्यवाणी केली असून, २ ऑक्टोबरची संध्याकाळी ६ वाजताची वेळ त्यांनी जगबूडीची भविष्यवाणी म्हणून सांगितली आहे.
राष्ट्रीय
राजधानी दिल्लीत सर्वात जास्त पगाराच्या नोकऱ्या
* देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील कर्मचा-यांना सर्वात जास्त पगार मिळतो.
* मुंबईत कोटय़वधी रुपयांची उलाढाल सुरु असली तरी दिल्लीमध्ये कर्मचा-यांना सर्वाधिक पगार मिळत आहे.
* दिल्लीचे मागील वर्षाचे दरडोई उत्पन्न १,९२५८७ लाख एवढे होते. आता यामध्ये वाढ होऊन हा आकडा २,१९,९७९ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
* दिल्लीचे दरडोई उत्पन्न इतर शहरांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याने येथील कर्मचा-यांचे पगार इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहेत.
* येथे काम करणा-या कर्मचा-यांमध्ये जास्त पगार असल्याने त्यांच्या राहणीमानातही थोडाफार बदल आपल्याला जाणवतो.
भारतीय जवानांनी बनविला जागतिक विक्रम
* दुचाकीवरून सादर करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय लष्करातील दोन जवानांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून ही प्रात्यक्षिके जबलपूर येथील लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये करण्यात आली.
* दुचाकीच्या सीटवर आणि हँडलवर उभे राहून सर्वाधिक वेळ दुचाकी चालवण्याचा जागतिक विक्रम या जवानांनी रचला आहे.
* यापैकी कॅप्टन मनप्रित सिंग यांनी मोटारसायकलच्या सीटवर उभे राहून दोन तास २४ मिनिटे आणि १२ सेकंद इतक्या वेळात ७५.२ किलोमीटर एवढे अंतर पार केले.
* यापूर्वी हा विक्रम इंदौरच्या रत्नेश पांडे यांच्या नावावर होता. त्यांनी मोटारसायकवरच्या सीटवर उभे राहून ३२.३ किलोमीटर इतके अंतर पार केले होते.
* याशिवाय, हवालदार संदीप कुमार यांनी मोटारसायकलच्या हँडलवर उभे राहून गाडी चालविण्याच्या प्रकारात एक तास २७ मिनिट आणि ३१ सेकंदात ४६.९ किलोमीटर एवढे अंतर पार केले.
* भारतीय लष्कराकडून यासंदर्भात निवेदन जारी करून माहिती देण्यात आलेली आहे.
* निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लष्कराच्या जबलपूर येथील सिग्नल कॉर्पसमधील डेअरडेव्हिल्स टीमच्या जवानांनी हे जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
निधी खर्चासाठी राज्यांना आणखी स्वायत्तता
* ज्या योजनांना केंद्र सरकारकडून अर्थसाह्य मिळते, अशा योजनांचा निधी खर्च करण्यासाठी राज्यातील सरकारांना आणखी स्वायत्तता देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून, त्यासाठीची मार्गदर्शक नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
* राज्यातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
* त्यापैकी काही योजनांना केंद्र सरकारकडून अर्थसाह्य उपलब्ध करून दिले जाते.
* मात्र, हा निधी खर्च करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानुसार केंद्राने अशा योजनांच्या निधीत वाढ करण्याबरोबरच एक नियमावलीही जाहीर केली आहे.
* केंद्राकडून राज्य सरकारच्या विविध योजनांना अर्थसाह्य म्हणून आतापर्यंत १० टक्के निधी प्रदान केला जात होता.
* त्यात आता २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी हीच वाढ ३० टक्‍क्‍यांपर्यंत करण्यात येईल, असे नवीन नियमावलीवरून स्पष्ट होते.
* नव्या नियमावलीअंतर्गत लाभ घेण्यासाठी राज्यांना त्यांच्या पातळीवर एक मंजुरी समिती गठित करावी लागणार आहे.
* "मनरेगा‘सारख्या योजनांना ही नियमावली लागू करता येणार नाही.
* मिळणाऱ्या निधीची रक्कम तत्सम योजनेकरिता; तसेच संबंधित उपयोजनेसाठी खर्च करण्याची मुभा राज्यांना देण्यात आल्याचेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
महाराष्ट्र
वेळेवर रेल्वेगाड्या चालविण्यात नांदेड विभाग चौथ्या क्रमांकावर
* दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने वेळेवर रेल्वेगाड्या चालविण्यात(वक्तशिर)आॅगस्ट महिन्यात देशात चौथा क्रमांक प्राप्त करीत इतिहास घडविला.
* सर्वसाधारणपणे अनेकदा रेल्वेगाड्या उशीराने धावतात. परंतु नांदेड विभागाने त्यावर मात करीत देशात चौथा क्रमांक मिळविला.
* नांदेड विभागात साधारणपणे एक हजार किलोमीटर एकेरी मार्ग आहे.
* यामध्ये १७३ किलोमीटर मार्ग हा मीटर गेज आहे.
* हा एक हजार किलोमीटर रुळाचा मार्ग साधारणत: महाराष्ट्रातील मराठवाडा,विदर्भ, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यात पसरलेला आहे.
* या एकेरी मार्गावर प्रवासी व मालवाहू रेल्वेगाड्या वेळेवर चालविणे हे नेहमीच जिकीचे काम ठरते.
* आॅगस्टमध्ये नांदेड विभागात एक्स्प्रेस रेल्वेगाड्या २४ दिवस तर पॅसेंजर रेल्वेगाड्या १९ दिवस १०० टक्के वेळेवर धावल्या.
* दोन्ही मिळून १५ दिवस सर्व रेल्वे १०० टक्के वेळेवर धावल्या. त्यामुळे या महिन्यात नांदेड विभागात वेळापत्रकानुसार ९९.२२ टक्के रेल्वेगाड्या वेळेवर धावल्या.
* देशभरातील यादीत नांदेड विभागाच्या खालोखाल सियालदा विभाग,बिकानेर विभागाचा क्रमांक लागतो.
शाहीर तानाजी बलसाने यांचे निधन
* मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शाहीर तानाजी देवराम बलसाने यांचे निधन झाले.
* त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कलावंत शाहीरभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते.
* सरकारमान्य शाहीर बलसाने आणि पार्टीचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी बालपणापासूनच लोकगीते, काव्य, लोकनाट्य पोवाडे यांचा वसा जपला.
* दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक बहुजन समाजासाठी शाहिरी लोककलेद्वारे समाजप्रबोधन व परिवर्तनाचे काम त्यांनी केले.
* महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र, तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान, कर्नाटक येथे लावणी महोत्सव घेऊन, शाहिरी कलेचे प्रदर्शन केले.

* गेल्या काही दिवसांपासून ते "माहेरची शिकवण‘ या चित्रपटाची निर्मिती करीत होते.
१३.०९.२०१६
अर्थसत्ता
‘जीएसटी समिती’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
* आज झालेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीएसटी समिती स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून या जीएसटी समितीचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतील.
* या समितीचे केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री सदस्य असणार आहेत. शिवाय प्रत्येक राज्याचे अर्थमंत्रीदेखील या समितीचे सदस्य असतील.
* उपस्थित सदस्यांच्या हजेरीत सर्व निर्णय घेतले जाणार असून निर्णयाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी उपस्थित सदस्यांपैकी दोन तृतीयांश मते मिळणे आवश्यक आहे.
* यात केंद्र सरकारच्या निर्णयाचे एक तृतीयांश तर राज्यांचे दोन तृतियांश वेटेज असणार आहे.
* जीएसटी समितीला जीएसटीच्या अंतर्गत कराचा दर आणि बँड निश्चित करण्याचे कार्य करावे लागणार आहे.
* कोणत्या वस्तू आणि सेवेवर किती कर आकारावा हे ठरवण्याचे काम देखील जीएसटी काउंसिल करणार आहे. पेट्रोलियम उत्पादनांवर कधी कर लावला जावा.
* शिवाय जीएसटीअंतर्गत कोणत्या सेवा आणि उत्पादनांवर सरचार्ज, सेस लावावा याचा निर्णय देखील काउंसिलमार्फत घेण्यात येणार आहे.
महागाई पाच टक्क्य़ांवर
* भाज्या तसेच अन्य खाद्यान्न किंमतीत उतार नोंदला गेल्याने गेल्या महिन्यातील महागाई दर पाच महिन्यांच्या तळात विसावला आहे. ऑगस्टमधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.०५ टक्के राखला गेला.
* मार्च २०१६ मधील ४.८३ टक्केनंतर यंदाचा दर हा किमान आहे. तर जुलैमध्ये तो ६.०७ टक्के असा गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकावर होता.
* वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१५ मध्ये महागाई दर ३.७४ टक्के नोंदला गेला होता.
* ऑगस्टमध्ये भाज्यांच्या किंमती १.०२ टक्क्य़ाने कमी होत १४.०६ टक्क्य़ावर विसावल्या आहेत.
* तर अन्य अन्नधान्याच्या किंमती महिन्याभरापूर्वीच्या ७.९६ टक्क्य़ांवरून ५.८३ टक्क्य़ांपर्यंत खाली आल्या आहेत.
* एकूण अन्नधान्य महागाई निर्देशांक जुलैमधील ८.३५ टक्क्य़ांवरून ऑगस्टमध्ये ५.९१ टक्के झाला आहे.
एप्रिल-आॅगस्टमध्ये वाढली करवसुली!
* चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते आॅगस्ट या पहिल्या पाच महिन्यांच्या काळात करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. अप्रत्यक्ष करांची वसुली २७.५ टक्के, तर प्रत्यक्ष करांची वसुली १५.0३ टक्क्यांनी वाढली.
* सरकारी सूत्रांनी सांगितले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १६.२६ लाख कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
* पहिल्या पाच महिन्यांत त्यापैकी तिसरा हिस्सा कर वसूल झाला आहे.
* यंदा संपूर्ण आर्थिक वर्षात थेट करात १२.६४ टक्के म्हणजेच ८.४७ लाख कोटींची वाढ सरकारला अपेक्षित आहे.
* अप्रत्यक्ष करात १०.८ टक्क्यांची अथवा ७.७९ लाख कोटींची वाढ अपेक्षित आहे.
* वैयक्तिक आयकर आणि अबकारी करात मोठी वाढ झाल्याने यंदाची वसुली वाढली आहे. प्रत्यक्ष करांची एकूण वसुली १.८९ लाख कोटींवर गेली आहे, तसेच अप्रत्यक्ष करांची वसुली ३.३६ लाख कोटींवर गेली आहे.
* प्रत्यक्ष करात कॉर्पोरेट आणि वैयक्तिक आयकराचा समावेश होतो, तर अप्रत्यक्ष करात अबकारी, सेवाकर आणि सीमा शुल्क यांचा समावेश होतो.
* कॉर्पोरेट आयकर ११.५५ टक्क्यांनी, तर वैयक्तिक आयकर २४.०६ टक्क्यांनी वाढला.
* रिफंड काढल्यानंतर कॉर्पोरेट आयकराची वाढ मात्र उणे (-) १.८९ टक्क्यांवर गेली. वैयक्तिक आयकर मात्र ३१.७६ टक्क्यांवर गेला.
* अबकारी कर ४८.८ टक्के वाढून १.५३ लाख कोटी झाला. सेवाकर २३.२ टक्क्यांनी वाढून ९२,६९६ कोटी झाला.
* याच काळात सीमा शुल्काची वसुली ९०,४४८ कोटी झाली.
क्रीडा
अमेरिकन स्पर्धेत महिला दुहेरीत बेथानी माटेक-ल्युसी सॅफारोवा विजेत्या
* बेथानी माटेक-सॅंडस आणि ल्युसी सॅफारोवा यांनी अमेरिकन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
* रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी कॅरोलिन गार्सिया-किस्तिना म्लाडेनोविच या फ्रान्सच्या अव्वल मानांकित जोडीचे आव्हान २-६, ७-६(७-५), ६-४ असे मोडून काढले.
* बेथानी-ल्युसी जोडीचे तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
* या जोडीने यापूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत.
* गार्सिया आणि म्लाडेनोविच यांनी यावर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे.
आर्मी ग्रीनने ड्युरंड करंडक पटकावला
* आर्मी ग्रीन संघाने उदयोन्मुख नेरोका फुटबॉल क्‍लबचे आव्हान पेनल्टी शूट आउटमध्ये ६-५ असे परतवून लावत १२८व्या ड्युरंड करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
निर्धारीत व अतिरिक्त वेळेत गोलशून्य बरोबरी झाली.
* शूट आउटमध्ये गोलरक्षक ललित थापाने सुरेख बचाव करत नेरोकाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र पुढील किकला सुशील, तर सातव्या किकला गोविन सिंग अपयशी ठरला. याचा फायदा घेत विक्रम अधिकारीने आपली किक सार्थकी लावली.
आशियाई करंडक तिरंदाजीत पूर्वषा शेंडेला दुहेरी रौप्यपदक
* महाराष्ट्राची तिरंदाज पूर्वषा शेंडे हिने तैवान आशिया करंडक (दुसरा टप्पा) तिरंदाजी स्पर्धेतील कंपाउंड प्रकारात दोन रौप्यपदके जिंकली.
* त्याचबरोबर याच प्रकारात ज्योती सुरेखा-दिग्विजय दयालने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.
* तैवानला सुरू असलेल्या या स्पर्धेत पूर्वषाला महिला एकेरीच्या अंतिम लढतीत १३७-१४२ अशी हार पत्करावी लागली.
* तिचा समावेश असलेला भारतीय संघ निर्णायक लढतीत मलेशियाविरुद्ध १८३-२०७ असा पराजित झाला.
* भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, तर चार रौप्यपदके जिंकली.
* अमन सैनी पुरुष एकेरीच्या निर्णायक लढतीत पराजित झाला, तर पुरुष संघास अंतिम फेरीत हार पत्करावी लागली.
* * भारताचे पदकविजेते
* पुरुष सांघिक रौप्य (दिग्विजय दयाल, अमन सैनी, पी. डिंकू सिंग, तैवानविरुद्ध हार)
* महिला सांघिक रौप्य (ज्योती सुरेखा, पूर्वषा शेंडे, खुशबू दयाल, मलेशियाविरुद्ध हार).
* मिश्र दुहेरी सुवर्ण (ज्योती सुरेखा-दिग्विजय दयाल, तैवानला हरवले)
* पुरुष एकेरीत अमन सैनीला रौप्य (मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हार)
* महिला एकेरीत पूर्वषा शेंडेला रौप्य (तैवानच्या मुलीविरुद्ध हार)
* मधुमिता कुमारीने ब्राँझची मलेशियन प्रतिस्पर्धीविरुद्धची लढत गमावली.
पुजारा ठरला गुलाबी चेंडूने द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज
* भारतीय संघातील मधल्या फळीतील भरवशाच्या चेतेश्वर पुजाराने गुलाबी चेंडूने खेळताना द्विशतक ठोकणारा जगातला पहिला फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे.
* दुलीप करंडकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजाराने द्विशतक साजरे करत हा विक्रम आपल्या नावावर केला.
* ग्रेटर नॉएडा स्पोर्टस क्लबच्या मैदानात इंडिया ब्लू संघाकडून इंडिया रेड संघाविरुद्ध खेळताना पुजाराने हा पराक्रम गाजवला.
* पुजाराने ३०३ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले. त्याने ३६३ चेंडूंमध्ये २८ चौकारांसह नाबाद २५६ धावांची खेळी केली.
* या खेळीसह पुजाराने टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले आणि आपण टीम इंडियातील स्थानाचे दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे.
अमेरिकेच्या महिलांचे निर्विवाद वर्चस्व
* अमेरिकेवरील अतिरेकी हल्ल्यास ११ सप्टेंबर रोजी पंधरा वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याच्या स्मृती अजूनही सर्वानाच स्मरणात आहेत.
* या दिवशी ट्रायथलॉनमध्ये तीनही पदके मिळविण्याचे अमेरिकन महिलांचे स्वप्न येथे साकार झाले. ट्रायथलॉनचा या स्पर्धामध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
* अमेरिकेच्या अ‍ॅलिसा सिएली हिने ही शर्यत एक तास २२ मिनिटे व ५५ सेकंदांमध्ये जिंकली. त्यानंतर ४८ सेकंदांनी ही शर्यत पूर्ण करणाऱ्या हॅली डॅनिसेविझ हिला रौप्यपदक मिळाले, तर मेलिसा स्टोकवेल हिने कांस्यपदक जिंकून अमेरिकेस निर्विवाद यश मिळवून दिले.
* याच क्रीडाप्रकारातील अन्य दिव्यांग विभागात अमेरिकेच्या ग्रेस नॉर्मन हिने सोनेरी कामगिरी केली.
* * स्टोकवेलचे संस्मरणीय कांस्यपदक
* स्टोकवेल ही इराकमध्ये २००४ मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या वेळी सैनिक म्हणून सहभागी झाली होती. त्या वेळी इराकी सैनिकांनी रस्त्यावर पेरलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये स्टोकवेल हिला पाय गमवावा लागला होता.
* पाय गमावणारी ती पहिलीच अमेरिकन महिला सैनिक होती.
* तिने जिद्दीने ट्रायथलॉनचा सराव केला आणि पारा ऑलिम्पिकचे पदक मिळविण्याचे ध्येय साकार केले.
* * सांगता समारंभात थांगवेलू भारताचा ध्वजवाहक
* उंचउडीत सुवर्णपदक मिळविणारा अ‍ॅथलिट मरियप्पन थांगवेलू याला पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारंभात भारताचा ध्वज नेण्याचा मान मिळणार आहे.
* हा समारंभ १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने ही माहिती दिली.
* गवेलू याने अमेरिकेचा विश्वविजेता खेळाडू सॅम ग्रेवे याच्यावर मात करीत सुवर्णपदक जिंकले होते.
* पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा तिसरा खेळाडू आहे.
वॉव्रींकाने रोखली जोकोविचची घोडदौड
* खेळ आणि वाढते वय याचा कारकिर्दीवर काही एक परिणाम होत नाही, हेच जणू सिद्ध करून दाखवत स्टॅन वॉव्रींकाने वयाच्या ३१व्या वर्षी अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या ४६ वर्षांत अमेरिकन स्पर्धा जिंकणारा वॉव्रींका सर्वात वयस्क खेळाडू ठरला.
* वाव्रींकाने रविवारी झालेल्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे आव्हान ६-७ (१-७), ६-४, ७-५, ६-३ असे मोडून काढले. वॉव्रींकाला तिसरे मानांकन होते. ही लढत चार तासांहून अधिक काळ चालली.
* * दृष्टिक्षेपात लढत * *
* अमेरिकन स्पर्धा जिंकणारा ३१वर्षीय वॉव्रींका सर्वांत वयस्कर खेळाडू. यापूर्वी १९७० मध्ये केन रोसवॉल विजेते
* वयाच्या तिशीत ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पीट सॅम्प्रासनंतर दुसरा खेळाडू
* वॉव्रींकाचे तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद. यापूर्वी २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१५ मध्ये फ्रेंच ओपन
* ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचवर दुसऱ्यांदा मात. यापूर्वी फ्रेंच स्पर्धेत मिळविला होता विजय
* जोकोविच २०११ आणि २०१५ मध्ये विजेता. या वर्षातील तिसऱ्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदापासून वंचित
* निराशेत जोकोविचने रॅकेट मोडली. आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार
* जोकोविच चौथ्यांदा या स्पर्धेत उपविजेता
साक्षी सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर
* रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीचे कांस्य जिंकणारी महिला मल्ल साक्षी मलिक युनायटेड विश्व कुस्तीच्या नव्या क्रमवारीत ५८ किलो वजन गटात करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर दाखल झाली आहे.
* आॅलिम्पिक पदकविजेती पहिली भारतीय मल्ल साक्षीला याआधी कुठलीही रँकिंग नव्हते.
* पुरुष फ्रीस्टाईलमध्ये संदीप तोमर आणि बजरंग पुनिया हे मल्लदेखील आघाडीच्या २० जणांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.
* आॅलिम्पिकच्या पहिल्या लढतीत पराभूत झालेला संदीप ५७ किलो वजन गटात १५ व्या आणि बजरंग ६१ किलो गटात १८ व्या स्थानावर आहे.
तंत्र – विज्ञान
व्हॉट्सअॅपने आणले सेल्फीसाठी नवीन फिचर्स
* सातत्याने नवनवे फीचर्स लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप अपडेट करते. आता आणखी नवे फीचर्स व्हॉट्सअॅपने अॅड अपडेट केले आहेत.
* लेटेस्ट बिटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅपने अपडेट आणले असून, हे अपडेट फोटोशी संबंधित आहे. या अपडेटमुळे फोटो आणि सुंदर बनवता येतात.
* हे फीचर स्नॅपचॅट किंवा अन्य अॅपमध्ये यापूर्वीच उपलब्ध आहेत. सध्या हे अपडेट बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. मात्र ते लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. ऑफिशिअल रिलीजआधाची हे अॅप तुम्ही वापरु शकता.
* तुम्ही एखादा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपवर पाठवणार असाल, तर फोटो काढल्यानंतर तुम्हाला फोटोवर क्रॉपसह अन्य पर्याय दिसतील.
* यामध्ये एक स्मायली, दुसऱ्यामध्ये T आणि तिसऱ्यामध्ये पेन्सिल दिसेल. तुम्ही स्मायलीवाल्या पर्यायावर क्लिक केल्यास, खूप साऱ्या स्माईली दिसतील.
* तुम्ही फोटोसोबत कोणतीही स्माईली अॅड करु शकता. तुम्ही जी स्मायली निवडाल, ती फोटोवर येईल आणि तुम्हाला हवी तिथे ती नेऊन ठेवू शकता.
* दुसरी पर्याय -T : T म्हणजे टेक्स्ट. म्हणजेच तुम्ही फोटोवर काहीही लिहू शकता. T वर टॅप केल्यानंतर की बोर्ड समोर येईल. उजव्या कोपऱ्यात कलरबार दिसेल, त्यापैकी कलर तुम्ही अक्षरांसाठी निवडून शकता.
* टेक्स्ट लिहिल्यानंतर तुम्ही एण्टर किंवा ओके केल्यानंतर, ती अक्षरं फोटोवर दिसतील. तुम्ही हे सुद्धा फोटोवर कुठेही मूव्ह करु शकता.
* तिसरा पर्याय – पेन्सिल या पर्यायाचा वापर तुम्ही डूडलसाठी करु शकता. फोटो आणखी रंजक करण्यासाठी या पर्यायचा वापर करु शकता. या फिचर्सशिवाय व्हॉट्सअपने फ्रंट फ्लॅश हे फिचरही आणलं आहे.
* अंधुक प्रकाशात चांगला सेल्फी घेण्यासाठी फ्रंट फ्लॅश हे फीचर अॅड केलं आहे. सेल्फी घेताना स्क्रीन पांढरी होईल, ज्यामुळे फोटो काढण्यासाठी प्रकाश मिळेल.
* हे अपडेट सध्या बिटा व्हर्जन २.१६.२६४ वर उपलब्ध आहे.
* जर तुम्ही व्हॉट्सअपचे बिटा प्रोग्राम साईनअप केले असेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करु शकता.
भूगर्भातील आण्विक इंधनाची मोजदाद होणार
* पृथ्वीच्या पोटात दडलेले आण्विक इंधन आणि किरणोत्सारी ऊर्जा यांचे मोजमाप २०२५ पर्यंत करता येणे शक्‍य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
* यामुळे या इंधनाचा वापर आणखी किती काळ करता येईल, याचा अंदाज बांधणे सोपे जाणार आहे.
* शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूस्तर हालचाली, ज्वालामुखी आणि चुंबकीय क्षेत्रासाठी पृथ्वीला इंधनाची गरज असते.
* एखाद्या हायब्रीड कारप्रमाणे, पृथ्वी ऊर्जेच्या दोन स्रोतांचा वापर करते. पृथ्वीच्या निर्मितीपासून दडलेली पुरातन ऊर्जा आणि नैसर्गिकरीत्या किरणोत्सर्गापासून तयार होणारी उष्णता या दोन ऊर्जांचा वापर केला जातो.
* ही ऊर्जा मोजण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून करत आहेत.
* यासाठी त्यांनी विविध प्रयोग करत अनेक अंदाज बांधले मात्र, अद्यापही या इंधनाची मोजदाद झालेली नाही.
* अमेरिकेतील मेरीलॅंड विद्यापीठ, प्राग येथील चार्ल्स विद्यापीठ आणि चीनमधील भूगर्भ विज्ञान संस्थेने मात्र पृथ्वीच्या पोटातील आण्विक इंधन २०२५ पर्यंत मोजता येणे शक्‍य असल्याचा दावा केला आहे.
* आतापर्यंतचे सर्वांत सूक्ष्म कण म्हणून विज्ञानाला माहीत असलेल्या "जिओन्यूट्रिऑन्स‘च्या शोधावर या शास्त्रज्ञांचा शोध अवलंबून आहे.
* तारे, सुपरनोव्हा, कृष्णविवर आणि अणुभट्ट्यांमधील आण्विक प्रक्रियेतून हे कण उत्पन्न होतात.
* याशिवाय भूगर्भात होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांच्या विघटनाच्या प्रक्रियेतूनही हे कण निर्माण होतात.
* हे कण शोधण्यासाठी एखाद्या इमारतीच्या आकाराच्या डिटेक्‍टरची आवश्‍यकता असून, तो जमिनीखाली किमान एक मैल खोल ठेवणे आवश्‍यक असते.
* या डिटेक्‍टरमध्ये हायड्रोजन कणांबरोबर धडक बसल्यानंतर हे "जिओन्यूट्रिऑन्स‘ शास्त्रज्ञांना मिळतात. या दोन कणांची धडक बसल्यावर विशिष्ट प्रकारचा प्रकाश बाहेर पडल्याने हे कण ओळखता येतात.
* अशी धडक जितक्‍या वेळा बसेल, तितके युरेनियम आणि थोरीयमचे कण भूगर्भात असल्याचे समजते.
* या घटकांचे पोटॅशियमबरोबर होणाऱ्या विघटनातून पृथ्वीच्या पोटात असलेल्या ऊर्जेचा अंदाज बांधता येईल, असे शास्त्रज्ञांना वाटते.
आंतरराष्ट्रीय
चीनमध्ये बुलेट नंतर आता स्काय ट्रेन
* बुलेट ट्रेन साठी जगात सर्वाधिक लांबीचा मार्ग बनविल्यानंतर आता चीनने स्काय ट्रेन चालविण्याची तयारी पूर्ण केली आहे.
* चायना रेल्वे रॉलिंग स्टॉक कार्पोरेशनशी संबंधित नाजिंग पुझेन कंपनीने शनिवारी स्काय ट्रेन ची पहिली झलक पेश केली. या ट्रेन चे फोटो प्रसिद्ध केले गेले आहेत.
* दोन कंपार्टमेंटच्या या ट्रेन मध्ये एकावेळी २०० प्रवासी बसू शकतात. ट्राम व सबवेच्या तुलनेत ही ट्रेन चालविण्याचा खर्च कमी असतो.
* बॅटरीवर चालणारी ही ट्रेन बॅटरी एकदा चार्ज केली की ४ किमी जाऊ शकते मात्र मध्यल्या स्टेशनवर अवघ्या दोन मिनिटांत तिची बॅटरी बदलता येते.
* हाय विंड रेसिस्टंट क्षमतेची ही रेल्वे तयार करण्यासाठी लागणारा वेळही खूपच कमी आहे.
* ही रेल्वे सुरू झाली की अशा प्रकारची रेल्वे चालविणारा चीन जगात तिसर्‍या नंबरचा देश ठरेल.
* सध्या जपान व जर्मनीमध्ये अशा ट्रेन चालविल्या जात आहेत.
भाताच्या नव्या प्रजातीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य
* ऑस्ट्रेलियन संशोधकांनी भारताच्या एम.एस.स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशनशी भागीदारी केली असून त्यात क्षारता सहन करू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाणार आहे.
* टास्मानिया विद्यापीठ व स्वामीनाथन फाउंडेशन यांच्यात गेल्या आठवडय़ात चेन्नई येथे २० लाख अमेरिकी डॉलर्सचा करार झाला असून त्याला ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीचे पाठबळ आहे. यात क्षारपड जमिनीत टिकाव धरू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाईल.
* भात हे आशियात अनेकांचे अन्न असून एकूण ९२ टक्के उत्पादनही आशियात होते, असे विद्यापीठाच्या अन्न संशोधन विभागाचे प्रमुख होल्गर मेन्क यांनी सांगितले.
* या भागातील भाताच्या उत्पादनावर क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण शेतांमध्ये वाढल्याने परिणाम झाला आहे.
* जमिनी अनुत्पादित होत असून अनेक शेतक ऱ्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. टास्मानिया विद्यापीठाने म्हटले आहे, की टास्मानियन कृषी संस्था जंगली भाताच्या प्रजातीची लागवड क्षारपड जमिनीत करीत आहे.
* जंगली भातातील जनुकांचा वापर नेहमीच्या भाताच्या प्रजातीत केला, तर त्या क्षारपड जमिनीतही वाढू शकतील व जगातील कुठल्याही क्षारयुक्त परिसरात त्यांची वाढ करता येईल. ते म्हणाले, की हा प्रकल्प तीन महिन्यांचा असून सर्जेई शाबाला यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
* ऑस्ट्रेलियाचा क्रमांक भात म्हणजे तांदळाच्या निर्यातीत तिसरा लागतो. कृषी उत्पादनांच्या एकूण निर्यातीत त्या देशाचा नववा क्रमांक आहे.
* मूल्यवर्धित निर्यातीतून ५०० दशलक्ष डॉलर्स तर वार्षिक ८०० दशलक्ष डॉलर्सचा महसूल त्यातून निर्माण होतो.
* क्षारपड जमिनीत उत्पादन देणाऱ्या भाताच्या प्रजातीमुळे भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील शेतक ऱ्यांना फायदा होणार आहे.
* टास्मानिया विद्यापीठ वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे झोंगहुआ चेन यांचेही सहकार्य घेत आहे.
वर्षअखेरीस रशिया-पाकिस्तानचा संयुक्त युद्ध सराव
* रशिया आणि पाकिस्तान यांच्यात जवळीक वाढत चालली आहे. रशिया हा भारताचा जवळचा मित्र आहे.
*  यावर्षाच्या अखेरीस दोन्ही देश संयुक्त लष्करी युद्ध सराव करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच असा युद्ध सराव होत आहे.
* शीतयुध्दाच्या काळात भारत रशियाच्या जवळ होता तर, पाकिस्तानची अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती.
* संयुक्त युद्ध सरावातून दोन्ही देशांमध्ये लष्करी सहकार्य वाढत असल्याचे सुचित होते.
* दोन्ही देशांचे २०० सैनिक या सरावामध्ये सहभागी होणार आहेत.
* वरिष्ठ पाकिस्तानी अधिका-याच्या हवाल्याने 'द एक्सप्रेस ट्रीब्युन'ने हे वृत्त दिले आहे.
* पाकिस्तानचा रशियाकडून अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याचाही विचार आहे.
* या युद्ध सरावाला 'फ्रेंडशिप २०१६' असे नाव देण्यात आले आहे.
* वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर मतभेद निर्माण झाले असून, भारत आणि अमेरिकेची मैत्री अधिक दृढ झाली आहे.
* चीन आणि रशिया हे अमेरिकेचे मुख्य स्पर्धक असून, पाकिस्तान आता या दोन्ही देशांबरोबर आपले संबंध अधिक बळकट करण्यावर भर देत आहे.
भारतीयाचे बुर्ज खलिफामध्ये २२ फ्लॅट
* जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल या भारतीय व्यावसायिकाचे जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’मध्ये तब्बल २२ फ्लॅट असल्याचे वृत्त एका स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.
* मेकॅनिक म्हणून या भारतीय व्यावसायिकाने सुरुवात केली होती.
* सध्या हा व्यावसायिक जीईओ नावाची कंपनी स्थापन करुन वातानुकूलन उद्योगात आपला जम बसवत आहे.
* मी स्वप्न पाहणारा माणूस आहे, त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवणार नाही. जर मला पटणाऱ्या किंमतीत अजून फ्लॅट मिळाले तर मी तेही विकत घेईन, असे या व्यावसायिकाने खलीज टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
* बुर्ज खलिफावरुन केरळमध्ये जन्मलेल्या नेरियापाराम्बिल यांची एका नातेवाईकाने मस्करी केल्यावर फ्लॅट खरेदी करण्यास सुरुवात केली.
* ८२२ मीटर उंचीच्या या इमारतीमध्ये ९००फ्लॅट आहेत.
* यापैकी २२ फ्लॅट या भारतीय व्यावसायिकाचे आहेत. सध्या त्याने ५ फ्लॅट भाड्याने दिले आहेत, तर उरलेल्या फ्लॅटसाठी त्याने भाडेकरुंचा शोध चालवला आहे.
चीनः सर्वांत उंच पूल वाहतुकीसाठी होणार खुला
* चीनमधील ग्वेझोऊ प्रांतात नदीवरील जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम सुरू असून तो लवकरच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
* नदीपासून तब्बल ५६५ मीटर (१,८५४फूट) उंचीवर हा पूल आहे.
* "बेइपानजियांग‘ असे या पुलाचे नाव आहे. या पुलाची लांबी १,३४१ मीटर इतकी असून, त्याची दोन्ही टोके जोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
* या वर्षअखेरीपर्यंत पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा चीन सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
* या पुलामुळे लिउनपान्शुई आणि शुआनवेई या दोन शहरांमधील अंतर पाच तासांऐवजी दीड तासांवर येणार आहे.
* चीनने गेल्याच महिन्यात जगातील सर्वांत मोठ्या लांबीचा काचेचा पूल नागरिकांसाठी खुला केला होता.
* मात्र, गेल्याच आठवड्यात दुरुस्तीसाठी तो बंद करण्यात आला आहे.
राष्ट्रीय
मिस युनिव्हर्ससाठी रोश्मिता हरिमूर्ती भारताची प्रतिनिधी
* यंदाच्या मिस युनिव्हर्स म्हणजे जगतसुंदरी स्पर्धेसाठी बंगलोरची रोश्मिता हरिमूर्ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
* यामाहा फॅसिनो मिस दिवा २०१६ हा किताब तिने नुकताच जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्ससाठी तिची निवड झाली आहे.
* ही स्पर्धा २०१७ च्या सुरवातीला होणार आहे. यामाहा फॅसिनो मिस दिवासाठी मॉडेल व अभिनेत्री लारा दत्त, अर्जुन रामपाल, अभिनेता अभय देओल, अभिनेत्री आदिती राव हैदरी व डिझायनर गौरव गुप्ता यांनी जज म्हणून काम पाहिले.
* या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनेत्री परिणिती चोप्रा सह अन्य अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला होता.
*  ही स्पर्धा २००० साली लारा दत्तने जिंकली होती त्यानंतर हा ताज अद्यापी भारताला मिळवता आलेला नाही.
* या स्पर्धेसाठी देशभरातील १६ स्पर्धक होते. त्यात श्रीनिधी शेट्टीही पहिली तर आराधना बोर्गोहेन ही दुसरी रनरअप ठरली.
'वनी' पुन्हा चर्चेत, काश्मीरचा सुपुत्र करणार देशाचं रक्षण
* हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी 'बुरहान वणी' मारला गेल्यामुळे एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच त्याच काश्मीरमध्ये 'वनी' या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
* मात्र हा 'वनी' म्हणजे काश्मीरचा सुपूत्र बीएसएफचे सहायक कमाडंट परिक्षेतील टॉपर नबील अहमद वनी होय..
* २६ वर्षीय नबील अहमद वनी देशाच्या रक्षणासाठी लवकरच सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रुजू होणार आहे.
* केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतीच वनी यांची भेट घेतली. बीएसएफच्या प्रमुखांनीच वनी आणि सिंग यांची भेट घालून दिली.
* उधमपूरच्या या तरूणाचं कौतूक करताना राजनाथ यांनी 'तुम्ही' राज्यातील तरूणांचे आदर्श असल्याचं म्हटलं आहे.
* नबील अहमद सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रूजू होणार असून त्यांच्या या यशामुळे त्यांची आई हनीफा बेगम देखील आनंदी आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केली दोन मंत्र्यांची हकालपट्टी
* भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री गायत्री प्रजापती आणि राजकिशोर सिंह यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.
* उत्तर प्रदेशात खाण राज्यमंत्री असलेले गायत्री प्रजापती आणि पंचायत राज मंत्री राजकिशोर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
* खाणकाम प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे प्रजापती यांच्यावर, तर सिंह यांच्यावर अवैधरित्या जमीन बळकाविल्याचा आरोप असून या दोघांच्या कामगिरीबद्दल अखिलेश यादव यांनी नाराजी दर्शविली होती.
* उत्तर प्रदेशात पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्यापूर्वीच अखिलेश यादव यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्यास सुरवात केली आहे.
अरुणाचलचे राज्यपाल राजखोवा पदमुक्त
* केंद्र सरकारच्या सल्ल्यास न जुमानणारे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांना आज अखेर पदमुक्त करण्यात आले.
* राष्ट्रपती भवनातर्फे जारी केलेल्या पत्रकानुसार राजखोवा यांचे राज्यपालपद काढून घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
* मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांच्याकडे अरुणाचलच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी तत्काळ देण्यात आली आहे.
* अरुणाचलच्या राज्यपालपदाबाबत पुढील व्यवस्था होईपर्यंत ते ही जबाबदारी सांभाळतील, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कावेरीचे पाणी पेटले
* कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हिंसाचार सुरू झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
* दोन्ही राज्यांत ट्रक्स आणि हॉटेल्सवर हल्ले सुरू असून, बंगळुरूमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागात हिंसाचाराचे प्रकार घडले.
* त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या राजधानीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
* बंगळुरूमध्ये आगारात उभ्या असलेल्या २० बसना आगी लावल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली.
* बंगळुरूच्या पिनया भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून, परिस्थिती चिघळत चालल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र
पदोन्नती नाकारल्यास तीन वर्षे वाट पाहावी लागणार
* पदोन्नती नाकारण्याच्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठीचे नवे धोरण आज राज्य सरकारने जाहीर केले.
* पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार देणाऱ्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या निवड यादीतून काढण्यात येईल.
* तसेच, पुढील दोन वर्षे निवडसूचीमध्ये त्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षीच्या निवडसूचीत त्यांची पदोन्नतीसाठीची पात्रता तपासण्यात येणार आहे.
* त्या वेळच्या गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी/कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास त्यांचा नियमित निवडसूचीत समावेश करण्यात येणार आहे.
* उदा. २०१५ च्या निवडसूचीसाठी (१.९.२०१४ ते ३१.८.२०१५) १५.१.२०१५ रोजी झालेल्या निवडसूचीत एखाद्या अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला असेल व त्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास त्यांचे नाव २०१५ च्या निवडसूचीतून वगळून त्यांचा २०१६ व २०१७ च्या निवडसूचीकरता देखील विचार न करता २०१८ च्या निवडसूचीसाठी विचार करण्यात येणार आहे.
* पदोन्नती नाकारल्याच्या तीन वर्षांनंतर दुसऱ्या वेळच्या निवडसूचीकरता विचार करण्यात येईल. त्यानंतर पदोन्नतीस पात्र ठरल्यास मात्र, संबंधिताने पुन्हा पदोन्नतीस नकार दिला तर त्याचा पुढील दोन वर्षे निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही.
* पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची वरच्या पदावरील सेवाज्येष्ठता ही ज्यावेळी संबंधित अधिकारी/कर्मचारी पुढील निवडसूचीत (तीन वर्षांनंतरच्या) पदोन्नतीस पात्र ठरेल व प्रत्यक्ष पदोन्नतीच्या पदावर रुजू होईल त्या दिनांकापासून विचारात घेतली जाईल.
* पदोन्नती नाकारलेल्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ दिले असल्यास ते काढून घेण्यासंदर्भात वित्त विभागाच्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात येईल.
* पदोन्नती नाकारलेल्यांमुळे रिक्त झालेल्या किंवा रिक्त होणाऱ्या पदावर संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या प्रवर्गानुसार व ज्येष्ठतेनुसार पात्र कनिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्याचा समावेश निवडसूचीत करण्यात येणार आहे.
* ज्या अधिकारी/कर्मचाऱ्याने कायमस्वरुपी पदोन्नती नाकारली आहे त्याचा पुढील कोणत्याही काळासाठी निवडसूचीकरता विचार करण्यात येणार नाही.
* * पदोन्नती नाकारण्यामागे विभागीय संवर्ग * *
* पदोन्नतीच्या यादीत क्रमानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक अशीच पसंती असते. विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने ही अट टाकली.
* त्यामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा पदोन्नती नाकारण्याकडे अधिक कल असतो. तसेच, विदर्भातील अधिकाऱ्यांना अन्य विभागात जावे लागते.
बालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार
* बालचित्रवाणीच्या गेल्या चार वर्षे प्रलंबित प्रश्नावर आता अखेर तोडगा निघाला असून ‘जे चालत नाही ते दुकान कशाला चालू ठेवायचे?’ असे म्हणून बालचित्रवाणी ही संस्था बालभारतीत विलीन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिली.
* बालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.
*  बालचित्रवाणीचे काय होणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात प्रलंबित आहे. त्याबाबतच्या विविध चर्चावर तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी पडदा टाकला.
* ‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दूरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच उपयोग नाही,’ अशी टिपणी करून राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच बालचित्रवाणी आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती, तावडे यांनी दिली.
* बालभारतीची ई-लìनग शाखा म्हणून बालचित्रवाणी काम करणार आहे.
मुंबई महापालिकाच उभारणार "स्मार्ट सिटी'
* केंद्र सरकारने नाकारलेला "स्मार्ट सिटी‘चा प्रकल्प मुंबई महापालिका स्वत: राबवणार आहे.
* महापालिकेच्या निर्णयामुळे गिरणगाव भविष्यात "बिझनेस हब‘ होणार आहे.
* "स्मार्ट सिटी‘अंतर्गत प्रस्तावित केलेली विकासकामे प्राधान्याने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
* लोअर परळ परिसराचा विकास करण्यासाठी महापालिकेने एक हजार कोटींचा आराखडा तयार केला होता.
* * असा आहे आराखडा * *
* लोअर परळ रेल्वे स्थानकाच्या बरोबरच एल्फिन्स्टन रोड, करी रोड, परळ, महालक्ष्मी, चिंचपोकळी या स्थानकांच्या परिसरात "सॅटिस‘ योजना राबवून वाहतूक सुरळीत करणार.
* दररोज परिसरातील ३६५ टन कचऱ्याचे संकलन.
* कचऱ्यावर प्रक्रियेसाठी बायोमिथेनायझेशनचे दोन प्रकल्प.
* १०० टक्के व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम.
* एका वर्षात २० तास आणि पुढील तीन वर्षांत २४ तास पाणीपुरवठा.
सरकार ठरवणार दूध, साखर, डाळींचे दर
* सरकार एमआरपीच्या नावाखाली मनमानीपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यांना चाप लावणार असून यापुढे सरकार डाळ, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर निश्चित करणार आहे.
* हा निर्णय ग्राहक आणि अन्न-नागरी पुरवठा खात्याने घेतला असून सुट्या आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरात मोठा फरक असतो.
* म्हणून अनेकदा दुकानदार हव्या त्या किमतींना वस्तूंची विक्री करतात.
* त्यामुळे सरकार हा महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे.
* तसे झाल्यास सरकारने निश्चित केलेल्या दरांपेक्षा दुकानदाराला त्यापेक्षा वाढीव दराने विक्री करता येणार नाही.

* तरीही एखाद्या दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरुच असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद केली गेली आहे.
१४.०९.२०१६
अर्थसत्ता
चीन घेणार ६८ लाख कोटींची विमाने
* चीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार वाढत असून, चीनमधील विमान प्रवासी कंपन्या पुढील २०  वर्षांत बोइंगकडून १.०२५ ट्रिलियन डॉलरची (सुमारे ६८ लाख कोटी रुपये) विमाने खरेदी करणार आहेत.
* २०३५ पर्यंत सुमारे ६ हजार ८१० बोइंग विमानांची मागणी चीनमधून नोंदविली जाईल. आधीच्या २०३४ पर्यंतच्या अंदाजात आणखी ७.६ टक्के वाढ झाली आहे.
* चीनमधून विमानांची मागणी वाढणार असली तरी अमेरिकी कंपन्यांकडून मागणी घटू लागली आहे.
* अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती याला कारणीभूत ठरली आहे.
* यामुळे अमेरिकी कंपन्या चिंतित आहेत. बोइंग आणि तिची युरोपमधील प्रतिस्पर्धी एअरबस चीनमधील बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
* चीनचे नागरी हवाई क्षेत्र सर्वाधिक वेगाने वाढत आहे. यामुळे कंपन्या येथे उत्पादन प्रकल्प उभारत आहेत.
* बोइंगने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील ५० टक्के व्यावसायिक विमाने त्यांच्या कंपनीची आहेत.
* * विमान निर्मितीत चीनचा शिरकाव
* चीन स्वतः विमाननिर्मिती करण्याची क्षमता विकसित करण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे.

* चीनचे प्रलंबित "सी ९१९‘ हे विमान या वर्षीच्या अखेर पहिले उड्डाण करणार आहे. "सी ९१९‘ ची स्पर्धा "बोइंग ७३७‘ आणि "एअरबस ए ३२०‘ या विमानांशी असेल.
ब्रिटनच्या चलनात आल्या प्लॅस्टिक नोटा!
* गेल्या दोन शतकांहून अधिक काळ कागद व कापड यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या चलनी नोटा वापरणाऱ्या ब्रिटनमध्ये मंगळवारपासून पहिली प्लॅस्टिकची नोट चलनात आली.
* ब्रिटनमध्ये सध्या ५, १०, २० व ५० पौंडाच्या नोटा चलनात आहेत. ५ पौंड मूल्याच्या नोटा सर्वप्रथम पॉलिमरवर छापण्यात आल्या.
* १० आणि २० पौंडाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अनुक्रमे सन २०१७ व २०२० मध्ये चलनात आणल्या जातील.
* मात्र, ५० पौंडाच्या प्लॅस्टिकच्या नोटा काढण्याचा सध्या तरी विचार नाही, असे बँक आॅफ इंग्लंडने स्पष्ट केले आहे.
* ५ पौंडाच्या प्लॅस्टिक नोटेवर एका बाजूला दुसरे महायुद्ध जिंकणारे ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे, तर दुसऱ्या बाजूला महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे.
* चर्चिल यांच्या चित्राच्या खाली त्यांनी पंतप्रधान या नात्याने १३ मे १९४० रोजी हाउस आॅफ कॉमन्समध्ये केलेल्या पहिल्या भाषणातील ‘मी तुम्हाला रक्त, कष्ट, अश्रू आणि घामाशिवाय दुसरे काही देऊ शकत नाही’ हे गाजलेले वचन छापलेले आहे.
अर्थसंकल्पांच्या एकत्रीकरणामुळे रेल्वेचे वाचणार १० हजार कोटी रुपये
* रेल्वेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन केल्यानंतर, भारतीय रेल्वेचे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत.
* विलिनीकरणानंतर केंद्र सरकारला कोणताही लाभांश देण्याचे बंधन रेल्वेवर राहणार नाही.
* रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुमारे ९० वर्षे जुनी आहे.
* रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर होत असल्यामुळे, रेल्वेविभाग सरकारच्या अंगीकृत उपक्रमाच्या कक्षेत येतो.
* त्यामुळे सरकारी मालकीच्या कंपन्या जसा सरकारला लाभांश देतात, तसाच लाभांश रेल्वेलाही द्यावा लागतो.
* स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प संपल्यानंतर लाभांशही संपुष्टात येईल.
* रेल्वे दरवर्षी सुमारे १० हजार कोटींचा लाभांश केंद्र सरकारला देते, तसेच सरकारकडून ४० हजार कोटींची मदत रेल्वेला मिळते.
* सर्वसाधारण अर्थसंकल्पात वित्तमंत्री रेल्वेच्या योजना आणि योजनाबाह्य खर्च वेगळ्या परिशिष्टात देतील, असे सूत्रांनी सांगितले.
जन धन बँक खात्यात ‘रुपया’चे सरकारी दान!
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनातून दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘जन धन’ योजनेच्या सफलतेचा आव म्हणून शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यात ‘आपोआप’ रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे.
* जन धन बँक खाते कार्यरत आहेत, असे दाखविण्यासाठी प्रसंगी संबंधित बँक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रतिनिधी यांना आपल्या खिशातून एक रुपया या खात्यात जमा करण्याचे तोंडी आदेश असल्याचे दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या शोधमोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
* पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत शून्य रक्कम (झीरो बॅलेन्स) बँक खाते देशभरातील सर्व बँकांमध्ये २८ ऑगस्ट २०१४ पासून सुरू करण्यात आले.
* अगदी कोणत्याही रकमेशिवाय असे बँक खाते केवळ आधार क्रमांकाद्वारे सुरू करण्याच्या या मोहिमेत बँकांनी हिरीरीने सहभागी होती निर्धारित लक्ष्यापेक्षा खूप अधिक संख्येने ्नखाते उघडून आजवर बँकांच्या परिघाबाहेर असलेल्या लोकांना सामावून घेतले.
* मात्र पहिल्या वर्षांत अशा १७.९० कोटी जन धन बँक खात्यांपैकी निम्मी शून्य शिलकी खातीच राहिली.
* पण चालू वर्षांच्या ऑगस्टपश्चात मात्र संबंधित खातेदाराने रक्कम जमा न करताही त्याच्या शून्य शिलकी खात्यात अकस्मात रक्कम झाल्याचे आढळून आले आहे.
* याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या विविध वार्ताहरांनी देशभरातील राष्ट्रीयीकृत बँका तसेच त्यांच्या शाखांकडून माहितीच्या अधिकारात मिळविलेली माहिती आणि संबंधित खातेदारांशी संपर्क साधून याबाबतची तपास मोहीम राबविली.
* वार्ताहरांनी क्षेत्रीय ग्रामीण बँकांसह ८२ बँकांकडे संपर्क साधला. पैकी ३४ बँकांनी जन धन खात्यांबाबतची माहिती दिली. सहा राज्यातील २५ गावे आणि चार शहरांमध्ये वार्ताहरांनी प्रत्यक्ष भेटही दिली.
* आपण खात्यात पैसे टाकले नसताना खात्यात  एक रुपया जमा झाल्याचे ज्ञात असलेल्या ५२ खातेदारांशीही बातचीत करण्यात आली.
* ऑगस्ट २०१४ मध्ये जन धन योजना घोषित झाल्यानंतर वर्षभरात, २६ ऑगस्ट २०१५ पर्यंत १७.९० कोटी जन धन खाती होती.
* ती पुढील आणखी एका वर्षांत, ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत २४.१० कोटी झाली. ३१ ऑगस्ट २०१६ अखेर या खात्यातील रक्कम ४२,०९४ कोटी रुपये झाली.
क्रीडा
रिओतील सुवर्णही अंध धावपटूंपुढे फिके
* रिओ डी जानेरो : येथे सुरु असलेल्या अपंगांच्या पॅरालिम्पिकमध्ये १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्या चार क्रमांकांवर आलेल्या अंध धावपटूंनी महिनाभरापूर्वी याच स्टेडियममध्ये १५०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमेरिकेच्या आॅलिम्पिकवीराहून अधिक वेगाने धावण्याची किमया करून सर्वांना थक्क केले.
* रिओ आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकासाठी नोंदल्या गेलेल्या वेळेहून या चारही अंधांचा वेळ एवढा कमी होता की त्यांच्यापैकी चौथा आलेला रिओ आॅलिम्पिकमध्ये धावला असता तरी त्याने १५०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक आरामात खिशात टाकले असते!
* धडधाकट खेळाडूंच्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धा गेल्याच महिन्यांत संपल्या.
* त्यातील १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या मॅथ्यु सेंट्रोवित्झ (ज्यू.) याने ३ मिनिटे ५० सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळविले होते.
* त्याच स्टेडियममध्ये सोमवारी पॅरालिम्पिकमधील ‘टी ११’, ‘टी १२’ व ‘टी १३’ या गटांतील अंधांची १५०० मीटर धावण्याची शर्यत झाली.
* त्यात अब्देललतीफ बाका, तामिरु डेमिसे, हेन्री किरवा आणि फौआद बाका या पहिल्या चार अनुक्रमांनी आलेल्या धावपटूंनी हे अंतर सेंट्रोवित्झपेक्षा कमी वेळेत पार केले.
* अल्जेरियाच्या अब्देललतीफ बाका याने ३ मिनिटे ४८.२९ सेकंदांत १५०० मीटरचे अंतर धावून सुवर्णपदक मिळवितानाच पॅरालिम्पिकमधील या शर्यतीचा नवा विश्वविक्रमही प्रस्थापित केला.
* रिओ आॅलिम्पिकचे सुवर्णपदक मिळविणाऱ्या सेंट्रोवित्झहून त्याने घेतलेला वेळ तब्बल १.७ सेकंदाने कमी होता.
* तामिरु डेमिसे (इथिओपिया) रौप्यपदकाचा (३:४८.४९ मिनिटे) तर केनियाचा हेन्री किरवा (३:४९.५९ मिनिटे) ब्रॉन्झपदकाचा मानकरी ठरला.
* फौआद बाका (३:४९.८४ मिनिटे) चौथा आला.
* या अंध धावपटूंना धावताना कोणतेही साधन वापरण्यास मज्जाव असतो, हेही लक्षात घ्यायला हवे.
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक
* रिओमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियाने एफ ४६ प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
* २००४ अॅथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावताना देवेंद्रने रचलेला विश्वविक्रम स्वत:च मोडीत काढला.
* त्यावेळी देवेंद्रने ६२.१५ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदक मिळवले होते. रिओमध्ये देवेंद्रने आपल्याच कामगिरीत सुधारणा केली.
* त्याने ६३.९७ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली.
* ३६ वर्षीय देवेंद्र जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर आहे.
* पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे सुवर्ण आणि एकूण चौथे पदक आहे.
* सोमवारी दीपा मलिकने गोळाफेकमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती.
* पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला क्रीडापटू आहे.
* तामिळनाडूच्या मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंचउडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
* याच प्रकारात तिसऱ्या स्थानावर राहिलेला उत्तर प्रदेशचा २१ वर्षांचा वरुणसिंग भाटी कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
* त्याला २००४ साली अर्जुन पुरस्कार आणि २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
* हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय पॅरालिम्पियन खेळाडू आहे.
आर. श्रीधर होणार भारताचे 'फिल्डिंग कोच'
* न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता आहे.
* सध्या श्रीधर हे भारतीय ‘अ‘ संघाच्या क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आहेत.
* न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी ते संघात दाखल होतील.
* गेल्या एप्रिलमध्ये भारतात झालेली ट्‌वेंटी-२० विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर श्रीधर यांचा भारतीय संघाबरोबर असलेला करार संपुष्टात आला होता.
* त्यानंतर पुन्हा त्यांचीच नियुक्ती करण्याविषयी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे विशेष आग्रही होते.
* वेस्ट इंडीजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाचे तात्पुरते प्रशिक्षक देण्यात आले होते.
* ‘इतर सर्व प्रशिक्षकपदासाठी पूर्ण वेळ नियुक्ती १५  सप्टेंबरनंतर केली जाईल,‘ असे ‘बीसीसीआय‘चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते.
* फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची नियुक्ती कायम राहील.
* तसेच, न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपेपर्यंत गोलंदाजीच्या प्रशिक्षकाचा निर्णय होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दीपा मलिकने जिंकले रौप्यपदक
* भारताच्या दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरी करताना रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळाफेक एफ-५३ प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.
*  विशेष म्हणजे पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असा इतिहास दीपाने या वेळी रचला.
* दीपाने चमकदार कामगिरी करताना आपल्या सहा संधींमध्ये ४.६१ मीटरची सर्वोत्तम फेक करून रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
* या पदकासह यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण ३ पदकांची नोंद झाली आहे.
* विशेष म्हणजे दीपाच्या या घवघवीत यशानंतर हरियाणा सरकारच्या योजनेनुसार दीपाला तब्बल ४ कोटी रुपयांचा आर्थिक पुरस्कार मिळेल.
* दरम्यान, बहारीनच्या फातिमा नदीमने ४.७६ मीटरची सर्वोत्कृष्ट फेक करीत सुवर्णपदकावर नाव कोरले.
* तर, यूनानच्या दिमित्रा कोरोकिडाला ४.२८ मीटरच्या फेकीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
तंत्र – विज्ञान
‘प्रथम’ लघू उपग्रहाचे प्रक्षेपण महिनाअखेरीस
* ‘त्सुनामी’सारख्या महाप्रलयाची पूर्वकल्पना देऊ शकणारा आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’ लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे.
* या लघू ग्रहाचे प्रक्षेपण इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरमधून सप्टेंबरच्या अखेरीस करणार आहे.
* आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ नावाचा उपग्रह तयार केला.
* एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर यांच्या संकल्पनेतून हा उपग्रह बनवण्यात आला.
* २००९ साली इस्रोसोबत या लघू उपग्रहासंदर्भात सामंजस्य करार झाला.
* हा करार २०१४ पर्यंत वाढविण्यात आला, पण या लघू उपग्रहाच्या प्रक्षेपणाला इस्रोचा हिरवा कंदील मिळत नव्हता.
* अखेर आठ वर्षांनंतर इस्रोकडून ‘प्रथम’ ला हिरवा कंदील मिळाला असून, महिन्याअखेरीस त्याचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार आहे.
* प्रथम या उपग्रहाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी घेतली आहे.
* नासाचे माजी प्रशासक डॉ. मायकल ग्रिफीन यांनी विद्यार्थ्यांच्या या शोधाचे आणि कल्पक वृत्तीचे कौतुक केले, शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधूनही ‘प्रथम’चे कौतुक करण्यात आले आहे.
आता ऐकताही येणार व्हॉट्सअॅपचे मेसेजेस !
* सातत्याने नवनवीन कल्पना राबवून सोशल मेसेजिंगसाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअॅप अप टू डेट राहत असते.
* व्हॉट्सअॅपने काही महिन्यापूर्वी संदेश पाठविण्याबरोबरच व्हाईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
* आता व्हॉट्सअॅप एक पाऊल पुढे टाकत मेसेजेस वाचण्याबरोरच ऐकण्याची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे.
* व्हॉट्सअॅप कोणी पाठविलेला मजकूर ऐकण्यासाठी ‘स्पिक‘ नावाचे नवीन ऑप्शन असणार आहे.
* या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मजकूर ऐकता येणार आहे.
* आयफोन धारकांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
* व्हॉट्सअॅपचा उपयोग ग्रुप चॅटींग अथवा वैयक्तीक चॅटींगसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
* नेटीझन्सची गरज व मागणी ओळखून व्हॉट्सअॅपकडून नवनवीन सुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो.
आंतरराष्ट्रीय
डेव्हिड कॅमेरॉन यांचा राजकारण संन्यास
* ब्रेक्‍झिटच्या मुद्यावर पायउतार झालेले ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी आज आपल्या संसद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.
* त्यांचा हा राजकारणातून संन्यास असल्याचे मानले जात आहे.
* पंतप्रधानदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ तीन महिन्यांतच कॅमेरॉन यांनी हा निर्णय घेतला आहे.
* पाठीमागच्या बाकांवर बसणे "अत्यंत अवघड‘ असून आणि नव्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासाठी अडथळा बनू इच्छित नाही, असे कॅमेरॉन यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले.
* २००१ पासून ऑक्‍सफोर्डशायरमधील विटने मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत असलेले कॅमेरॉन हे २००५ पासून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख नेते होते.
* २०१०  पासून सहा वर्षे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद सांभाळले होते.
भारताला विमान देण्यावर चीन नाराज
* भारताला गस्ती विमाने विकण्याच्या जपानच्या निर्णयावर चीनने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
* या निर्णयाच्या आडून चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्यास हे "अशोभनीय‘ कृत्य समजले जाईल, असा इशाराही चीनने दिला आहे.
* याबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की दोन देशांमध्ये संरक्षण सहकार्य होण्याला आमचा आक्षेप नाही.
* मात्र चीनवर दबाव आणण्यासाठी हे केले जात असेल, तर असे कृत्य अशोभनीय आहे.
* भारताला १.६ अब्ज डॉलर किमतीचे अत्याधुनिक गस्ती विमान विकत देण्याचा जपानचा विचार आहे.
यंदाचा ऑगस्ट महिना १३६ वर्षांतील सर्वात उष्ण
* यंदाचा म्हणजे ऑगस्ट २०१६ हा महिना गेल्या १३६ वर्षांत सर्वात उष्ण होता.
* गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून नंतरच्या सलग अकरा महिन्यात तापमानाचे उच्चांक मोडले गेले असे नासाने म्हटले आहे.
* मोसमी तापमानाचे चक्र जुलै ते ऑगस्ट २०१६ दरम्यान बदलले होते व तापमान जास्त होते. आतापर्यंतचा सर्वात उष्ण ऑगस्ट या वर्षी नोंदला गेला.
* नासाच्या गोडार्ड इन्स्टिटय़ूट फॉर स्पेस स्टडीज या संस्थेने म्हटले आहे की, २०१४ च्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात तापमान ०.१६ अंशांनी जास्त होते.
* गेल्या महिन्यात तापमान १९५१ ते १९८० या काळातील ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात तपमान ०.९८ अंश सेल्सियसने जास्त होते.
* जीआयएसएसचे संचालक गाविन श्मिडट यांनी सांगितले की, मासिक तापमान काही शंभरांशांनी बदलत असतात.
* दीर्घकालीन कल हे यात महत्त्वाचे असून त्यात ग्रहामध्ये होणारे बदल महत्त्वाचे आहेत.
* ऑगस्ट महिन्यात तापमान जास्त होते हे तर खरेच पण गेले लागोपाठ ११ महिने हे तापमान जास्तच राहिले.
* ऑक्टोबर २०१५ पासूनच्या नोंदी यात गृहित आहेत. मासिक विश्लेषणानुसार ६३०० हवामान केंद्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे निष्कर्ष काढले आहेत.
* जहाजे व तरंगती उपकरणे यांच्या मदतीने सागराचे तपामान मोजले असून अंटाक्र्टिक संशोधन केंद्रानेही तापमानांचे मापन केले आहे.
* आधुनिक जागतिक तापमानाची सर्वात जुनी नोंद १८८० मधील असली तरी ते तापमान पृथ्वीच्या विस्तीर्ण भागात नोंदलेले होते असे म्हणता येत नाही कारण तेव्हा तशा सुविधा फार कमी होत्या.
अफगाणिस्तानला भारताकडून लष्करी सहाय्याची अपेक्षा
* सातत्याने युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जात असलेल्या अफगाणिस्तानला भारताकडून लष्करी सहाय्याची अपेक्षा आहे.
* अफगाणिस्तानाचे अध्यक्ष अश्रफ गनी आपल्या दोन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यात याबद्दल चर्चा करणार आहेत.
* भारताच्या दौऱ्यात गनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असून या दोघांची संयुक्त पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे.
* अभियांत्रिकी संसाधने, पायाभूत सुविधा, लष्करी प्रशिक्षण, लष्करी दलांना शस्त्रपुरवठा, प्रशिक्षण, परस्परांना आपल्या सुविधा वापरण्याची मुभा या बाबतीत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे.
* अफगाणिस्तानातील वर्षानुवर्ष चालत आलेली अशांतता, अंतर्गत संघर्ष, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय युद्धनीती याबाबत गनी हे भारतीय युद्धनीतीचा ‘थिंक टँक’ असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस’च्या संरक्षण तज्ज्ञांना संबोधित करणार असून त्यांच्याशी सल्ला- मसलतही करणार आहेत.
'भारत-बांगलादेश संबंध नव्या उंचीवर'
* भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोचले असून, दोन्ही देश विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांत असल्याचे प्रतिपादन भारताचे बांगलादेशमधील उच्चायुक्त हर्षवर्धन श्रींगला यांनी केले.
* ते सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्रिपुरा येथे पत्रकारांशी बोलत होते.
* बांगलादेशने दहशतवादाविरोधात उघडलेली मोहीम कौतुकास्पद असून, भारताने यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन बांगलादेशला दिले आहे.
* द्विपक्षीय संबंधांबरोबर राज्यांशी विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात असून, त्रिपुरा व बांगलादेशमधील संबंध याची प्रचिती देतात, असे श्रींगला यांनी स्पष्ट केले.
* बांगलादेशने भारतास मेघना नदीवरील बंदर आणि नदीमार्गाबरोबर आसाम, आगरताळा सीमेवरील मार्गाचा वापर करण्यासही परवानगी दिली आहे.
* आसाम-आगरताळा महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून, त्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रीय
सिक्कीमच सर्वात स्वच्छ
* देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून सिक्कीमची निवड करण्यात आली आहे.
* आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांत पहिल्या दहा जिल्ह्यांत सिक्कीमच्या चार जिल्ह्यांनी स्थान पटकावले होते.
* ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१६’ च्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या अहवालानुसार सिक्कीमने यात १०० पैकी ९८.२ टक्के गुण मिळविले.
* यासाठी किती टक्के घरांमध्ये स्वच्छतागृहे आहेत याचा आधार ठरविण्यात आला होता.
* किती टक्के लोक घरातील स्वच्छतागृहाचा/सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करतात त्यासाठी १०० गुण ठरविण्यात आले होते.
* त्या निकषावर सिक्कामने १०० गुण प्राप्त केले, असे सिक्कीमने निवेदनाद्वारे जाहीर केले.
* पाहणीतील स्वच्छतेच्या सर्व निकषांत देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सिक्कीमच्या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
टाटांसाठी ममता बॅनर्जी यांचा नवा प्रस्ताव
* सिंगूरमध्ये टाटा कंपनीला सोसावा लागलेल्या तोटा भरून काढण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने त्या कंपनीसमोर औद्योगिकनगरी उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा नवा प्रस्ताव ठेवण्याची तयारी केली आहे.
* तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सिंगूरमध्ये टाटा कंपनीच्या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर नॅनोनिर्मितीचा कारखाना उभारण्याचा निर्णय कंपनीने २००८ मध्ये रद्द केला होता.
* सिंगूरऐवजी टाटा समूहाला पर्यायी जमीन देण्याचा प्रस्ताव तयार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अमित मिश्रा यांनी सांगितले. आमच्याकडे जमिनी आणि त्यांचे नकाशे तयार आहेत.
* पश्चिम मिदनापोरमधील गोलटोर येथे एक हजार एकर जमीन आम्ही देऊ शकतो, त्याचप्रमाणे पुरुलियातील रघुनाथपूर येथील २६०० एकर जमीन तयार आहे, रेल्वेसाठी आम्ही ६०० एकर जमीन तयार ठेवली आहे तरीही औद्योगिकनगरीसाठी ६०० एकर जमीन स्वतंत्रपणे ठेवण्यात आली आहे.
* टाटा समूह प्रकल्पाबाबत गंभीरतेने विचार करणार असल्यास चर्चेद्वारे ते क्षेत्र औद्योगिकनगरी म्हणून तयार करता येऊ शकते, असे मिश्रा यांनी सांगितले.
* पुरुलियाप्रमाणेच खरगपूर येथेही टाटाचा प्रकल्प येऊ शकतो, तेथे आम्ही ८०० एकर जमीन मोकली ठेवलेली आहे, वर्धमानमध्ये पन्हागड येथे ७०० एकर जमीन उपलब्ध आहे.
* टाटा स्टील अथवा टाटा मेटालिंक तेथे उद्योग उभारू शकतात, टाटा मोटर्सनेच प्रकल्प उभारला पाहिजे असा आमचा आग्रह नाही.
* राज्य सरकार रोखीने नुकसानभरपाई देण्याच्या स्थितीत नाही, मात्र जमिनीच्या स्वरूपात नुकसानभरपाई होऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
"ब्रिक्‍स' पर्यावरण मंत्र्यांची शुक्रवारी बैठक
* ब्रिक्‍स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक शुक्रवारी केळशी येथील पार्क हयात हॉटेलमध्ये होणार आहे.
* परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.
* बैठकीचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल खात्याचे राज्यमंत्री अनिल माधव दवे उद्या गोव्यात येत आहेत.
* पर्यावरणासंदर्भातील परस्पर सामंजस्य करार आणि संयुक्त कार्यगट या विषयावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे.
* "ब्रिक्‍स‘ समूहातील देशांचे पर्यावरण मंत्री वायुप्रदूषण, जल प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, हवामानबदल, जैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या गंभीर मुद्‌द्‌यांवर सहकार्याने कृती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाण्याची शक्‍यता आहे.
* * बैठकीकडे जगाचे लक्ष
* ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या "ब्रिक्‍स‘ समूहातील राष्ट्रांचा जागतिक लोकसंख्येत वाटा ४१.६ टक्के, जागतिक भू-भागाच्या २९.३१ टक्के भूभाग व्यापला आहे आणि जागतिक "जीडीपी‘मध्ये २२ टक्के वाटा आहे.
* "ब्रिक्‍स‘ समूहातील देशांकडे समृद्ध अशी नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधता आढळते.
* या बैठकीकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.
महाराष्ट्र
‘नैना’ विकासासाठी चिनी कंपनी
* बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात अल्पावधीत जगात प्रसिद्ध झालेली चायना फॉरच्युन लॅन्ड डेव्हलपमेंट (सीएफएलडी) कंपनी सिडको क्षेत्रातील नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) भागात शहर वसविण्यास इच्छुक आहे.
* त्यासाठी त्यांना विस्तीर्ण अशा जमिनीची आवश्यकता असून त्या संदर्भात बुधवारी मुंबईत एक सामंजस्य करार होणार आहे.
* पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीला हिरवा कंदील दिला आहे.
* सिडकोने नैना क्षेत्रात स्वेच्छा विकास योजना राबवली आहे. त्या अनुषंगाने सिडकोकडे जमीन उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* राज्य सरकारकडून चार एफएसआय पदरात पाडून पनवेल तालुक्यात हिरानंदानी, इंडिया बुल, अरिहंत यासारख्या बडय़ा विकासकांनी टोलोजंग वसाहती उभारल्या आहेत.
* या वसाहतीतील काही घरे सरकारला देऊन हा विकास ह्य़ा कंपन्या साधत आहेत.
* चीनमधील शांघाय, बीजिंग, सिझोन यासारख्या तीस जिल्ह्य़ात अख्खी शहरे वसविणाऱ्या सीएफएलडी या कंपनीला रायगड जिल्ह्य़ात विकास करण्याची इच्छा असून त्यांना विस्तीर्ण अशा जमिनीची गरज आहे.
* बाराशेपेक्षा जास्त तंत्रज्ञ या कंपनीच्या दावणीला कायमस्वरूपी असून जगातील पहिल्या पाचशे कंपन्यांमध्ये या कंपनीने मागील वर्षी स्थान प्राप्त केले आहे.
* सिडकोला सरकारने    रायगड जिल्ह्य़ातील २७० गावांजवळच्या ६० हजार हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.
* सिडकोने त्यातील ३७ हेक्टर जमिनीचा विकास आराखडा तयार केलेला आहे.
* नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) सिडकोने शेतकऱ्यांसाठी स्वेच्छाधिकार विकास योजना जाहीर केली आहे.
* या भागातील जमीन सरकारला बळाचा वापर करून संपादित करता येणार नसल्याने सिडकोने स्वेच्छाविकास योजना आणली आहे.
* यात शेतकऱ्यांनी सात हेक्टर जमीन सिडकोला हस्तांतरित केल्यास सिडको त्याबदल्यात पावणेदोन एफएसआय देऊन पायाभूत सुविधा पुरविणार आहे.
* याला अद्याप म्हणावा तसा प्रातिसाद मिळालेला नाही.
प्रत्येक खेडेगाव होणार २०१८ अखेरीस डिजिटल
* राज्यात पायाभूत सुविधांवर भर देतानाच प्रत्येक खेडे डिजिटल करण्यावर आम्ही भर दिला असल्याचे सांगत २०१८ च्या अखेरीस प्रत्येक गाव डिजिटल झालेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल आणि त्याद्वारे आरोग्य, शिक्षणासह विविध सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचतील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला.
* २०२० मध्ये देश प्रगत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून त्यात पायाभूत सुविधा क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असेल.
* अशा महत्त्वाच्या टप्प्यावर पायाभूत प्रकल्पांबाबत कॉन्क्लेव्हचे आयोजन करून लोकमतने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, अशी प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली.
* विकासाच्या प्रक्रियेत रस्ते हे इंजिनासारखे आहेत. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे ओळखून सुवर्ण चतुष्कोन, ग्रामसडक योजना आणली होती.
* आज रस्त्यांच्या जाळ्यासोबतच डिजिटल युगामध्ये प्रत्येक खेडे डिजिटल करण्यावर आम्ही भर दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
* कुलाबा ते सिप्झ व्हाया विमानतळ अशा ३० किलोमीटरच्या भूमिगत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या आॅक्टोबरमध्ये सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

* यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिीतीत झालेल्या पॅनल चर्चेत मुंबई आणि राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांचे रोडमॅप सादर केले.
१५.०९.२०१६
अर्थसत्ता
घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
* घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये ३.७४ टक्क्यांवर गेला असून, हा दोन वर्षांचा उच्चांक ठरला आहे. वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी या संबंधीची आकडेवारी जाहीर केली.
* ठोक किंमत निर्देशांक जुलैमध्ये ३.५५ टक्क्यांवर होता, तसेच आॅगस्ट २०१५ मध्ये तो उणे (-) ५.०६ टक्क्यांवर होता. २०१४ च्या आॅगस्टमध्ये तो ३.७४ टक्के होता.
* चालू वर्षाच्या आॅगस्टमध्ये घाऊक महागाई वाढीला डाळी, बटाटे, फळे इ. वस्तूंच्या वाढलेल्या किमती जबाबदार आहेत.
* उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर वाढून २.४२ टक्के झाला. जुलैमध्ये तो १.८२ टक्के होता.
२७ हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर होणार
* मालवाहतूकीसाठीचे अडथळे दूर व्हावेत यासाठी २७ हजार किलोमीटरचे ४४ हायवे बांधण्यात येणार असल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयातील सूत्रांकडून सांगितले गेले आहे.
* यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेतच पण त्याचबरोबर आर्थिक उलाढलीलाही वेग येणार आहे.
* इकॉनॉमिक कॉरिडॉर असे या योजनेचे नांव असून यात ३० मोठी शहरे जोडली जाणार आहेत.
* अटल बिहारींच्या काळात सुवर्ण चतुष्कोन ही १३ हजार किमीची देशाचे चारी कोपरे जोडणारी योजना अमलात आणली गेली होती. त्यापेक्षाही या योजनेचा विस्तार अधिक आहे.
* या योजनेत हायवे विस्तार उत्पादन केंद्रे व बंदरांपर्यंत केला जाणार आहे. ही येाजना सहा वर्षात पूर्ण केली जाईल व त्यासाठी ६ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.
* या योजनेशिवाय १५ हजार किलोमीटरचे फिडर रूटस व ४० इंटरकनेक्टिंग कॉरिडॉरही उभारले जाणार आहेत.
* सुवर्ण चतुष्कोन व ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉरही जोडले जाणार आहेत.
* ही योजना भारतमाला योजनेचाच एक भाग आहे असेही समजते.
* चार ते सहा लेन असलेले हे रस्ते बांधण्यासाठीचा खर्च आंतरराष्ट्रीय कर्ज, डेव्हलपमेंट सेस, खासगी गुंतवणुक यातून केला जाणार आहे.

अमेरिकेत चार कोटींहून अधिक जनता दरिद्री
* जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था व सुपर पॉवर मानल्या जाणार्‍या अमेरिकेत आज घडीला ४ कोटी ३० लाख नागरिक दारिद्रय रेषेखाली असल्याचे नुकतच्या झालेल्या जनगणना अहवालात नमूद केले गेले आहे.
* अर्थात गेल्या १६ वर्षात गरीबी दर घटत चालला असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे.
* आकडेवारीनुसार २०१५ मध्ये १३.५ टक्के नागरिक दारिद्रयरेषेखाली जगत होते ते प्रमाण त्याच्या आधीच्या वर्षात १४.७ टक्के इतके होते.
* २००८ सालाच्या आर्थिक मंदीनंतर दारिद्रय रेषेखाली जगत असलेल्यांची संख्या ३८ लाख होती.
* हाऊस वेज अॅन्ड मिन्स कमिटीचे अध्यक्ष केल्विन ब्राडी यांच्या मते हा अहवाल निराशाजनक आहे.
मोन्सॅन्टो अखेर बायरच्या ताब्यात!
* कृषी रसायन तसेच औषधनिर्मितीतील आघाडीची मूळची जर्मन कंपनी बायरने जागतिक बियाणे उत्पादक मोन्सॅन्टो चा खरेदी व्यवहार अखेर बुधवारी पूर्ण केला.
* गेल्या चार महिन्यांपासून चर्चेत असलेला ही खरेदी रोखीने ६६ अब्ज डॉलरद्वारे पूर्ण झाली.
* बायर तसेच मोन्सॅन्टो चे भारतात अस्तित्व आहे. तसेच येथील मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात या दोन्ही कंपन्या सूचिबद्ध आहेत.
*  बायरचा भारतातील रसायन उत्पादन व्यवसाय लॅन्सेक्सने काही वर्षांपूर्वी ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर बायरने विस्तार धोरण अवलंबिले.
* बायर कृषी क्षेत्रातील रसायन उत्पादनेनिर्मितीत आघाडीवर आहे. या क्षेत्रातील अस्तित्व विस्तारताना बायरने मोन्सॅन्टो ची खरेदी पूर्ण केली आहे.
* मोन्सॅन्टोची स्पर्धक सिंजेन्टाने नुकतीच केमचायना ही कंपनी ताब्यात घेतली होती.
* बायर आणि मोन्सॅन्टो दरम्यान याबाबतचा करार बुधवारी झाला.
* बायरने मोन्सॅन्टोची प्रति समभाग १२८ डॉलरप्रमाणे खरेदी केली आहे.
* दोन्ही कंपन्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मोन्सॅन्टोचा भारतात तीन उपकंपन्यांद्वारे कृषी क्षेत्रातील व्यवसायात शिरकाव आहे.
जीएमआर वरोराला ऊर्जा व्यवस्थापनेतील राष्ट्रीय पुरस्कार
* राष्ट्रीय स्तरावर आयोजीत ऊर्जा व्यवस्थापनेतील १७ वा राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी प्रथमच वरोरा येथील जीएमआर कंपनीने पटकाविला आहे.
* सीआयआय ऊर्जा संवर्धन प्रकल्प अंतर्गत ऊर्जा संवर्धन क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्याकरिता सर्वोत्तम ऊर्जा संवर्धन प्रणाली लागू करण्याकरिता राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजीत करण्यात येते.
* त्यात जीएमआर वरोरा, टाटा पॉवर व एनटीपीसी या तीन कंपन्याची निवड १७ व्या ऊर्जा व्यवस्थापन उत्कृष्ठता राष्ट्रीय पुरस्काराकरिता करण्यात आली.
* अत्यल्प कालावधीत जीएमआर वरोरा प्रकल्प कार्यान्वीत झाला.
* त्यातच ऊर्जा व्यवस्थापन उत्कृष्ठ राष्ट्रीय पुरस्कार जीएमआर कंपनी वरोराने पटकावून ऊर्जा क्षेत्रात आपला नावलौकीक मिळविला आहे.
* जीएमआर वरोराने ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनाची सर्वच स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
* सदर पुरस्कार सीआयआय ग्रीन बिझनेस सेंटर हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात सीआयआय अध्यक्ष शोभना कर्मानेही यांनी जीएमआर वरोरा चमूस प्रदान केला आहे.
क्रीडा
इंडिया ब्ल्यू संघाला जेतेपद
* अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दहा बळींच्या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप करंडकाला गवसणी घातली.
*  ब्ल्यू संघाने इंडिया रेड संघापुढे विजयासाठी ५१७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रेड संघाचा डाव १६१ धावांवर आटोपला आणि ब्ल्यू संघाने ३५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
* पहिल्या डावात २५६ धावांची खेळी साकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराला या वेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
विंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्सची हकालपट्टी
* वेस्ट इंडीजच्या ट्‌वेंटी-२० विश्‍वकरंडक विजेत्या संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांना विंडीज क्रिकेट मंडळाने काल (मंगळवार) नारळ दिला.
* वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या निवड समितीला वादग्रस्त निर्णयांची पार्श्‍वभूमी आहे.
* मंडळाशी वाद असल्याच्या कारणावरून ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड, ड्‌वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमीसारखे मातब्बर खेळाडूही बहुतांश वेळा संघाच्या बाहेरच असतात.
* गेल्या वर्षी मार्चमध्ये सिमन्स यांना विंडीजच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांतच त्यांचा करार अचानक संपुष्टात आणण्यात आला होता.
* भारतात झालेल्या ट्‌वेंटी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी पुन्हा त्यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले.
* विंडीजची आगामी मालिका पाकिस्तानविरुद्ध आहे.
* या मालिकेसाठी सिमन्स यांच्याऐवजी हेंडरसन स्प्रिंगर आणि रॉडी एस्टविक हे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील.
भारताला पहिल्याच दिवशी सहा पदके
* भारताच्या सायकलपटूंनी ट्रॅक आशिया चषक स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी आपला दबदबा सिद्ध करताना सहा पदकांची कमाई केली. यामध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.
* इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत देबोराह हेरोल्डने दोन सुवर्णपदक पटकावली.
* तिने महिलांच्या एलिट गटात ५०० मीटर शर्यतीत ३५.९६४ सेकंदाची वेळ नोंदवून पहिले सुवर्ण जिंकले.
* मलेशियाच्या मोहम्मद अदनान फरिना शावती आणि हाँगकाँगच्या यीन यीन यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
* सांघिक महिला गटात भारतीय संघाने ३५.९६२ सेकंदासह सुवर्णपदक निश्चित केले.
* या संघात देबोराह आणि केझिया वर्घीसी यांचा समावेश होता.
* कझाकस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर राजकुमारी देवीला कांस्यपदक देण्यात आले.
* पुरुषांच्या सांघिक गटात इराणने ४६.३३० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले.
* मलेशिया (४७.९९९ सेकंद) आणि कझाकस्तान (४७.६४१ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.
* भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने रौप्यपदकाची कमाई केली.
* त्यांनी ४९.२९९ सेकंदासह कझाकस्तानवर कुरघोडी केली.
* कनिष्ठ महिलांनी मात्र सुवर्णपदक पटकावले.
* तसेच अलेना रेजीने कनिष्ठ महिला गटात रौप्यपदक पटकावले.
‘जयपूर’चे बलवान सिंग भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक
* जयपूर पिंक पॅंथर्सचे बलवान सिंग विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील.
* भारतीय कबड्डीतील सर्वोत्तम प्रशिक्षकात बलवान सिंग यांची गणना होते. ही स्पर्धा पुढील महिन्यात अहमदाबादला होणार आहे.
* बलवान सिंग यांचे नाव भारतीय कबड्डी वर्तुळात आदराने घेतले जाते.
* त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूरने सलामीची प्रो कबड्डी लीग जिंकली आहे, तसेच नुकत्याच झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
* दोन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी बलवानसिंगच भारतीय संघाचे मार्गदर्शक होते. त्यामुळे त्यांच्याकडेच संघाची सूत्रे जाणे अपेक्षितच होते.
* त्याहीपेक्षा त्यांच्याबद्दल सर्वच खेळाडूंना असलेला आदर महत्त्वाचा ठरला आहे.
* त्यांनी अनेक नवोदितातून चांगले स्टार घडवले आहेत.
* प्राथमिक खेळाडूतून ते अंतिम १४ जणांचा संघ निवडण्यातही मोलाची कामगिरी बजावतील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. प्रो कबड्डी लीगमुळे अनुपकुमार, राहुल चौधरी, मोहित चिल्लर, रोहितकुमार हे स्टार झाले आहेत.
तंत्र – विज्ञान
माशांच्या खवल्यापासून वीज निर्मितीत यश
* समुद्र, नद्यातून प्रचंड संख्येने असणारे मासे वीज निर्मितीसाठी उपयुक्त ठरले आहेत.
* माशांच्या खवल्यांपासून वीज निर्मिती करण्याचे प्राथमिक प्रयोग यशस्वी झाले आहेत.
* खवल्यांपासून निर्माण होणारी ही उर्जा पेसमेकर, इन्शुलिन पंप अशा प्रकारच्या मेडिकल उपकरणांतून वापरणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
* कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातील प्रो. दीपांकर मंडदळ यांनी हे प्रयोग केले आहेत.
* मिळालेल्या माहितीनुसार माशांचे हे खवले मासे शिजवताना साफ केले जातात व ते फेकून दिले जातात.
* या खवल्यांत असणारे तंतू फार महत्त्वाचे असतात. या खवल्यात पायजोइलेक्ट्रीक क्षमता असलेले पदार्थ असतात. त्यावर दाब दिला गेला तर त्यातून उर्जा निर्माण होते.
* प्रो.दीपांकर यांनी हे खवले अॅसिडमध्ये टाकून पारदर्शक व लवचिक बनविले.
* नंतर त्याला विशिष्ठप्रकारे प्लॅस्टीक लॅमिनेट करून ते गोल्ड इलेक्ट्रोडने जोडले तेव्हा त्यातून वीज निर्मिती होत असल्याचे दिसून आले.
* ही वीज पर्यावरणपूरक व प्रदूषण रहित आहे आणि छोट्या उपकरणांसाठी ती वापरता येईल असे दीपांकर यांचे म्हणणे आहे.
रमेश रासकर यांना "कुंभथॉन'साठी "एमआयटी-लेमेलसन' पुरस्कार
* मूळचे नाशिकचे व गेल्या वीस वर्षांहून अधिक कालावधीपासून अमेरिकेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे.
* ५ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे ३ कोटी ३५ लाख, अशी पारितोषिकाची रक्‍कम आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला आहे.
* रासकर यांच्या नावावर ७५ हून अधिक पेटंट आहेत.
* डॉ. रासकर २००८ पासून एमआयटीशी जोडलेले आहेत. सध्या ते एमआयटी मीडिया लॅबच्या कॅमेरा कल्चर ग्रुपचे प्रमुख आहेत.
* कुंभमेळ्यापूर्वी राबविलेल्या कुंभथॉन या संशोधन चळवळीच्या उभारणीत रासकर यांचे मोलाचे योगदान होते.
* स्मार्टफोनद्वारे चष्म्याचा नंबर शोधणे, डोळ्यांच्या महत्त्वाच्या तपासण्या करणे यासह विविध संशोधन कार्य त्यांनी केले असून ७५ हून अधिक संशोधनांसाठी पेटंट नोंदविली आहेत.
* कुंभथॉन उपक्रम सुरू झाल्यापासून दर तीन महिन्यांनी ते "एमआयटी‘तील संशोधकांना भारतात विशेषत: नाशिकमध्ये संशोधनासाठी आणतात.

* शैक्षणिक संस्था व उद्योजकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग, उपक्रम राबविले आहेत.
आंतरराष्ट्रीय
दर वर्षी सहा अणुबॉंब बनवू शकतो उ. कोरिया
* आंतरराष्ट्रीय दबाव आणि बंदीनंतरही उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाने गती घेतली आहे.
* शस्त्रास्त्र विशेषज्ञांच्या नव्या आकलनानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत उत्तर कोरियाकडे युरेनियम संवर्धन सुविधा आणि प्लूटोनियमचा एवढा साठा असेल, की हा देश २० अणुबॉंबची निर्मिती करू शकेल.
* विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाजवळ युरेनियमचा भरपूर साठा आहे आणि तो देश जवळपास एक दशकापासून गोपनीय पद्धतीने त्याचे संवर्धन करण्याचे काम करत आहे.
* युरेनियमच्या या सामग्रीमुळे उत्तर कोरिया वर्षाला सहा अणुबॉंब तयार करू शकतो. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने पाचवी आणि सर्वाधिक शक्तिशाली अणुचाचणी केली.
* दक्षिण कोरियाच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरिया लवकरच आणखी एक अणुचाचणी करण्यासाठी सज्ज होत आहे.
* उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाविषयी बोलताना विशेषज्ञ जिगफ्राइड हेकर यांनी सांगितले, की उत्तर कोरिया दर वर्षी १५० किलो युरेनियमसंवर्धन करण्यात सक्षम होऊ शकतो आणि एवढ्या युरेनियमच्या जोरावर दर वर्षी सहा अणुबॉंब तयार केले जाऊ शकतात.
अण्वस्त्रांत रशियाची आघाडी
* स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री)च्या म्हणण्यानुसार, अण्वस्त्रांच्या संख्येत रशिया सर्वांत आघाडीवर आहे.
* १९४९ मध्ये पहिल्यांदा अणुचाचणी करणाऱ्या रशियाकडे ८ हजार अण्वस्त्रे आहेत.
* त्यानंतर अमेरिका (७३००), फ्रान्स (३००), चीन (२५०) यांचा क्रमांक आहे.
* पाकिस्तानकडे १०० ते १२० आणि भारताकडे ९० ते ११० अण्वस्त्रे आहेत.
अफगाणला १ अब्ज डॉलर्स मदतीची मोदींची घोषणा
* दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेल्या अफगाणी राष्ट्रपतीं अशरफ गनींची पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील हैद्राबाद हाऊस येथे भेट घेताना अफगाणिस्तानला भारतातर्फे १ अब्ज डॉलर्सची मदत दिली जाईल अशी घोषणा केली.
* हा पैसा शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, महिला सबलीकरण, उर्जा, पायाभूत सुविधा व अफगाणिस्तानात लोकशाही मजबूत करण्यासाठी वापरला जाणार आहे.
* यावेळी बोलताना मोदींनी राजकीय हेतूने दहशतवादाचे हत्यार उपसून भारत व अफगाणिस्तानात अशांतता माजविण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्याविषयी चिंता व्यक्त केली व असा प्रायोजित दहशतवाद व दहशतवाद्यांची ठिकाणे खतम केली जातील असा अप्रत्यक्ष संदेश पाकिस्तानला दिला.
* अशरफ गनी व मोदी यांच्यात यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.
* अफगाणीस्तानला भारताकडून अधिक प्रमाणात शस्त्रे व संरक्षण सामग्री मिळावी अशी अपेक्षा आहे.
* गतवर्षी प्रथमच ४ एमआय २५ लढाऊ हेलिकॉप्टर्स भारताने अफगाणिस्तानला दिली आहेत.
* भारताला अफगाणिस्तानकडून दहशतवादी, गुन्हेगार प्रत्यार्पणाचा करार केला जाण्याची अपेक्षा आहे.
* भारताने आजपर्यंत असा करार ३४ देशांसोबत केला आहे.
भारतीय वंशाच्या महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती
* भारतीय-अमेरिकन वंशाच्या महिलेची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असल्याचे व्हाइट हाउसतर्फे सांगण्यात आले.
* अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये ४७ वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.
* अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयातील न्यूयॉर्क खंडपीठात न्यायाधीशपदी डायने गुजराती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
* त्या अमेरिकेतील नागरिकांची योग्य प्रकारे सेवा करतील, असे ओबामा यांनी म्हटल्याचे व्हाइट हाउसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
* भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२ पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
* अमेरिकी सिनेटच्या मंजुरीनंतर गुजराती या न्यायाधीशपदाचा कार्यभार स्विकारतील.
दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ३५० पाणघोड्यांचा बळी?
* दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत घेणार ३५० पाणघोड्यांचा बळी; चारा वाचवण्यास रानरेड्यांनाही मारणार!
* जोनान्सबर्ग : सध्या सुरू असलेल्या दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे व रानरेड्यांना ठार मारणार आहेत.
* या जंगली जनावरांना मारल्यानंतर त्यांचे मांस राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या गोरगरिबांना वाटले जाईल, असे नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
* या कारवाईमागचा विचार स्पष्ट करताना पार्क सर्व्हिसचे प्रवक्ते इक फाहला म्हणाले की, पाणघोडे आणि रानरेडे हे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर गवत व झाडपाला खातात.
* दुष्काळामुळे तृणभक्षक प्राण्यांच्या अन्नाची उपलब्धता कमी झाल्याने एरवीही यापैकी बरेच प्राणी उपासमारीने मेलेच असते.
* त्यांची संख्या पद्धतशीरपणे कमी केल्याने निदान उरलेल्या प्राण्यांना तरी उपलब्ध खाद्य जास्त दिवस पुरू शकेल.
भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला बलुचिस्तानमधील हिंसाचाराचा मुद्दा
* बलुचिस्तानच्या मुद्द्यावरुन भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी नवी खेळी खेळली आहे.
* बलुचिस्तानमधील हिंसाचारात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत उपस्थित केला आहे.
* जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचेही भारताने ठणकावले आहे.
* संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेची ३३ वी वार्षिक सभा सुरु आहे.
* या सभेत भारताने बलुचिस्तानचा मुद्दा मांडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी अजित कुमार यांनी दिली आहे.
* भारताने या सभेत जम्मू काश्मीरविषयीही भूमिका स्पष्ट केली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागात समाजातील सर्व स्तरातील लोक राहतात.
* पाकिस्तानने आपली उर्जा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणा-या मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यावर खर्च करावी असेही भारताने म्हटले आहे.
* पाकिस्तानची ओळख हुकूमशाही, लोकशाही मूल्यांची उणीव आणि बलुचिस्तानसह देशभरात होणा-या मानवी हक्कांच्या उल्लंघनांसाठी आहे असा दावाही भारताने संयुक्त राष्ट्रात केला.
राष्ट्रीय
देशातील दहा टक्के नागरिक मनोविकारग्रस्त!
* देशातील ४३ शासकीय मनोरुग्णालयांत केवळ महिलांचीच नव्हे तर पुरुष मनोरुग्णांचीही परवड होत असते.
* लहान मुलांपासून वयोवृद्धांच्या मानसिक आजारांचे वेगवेगळे प्रकार असून शहरी व ग्रामीण भागातील मानसिक आजारांची कारणेही वेगवेगळी असताना चार लाख लोकसंख्येमागे अवघा एक मनोविकारतज्ज्ञ असे प्रमाण भारतात आहे.
* देशभरातील ४३ मनोरुग्णालयांमध्ये अवघ्या १७,८२५ खाटा असून रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले आहे.
* खाटा व रुग्णांचे प्रमाण कमालीचे व्यस्त असून एक लाख लोकांमागे १,४६० असे खाटांचे प्रमाण आहे.
* जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३च्या अहवालात चीन व भारतातील वेगवेगळ्या मानसिक आजारांच्या रुग्णांच्या संख्येची तुलना करण्यात आली आहे.
* स्किझोफ्रेनियाचे चीनमध्ये पाच लाख २१ हजार रुग्ण असून भारतात एक लाख ६३ हजार एवढे रुग्ण आहेत.
* नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या भारतात साडेअकरा लाख एवढी आहे तर चीनमध्ये दहा लाख लोक नैराश्याने ग्रासलेले आहेत.
* चिंताग्रस्त मनोरुग्णांची संख्या दोन्ही देशांत सुमारे साडेतीन लाख एवढी नोंदविण्यात आली आहे.
* दर लाख लोकांमागे चीनमध्ये १.७ एवढे सायकॅट्रिक तज्ज्ञ आहेत तर भारतात हेच प्रमाण ०.३ एवढे आहे.
* दिल्लीमध्ये ‘राष्ट्रीय महिला आयोग’ आणि ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ’ यांच्या अभ्यासातून देशातील शासकीय मनोरुग्णालयांमधील महिला रुग्णांच्या करण्यात आलेल्या अभ्यासात महिला रुग्णांच्या दुरवस्थेचा पंचनामा करण्यात आला असून अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
* पुणे मनोरुग्णालयात २५४० खाटा असून दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या तीन हजार एवढी आहे.
* ठाणे मनोरुग्णालयात १८५० खाटा असून सरासरी तेवढेच रुग्ण दाखल आहेत. रत्नागिरी येथे ३६५ खाटा असून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी दोन हजार एवढे आहे.
* नागपूर येथे ९४० खाटा असून ही सर्व रुग्णालये ब्रिटिश काळात बांधण्यात आली आहेत.
* महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी अशी चार प्रमुख मनोरुग्णालये आहेत.
एंब्रेअर विमान करार चौकशीच्या फेऱ्यात
* संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात झालेल्या २०.८ कोटी डॉलर रकमेच्या एंब्रेअर विमान खरेदी करारात लाच घेतली गेल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिले आहेत.
* ब्राझीलची विमाननिर्मिती कंपनी एंब्रेअर आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या दरम्यान २००८ मध्ये हा करार झाला होता.
* गंभीर प्रकारच्या आरोपांमुळे सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
* * काय होता करार?
"एईडब्ल्यू अँड सी‘ (वैमानिक पूर्वसूचना आणि नियंत्रणप्रणाली) साठी स्वदेशी रडारने सज्ज अशा तीन विमानांसाठी ब्राझीलची विमाननिर्मिती कंपनी एंब्रेअर आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या दरम्यान २००८ मध्ये करार झाला होता.
महाराष्ट्र
वीरा राठोड, चंदनशिवे यांना दया पवार स्मृती पुरस्कार
* पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१६ चा "दया पवार स्मृती पुरस्कार‘ कवी व लेखक वीरा राठोड, लोककला अभ्यासक व शाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना जाहीर झाला आहे.
* हा पुरस्कार सोहळा मंगळवारी सायंकाळी प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटरमध्ये होणार आहे.
* यंदाचा हा २० वा पुरस्कार सोहळा असून, प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
* औरंगाबाद येथे प्राध्यापक असलेल्या वीरा राठोड यांच्या भटक्‍या, बंजारा संस्कृतीवर आधारित "सेन सायी वेस‘ या बहुचर्चित काव्यसंग्रहास साहित्य अकादमीने नुकतेच युवा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले होते.
* मराठवाड्याचे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आहेत. तमाशावर त्यांनी डॉक्‍टरेट मिळविली आहे.
* शोषित-वंचितांचे जगणे जगासमोर मांडणाऱ्या ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
* २५ वर्षांहून अधिक काळ मुंबईतील सर्व प्रमुख दैनिकांत छायाचित्रकार म्हणून काम करणारे ओलवे यांचे सफाई कामगारांच्या भीषण जीवनावर आधारित "न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात‘ हे फोटोबुक खूप गाजले.
आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज
* माझगाव गोदीत बांधणी करण्यात आलेल्या आयएनएस मार्मागोवा (मुरगाव) युद्धनौका जलावतरणासाठी सज्ज झाली असून शनिवारी नौदल प्रमुख सुनिल लान्बा यांच्या उपस्थितीत आयोजित केल्या जाणाऱ्या सोहळ्यात ही युद्धनौका प्रथमच समुद्रात प्रवेश करणार आहे.
* माझगाव डॉक शिपबिल्डर्स (एमडीएल)ने या युद्धनौकेची नियोजित वेळेआधीच बांधणी केली आहे.
* विशाखापट्टण्णम् श्रृंखलेतील ही दुसरी युद्धनौका असून गोव्यातील मार्मागोवा बंदराचे नाव या नौकेला देण्यात आले आहे.
* शनिवारी नौदलप्रमुखांच्या उपस्थितीत या युद्धनौकेचे जलावतरण होईल. २०२० पर्यंत ही युद्धनौका नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.
* एमडीएलने गेल्या सहा वर्षात नौदलासाठी वर्षाकाठी एक युद्धनौकेची बांधणी केली आहे.
* २०१० साली आयएनएस शिवालिकच्या निर्मितीनंतर याच आयएनएस सातपुरा, आयएनएस सह्याद्री नौदलासाठी बांधण्यात आली. तर, आयएनएस कोलकात्ता आणि आयएनएस कोची या विनाशिका बांधण्यात आल्या. तर, आॅगस्ट २०१६ मध्ये आयएनएस चेन्नई नौदलाला सोपविली.
अस्वल व तिच्या पिल्लांच्या संरक्षणामुळे आतेगावचा जन-वन योजनेत समावेश
* मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेले असतांनाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सीमेवरील आतेगावच्या गावकऱ्यांनी मात्र वन्यजीव संरक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे.
* अस्वल आणि तिच्या दोन पिलांना आसरा देऊन गावकऱ्यांनी जंगल आणि वन्यजीव संवर्धनात मोलाची कामगिरी बजावली आहे.
* ही कामगिरी पाहून वनाधिकाऱ्यांनी या गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलली आणि हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट केले आहे.
पूर्वा चव्हाण "मिस पुणे फेस्टिव्हल'
* पुणे फेस्टिव्हल कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "मिस पुणे फेस्टिव्हल‘चा किताब पूर्वा चव्हाण यांनी पटकावला, तर तन्वी खरोटे, सुरभी आगरवाल उपविजेत्या ठरल्या.

* या स्पर्धेत बेस्ट टॅलेंट-दीक्षा रैना, बेस्ट हेअर-रोमा राऊत, बेस्ट स्माईल-ऐश्‍वर्या देव, मिस फोटोजेनिक-इशा कडू, मिस फेव्हरेट-सुरभी आगरवाल यांची निवड झाली.
१६.०९.२०१६
अर्थसत्ता
जिंदाल स्टीलमध्ये बुलेट ट्रेनसाठी हेड हार्ड रेल्सचे उत्पादन
* जिंदल स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेडने मेट्रो तसेच हायस्पीड रेल्वेसाठी वापरल्या जाणार्‍या हेडहार्ड रेल्सचे उत्पादन सुरू केले असून जिंदल असे उत्पादन करणारी देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.
* यासाठी कंपनीने रायगड मध्ये २०० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारला आहे.
* कंपनीचे सीईओ रवी उप्पल या संदर्भात बोलताना म्हणाले, जर्मनीतील एसएमएस मीर तंत्रमानाच्या सहकार्याने या प्रकल्पाची उभारणी केली गेली आहे.
* या प्रकल्पात दरमहिना ३० हजार टन रेल्स तयार होऊ शकतात. बुलेट, मेट्रो, हाय स्पीड फ्रेट कॉरिडॉरसाठी असे रेल्स आवश्यक असतात.
* विशेष हिट ट्रीटमेंटच्या सहाय्याने हे उत्पादन केले जाते.त्यासाठी उच्च तापमान नियंत्रण करावे लागते.
* या पद्धतीने तयार केलेले हे रूळ सर्वसामान्य रूळांच्या तुलनेत ५० टक्के अधिक बळकट अ्रसतात.
मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढीलवर्षी १ एप्रिलपासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.
* या तारखेपूर्वी जीएसटीसंबंधी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.
* जीएसटी कायद्याची अंमलबजावणी आणि दरांबाबत वेळोवेळी शिफारशी देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या सातत्याने बैठकी घेतल्या जाव्या, असेही त्यांनी सुचविल्या.
* माल आणि सेवेला जीएसटी कायद्यातून सूट दिली जाऊ शकते.
* जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत याबाबत आदेश दिले.
* १ एप्रिल २०१७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी होण्याबाबत कोणतीही हयगय नको याची खातरजमा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
क्रीडा
शाहिद आफ्रिदीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत
* पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.
* पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) शाहिदला मोठ्या थाटात अलविदा करण्याचे ठरवले आहे. यासाठी शाहिद आफ्रिदी आणि पीसीबीमध्ये करार झाल्याची चर्चा आहे.
* आफ्रिदीने कराचीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मला थाटात अलविदा करण्यात यावे, यासाठी मी पीसीबीवर कोणताही दबाव आणलेला नाही.
* मात्र, एखाद्या खेळाडूला निवृत्त होताना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. याबाबात मी इंझमाम-उल-हकशी चर्चा केल्याचेही आफ्रिदीने सांगितले.
* गेल्या काही दिवसांपासून शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वत:हून निवृत्ती जाहीर करावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हालचाली सुरू केल्या होत्या.
* पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आफ्रिदीची संघात निवड करण्यात आली आहे आणि या मालिकेदरम्यान तो निवृत्ती जाहीर करील, अशी पीसीबीला अपेक्षा आहे.
ग्रीन पार्कच्या ५०० व्या कसोटीवर ड्रोनचीही नजर
* येत्या २२ ते २८ सप्टेंबर या काळात कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानवर भारत व न्यूझीलंड यांच्यात होत असलेला क्रिकेट कसोटी सामना हा या मैदानावरचा ५०० वा सामना आहे.
* या ऐतिहासिक सामन्याचे महत्त्व लक्षात घेऊन उत्तरप्रदेश सरकारने सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे.
* पोलिस प्रशासनाने येथे त्रिस्तरीय सुरक्षा तैनात केली आहे.
* त्यात सीआयएसएप, पोलिस, गुप्तचर दल, विशेष पोलिस दल यांचे ४ हजार अधिकारी व जवान तैनात केले गेले आहेत.
*  त्याचबरोबर मैदान ते खेळाडूंचे निवास असलेल्या हॉटेलपर्यंत सीसीटिव्ही कॅमेरे व ड्रोनची पाळत ठेवली गेली आहे.
सरवन घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
* वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रामनरेश सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सरवान गयानामध्ये त्याची अधिकृत घोषणा करणार आहे.
* सरवन प्रदीर्घ कालावधीपासून संघातून बाहेर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध ओव्हलवर खेळला होता.
* ३६ वर्षीय सरवनने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना २००० मध्ये बार्बाडोस येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.
* या व्यतिरिक्त त्याने वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात २००० मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती.
* सरवनने १८१ वन-डे सामन्यांत ४२.६७ च्या सरासरीने ५८०४ धावा फटकावल्या आहेत.
* त्याची वन-डेतील सर्वोत्तम खेळी नाबाद १२० आहे. ही खेळी त्याने २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केली होती.
* सरवनने राष्ट्रीय संघातर्फे ८७ कसोटी सामने खेळले. त्याने ४०.०१ च्या सरासरीने ५८४२ धावा केल्या.
* कसोटीमध्ये नाबाद २९१ त्याची सर्वोत्तम खेळी केली. ही खेळी त्याने २००९ मध्ये इंग्लंडविरुद्ध बार्बाडोस येथे केली होती.
* सरवानने अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध २०११ मध्ये बार्बाडोस येथे खेळला होता.
* त्याने चार कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व केले.
मनोरंजन
हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय
* भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा असा पराक्रम प्रियंका चोप्राच्या नावावर झाला आहे.
* टेलव्हिजनवर जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवं स्थान मिळालं आहे.
* हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.
* फोर्ब्सकडून जाहीर करण्यात येणाऱ्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे.
* गेल्यावर्षी एबीसीच्या क्वांटिकोमधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.
* विक्रमी ७३ कोटी रुपयांच्या मानधनासह बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंकाने आठवं स्थान मिळवलं आहे.
* * यादीतील टॉप १० अभिनेत्री * *
* सोफिया वर्जारा २८८ कोटी
* कॅली कुओको १६४ कोटी
* मिंडी कॅलिंग १०० कोटी
* मॅरिस्का हार्टिगे ९७ कोटी
* अ‍ॅलेन पॉम्पियो ९७ कोटी
* कॅरी वॉशिंग्टन ९० कोटी
* स्टॅना कॅटिक ८० कोटी
* प्रियंका चोप्रा ७३ कोटी
* जुलियाना मारगुलिस ७० कोटी
* ज्यूली बॉवेन ६७ कोटी
तंत्र – विज्ञान
ताऱ्याच्या आकाराच्या रेणूंनी महाजीवाणूंवर मात शक्य
* सध्या जी प्रतिजैविके उपलब्ध आहेत ती काही रोगांमध्ये प्रभावहीन ठरली आहेत, त्यामुळे आता काही जीवाणूंवर उपाय नसला तरी आता वैज्ञानिकांनी ताऱ्याच्या आकाराचे रेणू तयार केले असून, ते या जीवाणूंना मारू शकतात.
* प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंवर यशस्वी उपचारांची शक्यता आता वाढली आहे.
* युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. ग्रेग क्वियाओ यांनी सांगितले, की जीवाणू संसर्ग घातक असतो व आता जीवाणू प्रतिजैविकांना फारशी दाद देत नाहीत, यात जीवाणू प्रतिजैविकांपासून वाचण्यासाठी त्यांचे उत्परिवर्तन घडवून आणत असतात.
* हे उत्परिवर्तित जीवाणू म्हणजे महाजीवाणू मानले जातात, जे औषधांना दाद देत नाहीत.
* इ.स. २०५०पर्यंत दहा दशलक्ष लोक जीवाणूजन्य रोगांनी मरू शकतात, कारण महाजीवाणू त्यांच्यावर मात करतील.
* गेल्या तीस वर्षांत केवळ दोन नवीन प्रतिजैविके तयार करण्यात यश आले आहे.
* क्वियाओ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेप्टाईड पॉलिमर्स तयार केले असून, त्यांनी अलीकडे ताऱ्याच्या आकारासारखे पॉलिमर तयार केले, ते ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया या घातक जीवाणूंना मारण्यात प्रभावी ठरत असते. ते शरीराला विषारी ठरत नाही.
* याबाबत लाल रक्तपेशींवर चाचण्या घेतल्या असता पॉलिमर मात्रा जर १०० पट जास्त असली तरच ते विषारी ठरतात.
* ताऱ्यांच्या आकाराचे पेप्टाईड पॉलिमर्स हे महाजीवाणूंना मारण्यात मदत करतात. त्यांच्या चाचण्या प्राण्यांमध्ये यशस्वी झाल्या आहेत.
* अनेक पथमार्गिका असलेल्या जीवाणूंना ताऱ्यांच्या आकाराचे पेप्टाइड पॉलिमर्स मारत असतात.
* काही प्रतिजैविके केवळ विशिष्ट मार्गिका असलेल्या जीवाणूंना मारतात, ती मर्यादा यात नाही.
* ताऱ्यांच्या आकाराचे पेप्टाईड पॉलिमर्स हे प्रतिजैविकांपेक्षा जास्त प्रभावी असतात.
* जीवाणूंच्या पेशीभित्तिका यात भेदल्या जातात. यात आणखी संशोधनाची गरज असून, प्रतिजैविकांना विरोध करणाऱ्या जीवाणूंवर त्यामुळे उपाय शक्य होणार आहे.
आंतरराष्ट्रीय
चीनच्या किनारपट्टीवर धडकले ‘मेरांती’
* जगभरात यावर्षी येणाऱ्या सर्वाधिक शक्तिशाली वादळांपैकी एक मानले जाणारे ‘मेरांती’ वादळ गुरुवारी पहाटे चीनच्या फुजियान प्रांतात धडकल्याने या क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले आहे.
* शियामेन शहरातील शियानगानमध्ये आलेले हे वादळ दक्षिण फुजियान प्रांतात १९४९ नंतर आलले सर्वात शक्तिशाली वादळ आहे.
* यामुळे परिसरातील पाणी आणि वीज पुरवठा पूर्णत: ठप्प पडला असून वेगवान हवा आणि पावसाने थैमान घातले आहे,अशी माहिती शिन्हुआ या शासकीय वृत्तसंस्थेने दिली आहे.
चीनच्या भिंतीच्या दुरूस्तीसाठी देणगी अभियान
* जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या चीनच्या महाप्रचंड भिंतीची दुरूस्ती करण्यासाठी देणगी अभियानाची सुरवात केली गेली असल्याचे समजते.
* ऑगस्टपासून सुरू असलेल्या या अभियानात आत्तापर्यंत ४५ हजार डॉलर्स रकमेच्या ऑनलाईन देणग्या मिळाल्या असल्याचे सांगितले जात आहे.
* चायनिज फौंडेशन फॉर कल्चरल हेरिटेज कन्झर्व्हेशन या सरकारी देखरेखीखाली काम करणार्‍या संस्थेकडून या देणग्या गोळा केल्या जात आहेत.
* या भिंतीची दुरूस्ती अत्यंत आवश्यक आहे मात्र हे काम सरकार एकट्याच्या जीवावर करू शकणार नाही त्यामुळे देणग्या गोळा केल्या जात आहेत असा खुलासा या संस्थेने केला आहे.
* डिसेंबर पर्यंत देणग्यातून १७ लाख डॉलर्स जमविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
* देणग्यातून केला गेलेल्या खर्चाचा तपशील सार्वजनिक केला जाणार आहे. तसेच सर्वप्रथम शिंफेकाऊ सेक्शनची दुरूस्ती केली जाणार आहे.
* भिंतीचा हा भाग जलाशयाजवळून जातो.
राष्ट्रीय
राफेल विमान खरेदी अंतिम टप्प्यात
* राफेल’च्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये केल्या जाणाऱ्या कराराचा मसुदा बनविण्याचे काम सुरू असून लवकरच या करारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
* या करारानुसार विमानांबरोबरच फ्रान्स भारताला स्वनातीत वेगाने अचूक लक्ष्याचा वेध घेणारी प्रभावी क्षेपनास्त्रही देणार आहे.
* या क्षेपणास्त्रांच्या तोडीचे क्षेपणास्त्र केवळ अमेरीकेकडेच आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या क्षेपणास्त्रांचा समावेश झाल्यानंतर दक्षिण आशिया क्षेत्रात सामरिकदृष्ट्या भारताचे पारडे अधिक जड होणार आहे.
* राफेल विमानांच्या सोबतीने त्यातून मारा करता येणारी ‘मेटेओर’ क्षेपणास्त्रही भारताला फ्रान्सकडून मिळणार आहेत.
* ही क्षेपणास्त्र ध्वनिपेक्षा चौपट वेगाने प्रवास करून १०० किलोमीटर पर्यंत अंतरावर असलेल्या शत्रूच्या विमानांचा अथवा क्रूझ क्षेपणास्त्रांचा अचूक वेध घेण्याची क्षमता राखून आहेत.
* ‘मेटेओर’च्या तोडीचे ‘एआयएम १२० डी’ हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र केवळ अमेरिकेकडे आहे.
* मात्र रॅम जेट इंजिन आणि अन्य तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे मेटेओर’ हे अमेरिकेच्या क्षेपणास्त्रापेक्षा अधिक घटक असल्याचा संरक्षण तज्ज्ञांचा दावा आहे.
* ‘राफेल’ विमानांचा एकूण व्यवहार ५८ हजार ६४६ रुपयांचा होता. अर्थात एका विमानाची किंमत १ हजार ६२८ कोटी रुपये एवढी होती. मात्र वाटाघाटीनंतर ती १ हजार ५०४ कोटी रुपये एवढी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मोदींच्या वाढदिवसाला जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवत जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची जय्यत तयारी सुरू आहे.
* प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत देशाला गौरवान्वित करणाऱ्या देशातील सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरला जाणार आहे.
* विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेखही त्यावर असेल.
* मोदी १७ सप्टेंबर या वाढदिवशी गुजरात या आपल्या गृहराज्याला भेट देतील तेव्हा सुरत येथे हा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या जातील.
* गुजरातची प्रसिद्ध अतुल बेकरी, शक्ती ही स्वयंसेवी संस्था तसेच देशभरात ३० पेक्षा जास्त गिटार केंद्र संचालित करणाऱ्या ‘गिटार मॉन्क’ या संस्थेने मोदींचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालविली आहे.
सरकारी योजनांच्या लाभासाठी यापुढे आधार कार्ड अनिवार्य
* घरगुती गॅसची सबसिडी, मनरेगा, पेन्शन इत्यादींसह केंद्र आणि राज्य सरकारच्या तमाम सरकारी योजनांचे लाभ व सवलती मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
* लवकरच त्यासाठी युनिक आयडेंटिटी अधिनियम अधिसूचित करण्यात येणार आहेत.
* सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एका निकालपत्रात सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही, असे म्हटले होते.
* तरीही प्रत्येक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करणारा नवा कायदा करण्याचे केंद्राने ठरवले आहे.
* घरगुती गॅसशी संबंधित पेट्रोलियम मंत्रालय असो की सरकारी शिष्यवृत्यांशी संबंधित मनुष्यबळ विकास मंत्रालय, आधार कार्ड नसलेला एकही लाभार्थी योजनेच्या अंमलबजावणीतून सुटू नये, यासाठी युनिक आयडेंटिटी अधिनियमानुसार नोंदणी रजिस्ट्रारशी संलग्न यंत्रणा प्रस्थापित करून त्यांची रितसर नोंदणी करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालयांवर सोपवण्यात आली आहे.
* याखेरीज आधार कार्ड कोणत्या सरकारी योजनांसाठी अनिवार्य आहे, त्याची यादीही संबंधित मंत्रालयांतर्फे वेळोवेळी अधिसूचित केली जाईल.
दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर
* दहशतवाद प्रभावित देशांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये भारताचादेखील समावेश आहे.
* २०१५ मध्ये जगभरात एकूण ११ हजार ७७४ दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये २८ हजार ३२८ लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर ३५ हजार ३२० लोक जखमी झाले आहेत.
* भारतामधील दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण ४३ टक्के असून यापैकी ७९१ हल्ले नक्षलवाद्यांनी केले आहेत.
* भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे.
* जगभरात तालिबान, इसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांची दहशत आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो.
* भारतातील चार राज्यांमध्ये अर्ध्याहून जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत.
* छत्तीसगडमध्ये २१  टक्के, मणिपूरमध्ये १२ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये ११ टक्के, झारखंडमध्ये १० टक्के दहशतवादी हल्ले झाले आहेत.
* छत्तीसगडमधील दहशतवादी हल्ल्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं असून २०१४ मध्ये जिथे ७६ हल्ले झाले होते तो आकडा २०१४ मध्ये १६७ वर पोहोचला आहे.
* भारत चौथ्या क्रमांकावर असणे ही काळजीची गोष्ट असली तरी अनेक दहशतवादी हल्ले प्राणघातक नव्हते. त्यांची प्राणघातक क्षमता कमी होती.
महाराष्ट्र
कुपोषण समस्या सोडविण्यात सरकार अपयशी
* पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या भागातील बालकांच्या कुपोषणाच्या समस्या सोडविण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव संतप्त झाले असून त्यांनी आज सरकारची खरडपट्टी केल्याचे समजते.
* आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी या तिन्ही विभागांच्या समन्वयातून युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी सरकारला दिले.
चंद्रपूर वीज केंद्राचा ५०० मेगावॅटचा ९ वा संच ऑक्टोबरात सुरू, क्षमता २९२० मेगावॅट होणार
* चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅटचा ९ व्या क्रमांकाचा संच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकदृष्टय़ा सुरू करण्यात येणार आहे.
* नववा संच सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट होणार आहे. हा संच लवकर सुरू व्हावा, यासाठी वीज केंद्राचे अभियंता युध्दपातळीवर कामाला लागले आहेत.
* या महाऔष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता कधी काळी २३४० मेगावॅट  होती.
* एकूण ७ संचांमधून ही विजनिर्मिती केली जात होती.
* यात २१० मेगावॅटचे ४, तर ५०० मेगावॅटचे ३, असे एकूण ७ संच कार्यान्वित होते, परंतु पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे संच कालबध्द झाल्यामुळे दोन्ही संच बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ४२० मेगावॅट विजनिर्मिती कमी झाली.
* त्याचा परिणाम कधी काळी २३४० मेगावॅट विजनिर्मितीची क्षमता असलेले हे केंद्र १ हजार ९२० मेगावॅट क्षमतेवर आले. आशिया खंडातील क्रमांक दोनचे विजनिर्मिती केंद्र, अशी या महाऔष्णिक विद्युत केंद्राची ओळख होती.
* नववा संच पूर्ण क्षमतेने सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट इतकी होणार असल्याने हा सर्वात मोठा वीज प्रकल्प राहणार आहे.
* देशात सर्वत्र वीज केंद्रे पाण्याअभावी बंद होत असतांना चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र एकमेव आहे ज्या केंद्राचे स्वत:चे इरई धरण आहे.
* या धरणातूनच या वीज केंद्राला नियमित पाणी पुरवठा होतो, तसेच वेकोलिच्या कोळसा खाणीही या केंद्राच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे कोळशा व पाण्याची टंचाई या केंद्राला कधीच जाणवली नाही.

* राज्य शासनाला सर्व दृष्टीने हे महाऔष्णिक वीज केंद्र परवडणारे आहे.
१७.०९.२०१६
अर्थसत्ता
हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप
* हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.
* हे सदस्यत्व ‘मतदानाच्या हक्कासह पूर्ण सदस्यत्व’ या वर्गातील आहे.
* एपीएक्युजीचे सदस्यत्व इंटरनॅशनल एअरोस्पेस क्वॉलिटी ग्रुप अंतर्गत प्राप्त करणारा भारत हा जगात सातवा देश आहे.
* इतर देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि जपानचा समावेश आहे, असे कंपनीने निवेदनाद्वारे कळविले आहे.
* एअरोस्पेस क्वॉलिटीमध्ये सुधारणा घडविण्याचे काम करणाऱ्या एअरोस्पेस क्वॉलिटीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एचएएल जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
* आता एचएएल जागतिक पातळीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ शकेल तसेच सध्याचा आणि नवा दर्जा सुधारणे व त्याचा आढावा घेणे यातही त्याला भाग घेता येईल, असे एचएएलचे मुख्य कार्यकारी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी सांगितले.
भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद
* भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनने एक परिषद स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. चीनमधील हुनान प्रांतात या परिषदेचे मुख्यालय राहील.
* भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीन सरकारने स्थापन केलेली ही पहिली अधिकृत सरकारी संस्था ठरणार आहे.
* चायना कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ इंटरनॅशनल ट्रेड (सीसीपीआयटी) ही ती संस्था स्थापन केली जाणार आहे. तिचा कार्यकाळ २ वर्षांचा राहील.
*  हुनानमधील सीसीपीआयटीच्या उप समितीचे चेअरमन हे जियान यांनी नव्या संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, चीन-भारत व्यवसाय परिषदेची स्थापना करणे हे माझे पहिले काम आहे.
* हुनानची प्रांतिक राजधानी चांगशा येथील सीसीपीआयटीच्या कार्यालयातूनच नव्या संस्थेचे कामकाज चालेल. नवी दिल्ली व हैदराबाद येथेही कार्यालये असतील.
* भारतात होणाऱ्या चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहित करणे तसेच समन्वय करणे ही कामे संस्था करील.
* भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय व्यापार ७०,७१ अब्ज डॉलरचा आहे. २०१५ मध्ये चीनची जागतिक आयात-निर्यात २४.५९ निखर्व युआन होती.
* गेल्याच महिन्यात भारत-चीन वित्तीय वाटाघाटी झाल्या. त्यावेळी चीनचे वित्त उपमंत्री शी योआबीन यांनी सांगितले होते की, गेल्या वर्षीपर्यंत चीनची भारतातील गुंतवणूक ४.०७ अब्ज डॉलर होती.
सिंचन प्रकल्पांसाठी राज्याचे १५ हजार कोटींचे कर्जरोखे
* राज्यातील अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
* कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी युती सरकारच्या आधीच्या कार्यकाळातही कर्जरोखे काढण्यात आले होते. त्या धर्तीवर आता हे कर्जरोखे काढले जाणार आहेत.
* राज्यातील ३७६ सिंचन प्रकल्पांची कामे वर्षांनुवर्षे निधीअभावी रखडली आहेत. त्यासाठी किमान ८४ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण त्यापैकी फारसे काम सुरु न झालेले व अन्य अडचणी असलेले ४९ प्रकल्प सोडून, अन्य ३२७ प्रकल्पांसाठी या  कर्जरोख्यांमार्फत निधी उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे ५८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
* केंद्र सरकारने राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी नुकतेच १८ हजार कोटी रुपये मंजूर केले असून आणखी १२ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहेत.
* नाबार्ड व अन्य स्रोतांतून ४२ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. पुढील साडेतीन वर्षांत राज्य सरकार अर्थसंकल्पातून सुमारे २४ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे.
* त्यामुळे सुमारे १५ हजार कोटी निधीची आवश्यकता असून तो कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प पुढील तीन वर्षांत मार्गी लागतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
यंदाचा अर्थसंकल्प ३१ जानेवारीला?
* केंद्र सरकारने रेल्वे व सार्वजनिक अर्थसंकल्प यापुढे वेगळे सादर न करता एकत्रच सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २४ जानेवारीपासून सुरू करण्याबाबत विचार चालविला असल्याचे समजते.
* या अधिवेशनात ३१ जानेवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल व रेल्वेसाठी वेगळे बजेट सादर केले जाणार नाही असेही सांगितले जात आहे.
* अर्थसंकल्पासंदर्भात यंदा केले जाणारे बदल पुढच्या वर्षात नियमात बदलले जातील असेही वित्त मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे. बजेट प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.
* आजपर्यंतच्या नियमानुसार फेब्रुवारीच्या तिसर्‍या अथवा चौथ्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू केले जात असे. त्यात प्रथम रेल्वे व नंतर आम बजेट पेश होत असे.
* यंदा मात्र हे सत्र २४ जानेवारीपासून सुरू होईल व ३१ जानेवारीला एकच बजेट सादर होईल असे संकेत दिले गेले आहेत.
* जीएसटी पास करून घेण्यासाठी यंदा हिवाळी अधिवेशनही १२ नोव्हेंबरपासूनच भरविले जाईल असेही कांही सूत्रांकडून सांगितले जात आहे.
क्रीडा
सोळा पदकांसह भारत दुसऱ्या स्थानी
* भारतीय संघाने आशिया चषक ट्रॅक सायकल शर्यतीच्या अखेरच्या दिवशी दोन सुवर्णसह आठ पदकांची कमाई केली.
* या कामगिरीच्या जोरावर भारताने १६ पदकांसह (५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्यपदक) स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या हाँग काँगने अव्वल स्थान पटकावले.
* ‘भारतीय संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. विशेषत: कनिष्ठ गटातील खेळाडूंने उल्लेखनीय खेळ केला,’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक आर. के. शर्मा यांनी व्यक्त केले.
* स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. देबोराह हेरोल्डने अंतिम शर्यतीत पहिल्या व दुसऱ्या फेरीत अनुक्रमे १२.५७६ सेंकद व १२.४९३ सेंकदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.
* हाँग काँगच्या झाओजुआनला रौप्य, तर मलेशियाच्या फरीना शवातीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, केइरीन प्रकारात देबोराहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
* केझीया वर्घेस्सेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पध्रेत देबोराहने एकूण तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.
* पुरुषांच्या केइरीन गटात भारताच्या अमरजीत सिंगला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु कनिष्ठ गटात इमर्सनने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. कनिष्ठ गटात भारताच्या सनुराज पी. याने कांस्यपदक जिंकले.
* महिलांच्या गटात नयना राजेश व अनु चुटीया यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. सांघिक महिला गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
* राज कुमारी देवी, बिद्या लक्ष्मी तौरांगबाम, ऋतुजा सातपुते व जी. अम्रिता यांचा या संघात समावेश होता.
लक्ष्मीपती बालाजीची प्रथम श्रेणीतून निवृत्ती
* भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली, पण तो इंडियन प्रीमिअर लीग आणि तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळण्यासह तामिळनाडू संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत कायम राहणार आहे.
* ३४ वर्षीय बालाजीने २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात संस्मरणीय कामगिरी केली होती. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना सांगितले की,‘मी भविष्याबाबत विचार करतो. आता मला कुटुंबासोबत वेळ घालविता येईल. मी प्रथम श्रेणी क्रिकेटला १६ वर्षे दिली आहे, पण आयपीएल व टीएनपीएलमध्ये खेळणे कायम ठेवणार आहे.’
* आक्रमक गोलंदाज बालाजीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द छोटेखानी ठरली.
* त्याने केवळ ८ कसोटी, ३० वन-डे आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
* त्याने कारकिर्दीत १०६ प्रथम श्रेणी सामन्यात १२.१४ च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहेत तर २६.१० च्या सरासरीने ३३० बळी घेतले आहेत.
अजिंक्य रहाणे, रोहित शर्माचा अर्जुन पुरस्काराने गौरव
* क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी आज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. रहाणेला या वर्षीचा तर रोहितला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
* जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ््यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व्यस्त असल्याने हे दोन्ही खेळाडू पुरस्कार वितरण सोहळ््यात उपस्थित राहू शकले नव्हते.
* गोयल म्हणाले की, भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अन्य खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.
तंत्र – विज्ञान
कॅसिनी यान आता शनि निरीक्षणाच्या अंतिम टप्प्यात
* शनी व त्याची कडी व चंद्र यांचा अभ्यास केल्यानंतर आता नासाचे कॅसिनी यान त्याच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात जाणार आहे.
* आता ते शनि ग्रह व त्याच्या कडय़ांची  अधिक जवळून निरीक्षणे करणार आहे.
* ऐतिहासिक वैज्ञानिक सफरीची सांगता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण त्याआधी दोन टप्प्यांचा कार्यक्रम हे यान पूर्ण करणार आहे.
* ३० नोव्हेंबरला कॅसिनी यान शनिच्या कडय़ाच्या कक्षांमध्ये जाणार असून, त्याला एफ रिंग ऑर्बिट्स असे म्हणतात.
* कॅसिनी यान एफ रिंगपासून ७८०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. एफ रिंग कक्षांमध्ये ही कडी व शनिचे लहान चंद्र अधिक स्पष्टपणे दिसणार आहेत, असे कॅसिनी या नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या वैज्ञानिक लिंडा स्पिलकर यांनी सांगितले.
* गेल्या वेळी म्हणजे २००४ मध्ये हे यान शनिजवळ गेल्यानंतर कडय़ांच्या अगदी जवळ गेले होते.
* कॅसिनीचा अंतिम टप्पा हा ग्रँड फायनल म्हणून ओळखला जात असून तो पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल.
* शनिच्या टायटन या चंद्राच्या अगदी जवळून हे यान मार्गस्थ होईल व शनि तसेच त्याच्या कडय़ांमधील जागेतून हे यान जाणार असून, त्यात २४०० किलोमीटरचा आतापर्यंत न पाहिला गेलेला भाग बघितला जाणार आहे.
* या मोकळय़ा जागेतून यानाला २२ उडय़ा घ्याव्या लागणार असून, पहिला प्रयत्न २७ एप्रिलला सुरू होणार आहे.
* कॅसिनीच्या अंतिम टप्प्यात शनिचे जवळून निरीक्षण केले जाणार आहे.
* शनिची अंतर्गत रचनाही यातून कळणार आहे, तसेच शनिचा दिवस नेमका किती तासांचा आहे, तसेच त्याच्या कडय़ांचे वस्तुमान किती आहे हे कळणार आहे. त्यांचे वयही यातून कळणार आहे.
* कडय़ांवरील धुळीच्या आकाराचे कण तपासले जाणार आहेत. शनिची अशी मापने प्रथमच केली जाणार आहेत. एफ रिंगचा अभ्यास महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात यान वेगळय़ा कक्षेतून प्रवास करणार आहे.
* २०१६ पासून कॅसिनी यानाची कक्षा बदलण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केले आहेत.
आंतरराष्ट्रीय
चीनने केले अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण
* अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे आज चीनने प्रक्षेपण केले.
* २०२२ पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
* अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या या अवकाश कार्यक्रमाला प्राधान्य दिले असून चीन आगामी काळात "स्पेस पॉवर‘ म्हणून उदयास येईल, असे म्हटले आहे.
इटलीचे माजी अध्यक्ष सिआंपी यांचे निधन
* इटलीचे माजी अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेंट्रल बॅंकेचे गव्हर्नर कार्लो अझेग्लिओ सिआंपी  यांचे आज निधन झाले.
* आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नावाजलेले सिआंपी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
* युरोपच्या एका चलनासाठी त्यांचे मोठे योगदान आहे; तसेच इटलीच्या पडत्या काळात त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय असल्याचे मत पंतप्रधान मटेओ रेंझी यांनी व्यक्त केले आहे.
भारत आणि रशियाचे संबंध दृढच रहातील
* रशिया आणि भारत हे एकमेकांचे जून सहकारी असून त्यांचे परस्पर संबंध हे उभय राष्ट्रांच्या दक्षिण आशियाविषयक धोरणाचा महत्वाचा भाग आहेत.
* त्यामुळे चीनशी रशियाची वाढती जवळीक अथवा भारत आणि अमेरिका यांचे वाढते सहकार्य याचा या द्विराष्ट्रीय संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाहीं; असा विश्वास परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला.
* शीतयुद्ध संपुष्टात आल्यानंतर झपाट्याने बदलेल्या जागतिक राजकीय समीकरणात मोठे बदल होत आहेत.
* सध्याच्या काळात भारत आणि चीन यांच्या संबंधातील तणाव वाढत आहेत. मात्र भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या राशियाची चीनशि जवळीक वाढत आहे.
* भारताचा कायमच शत्रू असलेल्या पाकिस्तानशीही रशियाने शस्त्रपुरवठा करार केला आहे. दुसरीकडे पूर्वापर अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभारून अमेरिकेपासून चार हात लांब असणारा भारतही अमेरिकेशी जवळीक साधू पाहत आहे.
* मात्र, या घडामोडींचा भारत रशिया संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही; अशी खात्री परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
* याच क्लिष्ट राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर राशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत; हे उल्लेखनीय.
"पाकमध्ये तयार होतेय नवे आण्विक प्रक्रिया केंद्र'
* अण्वस्त्रांचा सर्वाधिक साठा करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होत असून, इस्लामाबादपासून अवघ्या तीस किलोमीटरवर नवे आण्विक प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असल्याचा खळबळजनक खुलासा पाश्‍चिमात्य संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
* या खुलाशामुळे "एनएसजी‘ सदस्यत्वाचा पाकिस्तानचा दावा बारगळणार असल्याची चिन्हे आहेत.
* इस्लामाबादपासून जवळच काहुटा येथे असलेल्या खान संशोधन प्रयोगशाळेमध्ये (केआरएल) आण्विक प्रक्रिया करणारे नवे केंद्र पाकिस्तानकडून उभारण्यात येत असल्याचा अंदाज उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या विश्‍लेषणानंतर तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
* तसेच, पुढील दहा वर्षांत पाकिस्तान प्रतिवर्षी २० नव्या अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची शक्‍यता असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात केला आहे.
* सर्वाधिक अण्वस्त्रे असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकाकडे पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याचे कार्नेजी एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस आणि स्टिमसन सेंटर यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
* "केआरएल‘मधील सुमारे १.२ हेक्‍टर जमिनीवर नव्या अण्विक प्रक्रिया केंद्राची निर्मिती सुरू असल्याचे उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांवरून दिसून येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राष्ट्रीय
मोदींचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा होणार
* पंतप्रधान मोदी ६६ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांचा हा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.
* आज मोदींच्या हस्ते गुजराथेत ११२२३ दिव्यांगांना ११ कोटी रूपयांची आवश्यक विशेष उपकरणे वाटली जाणार आहेत व या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही समजते.
* आज देशभरातील भाजप कार्यकर्ते स्वच्छता अभियान राबविणार असून अध्यक्ष अमित शहा तेलंगणातील स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत.
* भाजप युवा मोर्चातर्फे १७ व १८ सप्टेंबर रोजी देशभरातील प्रमुख बाजार, चौक, मोठे मॉल येथे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
* या स्टॉलवर नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करण्यासाठीचे अभियान राबविले जाणार असल्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
* या अॅपवर मोदींची भाषणे, मन की बात, केंद्राने उपलब्ध केलेल्या सुविधा व नव्या योजनांची माहिती आहे.
स्व. जवाहरलाल दर्डा पुरस्काराचे आज वितरण
* राजस्थानात पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना पिंक सिटी प्रेस क्लब जयपूर व लोकमत मीडिया प्रा. लि. च्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्काराने तसेच अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्काराने गौरवण्यात येते.
* राजस्थानात पत्रकारिच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना १९९९ सालापासून स्व. जवाहरलालजी दर्डा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
* यंदाचा सन २०१५-१६ चा पुरस्कार द डेझर्ट रेल च्या संपादिका श्रीमती अमृता मौर्य यांना, तर अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्कार नॅशनल अफेअर्स न्यूज नेटवर्कचे संपादक विजय त्रिवेदी यांना जाहीर झाला आहे.
* याखेरीज यंदाच्या सोहळ्यात २०१०-११ पासून २०१४-१५ पर्यंत सलग चार वर्षांच्या दोन्ही पुरस्कार विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
* * दर्डा पुरस्काराचे मानकरी
* २०११-१२ विनोद भारद्वाज (स्वतंत्र पत्रकार), २०१२-१३ श्रीचंद्र मेहता (कार्यकारी संपादक, दैनिक नफा नुकसान) , २०१३-१४, सुरेंद्र जैन पारस (मुक्त छायाचित्रकार) आणि २०१४-१५,श्रीमती राखी जैन (कंटेट हेड ए-1 टीव्ही)
* * गहलोत पुरस्कार कोणाकोणाला
* २०११-१२ चिरंजीव जोशी सरोज (संपादक, पाक्षिक नवयुग),२०१२-१३ पद्म मेहेता (संपादक, जलते दीप), २०१३-१४, प्रकाश भंडारी (विशेष प्रतिनिधी द फ्री प्रेस जर्नल), २०१४-१५, महेशचंद्र शर्मा (नवज्योती.).
महाराष्ट्र
दाभोळ वीज प्रकल्पाचे विभाजन
* रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लि. या प्रकल्पाचे विभाजन करून रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लि. (वीजनिर्मिती कंपनी) आणि कोकण एलएनजी प्रा. लि. (गॅस टर्मिनल कंपनी) या दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
* बंद पडलेला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंड योजनेंतर्गत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला पुनरुज्जीवित करण्यात आला होता. त्या वेळी केंद्राने घेतलेल्या निर्णयांमध्ये विभाजनाचाही समावेश होता.
* तसेच, या प्रकल्पाच्या विभाजनाबाबत कर्जपुरवठादार बँकाही आग्रही होत्या. कर्जाचे समभागात रूपांतर केल्यानंतर आरजीपीपीएल कंपनीकडे ३८२० कोटी रुपये इतके भागभांडवल आहे.
* या कंपनीच्या समभाग भांडवलामध्ये महाराष्ट्र शासनाचा एमएसईबी होल्डिंग कंपनीमार्फत १३.५१ टक्के म्हणजे ५१६ कोटी एवढा वाटा आहे. प्रस्तावित विभाजनामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
* आरजीपीपीएल कंपनीस त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता येत नव्हती. त्यामुळे आरजीपीपीएल ही राष्ट्रीय संपत्ती अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून घोषित होऊ नये, यासाठी आरजीपीपीएल प्रकल्पाचे विभाजन करून विद्युतनिर्मिती केंद्र व आरएलएनजी टर्मिनल या स्वतंत्र कंपन्या करण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
१६ जिल्ह्यांत राबविणार कुष्ठरोग शोध अभियान
* राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १० हजार १०३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोधअभियान राबविण्यात येणार आहे.
* कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे, रायगड व पालघर या १६ जिल्ह्यांत हे अभियान राबविले जाईल.
* या अभियानामध्ये १६९ तालुके, १४ महानगरपालिका व ८८ नगरपालिकांचा समावेश आहे. ‘झीरो लेप्रसी मोहीम’ यशस्वी करू, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीव्यक्त केला.
* डॉ. सावंत म्हणाले, या अभियानाअंतर्गत समाजातील संशयित कुष्ठरुग्ण शोधण्यात येतील. निश्चित निदान झालेल्या रुग्णांना तातडीने औषधोपचार सुरू करणे, हा अभियानाचा उद्देश आहे. भारतातील १३ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १६३ जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
* राज्यात चालू आर्थिक वर्षांत सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. या जिल्ह्यात ५२२ रुग्ण आढळले आहेत.
* ठाणे, रायगड, पालघर तसेच मालेगाव येथे पल्सपोलिओ कार्यक्रम असल्याने तेथे १३ आॅक्टोबरपर्यंत अभियानातर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण ४ कोटी ९८ लाख लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी १ कोटी ५३ लाख शहरी भागातील व ३ कोटी ४५ लाख ग्रामीण भागातील लोकसंख्येचे उद्दिष्ट आहे.
* * कुष्ठरुग्णांची संख्या
* * जिल्हा रुग्णसंख्या प्रमाण
* गडचिरोली ५२२ ४.५२
* चंद्रपूर ८४८ ३.५९
* भंडारा ३९३ ३.०४
* पालघर ७२७ २.९७
* धुळे ४८१ २.१८
* गोंदिया २७१ १.९
* नंदूरबार ३३५ १.८९
* रायगड ४३१ १.५२
* जळगाव ६५९ १.४५
* वर्धा २०३ १.४५
* अमरावती ३३० १.०६
* नागपूर ४६१ ०.९२
* यवतमाळ २५४ ०.८५
* नाशिक ५०५ ०.७७
* वाशिम ९८ ०.७६
* ठाणे ५८४ ०.६४
चिकुनगुनियात तिपटीने वाढ
* सर्वाधिक रुग्ण व मृत्यू पडलेल्यांची संख्या असलेल्या हिवताप (मलेरिया) व डेंग्यूच्या रुग्णांची संख्या यंदा महाराष्ट्रात तुलनेने कमी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याउलट चिकुनगुनियाची रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
* केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय विषाणूजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम या संस्थेने देशभरातील विषाणूजन्य रोगांची माहिती गोळा केली आहे. त्यामधील आकडेवारीनुसार, मागील दोन वर्षांत एक लाखांहून अधिक जणांना बाधा झालेल्या आणि ९९ जणांचा बळी घेणाऱ्या हिवतापाचे प्रमाण चालू वर्षांत खूपच नियंत्रणात आले आहे.
* ११ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, राज्यात हिवतापाचे १२,५६३ रुग्ण आहेत. एकही बळी नाही. तसेच देशभरातील रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्राचा आठवा क्रमांक आहे. डेंग्यूबाबतही अशीच स्थिती आहे.
* २०१४ व १५ मध्ये डेंग्यूने अनुक्रमे ५४ व २३ बळी घेतले आणि जवळपास साडेतेरा हजार जणांना बाधा झाली. यंदा मात्र रुग्णसंख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे. देशात राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. एका अर्थाने हिवताप व डेंग्यूवर नियंत्रण आले असताना चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत तिपटीने वाढली आहे. मागील वर्षी ३९१ रुग्ण आढळले.
* याउलट यंदा सप्टेंबपर्यंतच रुग्णांची संख्या १०२४ वर पोचली आहे. चिकुनगुनियांच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात तिसरा आहे. कर्नाटक (९४२७) व दिल्ली (१७२४) यांच्यानंतर राज्याचा क्रमांक आहे.

* विषाणूजन्य रोगांमध्ये काला आजार व ‘जापनीज इन्सेफॉलिटीस’ या दोन आजारांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात झालेला नाही.
१८.०९.२०१६
अर्थसत्ता
अमेझॉनचे जेफ बेझोस जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती
* ई कॉमर्स कंपनी अमेझॉनचे संस्थापक, सीईओ व व्यवस्थापकीय संचालक जेफ बेझोस यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तीन नंबरवर झेप घेतली असून त्याची संपत्ती ६५.८ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
* फोर्ब्समध्ये ही माहिती दिली गेली आहे. हॅथवेच्या वॉरन बफेटला मागे टाकून बेझोस यांनी हे स्थान प्राप्त केले आहे.
* मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी वेल्स फार्गोस संदर्भातल्या बनावट अकौंट प्रकरणामुळे बफेट यांना १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले.
* त्यामुळे त्यांची संपत्ती ६६ अब्ज डॉलर्सवर आली. याचवेळी अमेझॉनचे वाढलेले उत्पन्न व कंपनीच्या शेअर्सनी घेतलेली उसळी यामुळे बेझोस यांच्या संपत्तीत वाढ झाली.
* बेझोस यांच्याकडे अमेझॉनचे १८ टक्के शेअर्स आहेत.
* जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती आहे ७८ अब्ज डॉलर्स.
* दोन नंबरवर झारा चे संस्थापक अमान सिओ आर्टेगा हे आहेत व त्यांची संपत्ती आहे ७३.१ अब्ज डॉलर्स.
पंजाब नॅशनल बँक(पीएनबी)नं विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती
* बॅटच्या वेगवान मा-यानं सगळ्यांना घायाळ करणारा क्रिकेटपटू विराट कोहली आता पीएनबीचं ब्रँडिंग करणार आहे. पंजाब नॅशनल बँक(पीएनबी)नं विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती केली आहे.
* भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहलीला पीएनबीनं अँबेसेडरपद बहाल केल्यानं सर्व आश्चर्यचकित झाले आहेत.
* सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जाच्या खाईत डुबणा-या बँकेला वर काढण्यासाठी पीएनबीच्या संचालक मंडळानं विराट कोहलीला ब्रँड अँबेसेडर केल्याची चर्चा आहे.
क्रीडा
पदकविजेत्यांचा ‘दिव्यांग खेलरत्न’ने गौरव
* ब्राझीलमधील रिओ-डी जानेरो येथे नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदके मिळवून देऊन देशाची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने ‘दिव्यांग खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तसेच प्रत्येकी पाच लाख रुपये रोख देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी येथे केले.
* मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बडोले म्हणाले, ‘‘मुंबईत लवकरच एक सोहळा आयोजित करून भालाफेकमधील सुवर्णपदकविजेता देवेंद्र झझारिया, उंच उडीतील सुवर्णपदकविजेता मरियप्पन थंगवेलू, गोळाफेकमधील रौप्यपदकविजेती दीपा मलिक व उंच उडीतील कांस्यपदकविजेता खेळाडू वरुणसिंह भाटी या चौघांना गौरविण्यात येईल.’’
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली अमरावतीची पूर्वशा
* धनुर्विद्येत (आर्चरी) भारताचा दबदबा कायम राखण्याची परंपरा अमरावतीच्या पूर्वशा शेंडे हिने कायम राखली आहे.
* तायवान येथे झालेल्या एशियन कप स्टेज-२ च्या स्पर्धेत पूर्वशाने रौप्य पदक पटकावले असून, या वर्षाचे हे तिचे सातवे आंतरराष्ट्रीय पदक आहे.
* कंपाउंड गटात भारताच्या मुलींच्या संघाने रौप्यपदक पटकावले.
* तर, वैयक्तिक खेळ प्रकारातसुद्धा पूर्वशाने दोन रौप्यपदके पटकावली. या स्पर्धेतील तिच्या प्रदर्शनामुळे जागतिक क्रमवारीत तिने २७ वे स्थान प्राप्त केले.
* आजवर अशा पद्धतीने आगेकूच करणारी अमरावतीची पूर्वशा सुधीर शेंडे ही एकमेव खेळाडू ठरली आहे.
*  जागतिक क्रमवारीत पहिल्या ३० खेळाडूंमध्ये अमरावतीच्या खेळाडूचा समावेश झाल्याने येथील क्रीडा जगतात उत्साहाचे वातावरण आहे.
* २०१४ पासून पूर्वशाने आपला दबदबा कायम राखला असून, या वर्षी तिने एका नव्याच विक्रमाची नोंद केली होती.
* नॅशनल रॅंकिंग टूर्नामेंटमध्ये ज्युनिअर, सबज्युनिअर व सिनिअर या तीनही कॅटेगरीत खेळणारी ती एकमेव खेळाडू ठरली होती.
तंत्र – विज्ञान
कृष्णविवर ताऱ्याला गिळंकृत करते तेव्हा
* अतिप्रचंड आकारातील कृष्णविवरे ही आपल्या जवळ येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला गिळंकृत करतात; यातून मोठ्या ताऱ्यांचीही सुटका होत नाही.
* कृष्णविवरांमधील प्रचंड प्रमाणातील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अशा घटना घडतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.
* कृष्णविवराने ताऱ्याला गिळंकृत केल्यानंतर नेमके काय होते याचा शास्त्रज्ञांनी प्रथमच उलगडा केला असून, एखादा तारा जेव्हा कृष्णविवराच्या पोटात ओढला जातो त्या वेळी प्रकाशाचा मोठा पट्टा दिसून येतो.
* "नासा‘च्या "वाइज‘ म्हणून प्रख्यात असलेल्या दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाशातील ही घटना शास्त्रज्ञांनी अभ्यासली आहे.
* कृष्णविवरांबद्दल अधिक माहिती नव्या शोधामुळे मिळू शकणार आहे.
* अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेची (नासा) दुर्बिण "इन्फ्रारेड लाइट‘मध्ये संपूर्ण अवकाशातील घटनांचे छायाचित्रण करत असते.
* "वाइज‘ या नावाने ही दुर्बिण ओळखली जाते. याच "वाइज‘चा उपयोग संशोधकांनी अभ्यासासाठी केला आहे.
* "नासा‘तील शास्त्रज्ञ आणि जोन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधक जोर्ट वॅन वेलझेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याबाबतचा अभ्यास केला आहे.
* "वाइज‘कडून प्राप्त झालेल्या "डेटा‘चा अभ्यास करून, कृष्णविवर जेव्हा तारा गिळंकृत करते त्या वेळी नेमक्‍या काय घटना घडतात याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला आहे.
* तारा कृष्णविवराने गिळंकृत केल्यानंतर मागे प्रकाशाचा मोठा पट्टा तयार होत असल्याचे निरीक्षण अभ्यासानंतर नोंदविण्यात आले आहे.
* या प्रकाशाच्या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात "इन्फ्रारेड लाइट‘ उत्सर्जित होत असल्याचेही आढळून आले आहे.
* वेलझेन आणि त्यांच्या पथकाने तीन ताऱ्यांचा अभ्यास केला असून, चीनमधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकाने चौथ्या ताऱ्याच्या माहितीचे विश्‍लेषण केले आहे.
* * कृष्णविवरांचे रहस्य उलगडणार?
* कृष्णविवर ताऱ्याला गिळंकृत करते तेव्हा निर्माण होत असलेल्या प्रकाशाच्या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात "इन्फ्रारेड लाइट‘चे उत्सर्जन होते.
* कृष्णविवराच्या अतिशय जवळ गेलेली कुठलीही गोष्ट विवराच्या मोठ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याच्या आत खेचली जाते. प्रकाशही त्याला अपवाद ठरत नाही.
* कृष्णविवरे मानवासाठी अद्याप रहस्यच ठरलेली आहेत.
* या कृष्णविवरांबद्दलची रहस्ये उलगडण्यासाठी नव्या संशोधनाचा फायदा होणार आहे.
फेसबुक न्यू मेक्‍सिकोच्या गावात उभारणार नवे डेटा सेंटर
* आपल्या वाढत्या युजर्सची संख्या लक्षात घेत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने न्यू मेक्‍सिकोमधील उताह शहरात नवे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
* डेटा सेंटर सुरू करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे क्‍लाऊड कम्प्युटिंगद्वारे आर्थिक भरभराट करणे. मात्र यामध्ये स्थानिकांचे प्रमाण कमी आहे.
* तज्ज्ञांच्या मते, या बांधकामासाठी सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असून, या डेटा सेंटरच्या उभारणीसाठी १.८ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.
* या प्रकल्पाच्या तात्पुरत्या कामासाठी 300 जणांना तर ५० जणांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होणार आहे.
* या डेटा सेंटरची उभारणीचे पुढील महिन्यात सुरू होणार असून प्रत्यक्ष ऑनलाइन कामाची सुरवात २०१८ पर्यंत सुरू होईल.
आंतरराष्ट्रीय
अमेरिकेत सर्वात महाग महिलांची प्रसुती
* अमेरिका महिलांच्या प्रसुतीसाठी सर्वात महाग असल्याचे शनिवारी मिडीयाने केलेल्या एका सर्व्हेमध्ये निदर्शनास आले असून हा सर्व्हे यूकेच्या मेडिकल जर्नल अंतर्गत १४ देशांमध्ये करण्यात आला.
* त्यात अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलिया दुसरा महागडा देश असल्याचे एका न्यूज एजन्सीने सांगितले आहे.
* द लँकेट शोमध्ये दर्शविलेल्या आकडेवारी नुसार अमेरिकेत सिझरीनचा खर्च १५ हजार ५०० डॉलर असून तो ऑस्ट्रेलिया पेक्षा केवळ पाच हजार डॉलरने जास्त आहे.
* ऑस्ट्रेलियामध्ये नॉर्मल प्रसुतीचा खर्च ६ हजार ७७५ असून अमेरिकेत तो १० हजार २३२ एवढा आहे.
* अहवाला नुसार जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये माता मृत्यूदर तसेच शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या जातात.
* त्यामुळे येथे शिशु संगोपन खर्च तसेच वैद्यकीय सेवांचा खर्च जास्त असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
राणी व्हिक्टोरियाच्या लग्नातील केकचा १७६ वर्षांनंतर लिलाव
* जवळपास १ लाख ३० हजारांच्या आसपास इंग्लडची राणी व्हिक्टोरिया यांच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव करण्यात आला.
* अल्बर्ट यांच्याशी १८४० मध्ये त्यांचा विवाह झाला होता. केक कापण्याची खिश्चन लग्नात पद्धत आहे. या वेडिंग केकला विशेष महत्त्व असते. हा केक त्यावेळचा आहे. राणीच्या लग्नातील या केकचे जतन करण्यात आले होते.
* त्यानंतर जवळपास १७६ वर्षांनी या केकच्या तुकड्याचा लिलाव करण्यात आला आहे.
* या तुकड्यावर १,५०० पौंडाची बोली लागली होती.
* हा केकचा तुकडा जर्सीतल्या संग्राहक डेव्हिड गेंसबरो रॉबर्ट यांच्याकडे होता. त्यांनी हा केकचा तुकडा लिलावासाठी काढला.
* केकसोबत द क्वीन्स ब्रायडल केक बंकिगहम पॅलेस असे लिहलेला बॉक्सचा देखील लिलाव करण्यात आला आहे.
* १० फेब्रुवारी १८४० मधला हा बॉक्स आहे. तसेच राणी विक्टोरिया यांची स्वाक्षरी असलेला आणि शाही मोहर असेल्या कागदाचा लिलावही यावेळी करण्यात आला.
'देशाच्या विकासाचे गुजरात इंजिन'
* पुढील वर्षीच्या "व्हायब्रंट गुजरात‘ परिषदेत भारत-अमेरिका बिझनेस कौन्सिल सहभागी होणार असून, गुजरात हे भारताच्या विकासाचे इंजिन असल्याचे कौन्सिलने म्हटले आहे.
* कौन्सिलचे अध्यक्ष मुकेश अघी म्हणाले, ‘भारतात उद्योगांमध्ये गुजरात आघाडीचे राज्य असून, ते देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून ओळखले जात आहे.
* जगभरातील गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचे "व्हायब्रंट गुजरात‘ हे उत्कृष्ट माध्यम आहे. यात कौन्सिलचाही सहभाग असणार आहे.
* ‘‘ गुजरातमधील वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. ते तेथील उद्योग मंडळांची भेट घेत आहे.
* तसेच, ह्यूस्टन, शिकागो, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी आणि मेन्लो पार्क येथील शंभरहून अधिक आघाडीच्या अमेरिकी कंपन्यांना हे शिष्टमंडळ भेट देणार आहे.
राष्ट्रीय
पुस्तकांची झेरॉक्स काढणे कॉपीराईटचे उल्लंघन नाही
* बरेच विद्यार्थी असे आहेत कि जे परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करतात.
* पण अशाप्रकारे पुस्तकांची झेरॉक्स काढणे हे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते. यावर कारवाई करावी अशा मागणीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
* मात्र शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी काढण्यात आलेल्या झेरॉक्स कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन ठरत नसल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
* ही याचिका दिल्लीतल्या पाच बड्या प्रकाशन संस्थांनी दाखल केली होती.
* झेरॉक्स दुकान आणि संदर्भ पुस्तकांचा समावेश असणारी कोर्स पॅकेट्स दिल्ली विद्यापीठाने तयार केली आहेत.
* ही कोर्स पॅकेट्स प्रकाशकांसाठी असलेल्या कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
महाराष्ट्र
राज्यात बालसंगोपन रजा लागू
* विकलांग मूल असलेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना आणि काही विशेष प्रकरणात पुरुष कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांची विशेष बालसंगोपन रजा लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
* विकलांग व्यक्तींसाठी असलेल्या (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्य समन्वय समितीच्या शिफारशी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
* त्यानुसार विकलांग अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास आणि असे मूल असून पत्नी हयात नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास म्हणजेच मुलाच्या वडिलांना संपूर्ण सेवेत ७३० दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बालसंगोपन रजा मिळू शकणार आहे.
* पूर्णत: अंध, अल्पदृष्टी, कृष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अस्थिव्यंगामुळे आलेली चलनवलन विकलांगता, मतिमंदत्व आणि मानसिक आजार असलेले मूल या प्रकारातील अपत्याचे माता-पिता या सवलतीस पात्र ठरू शकतील.
* या सवलतीसाठी अपत्याची विकलांगता याबाबतच्या अधिनियमातील विकलांगतेच्या व्याख्येनुसार असणे आवश्‍यक आहे.
* यासोबतच आत्ममग्न (ऑटीझम), सेरेब्रल पाल्सी, मतिमंद, बहुविकलांग आणि गंभीर स्वरूपाची विकलांगता असलेल्या मुलाचे माता-पिता या सवलतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.
* या सवलतीसाठी अपत्याचे वय २२ वर्षांहून कमी असणे आवश्‍यक असून, पहिल्या २ हयात अपत्यांसाठी ती लागू राहील.
* विशेष बालसंगोपन रजा एकाहून अधिक हप्त्यांमध्ये तथापि, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त तीन वेळा अशा मर्यादेत घेण्यात येईल.
* परीविक्षाधीन कालावधीत विशेष बालसंगोपन रजा दिली जाणार नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा घेता येऊ शकेल.
प्रफुल्ल सावंत यांच्या चित्राला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
* बल्गेरिया देशात आयोजित ‘इंटरनॅशनल त्रिनाले वॉटर अ‍ॅण्ड स्पिरिट एक्झिबिशन’मध्ये जगातील ६० निवडक जलरंग कलाकृतीत येथील चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या ‘बनारस घाट’ चित्राची विशेष पारितोषिकासाठी निवड झाली.
* ईस्ट वेस्ट इंडोलॉजिकल फाऊंन्डेशनच्या वतीने ५०० युरोचे ‘अ‍ॅवार्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
* वर्ना आर्ट गॅलरी येथे झालेल्या या चित्र प्रदर्शनात ६० देशांतील निवडक चित्रकारांच्या ५०० जलरंग माध्यमातील कलाकृती सादर झाल्या.
* यावेळी त्रिनालेच्या तज्ज्ञ परीक्षक समितीने या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनातील १५ दिग्गज चित्रकारांना त्यांच्या दर्जेदार चित्रकृतींसाठी आंतरराष्ट्रीय पारितोषिक देऊन सन्मानित केले.
* त्यात चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या ‘बनारस घाट’ चित्राची परीक्षकांनी अवॉर्ड ऑफ एक्सलन्ससाठी निवड केली.
*  ५०० युरो अर्थात ३७,५०० रुपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
* बल्गेरिया देशाच्या कलाप्रांतात चित्रकलेत पारितोषिक प्राप्त करणारे सावंत पहिलेच भारतीय ठरले.
* त्यांच्यासोबत स्वीडन येथील ज्येष्ठ चित्रकार स्टानिस्लॉ झोलाडज्, इंडोनेशियाचे यांन्चो यान्काव, बुल्गेरियाचे अटानस माटसोरफ अशा १५ चित्रकारांना गौरविण्यात आले.
* सावंत यांनी बनारस घाटावर ‘संस्कार भारती’ संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय निसर्ग चित्रण कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रात्यक्षिक दिले.
* सावंत यांच्या शैलीतील हे नावीन्यपूर्ण चित्र म्हणता येईल. बनारस घाटावरील सौंदर्याने नटलेल्या एका उंच मंदिराच्या बाजूवर बसून प्रत्यक्ष स्थळावरील दगडी मंदिरे, त्यांच्या गंगा नदीकडील घाटाकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि समोरचा गंगेचा अथांग प्रवाह याचे सृजनशील चित्रण सावंत यांनी आपल्या कुंचल्यातून केले.
* आगामी काळात त्रिनाले ट्रॅव्हल एक्झिबिशनच्या वतीने बल्गेरियात सहा ठिकाणी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
संचालकपदी संजय पाटील
* राज्यातील सांस्कृतिक विभागाच्या सर्वच खात्यांची जबाबदारी ‘अतिरिक्त’ खांद्यांवर देण्यात आली होती. त्यामुळे साहित्य - सांस्कृतिक वर्तुळातून नाराजी व्यक्त होत होती.
* गेल्या अनेक महिन्यांपासून सांस्कृतिक संचालनालयाचा कार्यभारही प्रभारी अधिकारी सांभाळत होते; आता मात्र ही संचालकाची जबाबदारी पूर्ण वेळेकरिता संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
* सोमवारी, १९ सप्टेंबर रोजी संजय पाटील या पदावर रुजू होणार आहेत.
* सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकाची सूत्रे पाटील सांभाळत आहेत.
* तसेच पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प संचालकपदाची धुराही पाटील यांच्याकडे आहे.
* अजय आंबेकर हे संचालकपदावरून गेल्यानंतर संचालकपदाचा प्रभारी कार्यभार शैलेश जाधव आणि संजय पाटील यांनी सांभाळला होता.
* तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाटील सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळतील.
मोरमुगाओच्या समावेशाने नौदलाची वाढली ताकद
* सर्वात अत्याधुनिक विनाशिका मोरमुगाओ ही युद्धनौका भारतीय नौदलाने आपले शनिवारी लाँच केली असून यात ब्रम्होस सुपरसॉनिक मिसाइल असणार आहेत.
* १५बी नुसार मोरमुगाओ नौदलाचे प्रोजेक्ट तयार केले गेले आहे. या श्रेणीतील वॉरशिप सहजासहजी शत्रूंच्या रडारवर येत नाहीत.
* त्यासोबतच मोरमुगाओ ७० किलोमीटर अंतरावरुनही शत्रूंचे विमान आणि क्षेपणास्त्राचा छडा लावण्यात तरबेज आहे.
* या युध्नौकेत इस्त्रायल तंत्रज्ञानाने बनलेले मल्टी फंग्शन सर्व्हिलन्स थ्रेट अलर्ट रडार (MF-STAR)यंत्रणा आहे.
* यामुळे हवेत शेकडो किलोमीटर अंतरावरील शत्रूंचे विमान आणि क्षेपणास्त्रांचा पत्ता लागू शकतो.
* मोरमुगाओ भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १५-बी अंतर्गत तयार झालेली दुसरी युद्धनौका आहे. या श्रेणीतील पहिले जहाज गेल्यावर्षी एप्रिलमध्ये लाँच झाले होते.
* ४ युद्धनौका तयार करण्यासाठी २९७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून मोरमुगाओचे वजन ७३०० टन आहे. त्याची लांबी १६३ मीटर आहे.
* या वॉरशिपला चार यूक्रेनियन गॅग टर्बाइन इंजिन आहे. यामुळे जहाज ३० नॉट (जवळपास ५६ KMPH) वेगाने चालते.
एमपीएससी अध्यक्षांविरुद्ध गंभीर तक्रारी
* महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांच्या कारभाराविरुद्ध राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
* सदस्य असताना आपण स्वत: आणि दोन विद्यमान सदस्यांनी मोरे यांच्या निर्णयांना वेळोवेळी विरोध दर्शविला. पण त्यांनी बरेचदा साधी दखलदेखील घेतली नाही, असे माजी सदस्यांनी म्हटले आहे.
* व्ही. एन. मोरे हे माजी सनदी अधिकारी आहेत. निवृत्तीला काही दिवस असताना तत्कालीन आघाडी सरकारने २०१४मध्ये त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
* एका महिला डॉक्टरची असिस्टंट प्रोफेसरपदी (आॅप्थॉल्मॉलॉजिस्ट) नियुक्ती अवैध मार्गाने करण्यात आली. छाननीनंतर अर्ज अपात्र ठरलेला असतानाही तिला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आणि निवडही करण्यात आली.
* ती एका नामवंत नेत्रतज्ज्ञाची कन्या आहे. उमेदवाराने दोन रिसर्च पेपर सादर करणे अनिवार्य होते. मात्र तिने अर्ज करण्याच्या अंतिम दिवसानंतरच्या तारखेतील एक रिसर्च पेपर सादर केल्याचे आढळले.
* पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेले काम हे अनुभव म्हणून गृहीत धरता येत नाही असे असताना या ठिकाणी मात्र अपवाद करण्यात आला, असा आरोपही करण्यात आला आहे. एका सहकार महर्र्षींच्या कन्येची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली.
* अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर दोन महिन्यांनी या महिलेने अर्ज केला तरीही तो ग्राह्य धरून तिला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आणि नियुक्तीदेखील देण्यात आली.
* आयोगाच्या तीन सदस्यांनी याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
देशातील ६० टक्के आदिवासी बालमृत्यू महाराष्ट्रात
* शासकीय आश्रमशाळांमधील अनास्था व दुरवस्थेमुळे गेल्या पाच वर्षांत ५२८ आदिवासी बालकांना जीव गमवावा लागला आहे.
* चटका लावून जाणाऱ्या या घटनांमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये नुसताच आघाडीवर नाही, तर तब्बल ६० टक्के मृत्यूंचे ओझे वाहणारे राज्य आहे!
* माहिती अधिकारातून गोळा केलेली माहिती आणि लोकसभेच्या मागील अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार, काळजाचा ठाव घेणारा हा मृतांचा आकडा एप्रिल २०१० ते डिसेंबर २०१५ दरम्यानचा आहे.
* यातील काही मृत्यू नसíगक किंवा अपघाती असले तरी मृत्यूंसाठी आश्रमशाळांमधील गरव्यवस्थापन आणि साध्या साध्या मूलभूत सुविधांचा अभाव या दोन प्रमुख गोष्टी बालकांच्या जिवावर उठल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
* या मृत्यूंमागे सर्पदंशापासून ते लंगिक शोषणांपर्यंत अनेक कारणांचा समावेश आहे.
* या पाच वर्षांच्या कालावधीत देशातील ११ आदिवासीबहुल राज्यांमधील शासकीय आश्रमशाळेमध्ये एकूण ८८२ आदिवासी बालकांचे मृत्यू झाले; पण त्यापकी तब्बल ५२८ मृत्यू स्वतला विकसित म्हणविणाऱ्या महाराष्ट्रामध्ये झाले आहेत.
* म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण जवळपास ६० टक्के आहे. अगदी मागास असलेला ओदिशाही (१३३) महाराष्ट्राच्या खूप खूप मागे आहे.
* आदिवासीबहुल छत्तीसगडमध्येही मृत्यूची संख्या (४७) तुलनेने कमी आहे.
* विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा स्पर्धक असलेल्या गुजरात (३०), आंध्र प्रदेश (१३) या राज्यांमधील संख्या तर अगदीच कमी आहे.
* त्याचवेळी राजस्थान, झारखंड आदी राज्यांमध्ये तर अशी एकही दुर्दैवी घटना घडलेली नाही.
* महत्त्वाचे म्हणजे, मृतांचा हा आकडा आदिवासी विकास मंत्रालयाकडून थेट चालविलेल्या आश्रमशाळांमधील आहे.
* शासकीय अनुदानांवर चालणाऱ्या खासगी आश्रमशाळांमधील माहितीचा यात समावेश नाही.
पोलिसांच्या संरक्षणासाठी कायदा! आता पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई
* वाहतूक पोलिसांना मारहाण, त्यांच्या अंगावर गाडी घालणे, पोलिसांना, सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना दम भरणे, प्रसंगी मारहाण करणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने पोलीस व सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा करण्याचे ठरवले आहे.
* विनाहेल्मेट अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यामुळे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागण्याच्या घटनेनंतरही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.
* याला आळा घालण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे.
* यात १८ वर्षांखालील मुले गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांसह मालकांनाही कोठडीची हवा खावी लागणार आहे.
* अशा प्रकरणांमध्ये एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
* याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
* विनापरवाना गाडी चालविणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे.
* अल्पवयीन वाहनचालकांवर २०१५मध्ये ८ हजारांहून अधिक तर जुलै २०१६पर्यंत ६ हजारांहून अधिक कारवाईची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे.
* मोटार वाहन कायद्यानुसार, ५० सीसी क्षमतेपेक्षा जास्त इंजिन असलेल्या वाहनांचा परवाना १८ वर्षांखालील मुलांना दिला जात नाही.

* तर सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक वाहन चालविण्यास २० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
१९.०९.२०१६
अर्थसत्ता
जनधन, प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल
* जनधन आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर असून मुद्रा योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबी हटावची सुरुवात झाली आहे.
* पूर्वी मोठे कर्जदार, कमी ग्राहक आणि जास्त नफा हेच उद्दिष्ट बँकांचे असायचे.
* आता मुद्रा योजनेमुळे सामान्य व्यक्ती आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही केंद्रस्थानी मानून बँकांना मुद्रा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.
* त्यामुळे कितीही अडचणी असल्या, तरी कर्जदारांनीही ज्या कारणासाठी कर्ज घेतले त्यासाठीच त्याचा उपयोग करा, असा सल्लाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
* सामान्य व्यक्तीला मुद्रा योजनेचा आधार मिळाला नसता, तर तो सावकाराकडे गेला असता.
* त्यातून पुन्हा दुहेरी व्याजात अडकून कर्जाच्या खाईत बुडाला असता.
* त्यामुळे अशा योजना राबविणाऱ्या टीजेएसबीसारख्या बँकांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
ग्रामीण घरासाठीचे अनुदान केले तिप्पट
* ग्रामीण भागातील नागरिकांचे घरांचे स्वप्न आता साकार होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतचे या घरासाठीचे अनुदान आता तिप्पट करण्यात येत आहे.
* याबाबत सरकार बँका, वित्त संस्था आणि रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यांच्यासोबत चर्चा करत आहे.
* आगामी तीन वर्षांत या माध्यमातून एक कोटी पक्की घरे उभारण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
* यासाठी ८२ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा एक प्रमुख भाग असणार आहे.
* इंदिरा आवास योजनेंतर्गत सरकार ७० हजार रुपयांचे अनुदान देते.
* तर डोंगरी भागात अनुदानाची ही रक्कम ७५ हजार रुपये एवढी आहे.
* ही रक्कम एका घरासाठी २ लाख २५ हजारांपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे.
*  यातील १ लाख २० हजार रुपये थेट मिळतील.
* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १८ हजार रुपयांचे मजूर काम उपलब्ध करून देण्यात येईल.
* स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२ हजार रुपये स्वच्छतागृहासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
* अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने अलीकडेच बँकांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
* घरांसाठी या योजनेतून अतिरिक्त कर्ज देण्याबाबतही या वेळी चर्चा झाली.
* हे घर किमान २५ स्क्वेअर मीटरचे असेल.
* यापूर्वी ही मर्यादा २० स्क्वेअर मीटरची होती.
क्रीडा
सौरभ वर्माला उपविजेतेपद
* भारताच्या सौरभ वर्माला बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
* अंतिम लढतीत फ्रान्सच्या लुकास कोव्र्हीने सरळ सेटमध्ये सौरभवर विजय मिळवत जेतेपद पटकावले.
* पाचव्या मानांकित लुकासने ४३ मिनिटांच्या लढतीत बिगरमानांकित सौरभचा २१-१९, २१-१९ असा पराभव केला.
औरंगाबादच्या संभाजीचा डबल गोल्डन धमाका
* औरंगाबादचा उदयोन्मुख १७ वर्षीय नेमबाज संभाजी शिवाजी झनझन-पाटील याने इतिहास रचताना गबाला येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डबल गोल्डन धमाका केला.
*  त्याच्या या शानदार कामगिरीने भारतानेदेखील पहिल्याच दिवशी सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली.
*  अजरबेजानच्या गबाला येथे सुरू असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत औरंगाबादच्या संभाजी पाटील याने ज्युनियर पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्टल स्पर्धेत ५६२ गुणांसह आॅस्ट्रेलियाच्या सरगेई इवग्लेस्की आणि जेम्स एशमोर यांना मागे टाकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
*  सरगेईने रौप्य आणि जेम्स एश्मोर याने कांस्यपदक जिंकले.
*  त्यानंतर संभाजी पाटील याने आपल्या या देदीप्यमान कामगिरीत सातत्य राखताना भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून देताना भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
*  संभाजीने सांघिक सुवर्ण गुरमीत आणि रितुराजसिंह यांच्यासाथीने देशाला जिंकून दिले.
*  त्याआधी बंगालच्या शुभंकर प्रामाणिक याने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
*  त्याने हे सोनेरी यश ५० मीटर रायफल प्रो प्रकारात २० शॉटसह एकूण २०५.५ गुणांसह मिळवले.
*  झेक प्रजासत्ताकच्या फिलीप नेपेजचलने २०५.२ गुणांसह रौप्य आणि रोमानियाच्या ड्रेगोमिर ईरोदाके याने १८१.१ गुणांसह कांस्यपदक आपल्या नावावर केले.
*  शुभंकरने सांघिक गटात फत्तेसिंह ढिल्लो व अजय नितीश याच्या साथीने भारताला सांघिक रौप्यपदकदेखील जिंकून दिले.
*  याशिवाय भारतीय नेमबाजांनी ज्युनियर पुरुष संघ रायफल प्रोमध्ये रौप्य आणि दोन कांस्यपदकाची देखील कमाई केली.
*  गतवर्षी जर्मनीत झालेल्या पहिल्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले होते.
वॅटफोर्डचा ऐतिहासिक विजय
* रविवारी व्हिकारेज रोड स्टेडियमवर झालेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेच्या लढतीत यजमान वॅटफोर्ड क्लबने ३-१ अशा फरकाने युनायटेडवर मात करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
* एटिएन्ने कॅपोई, जुआन झुनिगा आणि ट्रॉय डिने यांच्या प्रत्येकी एक गोलने वॅटफोर्डला विजय मिळवून दिला.
* उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवताना वॅटफोर्डने उपस्थित २१,११८ प्रेक्षकांची मनं जिंकली.
* १९८६ नंतर ईपीएलमध्ये वॅटफोर्डने युनायटेडवर मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.
 * ३४व्या मिनिटाला वॅटफोर्डच्या कॅपोईने डॅरील जॅनमाटने चतुराईने दिलेल्या पासवर गोल करून १-० अशी आघाडी घेतली.
* या गोलनंतर स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. खेळाडूंनीही मैदानावर नृत्य करून आपला आनंद साजरा केला.
* फेब्रुवारी २०१६ मध्ये मँचेस्टर युनायटेडकडून पदार्पण करणाऱ्या मार्कस रशफोर्डने आत्तापर्यंत क्लब सहकाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक १० गोल्सची नोंद केली आहे.
* पहिल्या सत्रात आघाडी घेतल्यानंतर वॅटफोर्डने २० सामन्यांत केवळ एकच पराभव पत्करला आहे. २००० साली युनायटेडनेच त्यांना पराभूत केले होते.
* प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत एटिएन्ने कॅपोईने पाच प्रयत्नांत चार गोल केले आहेत.
* युनायटेडविरुद्ध खेळलेल्या दहा सामन्यांतील वॅटफोर्डचा हा पहिलाच विजय ठरला.
* ईपीएलमध्ये दोन्ही संघ सातव्यांदा समोरासमोर आले असून युनायटेडने ६ विजय मिळवले आहेत.
* मार्कस रशफोर्डने रविवारी वॅटफोर्डविरुद्ध केलेला गोल हा युनायटेडचा प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील ८०० वा गोल ठरला.
* जोस मॉरिन्हो यांनी प्रशिक्षक म्हणून सलग तीन सामन्यांत पराभव पत्करण्याची ही दुसरी वेळ आहे.
* याआधी २००६ साली चेल्सीच्या प्रशिक्षकपदावर असताना त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली होती.
मनोरंजन
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अभिषेक बच्चनचे नाव
* गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची नोंद झाली आहे.
* त्याची गिनीज बुकात नोंद १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून झाली आहे.
* २००९ मध्ये दिल्ली ६च्या प्रमोशनदरम्यान १२ तासांत ७ शहरांत अभिषेक दिसला होता.
* या शहरांमध्ये गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद, दिल्ली, गुडगाव, चंदीगड आणि मुंबईचा समावेश आहे.
* याकामासाठी त्याने प्रायव्हेट जेट तसेच कारने तब्बल १८०० किमीचा प्रवास केला होता.
* याबाबतीत अभिषेकने हॉलीवूड अभिनेता विल स्मिथलाही मागे टाकले.
* त्याने २००४मध्ये रोबोटच्या प्रमोशनदरम्यान दोन तासांत तीन वेळा जनतेसमोर आला होता.
आंतरराष्ट्रीय
'युएई'त भरला आंतरराष्ट्रीय मराठी वाचक मेळावा
* ग्रंथ तुमच्या दारी, दुबई आणि आमी परिवार (Akhil Amirati Marathi Indians) यांच्या संयुक्त विद्यमाने शारजा युनिव्हर्सिटी सभागृहात पहिल्या आंतरराष्ट्रीय १६ सप्टेंबर रोजी वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
* कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
* यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त व उद्योजक श्री विश्वास ठाकुर,  दुबईत ग्रंथ तुमच्या दारीला सुरुवात करून देणारे व प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे, आमी परिवाराचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी आधिकारी नितीन साडेकर, प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक श्री रवींद्र गुर्जर उपस्थित होते.
* युएईच्या विविध भागातून आलेले जवळपास ४००—५०० वाचक प्रेमी मराठी बांधव या मेळाव्यास उपस्थित होते.
* यावेळी डाॅक्टर संदिप कडवे यांनी संपादित केलेल्या ‘विश्व पांथस्थ‘ या पहिल्या आखाती मराठी मासिकचे प्रकाशन करण्यात आले.
* तसेच प्रवीण दवणे यांच्या ‘एक कोरी सांज‘ या नव्या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.
"स्थलांतरितांचा देश' जगात २१ व्या क्रमांकावर
* न्यूयॉर्क च्या मायदेशातील युद्धग्रस्त परिस्थितीमुळे स्थलांतर कराव्या लागलेल्या निर्वासितांची संख्या ६ कोटी ५३ लाख इतकी झाली असून, ही संख्या ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे.
* स्थलांतरितांचा एक देश केल्यास तो लोकसंख्येच्या बाबतीत जगातील २१ वा मोठा देश असेल. संयुक्त राष्ट्रसंघाने ही माहिती प्रसिद्ध केली असून त्यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच स्थलांतरितांची संख्या इतकी वाढली आहे.
* इराक, सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, जॉर्डन या देशांमधून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.
* दहशतवादी कारवायांमुळे या देशांमध्ये अराजकता निर्माण झाली असल्याने येथील नागरिक सुरक्षितस्थळी आश्रय घेत आहेत.
* या निर्वासितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षेबाबतही प्रश्‍न निर्माण होत आहेत.
* हे सर्व जण समुद्रातून बोटीमार्गे अथवा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडत दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेत आहेत.
* निर्वासित झालेल्या कुटुंबांची संख्या मोठी असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी जागतिक स्तरावर गंभीरपणे चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे राष्ट्रसंघाने अहवालात म्हटले आहे.
* अहवालानुसार, पृथ्वीवरील दर ११३ नागरिकांमागे एक जण निर्वासित आहे.
* स्थलांतरितांची समस्या स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रसंघाने एक उदाहरण देताना म्हटले आहे, की जगातील सर्व स्थलांतरितांचा मिळून एक देश तयार करायचा झाल्यास, तो सर्वाधिक वेगाने लोकसंख्या वाढणारा देश होईल.
* तसेच, या देशातील निम्म्या नागरिकांचे वय १८mवर्षांपेक्षाही कमी असेल. तसेच, शिक्षणाची कमतरता, आजारांमुळे मृत्यू होणे यांसारख्या समस्यांचाही त्यांना सामना करावा लागेल.
* लोकसंख्येच्या बाबतीत हा जगातील २१ वा देश ठरून ५४ वी मोठी अर्थव्यवस्था असेल.
* * जगातील स्थलांतरित
५० लाख : सीरिया
२७ लाख : अफगाणिस्तान
११ लाख : सोमालिया
* * अंतर्गत विस्थापित
६९ लाख : कोलंबिया
६६ लाख : सीरिया
४४ लाख : इराक
तस्करीतून बचावलेली बनली राजदूत
* "इसिस‘कडून होणाऱ्या मानवी तस्करीतून बचावलेल्या इराकी युवतीला संयुक्त राष्ट्रसंघाने विशेष राजदूत म्हणून घोषित केले आहे.
* नादिया मुराद बासी ताहा (वय २३) असे या युवतीचे नाव असून, मानवी तस्करीतून बचावलेल्या व्यक्तींना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी ती प्रयत्न करणार आहे.
* मानवी तस्करी झालेल्या व्यक्तीला प्रथमच अशा प्रकारचा सन्मान मिळाला आहे.
* मुराद ही इराकमधील याझदी समुदायाची प्रतिनिधी असून, "इसिस‘च्या ताब्यातून सुटल्यानंतर त्यांच्याकडून याझदी नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांना तिने सातत्याने आणि अथकपणे वाचा फोडली आहे, असे राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले आहे.
* टाइम नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या २०१६ मधील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये मुरादचाही समावेश होता.
राष्ट्रीय
'महानदी'वरून ओडिशा-छत्तीसगड आमनेसामने
* कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून तमिळनाडू आणि कर्नाटकमधील संघर्ष शिगेला पोचला असताना, आता महानदीच्या पाण्यावरून छत्तीसगड आणि ओडिशा ही दोन राज्ये आमनेसामने आली आहेत.
* या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या त्रिपक्षीय बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.
* छत्तीसगड सरकारने महानदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बंधाऱ्यांच्या उभारणीस स्थगिती देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
* ओडिशा सरकारने या बंधाऱ्यांची उभारणी तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली होती. हे प्रकल्प जवळपास पूर्ण झाले असून, त्याचे काम आता थांबविता येणार नाही, असे छत्तीसगड सरकारने सांगितले.
* ओडिशाने पाणीवाटप नियमांचा भंग करून अनेक नद्यांवर बंधारे आणि छोटी धरणे बांधली असून, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आधी त्या प्रकल्पांचे काम थांबवावे, असे आग्रही मत छत्तीसगड सरकारने मांडले.
* या दाव्यामुळे हा तिढा आणखीनच बिकट होण्याची शक्‍यता आहे.
तोंडी तलाक पद्धतीला केंद्र सरकारचा विरोध
* मुस्लिमांमध्ये तीनदा तलाक उच्चारून महिलांना घटस्फोट देण्याच्या अमानुष पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात विरोध केला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
* कायदे मंत्रालय तलाकच्या मुद्दय़ावर या महिन्यात र्सवकष व ठोस उत्तर सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे.
* आंतरमंत्री पातळीवर गृह, अर्थ व महिला-बालकल्याण खात्यांच्या अधिकाऱ्यांनी  चर्चा केली.
* तीनदा तलाकच्या मुद्दय़ाकडे समान नागरी कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. त्याकडे महिला हक्कांच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल.
* अशी तलाकची पद्धत आता पाकिस्तान व बांगलादेशातही नाही, केवळ आपल्या देशात आहे.
* सरकारची यावर भूमिका काय असावी यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक झाली.
* मुस्लिमांमध्ये तलाक ए इबादत व निकाह हलाला हे दोन प्रकार आहेत. त्यात महिलांना घटस्फोट दिला जातो.
* या प्रश्नाकडे लिंगभाव हक्कांच्या दृष्टिकोनातून पाहिले जावे असे सरकारचे मत आहे.
* तलाकप्रकरणी अनेक याचिका दाखल असून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तरासाठी चार आठवडय़ांची मुदत दिली आहे.
* याबाबत पहिली याचिका उत्तराखंडची शायरा बानो हिने दाखल केली होती. त्यात त्रिवार तलाक, बहुपत्नीत्व व निकाह हलाला हे घटनाबाह्य़ असल्याचे म्हटले होते.
* जमियत उलेमा ए हिंद व ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड यांनी याचिकांना विरोध केला होता.
* हे व्यक्तिगत कायदे असून ते परत लिहिता येणार नाहीत व त्यात सुधारणा करता येणार नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले होते.
महाराष्ट्र
उपअधीक्षक, सहायक आयुक्तांच्या बदल्या
* राज्य पोलीस दलातील विविध घटकांत कार्यरत असलेल्या १५ सहायक आयुक्त/उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
* बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात सध्याचे व बदलीचे ठिकाण) :
* चंद्रकांत सांगळे (पवनी, भंडारा-नियंत्रण कक्ष, गडचिरोली),
* विशाल नेहूल (पांढरकवडा, यवतमाळ-धारणी, अमरावती),
* दीपक हुंबरे (वाई-राज्य गुप्त वार्ता विभाग, पुणे),
* सेवानंद तामगाडगे (चंद्रपूर मुख्यालय, यवतमाळ),
* अनिल महाबोले (औसा, लातूर- एम.आय.ए. पुणे),
* शालीग्राम पाटील (कर्जत-नाशिक शहर),
* रमेश गावित (पाचोरा, जळगाव-मुंबई),
* भास्कर थोरात (करमाळा-गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे),
* अभिजित शिवथरे (अंजनगांव-शेवगांव),
* अनिल सारदळ (एसआयडी-अलिबाग),
* पीयूष जगताप (औरंगाबाद शहर-यवतमाळ),
* अशोक वीरकर (अमरावती शहर-देगलूर),
* डॉ. दीपाली काळे-कांबळे (गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर-सांगली),
* सुरेश घाडगे (महाराष्ट्र पोलीस अकादमी-जव्हार, पालघर),
* नीलेश पांडे (दारव्हा, यवतमाळ).
ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन
* ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. आयुष्यभर संगीतसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या नंदू होनप यांची प्राणज्योत एका कार्यक्रमात संगीतसाधना करतानाच मालवली.
* रवींद्र नाट्य मंदिरात शनिवारी रात्री नंदू होनप यांची गाण्यांची मैफील होती. मैफिलीच्या अंतिम चरणी त्यांनी त्यांचे गाजलेले ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’ हे गाणे वाजवायला घेतले होते; आणि या गाण्याचा शेवट होत असतानाच ते कोसळले.
* नंदू होनप हे भक्तीसंगीताच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले होते. श्री गुरुदेव दत्ताची गाणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
* 'निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘स्वामी कृपा कधी’, ‘अक्कलकोट स्वामींची पालखी’, ‘तूचि आशा श्रीगणेशा’, ‘विठ्ठल बावरा’, ‘गण गण गणात बोते’ अशी अनेक भक्तिगीते त्यांनी संगीतबद्ध केली होती.
* अजित कडकडे, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे अशा आघाडीच्या गायकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ही गाणी गायली.
* भक्तीगीते आणि अभंगवाणी यावर त्यांची हुकूमत होती. पण त्यासह भारुडे, स्तोत्रे, लावणी, भावगीते असे संगीताचे प्रकारही त्यांनी हाताळले होते.
* ‘आकाशवाणी’वरील विशेष गीतगंगा यात त्यांनी सहभाग नोंदवला होता.
* अनेक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. मात्र १०० चित्रपटांना संगीत देण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिले.
* 'विश्वास' हा त्यांनी संगीतबद्ध केलेला अखेरचा चित्रपट ठरला.
* नंदू होनप हे व्हायोलिन वादनातही निपुण होते.
* त्याच्या व्हायोलिनची साथ ‘सावन आया है’, ‘सुनो ना संगे मरमर’, ‘दगाबाज रे’ अशा हिंदी गाण्यांनाही लाभली होती.
मॅन ऑफ द ईअर पुरस्काराने सुधीर मुनगंटीवार सन्मानित
* मॅन ऑफ द ईअर पुरस्काराने गौरवांकित होत असतांना राज्यात १ जुलैला लोकसहभागातून लावण्यात आलेल्या २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद घेतल्याचे ”लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” चे प्रमाणपत्रही आजच मिळाले.
* या दोन्ही गोष्टी खूप आनंददायी असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
* ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्सच्या वतीने रविवारी पद्मविभूषण डॉ.बी.के. गोयल यांच्या हस्ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मॅन ऑफ द ईअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
* यावेळी वुमन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
* याच कार्यक्रमात डॉ. सुजाता वासानी आणि डॉ. अमितकुमार शर्मा यांना आऊटस्टॅंडिंग यंग पर्सन अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
दहावीच्या निकालाचे महत्त्व कमी होणार
* शाळांची गुणवत्ता ठरवण्यासाठी मानके निश्चित होणार.
* दहावीच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्यासाठी शाळांची गुणवत्ता दहावीच्या निकालावर न जोखण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून यापुढे शाळांचे मूल्यमापन राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे करण्यात येणार आहे.
* राज्यात प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या योजनेची अंमलबजावणी माध्यमिक स्तरावरही करण्यात येणार आहे.
* चांगली शाळा कोणती, तर दहावीचा सर्वाधिक किंवा शंभर टक्के निकाल लागणारी शाळा! असे गेल्या अनेक वर्षांच्या समीकरणामुळे दहावीच्या परीक्षांचे वाढलेले महत्त्व मोडीत काढण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
* यापुढे दहावीच्या निकालावर शाळांची गुणवत्ता ठरवण्यात येणार नाही. शाळांची गुणवत्ता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
* त्याचप्रमाणे नववी आणि दहावी असे दोन्ही वर्गाचे निकाल गृहित धरण्यात येणार आहेत. प्राथमिक शाळांप्रमाणेच नववी आणि दहावीसाठी नैदानिक चाचण्या घेण्यात येणार आहे.
* शाळांच्या परीक्षांबरोबरच ही चाचणीही विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. शाळांची गुणवत्ता ठरवण्यासाठी या चाचण्यांचा निकाल, नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि निश्चित करण्यात आलेले निकष गृहित धरण्यात येणार आहेत.
* राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेली ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ ही योजना आता माध्यमिक शाळांसाठीही लागू करण्यात येत असून त्यानुसार हे बदल करण्यात येणार आहेत.
* या योजनेनुसार परीक्षा पद्धती आणि मूल्यमापनामध्येही काही बदल करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. सध्या पाठय़पुस्तकावर आधारित परीक्षा घेतली जाते.
* त्याऐवजी अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात यावी अशी सूचना राज्यमंडळाला शिक्षण विभागाने केली आहे.
* त्यामुळे अभ्यासक्रमात असलेल्या घटकावरील एखादा प्रश्न पाठय़पुस्तकातील धडय़ात नसला तरीही त्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतील.
* ‘स्पोकन इंग्लिश’चे वर्ग माध्यमिक स्तरावरही यापुढे सुरू करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राची विक्रमी वृक्षलागवड ‘लिम्का बुक’मध्ये
* राज्यात वनविभागाने लोकसहभागातून १२ तासांत दोन कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ वृक्ष लागवड करून केलेल्या विक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
* राज्यातील वनाच्छादन वाढावे म्हणून वनमहोत्सव व कृषी दिनाचे औचित्य साधून दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प वन आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या सन २०१६-१७च्या अर्थसंकल्पात जाहीर केला होता.
*  त्यानुसार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वनविभागाने १ जुल रोजी १२ तासांत सहा लाख १४ हजार ४८२ लोकांच्या सहकार्याने, शासकीय यंत्रणेसह विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळवीत १५३ प्रजातींच्या दोन कोटी ८१ लाख २८ हजार ६३४  रोपांची ६५ हजार ६७४ ठिकाणी लागवड केल्याच्या विक्रमाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र आज वनविभागास देण्यात आले.
‘ओरॅकल’करारासाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर
* राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे.
* त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री अमेरिकेला रवाना झाले.
* ‘ओरॅकल’च्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून ही कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे.
* ओरॅकलतर्फे आयोजित ओपन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
* एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रथमच असा सन्मान मिळत आहे.
* ओरॅकलकडून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला साहाय्यभूत ठरण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे.
* या दौऱ्यात मुख्यमंत्री  कॅलिफोíनयाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांचीही भेट घेतील.
* तसेच अमेरिकेतील विविध प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार असून ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या मोहिमेंतर्गत राज्यात उद्योग सुलभतेसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत ते प्रमुख  उद्योगांच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करणार आहेत.
* राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.
* भविष्यातील गरजांचा विचार करून त्यानुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
* कंपनीचे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड अशा तीन महापालिकांना सहकार्य लाभणार आहे.
* राज्यातील ही तीन महत्त्वाची शहरे स्मार्ट सिटी होण्याकडे महत्त्वाचे पाऊल टाकणार आहेत.
डोंबिवलीला रंगणार ९०वे साहित्य संमेलन
* आगामी ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे.
* संमेलनस्थळ निश्चित करण्याबाबत रविवारी साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक झाली.
* त्यात आयोजनाचा मान डोंबिवलीच्या आगरी युथ फोरमला मिळाला आहे.
* याबाबत निर्णय पुण्यात होऊनही अधिकृत घोषणा मात्र साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हेकेखोरपणामुळे २० सप्टेंबरला नागपूरलाच होणार आहे.
* संमेलनासाठी सातारा, चंद्रपूर, बेळगाव, कल्याण, डोंबिवली, रिद्धपूर येथून निमंत्रणे आली होती.
* महामंडळाने बेळगावचे सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीमधील आगरी युथ फोरम व कल्याणचे सार्वजनिक वाचनालय यांनी सुचविलेल्या स्थळांची पाहणी केली होती.
* बैठकीत अध्यक्षांसह काही सदस्यांचा बेळगावकडे अधिक कल होता तर काहींची डोंबिवलीला पसंती होती.
* अखेर डोंबिवलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आदिवासी बालमृत्यूंत वाढ!
* ठाणे व पालघर जिल्ह्य़ांतील बालमृत्यूच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
* राज्यातील एकूण १६ आदिवासीबहुल जिल्ह्य़ांतही बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची भीती आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
* केंद्र शासनाच्या मदतीद्वारे चालणारी ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलमेंट योजना’ केंद्राने आर्थिक मदत बंद केल्यामुळे जवळपास ठप्प झाली असून, त्याचाही मोठा फटका बसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
* राज्यात नवसंजीवन योजनेंतर्गत १६ आदिवासी जिल्हे असून, ठाणे व पालघर जिल्ह्य़ात २०१४-१५ मध्ये ९६७ बालमृत्यूंची नोंद आहे.
* त्यापाठोपाठ नंदुरबारमध्ये ७७० बालमृत्यू, नाशिक ५८०, गडचिरोली ५९९, अमरावतीत ३४४ बालमृत्यूंची नोंद झाली असून, २०१४-१५ मध्ये ४१८६ बालमृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
* यंदा पहिल्या सहा महिन्यांतच ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी भागात ६०० बालमृत्यूंची नोंद झाली असून महिला व बालकल्याण तसेच आदिवासी विभागाच्या अनेक योजना प्रभावीपणे आदिवासी भागात राबविल्या जात नसल्याचा फटका यंदाही बसेल, अशी भीती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
* आदिवासी जिल्ह्य़ात महसूल विभाग, वन विभागाकडून रोजगाराची कामे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे साधारणपणे नोव्हेंबरमध्ये रोजगार शोधण्यासाठी आदिवासी मोठय़ा संख्येने स्थलांतर करतात.
* पावसाळ्याच्या सुमारास शेतीनिमित्ताने ते आपल्या घरी परत येतात. त्यामुळे उपचारासाठी पाठपुरावा करण्यात अडचणी येतात.
* परिणामी, जुलै व ऑगस्ट महिन्यात बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होते, असे आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
* २०१२-१३ मध्ये ४५८१ बालमृत्यूंची नोंद होती. २०१३-१४ मध्ये ३९६२ बालमृत्यू झाले, तर गेल्या वर्षी यात जवळपास २०० बालमृत्यूंची वाढ झाली.
* गेल्या चार वर्षांत मातामृत्यू दरातही सातत्याने वाढ होत आहे. २०१०-११ मध्ये १४६६ मातांचा मृत्यू झाला.
* २०१२-१३ मध्ये १४०० मातामृत्यू, २०१३-१४ मध्ये हे प्रमाण थोडे कमी होऊन १३९० एवढे झाले होते. त्यात २०१४-१५ मध्ये पुन्हा वाढ होऊन १४४६ मातांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवाडीवरून दिसून येते.
* यात प्रसूतीकाळातील रक्तस्रावाने ३२७ मातांचा मृत्यू, गरोदरपणातील उच्च रक्तदाबाने १९१ मातांचा मृत्यू, तर प्रसूतीपश्चात जंतुदोषामुळे १५३ मातांचा मृत्यू झाला.

२०.०९.२०१६
अर्थसत्ता
बँकांच्या अर्थस्थितीत लक्षणीय सुधार
* बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होत असून येत्या वर्ष – दीड वर्षांत देशातील बँकांची स्थिती स्थिरावले, असा विश्वास मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.
* गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा बँकांची बुडीत कर्जाबाबतची स्थिती उल्लेखनीय असल्याचेही मूडीजने म्हटले आहे.
* रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार बँका त्यांच्या कर्जाबाबतच्या मालमत्ता गुणवत्तेला प्राधान्य देत असून एकूणच बुडीत कर्जाबाबत बँकांकडून सकारात्मकरीत्या गतीने पावले उचलली जात असल्याचेही अमेरिकास्थित पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
* बँकांची मालमत्ता गुणवत्ताही येत्या काही महिन्यांमध्ये सुधारेल, असा दावा करतानाच बँकांची बुडीत कर्जाबाबतची स्थिती ही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सध्या खूपच आशादायी असल्याचेही मूडीजने म्हटले आहे.
* गेल्या आर्थिक वर्षांतील बँकांची याबाबतची कामगिरी उल्लेखनीय राहिल्याचेही पतमानांकन संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत वेदलमणी यांनी म्हटले आहे. येथील बँकांना पूरक वातावरण मिळत असल्याने भारतीय बँकाही आता आर्थिक बाबतीत स्थिरावत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.
* मालमत्ता गुणवत्ता प्रक्रियेत ७० टक्के हिस्सा राखणाऱ्या एकूण १५ बँकांना मूडीज पतमानांकन देते, पैकी ११ बँकांचे मानांकन हे सकारात्मक राहिले आहे.
* रिझव्‍‌र्ह बँकेकडून येणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपातीबाबत साशंकता व्यक्त करतानाच वेदलमणी यांनी बँकांना निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ नोंदविता येईल, असे स्पष्ट केले.
* या क्षेत्रातील पतकिंमत तूर्त चढीच राहील, असे नमूद करत त्यांनी खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता भांडवल हा मुख्य भक्कम आधार असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
* सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना येत्या तीन वर्षांसाठी १.२ लाख कोटी डॉलरच्या भांडवली निधीची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले.
जीएसटी नेटवर्कमध्ये वाढणार केंद्र सरकारचा आर्थिक सहभाग
* वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) साठी माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जे जीएसटी नेटवर्क तयार करण्यात येणार आहे, त्यात केंद्र सरकारचा आर्थिक सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.
* सध्या जीएसटी नेटवर्कमध्ये केंद्राचे आणि राज्य सरकारांचे प्रत्येकी २४.५ टक्के याप्रमाणे ४९ भाग आहेत.
* उरलेले ५१ टक्के भाग एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एलआयसी हाउसिंग अशा बिगरसरकारी वित्तीय संस्थांकडे आहेत.
* मात्र भारतीय महसूल सेवेतील (कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज) अधिकाऱ्यांनी वित्तीय संस्थांच्या इतक्या मोठ्या सहभागाबद्दल अप्रत्यक्षपणे आक्षेप नोंदविल्यानंतर जीएसटी नेटवर्कमध्ये केंद्राचा सहभाग वाढविण्याबाबत विचार सुरू झाल्याचे समजते.
* जीएसटी नेटवर्क केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निधीवरच उभे असल्याने त्याच्या व्यवस्थापनात प्रचंड वेतन आणि भत्ते देउन खासगी व्यक्तींकडे सोपविण्याचे समर्थन करणे शक्य नाही, असे भारतीय महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
* त्यामुळे जीएसटी नेटवर्कमध्ये आर्थिक सहभाग वाढविण्याचा विचार केंद्राच्या पातळीवर सुरू झाला आहे. ज्यातून देशाच्या कराचा प्रचंड हिस्सा जमा होणार आहे, ते संपूर्ण नेटवर्क खासगी व्यक्ती वा संस्था यांच्या नियंत्रणाखाली जाता कामा नये, असे महसूल सेवा अधिकाऱ्यांच्या असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
* या असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जीएसटीसाठीचे कायदे व नियम तयार करण्यात आले आहेत.
* त्याच्या अमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील ६० हजार महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे.
* तसेच जीएसटीविषयी व्यवसाय आणि उद्योगांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कामही त्या प्रशिक्षणाचा भाग आहे.
क्रीडा
भारतीय नेमबाजांचा पदकांचा षटकार
* कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखताना पदकांचा षटकार ठोकला.
* सोमवारी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली. या कामगिरीसह भारत १३ (४ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य) पदकांसह रशियापाठोपाठ (१४) दुसऱ्या स्थानावर आहे.
* भारताने पहिल्या दिवशी तीन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई केली होती.
* दुसऱ्या दिवशी त्यांना महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळाले.
* यशस्विनी सिंग, मलाईका गोयल व हर्षदा निथावे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ११२२ गुणांची कमाई केली.
* रौप्यपदक जिंकणाऱ्या टर्की संघाला ११०४ गुण मिळाले, तर उजबेकिस्तानने १०८६ गुण नोंदवीत कांस्यपदक मिळविले.
* वैयक्तिक विभागात मार्गारिटा लोमोवा (रशिया), अ‍ॅना देदोवा (चेक प्रजासत्ताक) व अफाफ एल्होदोद (इजिप्त) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळविले.
* गौरव राणा, हेमेंद्र कुशवाह व सौरभ चौधरी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कनिष्ठ पुरुष गटात दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्यपदक पटकाविले.
*  वैयक्तिक गटात अनमोलकुमारने रौप्यपदक मिळविले. त्याने १९७.५ गुण घेतले.
* रशियाच्या आर्तेम चेनरेसोव याने १९९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
* एवगेनी बोरोवोई याला कांस्यपदक मिळाले.
* गायत्री नित्यानंदमने सोनिका व आदिती सिंग यांच्या समवेत ५० मीटर रायफल थ्रीपोझिशन या क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळविले.
* गायत्रीने वैयक्तिक विभागातही कांस्यपदक जिंकले. तिने ४३८.९ गुण नोंदविले.
* निकोला फोईस्तोवा (चेक प्रजासत्ताक) व ओल्गा एफिमोवा (रशिया) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. त्यांना अनुक्रमे ४५१.५ व ४५०.६ गुण मिळाले.
* दिलरीन गिलनेदेखील अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. स्कीट प्रकारात अनंतजीतसिंग नरुका, सुखबीरसिंग हरिका व हामझा शेख यांचा समावेश असलेल्या भारतीय संघास कांस्यपदक मिळाले. त्यांना ३३७ गुण मिळाले. रशिया (३६०) व चीन (३३९) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.
सुहास मांजरेची 'सुवर्ण'धाव
* पोलीस कॉन्स्टेबल सुहास सोपान मांजरे याने ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत जोरदार धाव घेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले.
* केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या वतीने ६५ व्या अखिल भारतीय पोलीस अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
* तर धावण्याच्या ८०० मीटर स्पर्धेत सोनी मोकळने सुवर्ण पदकावर नाव कोरले.
* स्पर्धेत निमलष्करी बल आणि राज्य पोलीस अशा ४0 संघाच्या १ हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
* रिले स्पर्धेत महाराष्ट्र संघात सुहाससह विपीन धावले (सातारा), राहूल काळे (सिंधूदुर्ग), विजय जाधव (कोल्हापूर) यांचा समावेश होता.
* त्याचबरोबर वैयक्तिक ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सोनी मोकळने सुवर्ण पदक मिळवले.
* साईगीताने ५००० मीटर स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले.
* स्वाती भिलारेने ४ बाय ४०० मी. रिले स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.
* सुहासच्या 'सुवर्ण' कमाईची मुंबई पोलिस दलाने तात्काळ दखल घेत त्याला पोलिस नाईक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमबाज प्रियेशाचे यशस्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण
* कानाने ऐकू येत नसले, तरी तिला आपले टार्गेट निश्‍चित माहिती असते. ते साध्य करण्याची अचूकताही तिच्याकडे आहे.
* याच जोरावर पुण्याच्या प्रियेशा देशमुख हिने बधिरांच्या पहिल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.
* ही स्पर्धा कझाकस्तान येथे झाली. कर्णबधिर असूनही नेमबाजीसारख्या कठीण क्रीडा प्रकारात २३ वर्षीय प्रियेशाने आंतरराष्ट्रीय पदार्पणातच विजयमंचाचा अनुभव घेतला.
* प्रियेशाने अंतिम फेरीत १८०.४ गुणांची कमाई करून तिसरा क्रमांक पटकावला.
* तीन वर्षापूर्वीच नेमबाजीत क्रीडा कारकीर्द सुरू करताना तिने मिळविलेले यश निश्‍चितच मोठे आहे.
* पात्रता फेरीत ४०४.९ गुण मिळवून ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती.
* अंतिम फेरीत तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
* युक्रेनची स्विटलाना यात्सेन्को (२०१.६) सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.
* सर्बियाची गोर्डाना मिकोविच (२००.३) रौप्य पदकाची मानकरी ठरली.
आंतरराष्ट्रीय
रशियन संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या पक्षाचा विजय
* रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे वर्चस्व कायम रहाणार आहे.
* संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे.
* सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून पुतिन यांची सत्ता कायम रहाणार असल्याचे स्पष्ट झाले.
* आतापर्यंत ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून, ४५० सदस्यांच्या संसदेत युनायटेड रशिया पक्षाचे ३३८ सदस्य निवडून आले आहेत.
* रविवारी मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये पुतिन यांचा पक्ष बाजी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालही तसेच लागले आहेत.
* अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा ज्या प्रमाणे जागतिक राजकारणावर, धोरणांवर परिणाम होतो.
* त्या तुलनेत रशियाची निवडणूकी तितकी महत्वाची वाटत नसली तरी, जागतिक संतुलनाच्या दृष्टीकोनातून या निवडणुकीचे महत्व आहे.
* कारण अनेक मुद्यांवर अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र मतभेद आहेत.
* वेळोवेळी या मतभेदांचा जागतिक राजकारणावर परिणाम झाला आहे.
युनोने घेतली उरी हल्ल्याची दखल
* रविवारी काश्मीरमधील उरी येथील सैन्य शिबिरावर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला.
* यामध्ये आतापर्यंत २० जवान शहीद झाले आहेत. सैनिकांनी ४ दहशतवाद्यांना मारले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध होतो आहे.
* संयुक्त राष्ट्रानेही याचा निषेध नोंदवला आहे.
* रविवारी जम्मू-काश्मीर उरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बन-की-मुन यांनी निषेध केला.
* तसेच या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना ओळखून त्यांना न्यायालयासमोर आणले जाईल, असेही ते म्हणाले.
सागरी जलतापमानवाढीमुळे वादळांचा धोका
* सागराच्या वरच्या भागातील पाणी गेल्या २० वर्षांत जास्त प्रमाणात तापत असून त्यामुळे चक्रीवादळे होतात तसेच बर्फाचा थर नष्ट होतो तसेच जागतिक हवामान बदलते असे नवीन अहवालात म्हटले आहे.
* आययूसीएन वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेसमध्ये हवाई येथे नुकताच हा अहवाल सादर करण्यात आला.
* १९९५ पासून सागराचे वरच्या थरातील तापमान जास्त वाढत असून त्यामुळे जागतिक हवामानात बदल होत आहेत.
* प्रा. ग्रँट बिग व प्रा. एडवर्ड हॅन या शेफिल्ड विद्यापीठाच्या भूगोल विभागातील वैज्ञानिकांनी सांगितले की, पाण्याचे तापमान वाढल्याने जागतिक हवामान बदलले आहे.
* हे बदल २००५ मध्ये न्यूऑर्लिन्समध्ये कतरिनासारखी जी वादळे झाली शिवाय फिलिपिन्समध्ये २०१३ मध्ये जे हैयान वादळ झाले त्यातून दिसून आले.
* दक्षिण अ‍ॅटलांटिक सागरात १९७० मध्ये प्रथम उपग्रहांनी वादळे टिपली गेली.
* थंड सागरी जलामुळे वादळे नसलेल्या भागात नंतर वादळे झाली.
* २००४ मध्ये सागरी तापमान खूप जास्त असल्याने वादळांना अनुकूलता होती त्यानंतर ब्राझीलमध्ये वादळे झाली. गरम पाण्यामुळे आक्र्टिक भागात पाण्याचे थर वितळले.
* ध्रुवीय प्रदेशात तापमानवाढ दुप्पट होती. त्यामुळे आक्र्टिक किनाऱ्यावर वादळे झाली. त्यामुळे परिसंस्थेला धक्का बसला.
* गरम सागरांमुळे एल निनो परिणाम वाढले. ते प्रवाह मध्य पॅसिफिककडे सरकू लागले. अनेकांना गरम समुद्र म्हणजे चांगले हवामान असे वाटते, पण ते खरे नाही.
* सागरी जल तापमानवाढीने जागतिक हवामानावर वाईट परिणाम होतो.
* एल निनो परिणाम सागरी जलतापमान वाढल्याने निर्माण होतो. त्यामुळे पूर, वादळे, दुष्काळ यात अनेक लोक मरतात असे प्रा. ग्रँट बिग यांनी सांगितले.
राष्ट्रीय
जागतिक पातळीवर पाकला एकटे पाडणार
* भारत जागतिक पातळीवर पाकिस्तानला जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता राजनैतिक प्रयत्नांद्वारे एकटे पाडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून हा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आला.
*या उद्देशार्थ, या हल्ल्यामधील पाकिस्तानच्या सहभागासंदर्भातील सर्व पुरावेही आवश्‍यकता भासल्यास भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर दिले जातील.
* पाकिस्ताननेच उरी येथील दहशतवादी हल्ला घडविल्याचे सर्व पुरावे भारताकडे आहेत. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी बनावटीच्या शस्त्रांबरोबरच पश्‍तो भाषेमधील साहित्य आढळून आले आहे.
* याचबरोबर दहशतवादी पाकिस्तानमधूनच आल्याचे जीपीएस ट्रॅकरच्या माध्यमामधूनही सिद्ध करता येणे शक्‍य असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
* पाकिस्तानने या हल्ल्याशी कसलाही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र
छत्रपती संभाजी राजे भोसले यांची पर्यटन दूत म्हणून निवड
* महाराष्ट्रातील किल्ले व गडांचे संवर्धन करण्यासाठी तसेच वारसास्थळांचे जतन करण्यासाठी वारसास्थळ धोरण आखले जाईल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केले.
* तसेच राज्यातील शिवकालीन किल्ले व गड यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांची पर्यटन दूत म्हणून निवड करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
* रावल म्हणाले, खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा किल्ले व गड यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची पर्यटन राजदूत म्हणून या वेळी निवड करण्यात आली आहे.
* छत्रपती संभाजी राजे म्हणाले, महाराष्ट्रातील इतिहास जगासमोर यावा यासाठी अनेक वर्षे मी काम केले.
* महाराष्ट्रातील वारसास्थळांचे तसेच इतिहासातील गड व किल्ले यांचे पावित्र्य जपण्यासाठी वारसास्थळ जतन धोरण आखणे गरजेचे आहे.
* यापूर्वी रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कामे लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.
* मुख्यमंत्र्यांनी २०१७ हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केल्याची नांदी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात
* माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वाढता वापर करून गतिमानता आणायची आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात करायची असे नवे धोरण राज्य सरकार राबविणार आहे.
* सातवा वेतन आयोग तोंडावर असतानाच राज्य सरकारने नोकरभरतीवर गदा आणल्याने बेरोजगारांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
* राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी एक परिपत्रक काढून या कपातीचे स्पष्ट सूतोवाच केले आहे.
* प्रत्येक विभागाला आयटी सोल्यूशन्सच्या माध्यमातून एकूण मानव संसाधनांची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आणणे गरजेचे आहे.
* त्यासाठी विभागप्रमुखांनी स्वत: लक्ष घालणे आवश्यक आहे. आयटी सल्लागार तसेच टीम त्यासाठी तयार करावी. तसे करणाऱ्या विभागांना इन्सेंटीव्ह देण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
* दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनवाढीचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसाधारण तत्त्व पाळणे आवश्यक आहे.
* सातव्या वेतन आयोगामुळे आगामी काळात वेतनावरील खर्चात होणारी संभाव्य वाढ, त्याचबरोबर १९८० ते १९९० या दशकात मोठ्या प्रमाणात झालेल्या नियुक्त्यांमुळे येत्या काही वर्षांत निवृत्तिवेतन देण्यासाठी मोठा आर्थिक भार पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्य सचिवांनी नवीन भरतीची मागणी खाली आणण्यास सांगितले आहे.
* राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची मागणी विविध संघटना करीत असताना आता सरकारने आहे त्या नोकऱ्यांमध्ये भविष्यात ३० टक्के कपात करण्याची भूमिका घेतली असल्याचे या परिपत्रकावरून स्पष्ट होते.
* सध्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या १७ लाखांच्या घरात असून, सेवानिवृत्तांची संख्या ६ लाख इतकी आहे.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना बंगविभूषण पुरस्कार
* स्वरसम्राज्ञी व भारतरत्न लता मंगेशकर यांना यावर्षीच्या बंगविभूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यानी बंगाली गीतांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना दिला जात असल्याचे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.
* ममता बॅनर्जी शनिवारी हा पुरस्कार जाहीर करताना म्हणाल्या की लतादिदींनी अनेक सुंदर बंगाली गीते गायली आणि बंगाली संगीतात मोठे योगदान दिले आहे.
* दिदीना हा पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी त्यांची संमती घेतली गेली होती असे सांगून त्या म्हणाल्या की संगीत कंपनी सारेगमचे अध्यक्ष संजीव गोयंका यांच्या सह लतादिदींच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार देणार आहे.
* या पुरस्काराची सुरवात २०११ सालापासून केली गेली आहे.
* आत्तापर्यंत सरोदवादक अजमद अली खान, गायक मन्नाडे, लेखिका महाश्वेतादेवी, फुटबॉलपटू सैलेन मन्ना, हॉकीपटू लेस्कली क्लॉडीअर, क्रिकेटपटू सौरव गांगुली, चित्रकार जोगन चौधरी, फिल्मकार गौतम घोष यांना दिला गेला आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आता ८५ टक्के कोटा
* महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांतील ८५ टक्के कोट्यातील प्रवेश हे राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला.
* यामुळे राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून फायदा होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश मिळाले आहे.
* राज्यातील खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांत प्रवेश मिळण्याबाबत स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारला यश मिळाले आहे.
* महाविद्यालयांनी ८५ टक्के जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी; तर १५ टक्के जागा इन्स्टिट्युशनल कोट्यातून भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
* मात्र, काही खासगी महाविद्यालये व इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज उच्च न्यायालयाने आदेश पारित करून सरकारने केलेले नियम कायम ठेवले आहेत.
एसटी महामंडळात होणार जम्बो भरती
* एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे.
* गेल्या दोन वर्षांत महामंडळात रिक्त जागा भरल्या न गेल्याने तब्बल १५ हजार जागा रिक्त आहेत.
* यात चालक-वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत.
* या जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशीही बोलणी सुरू केली आहे.
* २०१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर महामंडळात भरती प्रक्रिया झाली नाही. दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या.
* एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २६ हजार ११५ जागा मंजूर असून यात १ लाख ४ हजार ३९८ मनुष्यबळच सध्या कार्यरत आहे.
* हे पाहता सुमारे २२ हजार जागाच रिक्त असून यामध्ये ६ हजार ९०२ ही बढतीतील पदे तर १५ हजार १२२ सरळ सेवेतील परीक्षा घेऊन भरण्यात येणारी पदे समाविष्ट आहेत.
* बढती प्रक्रियेतील पदे भरण्याचे काम एसटी महामंडळाकडून सुरू आहे.
* सरळ सेवेत असणाऱ्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागीर, साहाय्यक कारागीर यांची पदे मोठी असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
* सध्या ३६ हजार ७३२ चालक असून आणखी २ हजार ९७७ चालकांची गरज आहे. तर ३४ हजार ८०७ वाहक कार्यरत असून आणखी ३ हजार ९६३ वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे.
* कारागीर, साहाय्यक कारागीर यांचीही ५ हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-४ मधील अन्य काही पदेही रिक्त आहेत.

* कंपनीला भरती प्रक्रियेचे काम दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली.
२१.०९.२०१६
अर्थसत्ता
देशातील प्रत्येक मुलीच्या नावे ११ हजाराची मुदत ठेव!
* आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे ११ हजार रुपयांची मुदत ठेव असणार आहे.
* ही घोषणा देशातील हेल्थकेअर नेटवर्क ‘ऑक्सी’ने केली आहे. कंपनीने हा निर्णय रिओ ऑलिम्पिकमध्ये देशातील महिला खेळाडूंनी भारताची वाढवलेली शान आणि मानानं प्रेरित होऊन घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
* कंपनीतर्फे देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे बचत खाते उघडण्यात येणार आहे.
* या अकाऊंटमध्ये प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे.
* मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ती हे पैसे काढू शकेल. ‘ऑक्सी’ची ही योजना पूर्णत: मोफत आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक पंकज गुप्ता यांनी दिली आहे.
* गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले नाव रजिस्टर करावे लागणार आहे.
* त्यानंतर ‘गर्ल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
राज्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान
* साखर उत्पादन क्षेत्राच्या विविध श्रेणीत विशेष गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ सहकारी साखर कारखान्यांना नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर इंडस्ट्रीजच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
* महाराष्ट्रातल्या ९ सहकारी साखर कारखान्यांचा त्यात समावेश आहे.
* सर्वोत्तम कामगिरी दिला जाणारा पुरस्कार जवाहर शेतकरी साखर कारखाना (यलगुड कोल्हापुर)चे अध्यक्ष कल्लप्पा आवाडेंसह कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला.
* देशात उच्च दर्जाच्या साखर उत्पादनासाठी सांगलीच्या पलुस तालुक्यातील डॉ. जी.बी.बापू लाड सहकारी कारखान्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* देशात ऊ स विकास कार्यक्रमात सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रदान करण्यात येणारे दोन्ही पुरस्कार यंदा महाराष्ट्राने पटकावले असून पहिला क्रमांक कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी कारखान्याला तर दुसरा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या पारगांवच्या भिमाशंकर सहकारी कारखान्याला देण्यात आला.
* साखर निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरीसाठी दिले जाणारे दोन्ही पुरस्कारही महाराष्ट्रातल्या कारखान्यांनीच पटकावले आहेत.
* पहिला पुरस्कार सोलापूरच्या माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याला.
* दुसरा पुरस्कार कोल्हापूरच्या कागल येथील छत्रपती शाहु कारखान्याला देण्यात आला.
* तांत्रिक कार्यक्षमता श्रेणीतला दुसरा पुरस्कार सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील शिरपूरच्या पांडुरंग सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी तर आर्थिक क्षेत्रात उत्तम व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार जालन्याच्या अंबड तालुक्यातील समर्थ सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव पावसेंनी सहकारी पदाधिकाऱ्यांसह स्वीकारला.
* देशात सर्वाधिक साखर उताऱ्यासाठी दिला जाणारा पुरस्कार सांगलीच्या वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर सहकारी कारखान्याला प्रदान करण्यात आला.
स्टील उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक
* भारत लवकरच जगात दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश बनण्याच्या मार्गावर आहे.
* चीन व जपाननंतर भारत स्टील उत्पादनात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
* लवकरच जपानला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय स्टील विभागाचे मंत्री बीरेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे.
* केंद्र सरकारने पायाभूत सोयींच्या विकासात सर्वाधिक गुंतवणूक करण्याचे लक्ष ठरवले आहे.
* रेल्वेसाठी १ लाख २५ हजार कोटी, राष्ट्रीय महामार्गांसाठी ८० ते ८५ हजार कोटी आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूद तर सरकारने चालू आर्थिक वर्षातच केली असल्याने भारतात स्टीलची मागणी हमखास वाढणार आहे.
* ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत २०२२ पर्यंत शहरांमधे ३ कोटी तर ग्रामीण भागात २ कोटी अशी एकुण ५ कोटी घरे बांधली जाणार आहेत.
* या प्रकल्पांसाठीही स्टील लागणारच आहे. सिमेंट काँक्रिटऐवजी पूर्णत: लोखंडी पूल उभारल्यास तो १५ टक्के महाग असला तरी त्याचे आयुष्य किमान १५० वर्षांचे असते.
* ही बाब लक्षात घेउन पुलांच्या उभारणीत स्टीलला उत्तेजन दिले जाणार आहे.
भारताचे परकीय कर्ज ४८५.६ अब्ज डॉलर्सवर
* भारताचे परकीय कर्ज मार्च २०१६ अखेर १०.६ अब्ज डॉलर्स म्हणजे २.२ टक्यांनी वाढून ४८५.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले असल्याचे अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
* कर्जात झालेली ही वाढ प्रामुख्याने अनिवासी भारतीयांकडून होणारी जमा व दीर्घमुदतीची कर्जे यामुळे झाली आहे.
* एक वर्षाच्या तुलनेत दीर्घमुदतीच्या कर्जातील वाढ ३.३ टक्के आहे.
* गतवर्षी ४०२.६ अब्ज डॉलर्सची दीर्घमुदतीची कर्जे होती.
* परकीय कर्जातील दीर्घ मुदतीच्या कर्जाचा हिस्सा एकूण कर्जाच्या ८२.८ टक्के आहे त्याचवेळी अल्पमुदतीची कर्जे २.५ टक्कयांनी घटून ८३.४ अब्ज डॉलर्सवर आली आहेत.
* या कर्जा चे प्रमाण घटण्यामागे प्रामुख्याने व्यापारसंबंधीच्या कर्जात झालेली घट हे मुख्य कारण सांगितले जात आहे.
क्रीडा
रिषिराज बारोटला सुवर्ण!
* भारतीय नेमबाज रिषिराज बारोट याने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वकप नेमबाजी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताला सुवर्ण मिळवून दिले.
* १९ वर्षांच्या रिषिराजने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात झेक प्रजासत्ताकाच्या खेळाडूला २५-२३ असे मागे टाकून सुवर्ण जिंकले.
* झेक प्रजासत्तकाचा लुकास सुकोमल रौप्य.
* आॅस्ट्रेलियाचा सर्गेई इव्हेगलव्हस्की कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
* भारताने आज दोन सुवर्णांसह ५ पदके जिंकली. एकूण ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि ८ कांस्यांसह भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर आला.
* रशिया दहा सुवर्णांसह २१ पदके जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे.
* प्रतीक बोस, अर्जुन बाबू आणि प्रशांत यांच्या संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात १८४९.९ गुणांची नोंद करून सुवर्णपदक जिंकले.
* सिंगापूरला रौप्य.
* जपानने कांस्य जिंकले.
* अर्जुन आणि प्रतीक हे वैयक्तिक प्रकारातही पात्र ठरले. अर्जुनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
* पुरुषांच्या ५ मीटर पिस्तुलमध्ये अनमोल,निशांत भारद्वाज व अर्जुन दास यांना १६०० गुणांसह सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
* १६४० गुणांसह रशियाने सुवर्ण पटकावले.
* महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये दिलरीन गिल, गीताक्षी दीक्षित व आषी रस्तोगी यांच्या संघाने कांस्य जिंकले.
पॅरॉलिम्पिकची शानदार सांगता
* रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेची संगीत आणि आकर्षक रंगसंगतीच्या रोषणाईसह रंगारंग कार्यक्रमाने सांगता झाली.
* ‘जैवविविधता : आपली प्रेरणा’ अशी रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेची थीम होती.
* १६ व्हिलचेअर नृत्यांगनांनी रविवारी झालेल्या या शानदार सोहळ्यात आपली कला साऱ्या जगाला दाखवली.
* या कार्यक्रमात सेपुलटुराचा या ब्राझीलच्या बँडच्या अँड्रेस किसर या हात नसलेल्या गिटारवादकाने सर्वांची मने जिंकली.
आंतरराष्ट्रीय पॅरॉलिम्पिक समिती आयपीसी चे अध्यक्ष फिलिप क्रॅवेन यांनी भाषणानंतर ऑटिझ्मने ग्रस्त गायक साउलो लुकास याने ब्राझीलचे राष्ट्रगीत गायले.
* यानंतर सहभागी १६० देशांनी आपल्या देशाच्या झेंड्यासह परेडमध्ये भाग घेतला.
आशिष देशमुख भारतीय वुडबॉल संघाचे कर्णधार
* पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय वुडबॉल संघाच्या कर्णधारपदी आ. डॉ. आशिष देशमुख यांची निवड करण्यात आली.
* व्हिएतनाममधील दानांग शहरात २४ सप्टेंबरपासून आयोजित आशियाई बीच गेम्ससाठी भारतीय वुडबॉल संघ २३ रोजी मुंबईहून रवाना होईल.
* भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे(आयओए) वुडबॉल संघ पाठविण्यात येत आहे.
तंत्रज्ञान
प्लूटो बटूग्रहावरील बर्फाळ भागाचे रहस्य उलगडले
* प्लूटो बटू ग्रहावरील हृदयाच्या आकाराचा नायट्रोजन हिमनदीचा भाग कसा तयार झाला असावा याचे कोडे वैज्ञानिकांनी उलगडले आहे.
* नासाच्या प्लुटो न्यू होरायझन्स यानाने गेल्या वर्षी बर्फाळ प्लुटो ग्रहाचे निरीक्षण केले होते.
* फ्रान्समधील एका प्रयोगशाळेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्लूटो हा वेगळा ग्रह आहे. तेथे नायट्रोजनचे संघनन विषुववृत्तावर अत्यंत कमी उंचीच्या भागात झाले आहे. त्यामुळे स्पुटनिक प्लॅनम भागात बर्फाचे अनेक थर साठलेले आहेत.
* प्लूटोवरील इतर घटकांचे वितरण व वातावरणातील त्यांच्या प्रमाणाचा विचार करण्यात आला आहे.
* प्लूटोच्या पृष्ठभागावरील बर्फ व नायट्रोजन अस्थिर असून जेव्हा त्याचे संप्लवन होते, तेव्हा तपमान उणे २३५ अंश असते.
* यात विरळ वातावरणाचा थर बर्फाच्या विवरात तयार झाला आहे. न्यू होरायझन्स यानाने प्लूटोजवळून जुलैत प्रवास केला असून त्यात संबंधित विवरातील घन नायट्रोजन हा खूप वस्तुमानाचा असल्याचे म्हटले आहे, स्पुटनिक प्लानम भागात त्याचे प्रमाण जास्त आहे.
* मिथेनचे धुके उत्तर अर्धगोलार्धात असून विषुववृत्तावरही ते सापडते. कार्बन मोनॉक्साइडचा बर्फ स्पुटनिक प्लानम या भागात सापडतो.
* आतापर्यंत प्लूटोवर बर्फ नेमके कसे पसरले गेले आहे, याचा अंदाज आला नव्हता.
* वैज्ञानिकांनी प्लूटो या बटू ग्रहाचे अंकीय प्रारूप तयार केले असून नायट्रोजन, मिथेन व कार्बन डायॉक्साइड यांसारख्या चक्रांचे त्यात सादृश्यीकरण करण्यात आले.
* प्लूटोवर घन व वायू यांचा समतोल बघितला, तर त्याला स्पुटनिक प्लानममध्ये अडकलेले बर्फ कारणीभूत आहे.
बराक-८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
* आज बराक -८ या दीर्घ पल्ल्याच्या, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिशा राज्यामधील भारतीय लष्कराच्या तळावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली.
* भारत व इस्राईलने हे क्षेपणास्त्र संयुक्तरित्या विकसित केले असून चंडीपूर येथे आज सकाळी ही चाचणी घेण्यात आली.
* हवाई मार्गाने येणारा कोणताही धोका या क्षेपणास्त्रामध्ये बसविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रडार व्यवस्थेमुळे (एमएफ स्टार) नष्ट केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले.
* या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्याही नजीकच्या भविष्यकाळात घेतल्या जाणार आहेत.
उबेरच्या विना ड्रायव्हर कारची यशस्वी चाचणी
* जगात टॅक्सी क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी असलेल्या उबेरच्या विना ड्रायव्हर कारची यशस्वी चाचणी झाली असून एकूण २० हाय डेफिनेशन कॅमेरे उबेरच्या या टॅक्सीमध्ये आहेत.
* तसेच एक लेझर सेन्सर आहेत. त्याद्वारे ऑटोमोडवर ही कार चालते.
* या कारच्या कॅमेऱ्यात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्यामुळे ट्रॅफिक, ट्रॅफिक सिग्नल यांचा अचूक अंदाज यात घेतला जातो.
* दोन मोडवर ही कार चालते एक ऑटो मोड आणि एक मॅन्युअल मोड.
* तसेच समोर एक आयपॅड असून त्यात गाडीसमोरचे अडथळे आणि इतर गोष्टी तसेच गाडीचा रूट दिसतो.
आंतरराष्ट्रीय
चीनमध्ये जगातील सर्वात मोठे हॉस्पिटल सुरू
* चीनच्या मध्यवर्ती डोंगझाऊ प्रांतात जगातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलचे उद्घाटन १६ सप्टेंबरला केले गेले.
* हे हॉस्पिटल ५ लाख चौरस मीटर म्हणजे ५४ लाख चौरस फुट जागेत पसरले असून येथे ७ हजार रूग्णांची एकावेळी सोय होऊ शकते.
* विशेष म्हणजे डोंगझाऊ विद्यापीठाची मान्यता असलेले हे पहिलेच बडे हॉस्पिटल आहे असेही समजते.
* याच्या बांधकामासाठी २५१० कोटी खर्च आला असून या हॉस्पिटलची एक शाखा पूर्वीच सुरू करण्यात आली आहे.
* या शाखेत गतवर्षी २ लाख १० हजार रूग्ण आले होते तसेच एका दिवसांत २० हजार रूग्णांना तपासले गेले होते.
* वर्षेभरात येथे ४ लाख शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत असेही सांगितले जात आहे.
जपान सरकारला पडली कुमारिका मुलींची चिंता
* सध्या एका वेगळ्याच समस्येला जपानला तोंड द्यावे लागत असून जपानमधील तरुणांना अविवाहित राहावेसे वाटत आहे.
* आपल्या करिअरवर वेळ देता यावे म्हणून जपानचे तरुण अविवाहित राहणे पसंत करीत आहेत.
* देशातील ६० टक्के मुलींनी अविवाहित राहावे वाटते तर ७० टक्के मुलांनाही अविवाहित राहावेसे वाटते.
* आश्चर्याची गोष्ट अशी की ४४ टक्के मुलींनी आपण कुमारिका आहोत अशी कबुली दिली आहे तर जपानच्या ४२ टक्के युवकांनीही आपण अद्याप सेक्सचा अनुभव घेतला नसल्याची कबुली दिली आहे.
* जपानची लोकसंख्या घटत आहे. तेथील लोकांची सेक्समधील आवड कमी झाली आहे त्यामुळेच त्यांना लग्न देखील करावेसे वाटत नाही असे म्हटले जात आहे.
* लग्न केल्यास सरकारकडून इंसेटिव्ह मिळतील असे सांगण्यात आले असून देखील युवक युवती त्याकडे दुर्लक्ष करित आहेत.
* या कारणामुळेच जपानमधील तरुणांची संख्या घटत आहे आणि म्हाताऱ्यांची संख्या वाढत आहे.
राष्ट्रीय
‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आईस्क्रिमच्या कांड्यापासून बनविलेल्या गणपतीची नोंद
* कर्नाटकातील एका तरुणाने आईस्क्रिमच्या कांड्यापासून भव्य गणपतीची मूर्ती तयार केली असून ईकोफ्रेंडली गणपतीची संकल्पना पुढे येत असताना महेश नामक या तरुणाचे हे प्रयत्न आदर्श ठरणार आहेत.
* महेश हा मारणे या गावचा रहिवाशी आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने महेशच्या या कलाकृतीची दखल घेतली आहे.
* महेशने मागील वर्षी काडीपेटीच्या कांड्याने २७ बाय १७ इंचाची मूर्ती तयार केली होती. त्यानंतर त्यानेही याही वर्षी गणपतीची मूर्ती तयार केली. त्यासाठी त्याने ३ हजार ५०० आईसक्रीम कांड्या आणि ७५० काडीपेटीच्या कांड्या वापरल्या आहेत.
* या कालाकृतीमुळे महेशला यावर्षी विक्रमांचे प्रमाणपत्र मिळाले.
गोव्यात आयबीआयएस स्टाईल्स हॉटेलचे शानदार उद्घाटन
* अकॉर हॉटेल आणि इंटरग्लोब हॉटेल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्याच आयबीआयएस स्टाईल्स या हॉटेलचे गोव्यात मोठ्या थाटामाटात मंगळवारी उद्घाटन झाले आहे.
* गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते या अत्याधुनिक हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.
* गोवा हे भारतातील सर्वात महत्वाचे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून याठिकाणी आल्यावर आपल्याला आयुष्यातील वेगळा अनुभव पाहायला मिळेल.
* आयबीआयएस हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला युनिक डिझाइन केलेल्या अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल.
* गोव्यातील आयबीआयएस स्टाईल्स हे भारतातील पहिले हॉटेल असून अ‍ॅडव्हान्स दर्जाचे आहे.
महाराष्ट्र
राष्ट्रकुल संसदीय मंडळाची मुंबईत परिषद
* राष्ट्रकूल संसदीय मंडळाची सहावी परिषद २० ते २३ जानेवारी या कालावधीत होणार असून या परिषदेस राज्यसभेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष तसेच देशातील विविध राज्यांच्या विधिमंडळ पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज दिली.
* परिषदेच्या तयारीसंदर्भात आज विधिमंडळात उच्चस्तरीय बैठक झाली.
* सर्व राज्यांचे विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी व प्रधान सचिव आदी सुमारे साडेतीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
* ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी विविध विभागांनी तयारी करावी, असे ठरविण्यात आले.
२८ हजार गावे डिजिटल
* राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्याच्या सरकारच्या कार्यक्रमात सहयोग देण्याची तयारी हॅलेट-पॅकर्ड कंपनीने दर्शविली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
* या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षणाच्या सोयी पोहोचतील.
* तसेच, ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल होणार असल्याचे त्यांनी कंपनीचे सीईओ मेग व्हाइटमन यांना सांगितले.
* या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी व्हाइटमन यांनी दर्शविली.
* यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलचे ऊर्जा धोरणविषयक संचालक नॉल्टी थेरिआॅट यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
* राज्यातील उद्योगसुलभतेच्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
* तसेच अहाना रिन्युएबल्सचे व्यवस्थापकीय संचालक जेसन तायी यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.
राज्यात आणखी ५ स्मार्ट सिटी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटीजच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या पाच शहरांचा समावेश केला आहे.
* एकट्या महाराष्ट्रातीलच पाच राज्ये या यादीत असून, त्यामुळे राज्यातील एकूण सात शहरे स्मार्ट होणार आहेत.
* पुणे आणि सोलापूरचा याआधीच समावेश झाला आहे.
* मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.
* पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी या शहराबरोबरच आग्रा, अजमेर, कानपूर हीही आता स्मार्ट सिटी योजनेत आली आहेत.
* मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व उज्जैन ही शहरेही आता स्मार्ट होणार आहेत.
* सिक्कीममधील नामची शहर स्मार्ट होण्यासाठी निवडले गेले आहे.
* ओडिशातील राउरकेला.
* राजस्थानातील कोटा तसेच नागालँडमधील कोहिमा ही शहरेही निवडली गेली आहेत.
* जम्मू-काश्मीर, प. बंगाल, केरळ, बिहार, हिमाचल प्रदेश, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोरम या राज्यांतील एकाही शहराचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश नाही.
* पंजाबमधील अमृतसर, जालंधर ही दोन शहरे.
* गुजरातमधील एकमेव बडोदा स्मार्ट सिटीजच्या तिसऱ्या यादीत आले आहे.
* कर्नाटकातील हुबळी-धारवाड, मंगलोर, टुमकुर, शिमोगा ही शहरे.
* आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि वेल्लोर.
* तामिळनाडूतील सेलम, तंजावूर, मदुराई ही शहरेही आता स्मार्ट सिटीज बनणार आहेत.
* * ६० शहरांना स्मार्ट करण्यासाठी १ लाख ४४ हजार ७४२ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
* स्मार्ट सिटीसाठी शहर निवडण्याची जी स्पर्धा होते, त्यात कल्याण-डोंबिवली दुसऱ्या क्रमांकावर असून, नागपूर पाचव्या, ठाणे आठव्या, नाशिक दहाव्या आणि औरंगाबाद २५व्या क्रमांकावर आले. स्मार्टच्या पहिल्या यादीत राज्यातील पुणे व सोलापूरचा समावेश होता.
* * स्मार्ट सिटी मुद्दे
* नाशिकचा आराखडा २१९४ कोटींचा
* जुन्या नाशिकच्या पुनर्विकासासाठी ३५९.६९ कोटी, ग्रीनफिल्ड अंतर्गत हनुमानवाडी क्षेत्र विकासासाठी ८५५.८९ कोटी रुपये, तर पॅनसिटी अंतर्गत पाणीपुरवठ्यात स्मार्ट मीटर व स्काडा सिस्टीम आणि वाहनतळ व वाहतूक व्यवस्थेसाठी ९७९.०४ कोटी रुपये.
* क्रिसिल या नामवंत संस्थेने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला.
* स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने प्रामुख्याने पर्यटनाच्या दृष्टीने सांस्कृतिक वारशांचे जतन व विकास करणे, वाइन कॅपिटल म्हणून पर्यटकांना आकर्षित करणे आणि शहराला कॉम्पॅक्ट सिटी म्हणून विकसित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
* * नागपूरचा ३९ हजार कोटींचा प्रस्ताव
* पर्यावरणास अनुकूल असा विकास
* उच्च दर्जाचे शिक्षण
* इलेक्ट्रॉनिक सिटी
* नद्या सुधारणा
* ट्रान्ससिट ओरिएन्टल डेव्हलपमेंट
* सुरक्षित शहर
* * कल्याण-डोंबिवलीचा आराखडा - २०३२ कोटींचा
* पालिका क्षेत्रातील स्टेशन परिसरांचा विकास
* वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा
* घनकचरा विल्हेवाट प्रकल्पांची उभारणी
* सर्व सुविधा आयटीशी जोडणे
* * औरंगाबादचा आराखडा - १७३० कोटींचा
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रोजगाराला प्राधान्य
* पर्यटनाला वाव, पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार
* * ठाण्याचा आराखडा - ६५०० कोटींचा
* आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा
* मनोरूग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानकाची उभारणी
* मुंबईची मेट्रो ठाण्यात. पुढे डोंबिवली, कल्याण, भिवंडीपर्यंत घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाट प्रकल्पांची उभारणी
* * सोलापूरचा आराखडा - २२४७ कोटींचा
* १०० कचरा व्यवस्थापन
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर
* सौरऊर्जा प्रकल्प, रस्ते- उड्डाण पूल
* जल पूनर्वापर प्रकल्प
* * पुण्याचा आराखडा ३ हजार कोटींचा
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करणे, संपूर्ण शहराला २४ तास पाणी पुरविणे, मल्टीलेवल पार्किंग, वाहतूक नियंत्रण केंद्र आदींचे नियोजन
राजापुरात  दुर्मीळ पतंग
* पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये अ‍ॅटलस प्रजातीचे दुर्मीळ पतंग सापडलेला असताना तालुक्यामध्ये पुन्हा एकदा दुर्मीळ प्रजापतीचा पतंग सापडला आहे.
* उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा ‘अँक्टिनास ल्युना’ हा पतंग तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी सापडला आहे.
* शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या भिंतीवर हा पतंग काल सायंकाळी आढळला.
* सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या तालुक्याच्या जंगल परिसरामध्ये दुर्मीळ प्रजातीच्या प्राणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे यापूर्वीच पुढे आले आहे.
* गत आठवडय़ामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर अ‍ॅटलस या दुर्मीळ प्रजातीचे फुलपाखरू आढळले होते.
* काल सायंकाळी याच इमारतीच्या भिंतीवर दुर्मीळ प्रजातींचे फुलपाखरू (पतंग) असलेले अँक्टिनास ल्युना फुलपाखरू (पतंग) आढळले.
* सुमारे पंधरा दिवसांचे जीवनमान असलेल्या पतंगाच्या पंखांचा रंग पोपटी फिक्कट असून, त्याच्या पंखाची रचना चंद्राच्या कलेप्रमाणे आहे.
* तालुक्यामध्ये सापडलेला हा मादी पतंग असून त्याच्या दोन पंखांमधील अंतर १०.५ सेंमी, तर उंची १६.५ सेंमी. असल्याची माहिती पक्षीमित्र मराठे यांनी दिली.
शाळा सोडल्याचा दाखला आता राज्यभर एकसमान
* विद्यार्थ्यांना शाळा सोडल्यानंतर देण्यात येणाऱ्या दाखल्यावर आता आधार कार्ड क्रमांकही शाळांना टाकावा लागणार आहे.
* बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार राज्यातील सर्व शाळांतील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवही (जनरल रजिस्टर) नमुन्यात सुधारणा करण्याबाबत शालेय शिक्षण विभागातर्फे सरकारी निर्णय जारी करण्यात आला.
* शाळा सोडल्याबद्दच्या दाखल्यांचा नमुना एकच असावा, अशी मागणी होत होती.
* त्यानुसार राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शाळेचा दाखला एकसारखाच एकाच नमुन्यामध्ये असावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने सरकारी निर्णयातून नवा नमुना जाहीर केला.
* सरकारी निर्णयात दिलेल्या नमुन्यानुसारच शाळांनी दाखले व नोंदवहींची छपाई करून घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

* त्याचबरोबर नव्याने आता शाळांना त्या विद्यार्थ्यांचा आधारक्रमांकही नोंद करण्याची, तसेच शाळा सोडताना असलेल्या वर्गाचा आयडी क्रमांकही नोंदवणेही शाळेच्या दाखल्यावर सक्तीचे करण्यात आले आहे.
२२.०९.२०१६
अर्थसत्ता
तेल आयात सात वर्षांच्या उच्चांकावर
* इंधनाबाबत आयातीवर अधिकतर निर्भर असलेल्या भारताची खनिज तेल मागणी गेल्या सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.
* देशाने ऑगस्टमध्ये १.८८ कोटी टन तेल आयात केले असून ते वर्षभरापूर्वीच्या तुलनेत यंदा ९.१ टक्के अधिक आहे.
* ऑगस्ट २०१५ मध्ये भारतातील तेल विक्री व विपणन कंपन्यांनी १.७२ टन इंधन आयात केले होते.
* यंदा देशाने नोंदविलेली तेल आयात ही एप्रिल २००९ नंतरची सर्वाधिक मागणी आहे.
तसेच भारताने यंदा तेल आयातीपोटी ३९,०३० कोटी रुपये मोजले आहेत.
* वर्षभरापूर्वीची रक्कम ही जवळपास तेवढीच, ३९,०२४ कोटी रुपये होती.
* आशियातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला भारत इंधन आयातीवर अधिकतर निर्भर आहे.
* देशाची याबाबतची क्रयशक्ती ऑगस्टमध्ये ११.४ टक्क्य़ांनी वाढली आहे.
* यंदा १.५८ कोटी टन इंधन व्यवहार झाले आहेत. यामध्ये पेट्रोलचा २२ लाख टन तर डिझेलचा ६१ लाख टन हिस्सा आहे. तर स्वयंपाकाच्या गॅससाठीची मागणी २० टक्क्य़ांनी वाढून १८ लाख टन झाली आहे. विमानासाठी लागणारे इंधनही ६ लाख टनने वाढले आहे.
* आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कमालीने खाली येत आहे. प्रमुख तेल उत्पादक देशांद्वारे इंधन पुरवठा वाढल्याने हे घडले आहे.
प्रमोद कर्नाड यांना दुसऱ्यांदा उत्कृष्ट सीईओ पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांना बँकिंग फं्रटिअर्सतर्फे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
* दिल्ली येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या नॅशनल कॉ-आॅप. बँकिंग समिट-२०१६ या परिषदेत कर्नाड यांचा गौरव करण्यात आला.
* बँकिंग फ्रंटिअर्सने रिझर्व्ह बँकेच्या माजी मुख्य महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली १२ परीक्षकांची समिती गठीत केली होती.
* त्यांनी नवी दिल्ली येथील परिषदेत बँकिंग पुरस्कार जाहीर केले. कर्नाड यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला.
क्रीडा
एमएसके प्रसाद निवड समितीचे अध्यक्ष
* भारताची माजी यष्टीरक्षक व फलंदाज एमएसके प्रसाद यांची भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
* संदीप पाटील यांच्याजागी प्रसादची निवड झाली आहे.
* तर, माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे ज्युनियर संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष असतील.
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (बुधवार) झालेल्या वर्षिक सभेत नव्या निवड समितीची घोषणा केली.
* संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीची मुदत संपल्यानंतर ही नवी समिती निवडण्यात आली आहे.
* दक्षिण विभागाचे प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलेल्या प्रसाद यांना समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे.
* या समितीत उत्तर विभागाकडून सरणदीप सिंग, पश्चिम विभागाकडून अबी कुरवेला, पूर्व विभागाकडून सुब्रतो बॅनर्जी आणि मध्य विभागाकडून राजेश चौहान यांना निवडण्यात आले आहे.
अजय देशपांडे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी
* महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पुणे येथे नुकतीच पार पडली.
* त्यात पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत साठे यांची अध्यक्षपदी, तर औरंगाबादचे अजय देशपांडे आणि उदय बक्षी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड झली आहे.
* कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : चंद्रकांत साठे,
* उपाध्यक्ष : सुरेश देव (पुणे),
* सचिव : अजय देशपांडे (औरंगाबाद),
* सहसचिव : अजित चव्हाण (पुणे),
* कोषाध्यक्ष : उदय बक्षी (औरंगाबाद),
* कार्यकारिणी सदस्य : सोहेल मुन्शी (सोलापूर), अनिरुद्ध तारळेकर (कोल्हापूर), अनिल गाजंगी, नितीन सामल (पुणे). अजय देशपांडे व उदय बक्षी हे गत २० वर्षांपासून एमसीए पॅनल पंच असून, त्यांचा क्रिकेट पंचगिरीच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग असतो.
अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
* बुधवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या ८७व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
* विशेष म्हणजे, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
* विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावरून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते.
* यामध्ये सर्वांत आघाडीवर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे नाव होते. आयसीसीमध्ये बीसीसीयाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र मुंबईत झालेल्या सभेमध्ये ही जबाबदारी ठाकूर यांच्याकडे सोपविण्याचा
तंत्र-विज्ञान
मंगळावरील खडकांच्या घर्षणातून हायड्रोजन निर्मिती शक्य
* मंगळावरील भूकंपात खडक एकमेकांवर घासले गेल्याने जीवसृष्टीस पूरक हायड्रोजनची निर्मिती होऊ शकते, असा दावा नवीन अभ्यासात करण्यात आला आहे.
* पृथ्वीवरही भूकंपामुळे खडक घासले जाऊन त्यातील हायड्रोजन बाहेर पडत असतो.
* अमेरिकेच्या येल विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की, स्कॉटलंडमधील आउटर हेब्राइड्स या भागाशी प्रस्तरभंगाजवळ निर्माण झालेल्या खडकांचा तुलनात्मक स्वरूपाचा अभ्यास करण्यात आला.
* त्यानुसार जेव्हा भूकंपाने खडक भंगतात किंवा एकमेकांवर घासले जातात तेव्हा हायड्रोजनची निर्मिती होते.
* संशोधनानुसार पूर्वीच्या काळात अशा खडकांच्या घर्षणातून सूक्ष्मजीवांच्या वाढीस आवश्यक असलेला हायड्रोजन प्रस्तरभंगाच्या भागात निर्माण झाला होता, असे येल विद्यापीठाचे भूगर्भशास्त्रज्ञ सीन मॅकमहॉन यांनी सांगितले.
* माणूस व प्राणी यांना लागणारी ऊर्जा ऑक्सिजन व शर्करा यांच्या अभिक्रियेतून तयार होते व जीवाणू विविध अभिक्रियातून ऊर्जा मिळवत असतात.
* हायड्रोजन वायूचे ऑक्सिडीकरण ही ऊर्जानिर्मिती करत असते. त्याचा वापर पृथ्वीवरील खोलवर भागातील जीवाणू करीत असतात.
* मंगळही भूकंपप्रवण आहे, आमच्या मते सूक्ष्मजीवसृष्टीस पुरेसा ऑक्सिजन मंगळावरील धरणीकंपातून निर्माण होतो. निदान काहीकाळ तरी त्याची निर्मिती होते.
* मंगळावरील पृष्ठभाग हा सूक्ष्मजीवसृष्टीस अनुकूल आहे. तेथे त्यासाठी आवश्यक ऊर्जास्रोत असावेत असा आमचा अंदाज आहे, असे मॅकमहॉन यांनी सांगितले.
* मंगळावरील खडकांची व खनिजांची तपासणी खोलवर प्रस्तरभंगाच्या ठिकाणी केल्यास त्यातून हायड्रोजन निर्मितीचे पुरावे मिळू शकतात.
* मंगळावरील २०१८ मधल्या इनसाइट मोहिमेत तेथील धरणीकंपांचा अभ्यास केला जाणार आहे.
* त्यावेळी आता आम्ही केलेल्या अभ्यासातील माहिती मंगळाच्या संदर्भातही आणखी वेगळ्या स्वरूपात सामोरी येईल असे स्कॉटलंडमधील अबेरदीन विद्यापीठाचे जॉन पारनेल यांनी सांगितले.
* अॅस्ट्रॉबायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
आंतरराष्ट्रीय
कॅनडाचा अतिसूक्ष्म राष्ट्रीय ध्वज तयार
* कॅनडाचा अतिसूक्ष्म राष्ट्रीय ध्वज तयार करण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले असून त्यामुळे सर्वात लहान राष्ट्रीय ध्वजाचे जागातिक रेकॉर्ड नोंदले गेले आहे.
* याची नोंद गिनीज बुकमध्येही घेतली जात आहे.
* युनिव्हर्सिटी ऑफ वॉटर्लूच्या इंन्स्टिट्यूट ऑफ क्वांटम कंप्युटिंग ने ही करामत साध्य केली आहे.
* हा ध्वज नुसत्या डोळ्यांना पाहता येत नाही. तो पाहण्यासाठी इलेक्ट्राॅन मायक्रोस्कोपची गरज भासते.
* त्याची लांबी आहे १.१७८० मायक्रोमीटर व व रूंदी आहे मानवी केसाच्या १/१०० इतकी. देशाच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्ताने हा ध्वज तयार केला गेला आहे.
* त्यासाठी इंजिनिअर नायन नेल्सन व त्यांचा विद्यार्थी नेटली प्रिसलिगर यांना सर्वाधिक छोटा राष्ट्रीय ध्वज बनविण्यासाठी पारितोषिकही दिले गेले आहे.
पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करा, अमेरिकन काँग्रेसमध्ये आणले विधेयक
* संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीर मुद्यावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.
* दोन अमेरिकन खासदारांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी विधेयक मांडले आहे.
* पाकिस्तान फक्त अविश्वास पात्र सहकारीच नाहीय तर, पाकिस्तानने अमेरिकेच्या शत्रूंना अनेक वर्ष मदत केली आहे असे दहशतवाद विरोधातील उपसमितीचे चेअरमन टेड पोई यांनी सांगितले.
* पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला. हक्कानी नेटवर्क बरोबर त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या लढाईत पाकिस्तान कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते असे पोई म्हणाले.
* दाना रोहराबाचेर आणि टेड पोई या दोन रिपब्लिकन सदस्यांनी हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडले.
* रशियानेही पाकिस्तान बरोबरचा संयुक्त युद्ध सराव रद्द केला आहे.
भारतामुळे नेपाळला चीनची उघड धमकी
* चीनचे भारताला भेट देणाऱ्या प्रत्येक देशांच्या प्रतिनिधींवर बारीक लक्ष असते.
* भारताबरोबर केलेल्या करार आणि संबंधावरही चीनचे लक्ष असते.
* नुकतेच नेपाळचे पंतप्रधान भारत भेटीवर येऊन गेल्याने ही बाब चीनला पचनी पडली नाही.
* भारताल महत्त्व देऊन चीनकडे सहानुभूतीशून्य पाहणे चीन-नेपाळ स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेला इजा होईल, अशा कडक शब्दांत चीनेने नेपाळला दम दिला आहे.
* ‘द ग्लोबल टाईम्स’ या दैनिकात चीन सरकारने आपली भूमिका मांडली आहे.
* भारत चीन आणि नेपाळ संबंधात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही या दैनिकातून करण्यात आला आहे.
* अलीकडेच चीन आणि नेपाळमध्ये ‘ब्रिक्स अँड रोड’ प्रकल्पावरून करार झाला आहे.
* नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी भारतला भेट दिली.
* मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून आपण भारताला भेट दिली, असे स्पष्टीकरण प्रचंड यांनी दिले.
राष्ट्रीय
भारतीय हवाई दलाच्या प्रहार क्षमतेत वाढ
* आधी केवळ हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता राखणाऱ्या ‘मिग २९’ या लढाऊ विमानाला आता अधिक क्षमतेने क्षेपणास्त्र वाहून नेता येतात.
* शिवाय जमिनीवरील लक्ष्यावर बॉम्बफेकीची नव्याने क्षमताही प्राप्त झाली आहे.
* इंधन टाकीची क्षमता वृध्दिंगत करताना हवेत इंधन भरण्याची खास व्यवस्थाही झाल्यामुळे ते अधिक काळ कार्यरत राहते.
* तिसऱ्या पिढीतील ‘मिग २९’ या लढाऊ विमानाला नुतनीकरणाद्वारे चौथ्या पिढीत रुपांतरीत करण्यात आले आहे.
* येथील ११ क्रमांकांच्या देखभाल व दुरुस्ती केंद्राने आतापर्यंत १४५ विमानांचे नुतनीकरण पूर्णत्वास नेले आहे.
* आधुनिक तंत्रज्ञानाचा साज चढवून ताफ्यात समाविष्ट झालेल्या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या प्रहार क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
* अपघातांच्या भोवऱ्यात सापडलेल्या मिग-२१ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी हवाई दल विविध पातळीवर प्रयत्न करत आहे.
* त्या अंतर्गत ‘मिग २९’च्या नुतनीकरणाची प्रक्रिया जशी हाती घेतली गेली, तसेच सुखोईच्या देशांतर्गत बांधणीद्वारे लढाऊ विमानांच्या संख्येचा समतोल साधला जात आहे.
* आतापर्यंत एकूण १४५ विमानांचे नुतनीकरण पूर्ण झाल्याची माहिती केंद्राचे प्रमुख कॅप्टन पी. के. आनंद यांनी दिली.
* या प्रक्रियेद्वारे विमानाची कारवाईची क्षमता तर लक्षणीय वृध्दींगत झाली.
* शिवाय वैमानिकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने अनेक बदल करण्यात आले.
* विशिष्ट स्वरुपाच्या ‘गिअर’मुळे सुरक्षितपणे उड्डाण व जमिनीवर उतरणे सुकर झाले.
रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा
* केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरीची मोहोर उठवली.
* अर्थात, यामुळे रेल्वेच्या विद्यमान रचनेत आणि कार्यपद्धतीत काहीही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे, अर्थसंकल्प मंजुरीची प्रक्रिया अलिकडे आणण्यालाही मंत्रिमंडळाने होकार दर्शविला आहे.
* त्यामुळे यंदा अर्थसंकल्पी अधिवेशन लवकर होईल. परंतु, त्याबाबतचे वेळापत्रक चर्चेनंतर ठरविले जाईल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
* * रेल्वेचा पसारा...
१ कोटी ३० लाख रोजचे प्रवासी
११,००० रोजच्या गाड्या
६०,००० किलोमीटर लोहमार्गाची लांबी
१० लाख ३६ हजार रेल्वे कर्मचारी
नोव्हेंबर १९४७ पहिला रेल्वे अर्थसंकल्प जॉन मथाईंनी मांडला
* * एका परंपरेची समाप्ती
* केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ऐतिहासिक निर्णय घेत गेली ९० वर्षे सुरू असलेली रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा बंद करत तो आता केंद्रीय अर्थसंकल्पाचाच एक भाग असेल.
* या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत केली.
* वास्तविक रेल्वे अर्थसंकल्प दर वर्षी एक सोहळाच असायचा; कारण याचा थेट सामान्यांच्या जीवनाशीच संबंध असतो.
* * भारतात पहिली रेल्वे
* १८५३ मध्ये मुंबई-ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली
* * कधी सुरू झाली परंपरा?
* रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाबाबत १९२४ मध्ये अर्थतज्ज्ञ विलियम मिटचेल ऍक्‍टवर्थ यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त.
दर वर्षी लोकसभेत घटनेच्या कलम ११२  व २०४ अंतर्गत रेल्वे अर्थसंकल्प मांडला जातो.
* * पहिला रेल्वे अर्थसंकल्प कधी?
नोव्हेंबर १९४७ मध्ये रेल्वेमंत्री जॉन मथाई यांनी सादर केला.
* * रोजगार
रेल्वेमुळे एक कोटी ३६ लाख नागरिकांना रोजगार.
* * आतापर्यंतचे रेल्वेमंत्री
१) एन. गोपालस्वामी अय्यंगार
२) जगजीवनराम
३) पन्नामपल्ली गोविंद मेनन
४) के. हनुमंतपय्या
५) टी. ए. पै
६) ललितनारायण मिश्रा
७) कमलापती त्रिपाठी
८) मधू दंडवते
९) एबीए गनीखान चौधरी
१०) जॉर्ज फर्नांडिस
११) जनेश्‍वर मिश्र
१२) मल्लिकार्जुन खर्गे
१३) लालूप्रसाद यादव
१४) सी. के. जाफर शरीफ
१५) नितीशकुमार
१६) स्वर्णसिंग
१७) एच. सी. दसप्पा
१८) एस. के. पाटील
१९) सी. एम. पुनाचा
२०) राम सुभाग सिंग
२१) गुलजारीलाल नंदा
२२) केदारनाथ पांडे
२३) प्रकाशचंद्र सेठी
२४) बन्सीलाल
२५) मोहसिना किडवाई
२६) माधवराव शिंदे
२७) रामविलास पासवान
२८) पवनकुमार बन्सल
२९) सी. पी. जोशी
३०) मुकुल रॉय
३१) राम नाईक
३२) दिनेश त्रिपाठी
३३) सदानंद गौडा
३४) सुरेश प्रभू (विद्यमान रेल्वेमंत्री)
* * पहिल्या महिला रेल्वेमंत्री
* ममता बॅनर्जी
स्वातंत्र्यसैनिकांना आता जादा पेन्शन
* विविध वर्गवारीतील देशभरातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शन योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये केंद्र सरकारने सरासरी २० टक्क्यांनी वाढ केली आहे.
* ही वाढ दरमहा सुमारे पाच हजार रुपयांची असेल. याखेरीज स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळेल व त्यात सहामाही सुधारणा होईल
* केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पेन्शनच्या सुधारित दरांना मंजुरी दिली.
* पेन्शनमधील ही वाढ व महागाईभत्त्याची सुधारित पद्धत यंदाच्या १५ आॅगस्टपासून लागू मानली जाईल.
* यानुसार पेन्शनचे वितरण संबंधितांच्या ‘आधार’शी संलग्न खात्यांतूनच करावे, असे निर्देशही सर्व संबंधित बँकांना देण्यात आले आहेत.
* गेल्या पाच दशकांत या योजनेनुसार एकूण १,७१,६०५ स्वातंत्र्यसैनिक व पात्रता निकषांत बसणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मंजूर करण्यात आले.
* सध्या ३७,९८१ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळतो.
* त्यापैकी ११,६९० प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिक आहेत, २४,७९२ त्यांच्या पत्नी किंवा पती आहेत तर १,४९० पात्र मुली आहेत.
रेस कोर्स रोडचे ‘लोककल्याण मार्ग’ नामकरण
* भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रेस कोर्स रोडचे नाव बदलण्यात आले असून, तो रस्ता आणि लोककल्याण मार्ग या नावाने ओळखला जाईल.
* दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या नवी दिल्ली परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र
आदिवासींसाठी राबविणार जच्चा-बच्चा योजना
* आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी "जच्चा-बच्चा‘ योजना राबविणार असून, तीन वर्षांत कुपोषणाचा आकडा एकांकात आणू, असा निर्धार ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.
* मोखाड्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे वास्तव चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी मोखाड्याचा दौरा केला.
* मोखाड्यातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
* सागर, ईश्‍वर यांच्या मृत्यूने कुपोषणाचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
* मृत बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आणि कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी पंकजा मुंडे मोखाड्यात आल्या होत्या.
* मोखाड्यात रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून आपण या भागात कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहती आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे पंकजा यांनी या वेळी सांगितले.
ग्रा.पं.मधील नळयोजना सौरऊर्जेवर चालविणार
* राज्यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणून त्या नळ योजनांवर अल्ट्रा वॉटर फिल्टर लावण्यात यावे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.
* मुंबईत मंत्रालयात बुधवारी ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जाच्या नियामक मंडळाची आढावा बैठक झाली.
* या बैठकीत दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायतीकडील नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे लक्ष्य महाऊर्जाला देण्यात आले.
* आदिवासी, माडा, मिनी माडा, दुर्गम भागातील ग्राम पंचायतींचाही या योजनेत समावेश असेल.
* पथदिवे बॅटरी बॅकअपसह लावण्यात यावे. १०० टक्के आॅफ ग्रिड पॉलिासी अंतर्गत सर्व पथदिवे लावावेत.
‘एव्हिएशन हब’ नाशिक औद्योगिक क्षेत्राची नवी ओळख
* लढाऊ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी लागणारे सुटे भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळत असून या निमित्ताने नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची ‘एव्हिएशन हब’ अशी नवीन ओळख होण्याच्या मार्गावर आहे.
* हवाई दलाच्या ११ क्रमांकाच्या दुरुस्ती व देखभाल केंद्रात नाशिकच्या जवळपास १०० छोटय़ा उद्योजकांनी पुरवठादार म्हणून नोंदणी केली आहे.
* त्यातील ४० उद्योग लढाऊ विमानांचे सुटे भाग निर्मितीत सक्रियपणे सहभाग नोंदवीत आहेत.
* या क्षेत्रात स्थानिक उद्योगांना मोठय़ा संधी उपलब्ध असून लढाऊ विमानांच्या सुटय़ा भागांच्या स्वदेशीकरणास चालना मिळणार आहे.
* ८ ऑक्टोबर हा दिवस हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो.
* या दलाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी बुधवारी ओझरच्या एचएएललगतच्या ११ क्रमांकाच्या हवाई दल देखभाल व दुरुस्ती केंद्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
* १९७५ मध्ये कार्यान्वित झालेल्या या केंद्रात मिग श्रेणीतील विमानांच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम केले जाते. तसेच मिग २९ च्या नूतनीकरणाचे कामही या ठिकाणी सुरू आहे.
* रशियाकडून खरेदी केलेल्या विमानांसाठी लागणारे सुटे भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, असा एचएएल आणि हवाई दलाच्या केंद्राचा प्रयत्न आहे.
* लढाऊ विमानाच्या सुटय़ा भागांचे स्वदेशीकरण करणे ही महत्त्वाची बाब आहे.
* मिग २९ या विमानाच्या जवळपास ९७ टक्के भागाचे स्वदेशीकरण करण्यात यश आले आहे.
* तंत्रज्ञान हस्तांतरण करारामुळे सुखोईच्या ६० हजारहून अधिक सुट्टय़ा भागांची निर्मिती देशात केली जाते.

* त्यात ‘एअर फ्रेम’साठी ४३ हजार संबंधित सुटे भाग, इंजिनकरिता ६,३०० तर इतर ९,६०० वेगवेगळ्या सुटय़ा भागांची देशांतर्गत निर्मिती करत एचएएलने सुखोईच्या बांधणी कार्यक्रमात ७२ टक्के तंत्रज्ञान ग्रहण करण्यात यश मिळाले आहे.
२३.०९.२०१६
अर्थसत्ता
१० कोटी ग्राहकसंख्या टप्पा पार करणारे देशातील पहिले ई-व्यापारी संकेतस्थळ
* फ्लिपकार्ट ही देशातील नोंदणीकृत ग्राहकांची संख्या १० कोटीवर पोहोचणारी पहिली ई-व्यापारी कंपनी बनली असून गेल्या एका वर्षात बेंगळूरस्थित कंपनीच्या ग्राहकांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
* गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत कंपनीचे नवीन २.५ कोटी ग्राहक जोडले आहेत.
* भारतातील फ्लिपकार्ट हे प्रमुख ई-व्यापारी संकेतस्थळ असून टायगर ग्लोबल, अस्सेल पार्टनर्स, मॉर्गन स्टॅनली आणि टी रॉव यासारख्या जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी कंपनीत कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
* कंपनीने आतापर्यंत ३०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक गोळा केली.
* मिंत्रा, फोनपे, लेट्सबाय यासारख्या कंपन्या आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
* याचबरोबर क्युब२६, नेस्टअवे आणि ब्लॅकबक यासारख्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.
* बँक ऑफ अमेरिका मेरिल रिंचच्या अहवालानुसार, फ्लिपकार्टची देशातील ई-व्यापार क्षेत्रात ४३ टक्के हिस्सेदारी आहे.
* २०१९ पर्यंत ती ४४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुकेश अंबानी नवव्यांदा सर्वांत श्रीमंत भारतीय
* रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला.
* तब्बल २२.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अंबानी हे नवव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
* फोर्ब्ज मासिकाने भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून, त्यांच्यापाठोपाठ सन फार्माचे दिलीप शांघवी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. परंतु, सन फार्माच्या शेअरमधील घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत १.१ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
* यंदा शांघवी यांची संपत्ती एकुण १६.९ अब्ज डॉलरवर पोचली आहे.
* याशिवाय, हिंदुजा कुटुंबाने १५.२ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले.
* विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी हे एक क्रमांकाने खाली जात चौथ्या क्रमांकावर आले आहेत. प्रेमजी यांची एकुण संपत्ती यावर्षी १५ अब्ज डॉलरएवढी झाली आहे.
* विशेष म्हणजे, पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांनादेखील यादीत ४८ व्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे. बाळकृष्ण यांच्याकडे एकुण २.५ अब्ज डॉलरची संपत्ती उघड असल्याचे जाहीर झाले आहे.
* मुकेश अंबानींची एकुण संपत्ती वर्षभरात १८.९ अब्ज डॉलरवरुन २२.७ अब्ज डॉलरएवढी झाली आहे.
* त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या संपत्तीचा आकडा ३.४ अब्ज डॉलरएवढा असून, श्रीमंतांच्या यादीत ते ३२ व्या क्रमांकावर आहेत.गेल्यावर्षी ते २९ व्या क्रमांकावर होते.
* भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंतांकडे एकुण ३८१ अब्ज डॉलर अर्थात २५.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.
व्होडाफोनला ४७,७०० कोटींचे अर्थबळ
* एकीकडे रिलायन्स जिओच्या रूपात उभे ठाकलेले आव्हान आणि दुसरीकडे येत्या महिन्यात होऊ घातलेल्या विक्रमी ध्वनिलहरींची लिलाव प्रक्रिया या पाश्र्वभूमीवर व्होडाफोनला तिच्या प्रवर्तक समूहाकडून भक्कम आर्थिक बळ मिळाले आहे.
* ग्राहकसंख्येत देशातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या व्होडाफोनला समूहाकडून ४७,७०० कोटी रुपयांचे नवे एकगठ्ठा भांडवल प्राप्त झाले आहे.
* समभागरूपात असलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक मानली जात आहे.
* २० कोटी मोबाइलधारक संख्येसह देशात दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार सेवा पुरवठादार असलेल्या व्होडाफोनची अंदाजे ३ अब्ज डॉलर निधी उभारणीची प्रारंभिक समभाग विक्री प्रक्रिया एप्रिलपासून सातत्याने लांबणीवर पडत आहे.
* अशातच नव्या आर्थिक साहाय्याची घोषणा करण्यात आली.
पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती
* रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर काय असावेत, हे ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीवर (एमपीसी) सरकारने आज तीन सदस्यांची नेमणूक केली.
* रिझर्व्ह बँकेच्या नामित सदस्यांसह व्याजदर ठरविण्याचे काम हे सदस्य करतील.
* महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले.
* त्यानुसार, व्याजदर ठरविण्याचे आव्हान समितीसमोर असेल.

* बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली या समितीवर प्रा. चेतन घाटे (भारतीय सांख्यिकी संस्था), पामी दुआ (संचालक, दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स) व प्रा. रवींद्र एच. ढोलकिया (आयआयएम अहमदाबाद) यांच्या नेमणुका सरकारने केल्या आहेत.
महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करणार
* महागाईला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आता ‘हायटेक’ पद्धतीचा अवलंब करण्याच्या तयारीत असून, यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले जाणार आहे.
* यामार्फत ग्राहकांना जादा किंमत वसूल करणाऱ्यांविरुद्ध थेट केंद्र सरकारकडे तक्रार करता येईल.
* यामार्फत ग्राहकांना थेट मंत्रालयाशी संपर्क साधता येईल. तसेच ग्राहकांना आवश्यक अन्नपदार्थांच्या किरकोळ मूल्याबाबत अद्ययावत माहिती दिली जाईल.
* एखाद्या दुकानदाराविरुद्ध जादा किंमत वसूल केल्याची तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. तक्रारी प्राप्त होणे आणि त्याच्या प्रोसेसिंगसाठी कमी वेळ लागेल.
* सुरुवातीला हे अ‍ॅप्लिकेशन राजधानी दिल्लीतील ग्राहकांपुरतेच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

* त्यानंतर इतर मोठ्या आणि छोट्या शहरांतही उपलब्ध करून दिले जाईल. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती.
क्रीडा
मिसबाह बनला गदाधारी
* आयसीसीतर्फे २००३ पासून सुरुवात झालेल्या कसोटी संघ रँकिंगनंतर प्रथमच अव्वल स्थानी पोहोचणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक याला आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप गदा सोपवली.
* आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतानंतर पाकिस्तान पाचवा संघ आहे जो की, आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.
* मिसबाह हा नववा कर्णधार आहे ज्याने की कसोटी चॅम्पियनशिप गदा उंचावण्याचे भाग्य मिळाले आहे.
* त्याआधी स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ (सर्वच आॅस्ट्रेलिया), महेंद्रसिंह धोनी (भारत), अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड), ग्रॅमी स्मिथ आणि हाशीम अमला (दोन्ही दक्षिण आफ्रिका) यांना सन्मान मिळाला आहे.
हॉकीपटू रितूरानीचा हॉकीला रामराम
* भारतीय महिला हॉकी टीमची माजी कप्तान रितू रानीने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले असून त्यासंदर्भातले ईमेल तिने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांना पाठविले आहे.
* रितूच्या कप्तानीखाली भारतीय महिला टीमने इंचियोन आशियाई खेल २०१४ मध्ये कांस्य तर २०१३ च्या आशियाई चॅपियनशिपमध्ये रजत पदकाची कमाई केली आहे.
* नुकत्याच झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये रितूरानीची निवड केली गेली नव्हती.
* वास्तविक रितूच्या कप्तानीखाली रिओ ऑलिंपिकमध्ये ३६ वर्षांच्या गॅपनंतर भारतीय महिला हॉकी टीम क्वालिफाय झाली होती मात्र रितूच्या खराब वर्तणुकीचे कारण देऊन तिला ऑलिंपिकसाठी निवडले गेले नव्हते.
* मिड फिल्डर पोझिशनवर खेळणारी २४ वर्षीय रितू यामुळे अतिशय निराश झाली होती असेही समजते.
* अर्थात २९ तारखेपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय कॅंपसाठी तिची निवड केली गेली होती.
* नरेंद्र बात्रा या संदर्भात म्हणाले की रितूने राष्ट्रीय कँपमध्ये सहभागी होत नसल्याचे कळवितानाच आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्त होत असल्याचे ईमेलने कळविले आहे.
आयसीसी आचारसंहिता, डीआरएस पंच अपीलमध्ये बदल
* आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडू तसेच सहयोगी स्टाफसाठी आचारसंहिता तसेच डीआरएसमधील पंचांच्या अपीलामध्ये बदल केला आहे.
* आचारसंहितेत गुन्ह्याची यादी, गुन्ह्याबद्दल तंबी, दंड अथवा निलंबन यामध्ये कुठलेही बदल केले नाहीत.
* पण संहितेचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूच्या नावापुढे नकारात्मक गुण जमा होतील. यामुळे सातत्याने चुका करणाऱ्या खेळाडूला निलंबनासही सामोरे जावे लागेल.
* नकारात्मक गुण दोन वर्षे खेळाडूंच्या नावापुढे जमा होत राहतील.
* सर्व खेळाडू २२ सप्टेंबरपासून झिरो बॅलेन्सने सुरुवात करणार आहेत.
* पायचितच्या निर्णयाशी संबंधित पंचाच्या कॉलचा नियमदेखील २२ सप्टेंबरपासून अंमलात आला.
* नव्या नियमांतर्गत पहिला सामना रविवारी द. आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात बेनोनी येथे खेळविण्यात येणार आहे.
तंत्र-विज्ञान
अमेरिकी कंपनीकडून स्मार्ट मेणबत्तीची निर्मिती
* स्मार्टफोनच्या मदतीने प्रज्वलित करता येईल अशी स्मार्ट मेणबत्ती अमेरिकेतील कंपनीने विकसित केली आहे.
* ही मेणबत्ती स्मार्ट स्वरूपाची असून ती लावण्यासाठी आगपेटी किंवा लायटर लागत नाही.
* वाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर यात केला असून त्यात सुरक्षा व दीपसौंदर्याची पुरेशी काळजी घेतली आहे.
* मेणबत्ती पेटवणे हे मनाला शांतता व आनंद देणारे असते. मेणबत्ती पेटवल्यानंतर ज्वाला दिसते, वास येतो व एक वेगळे वातावरण तयार होते.
* आता जी मेणबत्ती तयार केली आहे तिला वात पेटेल की नाही वगैरे काळजी नाही, या अनेक मेणबत्त्या कमी वेळात लावता येतात असे अमेरिकेच्या ल्युडेला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी बियानचिनी यांनी सांगितले.
* त्यांच्या कंपनीने ही स्मार्ट मेणबत्ती तयार केली आहे.
* स्मार्ट मेणबत्ती ही एलइडी मेणबत्तीचे सर्व फायदे सुरक्षित व अधिक विस्तारित स्वरूपात देते.
* ही मेणबत्ती खऱ्या मेणबत्तीचा अनुभव देणारी आहे असे बियानचिनी यांनी सांगितले.
* त्यात मेणबत्तीचे मेण शंभर टक्के वापरले असून त्यात वातीचा वापर केलेला नाही.
* एका बटनाच्या मदतीने आपण अनेक मेणबत्त्या नियंत्रित करू शकतो.
* या मेणबत्तीला चाइल्ड लॉक अ‍ॅपही येते व जोखमीच्या वेळी ती आपोआप विझते.
गुगल बनविणार मुंबईला वायफाय सिटी
* ‘गुगल’चे प्रतिनिधी विनय गोयल यांची अमेरिका दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असून मुंबईला वायफाय सिटी बनविण्यासाठी गुगलने पाठबळ देण्याची तयारी या झालेल्या भेटीत दर्शविली आहे.
* मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रात त्यांचा सहयोग घेण्याबाबतही चर्चा केली आहे.
* मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ‘एआयआरबीएनबी’ चे प्रतिनिधी ख्रिस लेहान आणि माइक ऑर्जिल यांनी राज्य पर्यटन विकास महामंडळाशी सामंजस्य करार करण्यासंबंधीच्या प्रस्तावाचा कंपनीकडून विचार करण्यात येत असल्याचे सांगितले.
आंतरराष्ट्रीय
काश्मीरमध्ये हस्तक्षेपास संयुक्त राष्ट्राचा नकार
* काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावल्यामुळे काश्मीर मुद्यावरुन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ संयुक्त राष्ट्रात पूर्णपणे तोंडघशी पडले आहेत.
* काश्मीरसह अन्य वादांच्या मुद्यांवर भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन तोडगा शोधावा असा सल्ला संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी नवाझ शरीफ यांना दिला.
* बान की मून यांना भेटून शरीफ यांनी काश्मीरमध्ये भारताकडून कसे मानवधिकाराचे उल्लंघन सुरु आहे त्याचा अहवाल सोपवला.
* भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन विषय सोडवणे दोन्ही देशांच्या आणि प्रदेशाच्या हिताचे आहे असे बान की मून यांनी शरीफ यांना सांगितले.
* संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानी मिशनने दिलेल्या माहितीनुसार शरीफ यांनी काश्मीर संबंधातील अहवाल मून यांच्याकडे सोपवला.
* काश्मीरमध्ये कशा पद्धतीने अन्याय सुरु आहे त्याचे फोटो त्यांनी मून यांना दाखवले.
जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांत 'आयआयएससी'ची झेप
* जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतीय विज्ञान संस्थेने (आयआयएससी) आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक पटकाविला आहे.
* टाइम्स हायर एज्युकेशन ("द‘) या संस्थेने ही यादी सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केली आहे.
* भारतीय विज्ञान संस्थेने जागतिक क्रमवारीत २०१ ते २५० या गटात स्थान मिळविले आहे. सत्तर देशांमधील ९८०  विद्यापीठांमध्ये भारतातील केवळ ३१ विद्यापीठांना स्थान मिळविता आले आहे.
* ऑक्‍सफर्ड विद्यापीठ या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून, मागील बारा वर्षांत प्रथमच ब्रिटनमधील विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
* भारतातील ३१ संस्थांपैकी सात संस्था या आयआयटी असून, आयआयटी मुंबई यात आघाडीवर (३५१ ते ४००) आहे.
* याशिवाय दिल्ली, कानपूर, मद्रास, खरगपूर, रुरकी आणि गुवाहाटी हे आयआयटीदेखील यादीत आहेत.
* याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (रुरकेला), श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठ, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि तेजपूर विद्यापीठ या चार संस्था यादीत स्थान मिळविण्यात प्रथमच यशस्वी झाल्या आहेत.
* "द‘च्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचेच वर्चस्व आहे.
* ऑक्‍सफर्डशिवाय केंब्रिज आणि इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडन या संस्था पहिल्या दहामध्ये आहेत. उर्वरित सात संस्था अमेरिकेतील आहेत.
राष्ट्रीय
गरीब मुलींच्या विवाहाला २०४ कोटी
* तामिळनाडूतील जयललिता सरकारने गरीब मुलींच्या विवाहाला साहाय्य करण्यासाठी ‘तालिकू तंगम’ (पवित्र मंगळसूत्रासाठी सोने) ही २०४ कोटी रुपयांची योजना सुरू केली.
* चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी २०४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, याचा १२ हजार ५०० महिलांना लाभ होणार असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले.
* या योजनेंतर्गत गरीब आई-वडील, विधवा आणि इतरांच्या मुलींना लग्नासाठी सोने आणि इतर स्वरूपाचे साहाय्य करण्यात येते.
* लाभार्थी मुलगी दहावी उत्तीर्ण असेल, तर तिला २५ हजार रुपये आणि पदवीपूर्व शिक्षण किंवा पदविकाधारक असल्यास तिला ५० हजार रुपयांचे साहाय्य करण्याचीही यात तरतूद आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
* सत्ताधारी अण्णा द्रमुकने २०११ च्या निवडणुकीदरम्यान गरीब मुलींच्या विवाहासाठी चार ग्रॅम सोने देण्याचे, तर गेल्या निवडणुकीदरम्यान ते वाढवून ८ गॅ्रम करण्याचे आश्वासन दिले होते.
* हे आश्वासन पूर्ण करीत, मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी ही वाढीव योजना सुरू केली आणि पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी ८ ग्र्रॅम वजनाचे नाणे दिले.
* हे लाभार्थी त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या डॉ. राधाकृष्णनगरसह कांचीपुरम येथील रहिवासी आहेत.
ऍट्रोसिटीसंबंधी खटल्यांसाठी गुजरातमध्ये १६ विशेष न्यायालये
* गुजरातमधील दलित आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर दलित- आदिवासी अत्याचाराच्या (ऍट्रॉसिटी) खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी १६ विशेष न्यायालये राज्यभरात स्थापन करण्यात आली आहेत.
* याबाबत गुजरातच्या विधी विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात आले.
* गुजरातमधील ही सर्व न्यायालये १ ऑक्‍टोबरपासून कार्यरत होणार असून, या न्यायालयांमध्ये फक्त ऍट्रॉसिटी कायदा १९८९, संदर्भातीलच खटल्यांची सुनावणी होणार असल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.
* १५ जिल्ह्यांमध्ये ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.
* अहमदाबादमध्ये शहर दिवाणी न्यायालय आणि ग्रामीण न्यायालय अशी दोन न्यायालये असणार आहेत.
* याचप्रमाणे आनंद, बनस्कंथा (पालनपूर), भरूच, गांधीनगर, जामनगर, जुनागढ, कच्छ (भूज), मेहसाणा, पाटण, राजकोट, सुरत, सुरेंद्रनगर आणि बडोदा या ठिकाणी ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.
जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प अदानी ग्रुपकडून राष्ट्राला समर्पित
* तामिळनाडूमध्ये जगातील सर्वात मोठय़ा सौर ऊर्जा प्रकल्पाचे अदानी गुपची उपकंपनी असणा-या अदानी ग्रीन एनर्जीने उद्घाटन केले असून ६४८ मेगावॅट वीज निर्मिती या प्रकल्पातून करण्यात येईल.
* या प्रकल्पासाठी अदानी ग्रुपकडून ४५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.
* तामिळनाडूतील रामनाथपूरममधील कामुथी येथील हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
* राज्य सरकारने सौर ऊर्जेच्या माध्यमातून ३००० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्टय़ ठेवले आहे.
* ६४८ मेगावॅट क्षमतेचा संपूर्ण प्रकल्प कामुथी ४०० केव्ही सबस्टेशनशी जोडण्यात आला. यामुळे एकाच ठिकाणाहून सर्वात जास्त प्रमाणात सौर वीज तयार होईल.
* तामिळनाडूबरोबरच संपूर्ण देशासाठी ही सन्मानाची बाब आहे.
* जागतिक पातळीवर आता भारत ग्रीन एनर्जी उत्पादनाच्या बाबतीत प्रथम स्थानी पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे.
* राज्याच्या मुख्यमंत्री आणि तामिळनाडू सरकारने सकारात्मक पावले उचलल्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो, असे अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनी यावेळी सांगितले.
विसारानाइ ऑस्करच्या स्पर्धेत
* ‘विसारानाइ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तामिळ चित्रपटाचे नाव पुढील वर्षीच्या ऑस्कर महोत्सवातील विदेशी भाषिक चित्रपटांच्या श्रेणीत भारताच्या अधिकृत प्रवेशिकेच्या स्वरूपात पाठवण्यात आले आहे.
* या श्रेणीत स्पर्धेत असलेल्या २९ चित्रपटांमधून ‘विसारानाय’ची निवड करण्यात आल्याचे भारतीय चित्रपट महासंघाचे (फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया) सरचिटणीस सुप्रान सेन यांनी सांगितले.
* या वर्षी झालेल्या ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट तामिळ फीचर फिल्म, सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेता आणि सवरेत्कृष्ट संकलन, असे तीन पुरस्कार त्याने पटकावले होते.
* अभिनेते व चित्रपट निर्माते धनुष यांनी तयार केलेला हा गुन्हे- थरारपट वेत्रिमारन यांनी दिग्दर्शित केला असून त्यांनीच पटकथा लिहिली आहे.
* एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक अप’ कादंबरीवर तो आधारित आहे.
* दिनेश रवी, आनंदी व आदुकलम मुरुगदोस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पोलिसांचे अत्याचार, भ्रष्टाचार आणि अन्यायामुळे निर्दोष लोकांचे जाणारे बळी यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनवर घोळवे
* ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी गोविंद घोळवे यांची निवड करण्यात आली आहे.
* ते या संघटनेवर महाराष्ट्र आणि गोव्याचे प्रतिनिधित्व करतील.
* श्रीक्षेत्र भगवानगडाचे सचिव असलेले घोळवे यापूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते.
सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर
* देशातील पारंपरिक विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे.
* टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने जाहीर केलेल्या रँकिंकमध्ये पुणे विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
* देशातील सर्व आयआयटी आणि पारंपरिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.
* टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेतर्फे जगभरातील विद्यापीठांसह भारतातील विद्यापीठांचे रॅकिंग केले जाते.
* गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशभरातील पारंपरिक विद्यापीठांचे रँकिंग जाहीर करण्यात आले होते.
* त्यात प्रथम क्रमांकावर जाधवपूर विद्यापीठ आणि द्वितीय क्रमांकावर पंजाब विद्यापीठ होते. तर, तिसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होते.
* यंदा विद्यापीठाने तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ६०० ते ८००च्या दरम्यान आहे.
* विद्यापीठाची अध्यापन पद्धती, औद्योगिक कंपन्यांचे विद्यापीठाशी असणारे संबंध, विद्यार्थी व प्राध्यापकांचे संशोधनातील योगदान विचारात घेऊन विद्यापीठाचे रँकिंग निश्चित करण्यात आले आहे.
अलिबाग कुलाबा वेधशाळेला १७५ वर्षे पूर्ण
* अलिबाग येथील कुलाबा भूचुंबकीय वेधशाळा बुधवारी १७५ वर्षांची झाली आहे. भूचुंबकीय शक्तीचा आणि हालचालीचा वेध घेण्याचे काम इथे अव्याहतपणे केले जात आहे.
* भूगर्भ आणि हवामानातील चुंबकीय लहरींचे अतिसूक्ष्म नोंदीचे संकलन या ठिकाणी उपलब्ध आहे.
* जगभरातील चार सर्वात जुन्या चुंबकीय वेधशाळांमध्ये या वेधशाळेचा समावेश असून जागतिक पातळीवर भूगर्भ शास्त्रज्ञ, भूभौतिक शास्त्रज्ञ आणि खगोल अभ्यासकांकडून कुलाबा वेधशाळेच्या नोंदींना खूप महत्त्व असते.
* ब्रिटिशांनी १८४१ साली मुंबईतील कुलाबा येथे कुलाबा वेधशाळेची स्थापना केली.
* मुंबई बंदरातील खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेची स्थापना करण्यात आली.
* रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांच्या शिफारसीनुसार भूचुंबकीय क्षेत्राचे नियमित मापन सुरू करण्यात आले.
* १८४६ पासून दर तासाला सुसंगतपणे भूचुंबकीय लहरींच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली. मॅग्नेटोग्राफच्या साह्य़ाने फोटोग्राफीक पद्धतीने या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या.
* १८९६ च्या सुमारास डॉ. नानाभॉय आर्देशर फार्मजी मुस यांनी कुलाबा वेधशाळेची धुरा सांभाळली. त्याकाळात मुंबईत वाहतुकीसाठी घोडय़ावर चालणाऱ्या ट्राम्स वापरल्या जात असत.
* मात्र १९०० सालच्या सुमारास मुंबईतील ट्राम्सचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भूचुंबकीय नोंदीच्या संकलनात अडथळे निर्माण होणार होते. त्यामुळे कुलाबा येथील वेधशाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
* त्यावेळी वेधशाळेसाठी १२ जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावरील सात एकरची जागा निवडण्यात आली.
* चुंबकीय परिणामांपासून मुक्त अशा दोन इमारती येथे बांधल्या गेल्या. पोरबंदर येथील दगड, वाळू आणि तांब्यापितळाच्या वस्तूंचा वापर करून या ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यात आले.
* बाहेरील तापमानाचा परिणाम न होणाऱ्या एका इमारतीत मॅग्मोमीटर बसवण्यात आले. तर दुसऱ्या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्रातील विविध घटकांचे निरपेक्ष मापन सुरु झाले.

* १९०४ साली अलिबाग येथील कुलाबा वेध शाळेतून भुचुंबकीय लहरीचे मापन सुरू झाले. ते आजही अव्याहतपणे सुरू आहे.
२४.०९.२०१६
अर्थसत्ता
भागविक्रीत कर्मचाऱ्यांच्या राखीव हिश्शांत वाढ
* समभागांची खुली आणि सार्वजनिक विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक वाटेकरी केले जावे असा नियमातील बदल भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने शुक्रवारी केला.
* अशा भागविक्री प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना आजवर कमाल २ लाख रुपये मूल्यांपर्यंत समभाग खरेदी शक्य होती, ती आता कमाल ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
* ‘सेबी’च्या आयसीडीआर नियमांन्वये, भागविक्री प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या हिश्शात वाढ केली जाणार असली तरी भागविक्री पश्चात कंपनीच्या एकूण भागभांडवलात कर्मचाऱ्यांचा वाटा ५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी कंपन्यांना घ्यावी लागणार आहे.
* शुक्रवारी येथे झालेल्या सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या आणि अन्य महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
* तथापि २ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या समभागांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अर्ज हा त्या भागविक्रीतील कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिश्शाचा भरणा पूर्ण झाला नसेल, तरच विचारात घेतला जावा, अशा पोटनियमाचे कलमही जोडण्यात आले आहे.
२० लाखांपर्यंतच्या व्यवसायाला करसूट
* वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीच्या दृष्टीने स्थापित जीएसटी परिषदेच्या येथे सुरू असलेल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी जीएसटी करातून सूट मर्यादेबाबत महत्त्वाची राजकीय सहमती साधण्यात यश आले.
* अर्थमंत्री आणि जीएसटी परिषदेचे अध्यक्ष असलेल्या अरुण जेटली यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत, जीएसटी करातून वार्षिक २० लाख रुपये महसुली उलाढाल असलेल्या व्यवसाय, व्यापारांना नव्या कर प्रणालीतून मोकळीक देण्याची मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय झाला असल्याचे स्पष्ट केले.
* पूवरेत्तर राज्ये आणि अन्य पर्वतीय व छोटय़ा राज्यांसाठी ही मर्यादा १० लाख रुपये निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* याचा अर्थ त्या त्या राज्यातील या मर्यादेपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना नव्या अप्रत्यक्ष कर सुधारणेची कसलीही झळ बसणार नाही.
* राज्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या जीएसटी परिषदेत, सर्व प्रकारचे अधिभारही जीएसटीमध्ये अंतर्भूत करण्यास राज्यांनी संमती दिली आहे.
* ३१ मार्च २०१६ रोजी समाप्त झालेले आर्थिक वर्ष हे राज्यांच्या महसुली अंदाजाच्या निश्चितीसाठी आधारभूत वर्ष मानले जाईल.
* ही जीएसटी परिषदेची जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पहिलीच बैठक होती.
* जीएसटी कर आकारणीच्या दराचा राज्यांच्या महसुली भरपाईच्या दृष्टीने कळीचा मुद्दा १७ ते १९ ऑक्टोबरच्या नियोजित बैठकीत घेतला जाणार आहे.
* वार्षिक २० लाख उलाढाल असणाऱ्या व्यापार-व्यवसाय ‘जीएसटी’ कर कक्षेच्या बाहेर
पूवरेत्तर आणि पर्वतीय राज्यांमध्ये ही मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत
* वार्षिक १.५ कोटींपर्यंत महसुली उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कर महसुलावर राज्यांचा हक्क अबाधित
* ११ लाख नोंदणीकृत सेवा करदात्या व्यापाऱ्यांच्या कर महसुलावर केंद्राचे नियंत्रण कायम राहील.
* १७ ते १९ ऑक्टोबरच्या परिषदेच्या नियोजित  बैठकीत होईल जीएसटी दराची निश्चिती!.
देशामधील ४७५ व्यक्तींची कर बुडविणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक
* बहामाज् पेपर लीक्स द्वारे देशामधील तसेच भारतीय वंशाच्या ४७५ व्यक्तींनी कर बुडविणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
* या यादीमध्ये वेदांता समुहाच्या अनिल अग्रवाल, बॅरन समुहाच्या कबीर मूलचंदानी आणि फॅशन टीव्हीचे प्रमोटर अमन गुप्ता यांची नावे असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.
* बहामाज् पेपर लीक्सच्या या यादीमध्ये जगभरातील एकूण १ लाख ७५ हजार जणांची नावे आहे.
* बहामाज्मध्ये जर गुंतवणूक केली तर तिथे कर लागत नाही तसेच तुमचे नावही गुप्त ठेवता येते.
* त्यामुळेच अनेक गुंतवणूकदारांची पसंती या टॅक्स हॅवन्समध्ये गुंतवणूक करण्याला आहे.
* अनिल अग्रवाल यांचे नाव या यादीमध्ये आल्यानंतर अग्रवाल यांच्या प्रवक्त्यांनी त्याचा खुलासा केला आहे.
* अग्रवाल यांच्या नावावर एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने जी काही गुंतवणूक केली आहे त्याची माहिती आयकर विभागाला दिली आहे असे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
* या यादीमध्ये प्रसाद आणि प्रकाश निम्मागड्डा या फार्मासिटिकल्स क्षेत्राशी निगडित विकसकाचेही नाव आहे, गौतम थडानी, राजन मधू, गणपती रथिनाम, शौमिक प्रसन्ना मुखर्जी यांची नावे देखील या यादीमध्ये आहे. आपण काही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा खुलासा त्यांनी वृत्तपत्राला केला आहे.
क्रीडा
आयसीसी क्रमावरीत भारताची घसरण
* गेले काही दिवस एकदिवसीय सामन्यांपासून दूर असलेल्या भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत तिस-या स्थानावर घसरण झाली आहे.
* तर फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने दुस-या क्रमांकावर आपले स्थान नक्की केलं. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली.
* भारत ११० गुणांसोबत तिस-या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलिया १२४ गुणांसहित पहिल्या आणि न्यूझीलंड ११३ गुणांसहित दुस-या क्रमांकावर आहेत.
* विराट कोहलीच्या खात्यात ८१३  गुण जमा असून दक्षिण अफ्रिकेचा ऑलराऊंडर ए बी डेव्हिलिअर्स पहिल्या क्रमांकावर आहे.
* अनुभवी हाशीम अमलाला विराट कोहलीने क्रमवारीत मागे टाकलं आहे.
* विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय संघातील रोहीत शर्मा सातव्या आणि शिखर धवन आठव्या स्थानावर आहेत.
* गोलंदाज आणि ऑलराऊंडरच्या क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश झालेला नाही.
दक्षिण आफ्रिकेत होणार नवीन ‘डीआरएस’चा वापर
* दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे.
* नवीन सुधारित डीआरएस प्रणालीमध्ये पायचितसंदर्र्भात अधिक निर्णय दिले जाण्याची शक्यता आहे.
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या डीआरएस प्रणालीला विरोध केल्यामुळे भारत-न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या मालिकेत ही प्रणाली वापरली जाणार नाही.
* रविवारी दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान बेनोनी येथे एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.
* या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आचारसंहितेत केलेले बदलही लागू करण्यात येणार आहेत.
* हे नियम २२ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
* आचारसंहितेच्या नियमानुसार आता खेळाडूंवर दंड आकारण्याबरोबर दुवर्तनाबद्दल गुण दिले जाणार आहेत. त्यांनी केलेल्या चुकीवर १ ते ८ दरम्यान गुण दिले जाणार आहेत.
* दोन वर्षासाठी हे गुण दिले जातील व त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
* गुणांच्या संख्येवर खेळाडूंवर किती सामन्यांसाठी निलंबन करायचे हे ठरणार आहे.
श्रीकांतच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात
* किदम्बी श्रीकांतच्या पराभवामुळे भारताचे जपान सुपर सीरिज बॅडमिंटनमधील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले.
* जर्मनीच्या मार्क जेवेब्लिरने त्याला १८-२१, २१-१४, २१-१९ असे पराभूत केले.
* श्रीकांतने यापूर्वी मार्कला दोन वेळा हरवले होते, तर एकदा त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.
* श्रीकांतने एक मॅचपॉइंट वाचवला, मात्र दुसऱ्या मॅचपॉइंटच्या वेळी तो आपला बचाव करू शकला नाही.
तंत्र-विज्ञान
दोन ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध
* नासाच्या हबल दुर्बिणीच्या मदतीने खगोलवैज्ञानिकांनी दोन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह शोधला आहे.
* दोन ताऱ्यांची ही प्रणाली आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानाच्या नजीक ८००० प्रकाशवर्षे दूर आहे. हा ग्रह ताऱ्यांभोवती ३०० दशलक्ष मैल अंतरावरून फिरत आहे.
* लघुग्रहांचा पट्टा आपल्या सूर्यापासून जेवढय़ा लांब अंतरावर आहे, तेवढय़ा अंतरावरून हा ग्रह फिरत आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
* दोन लाल बटू तारे ओजीएलइ २००७ व बीएलजी ३२९ एकमेकांपासून ६० लाख मैल दूर आहेत, हे अंतर पृथ्वीभोवतीची चंद्राची जी कक्षा आहे त्या अंतराच्या चौदापट आहे.
* हबलच्या निरीक्षणानुसार पहिल्यांदाच दोन तारे व एक ग्रह अशी प्रणाली गुरुत्वीय भिंग तंत्राने शोधण्यात आली असून यात गुरुत्वीय भिंग स्थिती, पुढील ताऱ्याच्या गुरुत्वाने मागील ताऱ्याचा प्रकाश वाकतो व काही क्षण त्याला समांतर होतो, तेव्हा असते.
* प्रकाशवर्धनाचा हा गुणधर्म पुढील ताऱ्याचे गुणधर्म दाखवू शकतो व इतर ग्रहांविषयी माहिती मिळू शकते.
* २००७ मध्ये तीन घटकांची ही प्रणाली शोधण्यात आली होती व त्यात मायक्रोलेन्सिंग ऑब्झर्वेशन, द ऑप्टिकल ग्रॅव्हीटेशनल लेन्सिंग एक्सपिरिमेंट, मायक्रोलेन्सिंह फॉलोअप नेटवर्क, द प्रोबिंग लेन्सिंग अ‍ॅनोमलीज नेटवर्क व रोबोनेट  कार्पोरेशन या गटांचा सहभाग होता.
* पृथ्वीवरील निरीक्षण केंद्रांनी हे तारे व ग्रह यांचा शोध लावण्यात भूमिका पार पाडली असून यातील तिसऱ्या घटकाचे अस्तित्व सिद्ध करण्यास मदत केली आहे.
* भूकेंद्रांनी दोन शक्यता वर्तवल्या होत्या. त्यात शनीइतक्या वस्तुमानाचा ग्रह द्वैतीत ताऱ्यांभोवती फिरत आहे व पृथ्वी इतक्या वस्तुमानाचा ग्रह एका ताऱ्याभोवती फिरत आहे, या दोन शक्यतांचा समावेश होता, असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे डेव्हीड बेनेट यांनी सांगितले.
* हबल दुर्बिणीने पाठवलेल्या प्रतिमा अधिक स्पष्ट असल्याने हा शोध लावणे शक्य झाले आहे. मागील तारा व पुढील तारा यांचे अस्तित्व त्यामुळे ओळखणे शक्य झाले.
सैनिकांना सावध करणारी चिप होतेय तयार
* भविष्यात सैन्यातील जवानांवर अचानक हल्ले झालेच तरी त्यापासून सैनिकांचे रक्षण करू शकेल अशी चिप रक्षा मंत्रालयाच्या अ्रखत्यारीखाली काम करणार्‍या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन म्हणजे डीआरडीओमध्ये विकसित केली जात आहे.
* या चिपवरचे संशोधन वेगाने सुरू असून ती लवकरच सैन्यासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
* या चिपमुळे सैनिकांना त्यांच्या आसपास सुरू असलेल्या हालचाली अगोदरच कळू शकणार आहेत.
* ही चिप कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची पूर्वसूचना देईल व त्यामुळे हल्ला परतविण्यासाठी सज्ज होण्यास जवानांना पुरेसा अवधी मिळू शकेल.
* एकप्रकारे ही चिप सैनिकांसाठी सुरक्षा कवच असेल. दुर्गम भागात तैनात असणार्‍या जवानांसाठी ही चिप हवामान बदलाची माहिती देईल तसेच बिघडलेल्या वातावरणात कोणता रस्ता सुरक्षित आहे याची माहितीही देईल.
* सैनिकांच्या आसपास कोणतीही हालचाल होत असेल तर त्याची सूचना ही चिप अगोदरच देईल.
आंतरराष्ट्रीय
अखेर भारताचे झाले बहुप्रतिक्षित ‘राफेल’
* अत्याधुनिक क्षेपणास्त्रे व युद्धसामग्रीने सुसज्ज असलेली ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील ७.८७ अब्ज युरो किंमतीच्या करारावर भारत व फ्रान्सने आज स्वाक्षरी केली.
* भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य या लढाऊ विमानांच्या अंतर्भावामुळे अधिक वाढणार आहे. या करारावर भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व फ्रान्सचे संरक्षण मंत्री जेन य्वेस ले द्रायन यांनी स्वाक्षरी केली आहे.
* भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना ३६ राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भातील दिलेल्या आश्‍वासनानंतर १६ महिन्यांनी हा करार करण्यात आला आहे.
* आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने यासंदर्भातील तयार केलेला प्रस्ताव धुडकावून लावत सध्याच्या सरकारने फ्रान्सशी नव्याने बोलणी सुरु केली होती.
* किंमतीसंदर्भात घेण्यात आलेल्या नव्या भूमिकेनंतर करण्यात आलेल्या या करारामुळे भारतास तब्बल सुमारे ७५ कोटी युरो वाचविणे शक्‍य होणार आहे.
* याशिवाय, या करारामध्ये ‘५०% ऑफसेट‘ कलमही समाविष्ट करण्यात आले आहे. या कलमामुळे भारतामधील छोट्या व मोठ्या कंपन्यांना या कराराच्या माध्यमामधून तब्बल ३ अब्ज युरो किंमतीचे काम मिळणार आहे.
पाक - रशिया पहिल्यांदाच करणार लष्करी संचलन
* रशिया आणि पाकिस्तान उद्यापासून पहिल्यांदाच संयुक्त लष्करी संचलन करणार आहेत.
* रशियाच्या जवानांची एक तुकडी पाकिस्तानात शुक्रवारी दाखल झाली असून रशिया आणि पाकिस्तान शनिवारपासून पहिल्यांदाच संयुक्तरित्या संचलन करणार असल्याची माहिती आयएसपीआरचे ले. जनरल असीम सलीम बाज्वा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
* काही दिवसांपूर्वी जम्मू -काश्मीरमधील उरीमध्ये दहशतवाद्यांकडून भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय लष्करातील १८ जवान शहीद झाले होते.
* त्यानंतर रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव रद्द करण्याची माहिती देण्यात आली होती.
* रशियाचे २००  जवान या संचलनात भाग घेणार आहेत.
* या दोन्ही देशांच्या लष्करी संचलनाला 'फ्रेन्डशिप २०१६' असे नाव देण्यात आले असून हे संचलन दोन आठवडे म्हणजेच ७ ऑक्टोंबरपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या मिडीयाने दिली आहे.
सीमेवरील कुंपणाबाबतचे नैपुण्य भारताला देण्यास इस्रायल तयार
* भारत व इस्रायल या दोन्ही देशांपुढे अनेक बाबतीत ‘समान आव्हाने’ असल्याचे सांगून, सीमेवरील कुंपण मजबूत करण्यासाठी आपल्याकडील विशेष नैपुण्य भारताला उपलब्ध करून देण्याची तयारी इस्रायलने दर्शवली आहे.
* गेल्या आठवडय़ात उरी येथे हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे मानले जात आहे.
* त्यामुळे इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कॅरमन यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
* सध्याच्या घडामोडींकडे आपला देश काळजीने बघत असून, दहशतवादाच्या विरोधातील सहकार्य हा द्विपक्षीय संबंधांचा कायम घटक राहील, असे कॅरमन म्हणाले.
* केंद्रीय  गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या यापूर्वीच्या इस्रायल दौऱ्यात त्यांना देशाची सीमेवरील तयारी दाखवण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
* इस्रायलला नेहमीच धोका राहिलेला असल्यामुळे आमच्याजवळ याबाबतचे विशेष नैपुण्य आहे. आमच्यासमोरील आव्हाने समान असून आमच्याकडे त्यासाठी उपायही आहेत.
* त्यामुळे याबाबत आपण एकत्र काम करू शकतो. यापूर्वी आम्ही इतर क्षेत्रात सहकार्य केले असून ते याही क्षेत्रात केले जाऊ शकते, असे तेल अवीव येथे होऊ घातलेल्या एचएलएस व सायबर परिषदेची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कॅमेरून यांनी सांगितले.
राष्ट्रीय
दिल्लीत डॉक्‍टरांचे निवृत्तीचे वय वाढले
* दिल्ली सरकारने सरकारी सेवेतील डॉक्‍टरांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्षे केले आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
* आरोग्य विभागाने सरकारी डॉक्‍टरांचे निवृत्तीचे वय वाढवावे, असा प्रस्ताव नुकताच नायब राज्यांपालांकडे पाठविला होता.
* शहरातील अनुभवी डॉक्‍टरांना दीर्घकाळ सेवेत ठेवण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
* दिल्ली सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांत डॉक्‍टरांचे निवृत्तीचे वय आधी ६२ वर्षे होते.
*  दिल्ली शहरात ३६ सरकारी रुग्णालये आहेत. "दिल्ली शहरातील सरकरी डॉक्‍टरांसाठी ही चांगली बातमी आहे.
* त्यांच्या सेवेच्या वर्षात दोन वर्षांची वाढ झाली आहे,‘ असे ट्‌विट आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.

व्हॉट्‌सऍपचा डेटा फेसबुकवर टाकू नका
* दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्‌सऍप या मेसेजिंग ऍपला आज मोठा दणका देत २५ सप्टेंबरपर्यंतचे सर्व मेसेज आणि अन्य डेटा डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
* व्हॉट्‌सऍपवरील माहिती फेसबुकशी जोडण्याबाबत सुरू असलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने फेसबुकला वरील आदेश दिल्याने येत्या रविवारपर्यंत व्हॉट्‌सऍप फेसबुकशी जोडले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
* फेसबुकच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सची माहिती फेसबुकला देण्यात येणार आहे.
* याला आव्हान देण्यासाठी कर्मण्य सिंग सरीन आणि श्रेया सेठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
* या वेळी खंडपीठाने २५ सप्टेंबरपूर्वी अकाउंट डिलीट केलेल्या किंवा वापरात असलेल्या युजर्सचा कसलाही डेटा फेसबुकशी जोडू नये, असे म्हटले आहे.
वेबसाईट्सवरील लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती बंद
* आता लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती आणि माहिती गूगल, याहू आणि मायक्रोसॉफ्ट सर्च इंजिनवर दिसणार नाही.
* या संदर्भातील एका याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने माहिती दिली की, या तिन्ही कंपन्यांवरील लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती, माहिती ऑटो ब्लॉक करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबण्यात आली आहे.
* जे कीवर्ड्स टाईप केल्यानतंर लिंग परीक्षणासंबंधी माहिती, जाहिराती दिसते, असे २२ कीवर्ड्स शोधून काढण्यात आले आहेत.
* या २२ कीवर्ड्सपैकी कोणतेही कीवर्ड टाईप केल्यानंतर लिंग परीक्षणासंबंधी माहिती समोर सर्च होते.
* ते सर्व कीवर्ड्स ऑटो ब्लॉक करण्यात येणार असल्याची माहिती सर्च इंजिन कंपन्यांनीही न्यायालयात दिली.
* डॉ. साबू जॉर्ज यांनी लिंग परीक्षणाच्या जाहिरातींविरोधात याचिका दाखल केली होती.
* या याचिकेत काही कीवर्ड्सचा उल्लेख केला होता.
* डॉ. जॉर्ज यांचा आरोप होता की, ऑनलाईन सर्च इंजिन कंपन्या लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती दाखवून कायद्याचे उल्लंघन करत आहेत.
* भारतातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा लागू करण्यात आला आहे.
* या कायद्यानुसार गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे.
महाराष्ट्र
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. म्हैसेकर यांचे निधन
* ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्यसभेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ. गोविंद रामचंद्र म्हैसेकर यांचे काल नांदेड येथे निधन झाले.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर व नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर यांचे ते वडील होत.
* मराठवाड्यातील शैक्षणिक मागासलेपण पुसून टाकण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्यांपैकी ते होते.
* लोकवर्गणी गोळा करून नांदेडच्या यशवंत विद्यालयाची स्थापना करण्यात त्यांचा वाटा होता.
* दीर्घकाळापर्यंत ते या महाविद्यालयाचे प्राचर्य होते.
* मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले.
* ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.
* १९७६ ते १९८२ दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. देशातील शिक्षण व्यवस्थेतील बदलांबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधून त्यांनी समस्या सोडविल्या होत्या.
* १९६२-६३मध्ये राज्य प्रशासकीय पुनर्रचना समितीतील शिक्षण समितीचे सदस्य होते.
'एबीसी'च्या अध्यक्षपदी आय. वेंकट
* भारतातील वृत्तपत्रांचा खप प्रमाणित करणाऱ्या "ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन‘ (एबीसी) या संस्थेच्या अध्यक्षपदी "इनाडू‘चे संचालक आय. वेंकट यांची निवड करण्यात आली.
*  प्रतापराव पवार यांचीही संघटनेच्या कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
* कोकाकोलाच्या (इंडिया) विक्री आणि व्यवसाय (भारत आणि नैर्ऋत्य आशिया) विभागाचे उपाध्याक्ष देवव्रत मुखर्जी यांची २०१६-१७या वर्षासाठी संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
* "आयटीसी‘चे हेमंत मलिक नव्या कार्यकारिणीत मानद सचिव आणि "डीडीबी मुद्रा‘चे मधुकर कामत मानद खजिनदार असतील.
* कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांमध्ये शैलेश गुप्ता (जागरण), होरमुसजी एन. कामा (बॉम्बे समाचार), बेनॉय रॉयचौधुरी (हिंदुस्तान टाइम्स), राजकुमार जैन (टाइम्स ऑफ इंडिया) आदींचा प्रकाशकांचे प्रतिनिधी तर संदीप तार्कस (फ्युचर रिटेल), शशिधर सिन्हा (आयपीजी मीडियाब्रॅंड्‌स) आदींचा जाहिरातदारांचे प्रतिनिधी म्हणून समावेश आहे.
आयटीआय उत्तीर्णांना बारावीचा दर्जा
* आयटीआयमध्ये दोन वर्षांचा टे्रड पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीचा दर्जा देण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
* परिणामी विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेतून मुक्ती मिळणार असून, पदवीच्या कोणत्याही शाखांना थेट प्रवेश घेता येणार आहे.
* संबंधित विद्यार्थ्यांना केवळ नॅशनल स्कूलकडून दोन विषयांची आॅनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे.
* त्यानंतर बारावीच्या निकालाऐवजी संबंधित विद्यार्थ्यांना बारावी समकक्ष समजले जाईल. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र नॅशनल ओपन स्कूलच्या (राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था) माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शासनाच्या खर्चाने चला तीर्थयात्रेला !
* सरकारी खर्चाने तीर्थयात्रेला जाण्याची योजना आता महाराष्ट्रात येऊ घातली आहे.
* ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनें’तर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकास त्याच्या हयातीत एकदा देशातील कुठल्याही एका तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी जाता येईल.
* या योजनेत सर्वधर्मीय प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात येणार आहे.
* मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही योजना आधीच अंमलात आणली आहे. काही बदल करून तोच पॅटर्न महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे.
* मध्य प्रदेशात तीर्थक्षेत्राला जाण्यायेण्याचा, तेथे राहण्याचा आणि भोजनाचा खर्च तेथील शासन उचलते.
* त्यासाठी त्यांनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. महाराष्ट्रातही आयआरटीसीशीच करार केला जाण्याची शक्यता आहे.
* निश्चित करून दिलेल्या सुविधांव्यतिरिक्त काही सुविधा हव्या असतील तर त्यासाठी यात्रेकरूंना पैसे मोजावे लागतील.
* * तीर्थयात्रेसाठी आधी नोंदणी करावी लागेल
* या योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला पाठविण्यात येईल.
* आयकर न भरणाऱ्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश या योजनेत करण्याचा विचार आहे.
* तीर्थयात्रेसाठी आधी नोंदणी करावी लागेल. तहसील कार्यालय आणि अन्य काही शासकीय कार्यालयांमध्ये त्यासाठीचे अर्ज मिळतील. आॅनलाइन नोंदणीचीही सोय असेल.
* ज्येष्ठ नागरिकांना गट तयार करूनही अर्ज करता येईल. एका गटात किमान २५ सदस्य असावेत, अशी अट असेल.
* तीर्थयात्रींची निवड लॉटरी पद्धतीने होईल.
* वैष्णवदेवी, जगन्नाथ पुरी, उज्जैन, द्वारका, अयोध्या, रामेश्वरम, तिरुपती, पुष्कर, गया, सुवर्ण मंदिर, सम्मेद शिखर, श्रवणबेळगोळ, अजमेर शरीफ, वेलांगणी, गोवा, सोमनाथ, काशी, केदारनाथ, बद्रीनाथ, मथुरा, पंढरपूर, शिर्डी, अष्टविनायक, नांदेड गुरुद्वारा, देवीची साडेतीन पीठे, शनी शिंगणापूर, जेजुरी आदींसह जवळपास ३५ ते ४० तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना असेल

२५.०९.२०१६
अर्थसत्ता
सीफूड निर्यात करणाऱ्यांच्या यादीत भारत जगात सातवा
* भारत सीफूड निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत जगात सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य (स्वतंत्र पदभार) राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
* सीतारामन विशाखापट्टनम येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय सीफूड प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
* या क्षेत्रात सागरी उत्पादनांच्या व्यावसायिकांनी मोठा व्यवसाय दिसल्याने आज या क्षेत्राला भरभराट मिळाली आहे. त्यामुळे याचे श्रेय मी त्यांनाच देते.
* त्यांच्याशिवाय सीफूड करण्यात भारत जगात सातव्या क्रमांकावर पोचला नसता.
* या प्रदर्शनाचे आयोजन सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए) आणि भारतातील सीफूड निर्यात संघटनेने (एसईएआय) केले आहे.
* या प्रदर्शनाला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
* स्थानिकांसह निर्यातीच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि शाश्‍वत भारतीय सागरी उत्पादने घेणे हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे.
क्रीडा
मानसी चिपळूणकरचा डबल धमाका
* अव्वल मानांकित मानसी चिपळूणकरने लौकिकास साजेसा खेळ करत टेबल टेनिस स्पर्धेच्या युवा आणि ज्युनियर मुलींच्या गटात बाजी मारली.
* या विजयामुळे मानसीने मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत विजयाचा डबल धमाका केला. तर पुरुष गटात परेश मुरेकर आणि महिला गटात श्वेता पारटेने विजेतेपदावर नाव कोरले.
* महिला गटात झालेल्या स्पर्धेत श्वेता पारटेने रुचिरा मानेकरवर ११-७,१२-१०,११-६,११-५ अशी मात करीत निर्णायक विजय मिळवला.
* पुरुष गटात परेश मुरेकरने तन्मय राणेचा ४-० असा पराभव करीत स्पर्धेत सहज विजयाची नोंद केली.
* तन्मयने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र अनुभवाच्या जोरावर परेशने बाजी मारत अजिंक्यपदाला गवसणी घातली.
वेलवन सेंथीकुमारला अजिंक्यपद
* भारताचा युवा स्क्वॉशपटू वेलवन सेंथीकुमारने क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ वैयक्तिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेत १९-वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद पटकावले.
* चेन्नईचा हा खेळाडू भारतीय स्क्वॉश अकादमीत (आयएसए) सराव करत असून आशियाई स्पध्रेत अजिंक्यपद पटकावणारा रवी दीक्षित (२०१०) यांच्यानंतर दुसरा खेळाडू आहे.
* दुसरे मानांकन असलेला वेलवन या लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार होता.
* मात्र, चौथ्या मानांकित सराजने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आणि कनिष्ठ विश्वविजेत्या मलेशियाच्या एनजी इयन योवचा पराभव करून खळबळ माजवली. त्यामुळे त्याच्याकडून अनपेक्षित निकालाची अपेक्षा होती.
सानिया-बाबरेराला जेतेपद
* भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक टेनिस स्पध्रेत महिला दुहेरीत जेतेपदाला गवसणी घातली.
* सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअ‍ॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
* सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे.
* गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते.  * मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पध्रेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४ मध्ये येथे अजिंक्यपद पटकावले होते.
* सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत.
* त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या जेतेपदाचाही समावेश आहे.
* तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पध्रेतही बाजी मारली.
* सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.
तंत्र-विज्ञान
अलिबाबा करणार ई कॉमर्स उपग्रह लाँच
* ऑनलाईन मार्केटिंगमधील दिग्गज चीनी कंपनी अलिबाबा पुढच्या वर्षात जगातला पहिला ई कॉमर्स उपग्रह लाँच करण्याच्या तयारीत आहे.
* यासाठी त्यांनी चायना अॅकॅडमी ऑफ व्हेईकल टेक्नॉलॉजी व चायना स्पेस म्युझियमशी सहकार्य करार केला असल्याचे समजते.
* या उपग्रहामुळे कंपनी त्यांच्या ग्राहकांना जगातील सर्वोत्तम भाजीपाला व उच्च गुणवत्तेची उत्पादने सॅटेलाईटच्या मदतीने पुरवू शकणार आहे.
* या उपग्रहामुळे कृषी उत्पादने व चांगल्या भाज्या सर्वसामान्य ग्राहकांनाही मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहेत.
* कंपनीने त्यासाठी कस्टमाईज उत्पादनांची मालिका तयार करण्याची योजनाही आखली आहे.
* स्पेस तंत्रज्ञान व ई कॉमर्स डेटा यांच्या संयोगातून वरील तिन्ही कंपन्या अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठे काम करू शकणार आहेत.
मुंबई आयआयटीचा पहिला ‘प्रथम’ उद्या झेपावणार
* भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेतील सातवा उपग्रह येत्या सोमवारी प्रक्षेपित होणार आहे.
* आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे नाव ‘प्रथम’ असून या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणु मोजता येणार आहेत.
* विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली.
* या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.
* आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी २००७मध्ये या उपग्रहाची संकल्पना मांडली.
* यानंतर २००९मध्ये आयआयटी मुंबई आणि इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला.
* या करारानुसार या उपग्रहाचे प्रक्षेपण २०१२मध्ये अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि काही तांत्रिक अडचणींमुळे उपग्रहाचे प्रक्षेपण होऊ शकले नाही. तरीही या प्रकल्पावर विद्यार्थ्यांचे काम सुरू होतेच.
* पुढे २०१४मध्ये सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्यात आली. या नऊ वर्षांच्या वाटचालीनंतर सोमवारी हा उपग्रह अवकाशात झेपावणार आहे.
* आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांनी या उपग्रहावर काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे.
* देशातील १५ विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहात नोंदविलेल्या विद्युत परमाणुंची नोंद होणार आहे.
* या केंद्रांमध्ये मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.
पहिली ट्रान्सफॉर्मर कार सादर
* जगातील पहिली ट्रान्सफॉर्मर कार तुर्कस्तानातील १२ इंजिनिअर्स व चार तंत्रज्ञांनी सादर केली आहे.
* ही बीएमडब्ल्यू कार कांही सेकंदात रोबो मध्ये परावर्तित होऊ शकते.
* ही कार रिमोटवर चालते आणि ती तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला आहे.
* ही कार रोबोमध्ये बदलली गेली की रोबोचे डोके व हात हलू शकतात मात्र ही कार चालू शकत नाही अथवा रोबोप्रमाणे उडूही शकत नाही.
* या क्रिया करण्यासाठी एक विशेष फंक्शन या कारला जोडले जाणार आहे.
* कारसंदर्भातले सर्व संशोधन पूर्ण झाले असून ती लवकरच बाजारात आणली जाणार आहे.
* लॅटरॉन कंपनीने तयार केलेली ही ट्रान्सफॉर्मर कार ट्रान्सफॉर्मर चित्रपटातील अॅनिमेटेड रोबोप्रमाणेच आहे.
ट्विटरचा होणार सौदा ?
* लवकरच मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरचा सौदा होण्याची शक्यता असून काही टेक कंपन्यांशी त्याकरिता बोलणीही सुरु असल्याची चर्चा आहे.
* याबाबत सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गुगल आणि क्लाऊड कॉम्प्यूटिंगमधील सेल्सफोर्स कंपनीशी ट्विटरच्या चर्चा सुरु आहेत.
* सध्या ३१३ दशलक्ष ऐवढी ट्विटरच्या अक्टिव्ह युजर्सची संख्या आहे.
* विक्रीच्या बातमीनंतर ट्विटरच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
* ट्विटरच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडल्यानंतर विक्रीसंबंधी चर्चा सुरु करण्यात आली आहे.
* दोन वर्षांपूर्वी जॅक डोरसे यांनी ट्विटरच्या सीईओपदाची धुरा सांभाळली होती.
* त्यानंतर सतत कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याने ट्विटरने विक्रीसाठी चर्चा सुरु केली.
आंतरराष्ट्रीय
परकीय आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानच्या बाजूने राहील
* परकीय आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानच्या बाजूने राहील, असे आश्वासन चीनचे लाहोरमधील महावाणिज्यदूत यू बोरियन यांनी दिले आहे.
* पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहाबाझ शरीफ यांच्याशी भेटीत त्यांनी हे आश्वासन दिले.
* काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या भूमिकेस चीनचा पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले.
* चीनने म्हटले आहे की, परकीय आक्रमण झाल्यास आमचा देश पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा देईल. काश्मीर मुद्दय़ावर पाकिस्तानच्या भूमिकेस आमचा पाठिंबा आहे.
* काश्मीरमध्ये भारताने नि:शस्त्र लोकांवर अत्याचार चालवले आहेत त्याचे समर्थन होऊ शकत नाही. काश्मीर प्रश्न तेथील जनतेच्या आकांक्षानुसार  सोडवला गेला पाहिजे.
* गेल्या १८ सप्टेंबर रोजी  काश्मीरमध्ये उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात १८ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.
* भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे, पाकिस्तानने मात्र हल्ल्याशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे.
* पाकिस्तान-चीन आर्थिक मार्गिकेचा बराच भाग वादग्रस्त पट्टयातून जात असल्याने भारताने या मार्गिकेला आक्षेप घेतला आहे.
* यू यांनी शहाबाझ यांची भेट  घेऊन त्यांचे ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले व काश्मीरमधील स्थिती तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेच्या प्रगतीवर चर्चा केली.
अमेरिकेतील हल्ल्याप्रकरणी सौदी अरेबियावर खटल्याची परवानगी देणारे विधेयक ओबामांनी फेटाळले
* अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना सौदी अरेबियावर खटला भरण्यास परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेटाळले आहे.
* सौदी अरेबियावर खटले भरण्याची परवानगी दिली तर त्याचे वाईट परिणाम अमेरिकेच्या हितसंबंधांवर होतील, असे कारण हे विधेयक नाकारताना देण्यात आले आहे.
* जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम अॅक्ट बिल रिपब्लीकनांचे बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले होते, पण त्या विधेयकास मान्यता दिले तर दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन होऊ शकते व अमेरिकेचे परदेशातील हितसंबंध धोक्यात येऊ शकतात, असे ओबामा यांनी काल सांगितले.
* अमेरिकी परराष्ट्र सार्वभौम संरक्षण कायद्यातील तत्त्वांचे या विधेयकामुळे उल्लंघन होऊ शकते व सर्वच देशांना न्यायिक प्रक्रियेपासून असलेले संरक्षण धोक्यात येऊ शकते किंवा काढले जाऊ शकते.
* काही खासगी पक्षकारांनी केलेल्या आरोपांमुळे हे घडणे योग्य ठरणार नाही.
* अमेरिकेत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यात सौदी अरेबियातील दहशतवादी गटांचा हात होता असे सांगण्यात येते.
* अपूर्ण माहितीच्या आधारे दीर्घकालीन परिणाम घडवणारे निर्णय घेण्यासारखा हा प्रकार विधेयक मंजूर केल्यास होईल.
राष्ट्रीय
व्याघ्र संरक्षणासाठी भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल
* छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
* त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे.
* केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
* वाघांवर नजर ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली नेक कॉलर, ड्रोनसारख्या आदी उपकरणांच्या निर्मितीचे काम ‘मेक इन इंडिया‘ कार्यक्रमांतर्गत हाती घेतले जाईल, असे दवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
* * योजनेचा पहिला टप्पा
* एनटीसीएने भारतीय वन्यजीव संस्थेशी (डब्ल्यूआयआय) एक सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्ना, जिम कॉर्बेट, काझीरंगा, सुंदरबन आणि सत्यमंगलम या अभयारण्यांत या उपकरणांचा वापर केला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनमध्ये सहभागी होण्यासाठी सुषमा स्वराज रवाना
* २६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनमध्ये सहभागी होण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या आज न्यूयॉर्कला रवाना झाल्या आहेत.
* भारत व पाकिस्तानमध्ये उरीवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर वाकयुद्ध सुरू आहे.
* पाकिस्तानला युएनमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील महिला अधिकारी इमाम गंभीर यांनीही लाथाडले होते.
* मानवाधिकाराचे सर्वात मोठे उल्लंघन दहशतवाद आहे. दहशतवादाचा उपयोग सरकारी धोरणांसाठी केला जात आहे. त्यामुळे हा युद्धगुन्हाच आहे.
* आज भारतासह इतर देश पाकिस्तानच्या दहशतवादला बळी पडत असून, दररोज अनेक समस्यांना करावा लागत आहे, अशा कठोर शब्दांत इमाम गंभीर यांनी पाकला सुनावले होते.
* त्यानंतर आज परराष्ट्रमंत्री स्वतः युएनसाठी रवाना झाले आहेत.
* येत्या २६ सप्टेंबरला स्वराज युएनमध्ये भाषण करणार आहेत.
* संयुक्त राष्ट्रामध्ये सुषमा स्वराज उरी हल्ल्याबाबत नेमके काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
महात्मा फुले यांना भारतरत्नची राष्ट्रीय आयोगाची शिफारस
* थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘भारतर’ने सन्मानित करण्याची अधिकृत शिफारस निवृत्त न्यायाधीश के. ईश्व्रय्या यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने केल्याचे समजते.
* अशीच शिफारस यापूर्वी महाराष्ट्र सरकारनेही केलेली आहे.
* महात्मा फुले यांच्याबरोबरच बी.पी. मंडल यांनाही भारतर देण्याची शिफारस आयोगाची आहे. इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारया मंडल आयोगाचे बी.पी. मंडल हे अध्यक्ष होते.
* अशी शिफारस आयोगाच्या अखत्यारित येत नसल्याने ती केंद्र सरकारवर बंधनकारक नाही; पण त्यामुळे या जुन्या मागणीला बळ मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात बंबार्डिअर लोकल?
* मध्य रेल्वेच्या ताफ्यात बंबार्डिअर कंपनीच्या नव्या ११ ते १२  लोकलचा समावेश होण्याची शक्‍यता आहे.
* रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यास प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याचा मार्ग मोकळा होईलच; पण प्रथमच नव्याकोऱ्या लोकल मध्य रेल्वेच्या पदरात पडणार आहेत.
* मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकल सेवेचा ३५ ते ४० लाख प्रवासी वापर करतात.
* पश्‍चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेचा आवाका अधिक आहे. हे मान्य केले तरी अचूक वेळापत्रक आणि नव्या लोकलपासून सारे काही पश्‍चिम रेल्वे प्रवाशांच्या नशिबात अधिक आहे.
* एवढेच काय तर पश्‍चिम रेल्वेने वापरलेल्या लोकल कालांतराने मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतात.
* सध्या मध्य रेल्वेच्या लोकल "भारत हेवी इलेक्‍ट्रॉनिक लि.‘ (भेल) आणि सिमेन्स कंपनीच्या आहेत; पण आता ही परिस्थिती बदलणार आहे.
* पश्‍चिम रेल्वेच्या वाट्याला येणाऱ्या ११ ते १२ लोकल मध्य रेल्वेने आम्हाला द्याव्यात, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आहे.
* या लोकल कॅनडियन ऍरोस्पेस ऍण्ड ट्रान्सपोर्टेशन कंपनीच्या "बंबार्डिअर‘ नावाने ओळखल्या जातात.
* प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त जागा, मोठ्या खिडक्‍या, अधिक वेग आदी कारणांमुळे बंबार्डिअर लोकल सरस आहेत.

* पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात ८६ पैकी ४९ लोकल बंबार्डिअर कंपनीच्या आहेत.
२६.०९.२०१६
अर्थसत्ता
आता कामगार कायदयांत होणार मोठे बदल
* वस्तू आणि सेवा कराला मान्यता मिळाल्यानंतर, केंद्र सरकारने आता कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी चालवली आहे.
* सरकारला अपेक्षित बदल मंजूर झाले, तर कामगारांची नियुक्ती करणे आणि त्यांना कामावरून कमी करणे, कोणत्याही कंपनीला अधिक सोपे जाणार आहे.
* कायद्यातील प्रस्तावित बदलांमुळे देशात लाखो नव्या नोकऱ्या आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असा दावा केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी केला आहे.
* मात्र, काहींच्या नोकऱ्याही त्यामुळे जाण्याची भीती कामगार संघटना व्यक्त करीत आहेत.
* नव्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, विविध क्षेत्रांतील कंपन्यांना नोकऱ्यांच्या नियुक्तीशी व कपातीशी संबंधित कामगार कायद्यांमध्ये शिथिलता हवी आहे.
* बदलत्या काळात आवश्यक बदल या कायद्यांमध्ये अपेक्षित आहेत.
* याच भूमिकेला अनुसरून औद्योगिक संबंध आणि मजुरीशी संबंधित दोन प्रमुख विधेयके लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
* कॅबिनेटची त्याला मंजुरी मिळताच, नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ही विधेयके संसदेत सादर केली जातील, असे ते म्हणाले.
क्रीडा
३७ कसोटींमध्येच अश्‍विनच्या २०० विकेट्‌स
* अश्‍विनने सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये २०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वकार आणि लिली यांना मागे टाकले. या यादीत आश्‍विन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
* अश्‍विनचे न्यूझीलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी कसोटीमध्ये १९३ बळी होते.
* न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला बाद करत आश्‍विनने कसोटीतील २०० बळींचा टप्पा गाठला. ही आश्‍विनची ३७ वी कसोटी आहे.
* वकार युनूस आणि डेनिस लिली या दोघांनीही ३८ कसोटींमध्ये २०० बळी मिळविण्याची कामगिरी केली होती.
* सर्वांत कमी कसोटींमध्ये २०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर क्‍लॅरी ग्रिमेट अव्वल स्थानी आहेत. त्यांनी ३६ कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती.
विश्वजीत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी निवड
* जागतिक रेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजीत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
* ९ ते १२ आॅक्टोबर दरम्यान फ्रान्स येथील माद्रिद शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे.
* या आधी पोलंडच्या क्रेकाऊ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विश्वजीत यांनी सुवर्ण पदक मिळविले होते, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक पदके मिळविली आहे.
* विशेष म्हणजे, विश्वजीत यांच्यासह सुमा शिरूर, अयोनिका पॉल, तेजस्विनी मुळ्ये, स्वप्निल कुसळे, जितेंद्र विभुते, सुमेध देवळालीवाला, रुचिता विणेरकर हे नामांकित नेमबाजदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
टेनिसपटू हृदयाला दुहेरी मुकुट
* हृदया शहाने अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला.
* इंदूरला पार पडलेल्या स्पर्धेत १४ वर्षांखालील एकेरीत अग्रमानांकित हृदयाने मध्य प्रदेशच्या रुबिता मीनाला ६-३, ६-४ असे हरविले.
* १६ वर्षांखालील दुहेरीत तिने मुंबईच्या शनया नाईकच्या साथीत मालविका शुक्‍ला-झाई जीवन यांना २-६, ६-४, १०-२ असे हरविले. हृदया-शनया बिगरमानांकित होत्या; तर प्रतिस्पर्धी जोडी अग्रमानांकित होती.
मराठा लाईट इन्फन्ट्रीचे विजेतेपद
* महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या सहकार्याने पार पडलेल्या ११३व्या आगा खान चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत मराठा लाईट इन्फन्ट्री (एमएलआय) ‘अ’ संघाने रविवारी पुरुष गटात विजेतेपदाला गवसणी घातली.
* महिलांमध्ये नवी दिल्ली येथील जिझस अँड मेरी कॉलेज संघाने बाजी मारली.
* पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगर परिसरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या चुरशीच्या अंतिम फेरीत एमएलटी ‘अ’ संघाने लखनौ येथील के. डी. सिंगबाबू सोसायटी संघावर २-१ने मात केली.
* तर दुसरीकडे एकतर्फी झालेल्या सामन्यात आझम कॅ म्पस संघाला ५-०ने लोळवून जिझस अँड मेरी संघाने महिला गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना
* मुंबईत पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) स्थापना करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी ‘स्पाइस जेट’चे कार्याध्यक्ष व व्यवस्थापक अजय सिंह यांची निवड करण्यात आली.
* सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे जय कवळी निवडून आले. ही निवडणूक योग्य रीतीने पार पडल्याचे प्रशस्तीपत्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनी दिले.
* त्यामुळे भारतीय बॉक्सिंगपटूंचे आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळण्याचे दरवाजे उघडले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
* या महासंघाला एआयबीएकडे औपचारिक संलग्नतेसाठी अर्ज करावा लागेल व त्यानंतर डिसेंबरमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये जागतिक संघटना संलग्नतेची औपचारिकता पूर्ण करेल.
कार्यकारिणी समिती
* अध्यक्ष : अजय सिंह (उत्तराखंड) ’
* सरचिटणीस : जय कवळी (महाराष्ट्र)
* खजिनदार : हेमंता कुमार कलिता (आसाम) ’
* उपाध्यक्ष : खोईबी सलाम सिंग (उत्तर-पूर्व), जॉन खारसिंग (पूर्व), अनिल कुमार बोहिदार (दक्षिण-पूर्व), सी. बी. राजे (दक्षिण), अमरजित सिंह (पश्चिम), नरेंद्र कुमार निरवाण (उत्तर-पूर्व), राजेश भंडारी (उत्तर) आणि अनिल कुमार मिश्रा (मध्य) ’
* विभागीय सचिव : स्वपन बॅनर्जी (पूर्व), जी. व्ही. रवी राजू (दक्षिण-पूर्व), आर. गोपू (दक्षिण), राजेश देसाई (पश्चिम), दिग्विजय सिंह (उत्तर-पश्चिम), संतोष कुमार दत्ता (उत्तर), राजीव कुमार सिंह (मध्य).
तंत्र-विज्ञान
सर्वांत मोठ्या दुर्बिणीतून परग्रहवासीयांचा शोध सुरू
* चीनने रविवारी जगातील सगळ््यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला.
* फुटबॉलची ३० मैदाने एकत्र केल्यावर जेवढा आकार होईल तेवढी ही दुर्बीण असून ती ४,४५० परावर्तक आरशांपासून (रिफ्लेक्टर पॅनेल्स) बनलेली आहे.
* या विश्वाचा जन्म वा उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेण्यास ही दुर्बीण मदत करील.
* चीनच्या अकॅडमी आॅफ सायन्सेस अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनोमिकल आॅब्झर्वेशनचे उप प्रमुख झेंग शिओनियन यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले येते १० ते २० वर्षे ही दुर्बीण जागतिक नेतृत्व करील.
* या दुर्बिणीचा वापर अधिकृतपणे सुरू केला जात असताना शेकडो खगोलशास्त्रज्ञ आणि आकाशातील घटनांची उत्सुकतेने माहिती घेऊ इच्छिणारे उपस्थित होते.
* गुईझोऊ प्रांतातील पिंगटॅँग परगण्यातील कार्स्ट खोऱ्यात ही दुर्बीण आहे. हा दुर्बीण प्रकल्प २०११ मध्ये सुरू झाला व त्यासाठी १.२ अब्ज युआन (१८० दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च आला.
* * आठ हजार लोकांनी बनविले आश्चर्य!
* चीनच्या खगोलशास्त्रज्ञांनी १७ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. या दुर्बिणीसाठी शांत वातावरणाची आवश्यकता असल्यामुळे सुमारे आठ हजार लोकांना त्या भागातून हलविण्यात आले.
* दुर्बिणीला पाच किलोमीटर त्रिज्येत रेडिओ सायलेन्सची गरज असते.
मंगळयानाचा ग्रहण काळ कमी करण्याचे पुढील वर्षी प्रयत्न
* मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या भारताच्या मंगळ मोहिमेला काल दोन वर्षे पूर्ण झाली असून अपेक्षेपेक्षा यानाने अधिक काळ काम दिले आहे.
* आता पुढील वर्षी या अवकाशयानाचा अंधारात असण्याचा काळ म्हणजे ग्रहण काळ कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
* इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले, की मॉम मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अपेक्षित कार्यकाल सहा महिने होता. त्यानंतर वर्षभर त्याच्या पाच पेलोडमधून मिळालेली माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने प्रसारित केली.
* ग्रहण काळात त्याला बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. जर ग्रहण काळ कमी केला तर ती बॅटरी जास्त काळ टिकू शकेल.
*  ग्रहण काळाचा परिणाम अवकाशयानाच्या कार्यक्षमतेवर कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जाणार असून अजूनही यानात बऱ्यापैकी इंधन आहे. त्यामुळे ते इतके दिवस कार्यरत राहू शकले.
* मॉम म्हणजे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सोडले होते.
* त्यासाठी पीएसएलव्ही सी २५ हा प्रक्षेपकही वापरण्यात आला होता. खोल अंतराळातील ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले होते.
* मंगळयानाने पहिल्या दोन वर्षांत मिळवलेली माहिती जाहीर करण्यात आली असून भारताच्या या मोहिमेला अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा स्पेस पायोनियर पुरस्कार तसेच नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता.
* यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवावरील संप्लवन प्रक्रियेवर प्रकाश टाकला असून तेथील कार्बन डायॉक्साइड व पाण्याचे बर्फ यांचे थर उन्हाळ्यात नष्ट होत असतात.
* त्याबाबतच्या माहितीत मॉमच्या निरीक्षणांनी भर पडली आहे.
आंतरराष्ट्रीय
बांगलादेशच्या सीमेवर काटेरी तारेचे कुंपण
* भारत सरकारने बांगलादेश सीमा सील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बांगलादेशनेही आसामला लागून असणाऱ्या त्यांच्या सीमेवर काटेरी तारेचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
* बांगलादेश लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
* म्यानमारच्या सीमेवरदेखील अशाच पद्धतीचे कुंपण उभारण्याचा बांगलादेश सरकारचा विचार आहे.
* बांगलादेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक मेजर जनरल अझीज अहमद यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधताना ही भूमिका स्पष्ट केली.
* भारताप्रमाणेच सीमावर्ती भागामध्ये रस्त्यांचे जाळे उभारण्याचा आमचा मनोदय असून, त्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
भारत करतो आहे आमची प्रतिमा मलीन
* दहशतवादाची निर्यात पाकिस्तान करत असल्याचा अपप्रचार करून नरेंद्र मोदी काश्‍मीरवरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानने बचाव करण्याचा प्रयत्न केला.
* काल कोझिकोड येथे जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर थेट टीका केली होती.
* त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक प्रसिद्ध करून आपली अधिकृत भूमिका मांडली.
* पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे.
* या पत्रकात म्हटले आहे, की जाणीवपूर्वक भडकावणारी विधाने करून भारताचे नेते पाकिस्तानविरुद्ध जागतिक पातळीवर प्रतिमाहनन करण्याची योजना आखत आहेत.
* दहशतवादी बुऱ्हाण वाणी याचा उल्लेख पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘काश्‍मीरमधील तरुण नेता‘ असा केला.
* बुऱ्हाण वाणीला ठार मारल्यानंतर काश्‍मीरमध्ये पुन्हा एकदा दडपशाही सुरू झाली आहे, असा दावाही पाकिस्तानने केला.
राष्ट्रीय
भारताचा संयम मुत्सद्दी बलवानाचा!
* काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेवरचा तणाव अनेक पटीने वाढला आहे.
* भारताने आपली संरक्षण सिध्दता मजबूत करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे.
* ७७८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात भारतीय सैन्य तैनात केले जात आहे.
* शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इंधन इत्यादीची भरपूर रसदही रवाना करण्यात आली आहे. ही सारी तयारी युध्दसदृश स्थितीचा इशारा देणारी आहे.
* रविवारी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदींनी ‘भारताचे सैन्यदल बोलत नाही, पराक्रम करून दाखवते’ असा सूचक इशाराही दिला आहे.
* उरी हल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी भारत आणि पाक हे दोन्ही देश खरोखर युध्दाला सामोरे जातील काय? याचे उत्तर नकारार्थी असले, तरी संरक्षण सिध्दतेत भारत पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने पुढे आहे, या वास्तवाची जाणीव संरक्षण मंत्रालयाने करून दिली आहे.
"केन-बेतवा' प्रकल्प पन्ना अभयारण्याच्या मुळावर
* मध्य प्रदेशमध्ये होऊ घातलेला "केन-बेतवा नदीजोड प्रकल्प‘ येथील पन्ना अभयारण्याच्या मुळावर उठण्याचे संकेत आहेत. हा प्रकल्प उभा राहिला, तर अभयारण्यातील किमान ९० चौरस किलोमीटरचे क्षेत्र व किमान सात लाख झाडे पाण्याखाली जातील, अशी माहिती एका सरकारी अहवालाद्वारे उघड झाली आहे.
* केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्प योजनांपैकी केन-बेतवा हा प्रकल्प सर्वांत मोठा मानला जात असून, पन्ना या अभयारण्याचा बराचसा भूभाग त्याखाली येणार आहे.
* ही बाब येथील वनसंपदेबरोबर वन्यप्राण्यांच्या जीवनमानावर दुरोगामी परिणाम करणारी ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
* प्रकल्प क्षेत्रात ७ लाख २० हजार मोठी झाडे आहेत. कालांतराने ही संख्या १२लाखांच्या घरात जाईल.
* प्रकल्पाच्या पाण्यामुळे ही वनसंपदा धोक्‍यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या एका अहवालात नमूद आहे.
* पन्ना अभयारण्य वाघांसाठी आरक्षित करण्यात आले असून, अभयारण्याच्या कोअरझोनमध्ये येणाऱ्या एका धरणावर हा प्रकल्प उभा राहणार आहे.
* * प्रकल्पामुळे हे शक्‍य
* ९ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पूर्ण झाला, तर १३ लाख ४२ हजार लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
* या प्रकल्पामुळे मध्य व उत्तर प्रदेशच्या सहा जिल्ह्यांतील किमान ६ लाख ७५ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
महाराष्ट्र
राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजा माने
* महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
* राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
* राजा माने हे सध्या शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहेत.
* २९ सप्टेंबरला पुणे विभागीय कार्यालयात ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजा माने यांचा सत्कार होणार आहे.
* याच कार्यक्रमात पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
नाशिकचे चित्रकार सावंत बंधूंना थायलंडमधील पारितोषिक
* जागतिक पातळीवर चित्रकला क्षेत्रात नाशिकचे नाव उंचाविणारे राजेश व प्रफुल्ल या सावंत बंधूंना थायलंडचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
* इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी ऑफ थायलंड या जागतिक कला संस्थेतर्फे बानसिलापीन येथे १ ऑक्टोबर रोजी आयोजित हुआहीन ब्लुपोर्ट वॉटरकलर आर्ट्स प्रदर्शनात चित्रकार सावंत बंधूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
* राजेश सावंत यांनी इटलीमध्ये जलरंग माध्यमात ऑन दि स्पॉट चित्रित केलेल्या ‘ग्रॅण्ड कॅनाल ऑफ व्हेनिस’ या निसर्गचित्राची या पारितोषिकासाठी निवड केली आहे.
* ज्या चित्रकारांनी जागतिक स्तरावर जलरंगाच्या चित्रणात आजपर्यंत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा विविध देशांतील निवडक २० चित्रकारांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. त्यात प्रफुल्ल सावंत यांचा समावेश आहे.
* २ ऑक्टोबर रोजी बँकॉक येथे गौरविण्यात येणाऱ्या चित्रकारांची कार्यशाळा होणार आहे. त्यात प्रफुल्ल सावंत जलरंगातील चित्रकलेचे धडे देणार आहेत.
* प्रदर्शनात ५० देशांच्या उत्कृष्ट २०० चित्रकृती सादर होणार आहेत.
* सावंत बंधूंच्या एकूण चार चित्रकृती प्रदर्शित करण्यात येणार असून प्रदर्शनाच्या जागतिक पुस्तिकेतही त्यांच्या चित्रांना स्थान देण्यात येणार आहे.

* सावंत बंधूंना चित्रकलेसाठी आजपर्यंत ४९ आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
२७.०९.२०१६
अर्थसत्ता
रामदेवबाबांच्या पतंजलीचा महाराष्ट्रात डेअरी प्रकल्प
* योगगुरू रामदेवबाबांचा पतंजली उद्योग डेअरी क्षेत्रात ही झेप घेत असून या प्रकल्पातून दूध, दही, पनीर, लोणी व लस्सी या सारखी डेअरी उत्पादने बाजारात आणली जात आहेत.
* या आर्थिक वर्षात त्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकात डेअरी प्लाँट सुरू केले जातील असे रामदेवबाबांनी कर्नाल येथे भरलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय डेअरी अनुसंधानच्या परिषदेत सांगितले.
* डेअरीतील स्वदेशी ब्राँड अमूलचे कौतुक यावेळी रामदेवबाबा यांनी केले व डेअरी अनुसंधानच्या सहकार्याने काम करण्याची इच्छाही यावेळी व्यक्त केली.
* रामदेवबाबांनी डेअरीबरोबरच स्वदेशी गाईंच्या पोषणासाठीही खास व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले भारतात सध्या डेअरी व्यवसायाची उलाढाल ३ लाख कोटींची आहे ती २०२२ पर्यंत पाच लाख कोटींवर जाईल.
* पतंजलीच्या प्रकल्पांमुळे किमान १ हजार जणांना रोजगार मिळेल तसेच कोट्यावधी शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ होईल.
* देशी गाईंच्या दुधाची गुणवत्ता व दूध देण्याची क्षमता वाढविण्यासाठी अमेरिका व ब्राझील देशातील तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘डिजिटल इंडिया’ची अल्पावधीत मोठी मजल
* भारताने अल्पावधीत डिजिटल इंडिया संकल्पनेने मोठी मजल मारली आहे.
* आपल्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने गतवर्षी आजपर्यंतची सर्वाधिक ८ लाख कोटींची निर्यात केली. जगातल्या ८० देशांच्या २०० शहरांमधे भारताचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक सध्या कार्यरत आहेत.
* रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आर.अँड डी.) क्षेत्रात भारत जगातला मोठा हब बनला आहे.
* अमेरिकेच्या खालोखाल गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुकचा सर्वाधिक वापर भारतात होतो आहे.
* १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात १०५ आधार कार्डधारक, १०३ कोटी मोबाईल ग्राहक आणि ४० कोटी लोक इंटरनेट युजर्स आहेत.
* डिजिटल इंडियाची ही आकडेवारी बोलकी आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
* भारतात डिजिटल इंडिया संकल्पना केवळ श्रीमंत व उच्च मध्यम वर्गापुरती मर्यादित नाही, तर मुख्यत्वे ती गरीबांसाठीच आहे, असे नमूद करीत रविशंकर प्रसाद म्हणाले, चहावाला, रिक्षावाला, हातगाडीवाला अशा प्रत्येकाला डिजिटल इंडियाच्या माध्यमातून व्यवसायाच्या नवनव्या संधी शोधता आल्या पाहिजेत, अशी पंतप्रधानांची भूमिका आहे.
क्रीडा
बर्लिन मॅरेथॉन इथिओपियाच्या केनेनिसा बेकेलेने जिंकली
* इथिओपियाच्या केनेनिसा बेकेले याने रविवारी झालेली बर्लिन मॅरेथॉन शर्यत जिंकली.
* त्याने केनियाच्या विल्सन किपसॅंग याला मागे टाकले. त्याचा विश्‍वविक्रम थोडक्‍यात हुकला.
* ऑलिंपिकमध्ये ५ आणि १० हजार मीटर शर्यतीचा तीन वेळचा विजेता असणाऱ्या बेकेले याने आज सुरवातीपासून वेगवान धाव घेणाऱ्या किपसॅंग याला केवळ दहा सेकंदांनी मागे टाकले.
* बेकेले याने २ तास ३ मिनिटे ३ सेकंद वेळ दिली.
* किपसॅंग याने २ तास ३ मिनिटे १३ सेकंद वेळ देत दुसरा क्रमांक मिळविला.
* केनियाचा इव्हान चेबेट तिसरा आला. त्याने २ तास ५ मिनिट ३१ सेकंद अशी वेळ दिली.
ली चोंग वेईला विजेतेपद
* मलेशियाच्या ली चोंग वेई याने रविवारी जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
* चोंग वेईने यापूर्वी या स्पर्धेत २००७, २०१०, २०१२, २०१३, २०१४मध्ये विजेतेपद मिळविले आहे.
महिला एकेरीत चीनच्या हे बिंगजिआओ हिने विजेतेद मिळविले.
महान गोल्फपटू अरनॉल्ड पाल्मर यांचे निधन
* गोल्फला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे अमेरिकेचे महान खेळाडू अरनॉल्ड पाल्मर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, ते ८७ वर्षांचे होते.
* गोल्फसम्राट म्हणून लोकप्रियता लाभलेल्या पाल्मर यांनी १९५८, १९६०, १९६२ व १९६४ मध्ये मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
* ब्रिटिश खुली स्पर्धा त्यांनी १९६१ व १९६२ मध्ये जिंकली. अमेरिकन ओपन गोल्फ स्पर्धेत त्यांनी १९६० मध्ये अजिंक्यपद मिळविले होते.
*  गोल्फमधील त्यांची नजाकत एवढी सुंदर होती की दूरचित्रवाणीवर अनेक वेळा त्यांच्या खेळाचे प्रक्षेपण केले जात असे.
* पाल्मर यांनी १९५४ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी अमेरिकन हौशी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.
* त्यानंतर त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये ६२ वेळा अजिंक्यपद पटकाविले.
* एका मोसमात एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणारे ते पहिले खेळाडू होते.
* त्यांनी सांघिक स्पर्धेत सहा वेळा रायडर चषक स्पर्धेत भाग घेतला.
* १९७४ मध्ये त्यांची गोल्फच्या हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. त्यांना अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.
आयसीसीच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी टीम इंडिया
* टीम इंडियाने कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत न्यूझीलंडचा १९७ धावांनी धुव्वा उडवून कसोटीच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठले आहे.
* आता प्रत्येकी १११ गुण भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात जमा झाले आहेत.
* काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळाले होते.
* मात्र भारताच्या आज विजयामुळे पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला आयसीसीने दिलेली प्रतिष्ठित गदा अवघ्या सहा दिवसातच परत घेतली जाणार आहे.
* भारत आणि पाकिस्तान खालोखाल १०८ गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
पाचशेव्या कसोटीला विजयाची झळाळी
* रविचंद्रन आश्विनच्या फिरकीने पुन्हा एकदा कमाल केली. आश्विनच्या (६ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी न्यूझीलंडचा १९७ धावांनी पराभव करीत आपल्या ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्याला संस्मरणीय केले.
* ४३४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी सोमवारी उपाहारानंतर काही वेळांतच २३६ धावांत संपुष्टात आला.
* भारताने या निकालासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेत आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली.
* आश्विनने अनुकूल स्थितीचा लाभ घेताना १३२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. त्याने या लढतीत एकूण १० बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
* मोहम्मद शमीने आज (२-१८) दोन बळी घेत आश्विनला योग्य साथ दिली. रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
तंत्र-विज्ञान
‘चिरोटोडॅक्टिस वरद गिरी’ असे नामकरण; युवा संशोधकांची भरारी
* भारतात १३० वर्षांनंतर नव्या पालीच्या शोध लावण्यात युवा संशोधकांना यश आले आहे.
* मध्य व पश्चिम भारतात गेकोइला कोलेगलन्सी या नावाने परिचित असलेल्या पालीचे जिन्स या नव्या पालीत आढळले आहेत.
* पालींच्या संशोधनासंदर्भात आतापर्यंतची ही सर्वात मोठी उपलब्धी समजली जाते. या पालीला ‘चिरोटोडॅक्टिस वरद गिरी’ असे नाव देण्यात आले आहे.
* अमेरिकेच्या विल्लानोवा विद्यापीठाचे डॉ. ईशान अग्रवाल, डॉ. अ‍ॅरोन बॉर, तसेच बंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर बॉयोलॉजिकल सायन्सचे झिशान मिश्रा, मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटाचे शौनक पाल या युवा संशोधकांना ही पाल शोधून काढण्यात यश मिळाले आहे.
* या पालीसंदर्भात त्यांनी भारतभ्रमंती केली. त्यानंतर ही पाल वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वावर असला तरीही ती दुर्मीळ आहे.
* * अन्यथा पाल नामशेष
* मनुष्यवस्ती आणि जंगलांमधील खडकाळ गवती कुरणाचा पट्टा म्हणजे, या पालीचा अधिवास आहे.
* मात्र, अलीकडील शहरीकरण, विकास प्रकल्प आणि इतर कारणांमुळे खडकाळ गवती कुरणांचा परिसर कमीकमी होत आहे.
* पुढील १५० वर्षांपर्यंत शहरीकरण अणि विकासाच्या गर्तेत पालींचा हा अधिवासही नष्ट होईल आणि त्यामुळे या पालीच्या अस्तित्वावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
* तिचा हा अधिवास सुरक्षित राखला नाही, तर पुढील १५० वर्षांत ती नामशेष होऊ शकते, अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
* दुर्मीळ आणि निशाचर असलेल्या या पालीचा अधिवास इतर पालींपेक्षा वेगळा आहे.
* सहा सेंटीमीटपर्यंत तिची लांबी असते आणि महाराष्ट्र, गुजरातसह व मध्य प्रदेशात ती आढळते.
* संशोधकांच्या चमुने सरिसृप क्षेत्रातील संशोधनातील सर्वात मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. वरद गिरी यांचे नाव या पालीला दिले.
* ही नवी प्रजाती ‘झुटाक्सा’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ऑर्डर ए डॅडी अॅपने महिलांना स्पर्म निवडीची संधी
* ब्रिटनच्या स्पर्म बँकेतील भारतीय वंशाचे डॉक्टर डॉ.कमल आहुजा यांनी असे एक अॅप विकसित केले आहे, ज्यामुळे अपत्य प्राप्तीसाठी उपचार घेत असलेल्या महिलांना आपल्या बाळाचे वडील होण्यास योग्य वाटतील त्या व्यक्तीचे स्पर्म मिळविणे शक्य होणार आहे.
*  या महिला स्पर्म डोनरची निवड ऑनलाईन करू शकणार आहेत.
* जगातील या प्रकारचे पहिलेच अॅप असल्याचा दावा आहुजा यांनी केला आहे.
* या अॅपचे नांव ऑर्डर अ डॅडी असे केले गेले आहे.
* या अॅपमुळे अपत्यप्राप्तीसाठी इच्छुक असलेल्या महिला घरच्या घरी बसून स्पर्म डोनेशन करणार्‍या व्यक्तीची माहिती मिळवू शकतील व विचार करून त्यातील कुठले स्पर्म घ्यायचे याची निवड करू शकतील.
* त्यामुळे दान कर्त्याचे केस, डोळे, उंची, शैक्षणिक स्तर, व्यवसाय, व्यक्तिमत्त्व यांतून महिलांना आपल्या बाळाचे वडील कसे असावेत याची निवड करता येईल.
* अर्थात त्यासाठी स्पर्म बँकेकडे ९५० पौंड भरल्यानंतर या महिला ज्या प्रजनन केंद्रात उपचार घेत असतील त्या केंद्राकडे निवडलेले स्पर्म पोहोचविले जाणार आहेत.
* ब्रिटनमधील ५० टक्के आयव्हीएफ क्लिनिकनी या सेवेसाठी नोंदणी केली असल्याचे व त्याला कायदेशीर मान्यता असल्याचे सांगितले जात आहे.
आंतरराष्ट्रीय
आशियातील सर्वाधिक स्वच्छ मॉलिनांग!
* साऱ्या जगाला स्वच्छता आणि टापटिपपणा यांचा वस्तुपाठ घालून देणारे भारत-बांगलादेश सीमेवरील मेघालय राज्यातील मॉलिनाँग हे गाव पर्यटकांना आपल्या गुणवैशिष्ट्यांनी आकर्षित करून घेत आहे...
* भारत-बांगलादेश सीमेवर मेघालय राज्यातील शिलाँगपासून ९० किलोमीटरवर वसलेले अगदी पाचशे लोकसंख्या असलेले आशियातील सर्वाधिक स्वच्छ आणि ‘इको टुरिझम’साठी प्रसिद्ध असलेले मॉलिनाँग (Mawlynnong) हे गाव. ‘डिस्कव्हर इंडिया’ या मासिकाकडून सलग २००३ आणि २००६ मध्येदेखील या गावाला सर्वाधिक स्वच्छ गाव म्हणून मान मिळाला.
* लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची दिवसाची सुरवात घर आणि परिसरातील साफसफाईने होते.
* शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थीसुद्धा रस्त्यांवरील कचरा आणि झाडांची पाने गोळा करून कचराकुंडीत टाकतात.
* प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी कचराकुंड्यादेखील बांबूच्या काड्यांपासून तयार केलेल्या वापरल्या जातात.
* आता शंभर टक्‍के प्लॅस्टिकमुक्‍तीकडे या गावाची वाटचाल होत आहे. दर्जेदार आयुष्यासाठी स्वच्छता ही गुरुकिल्ली मानली जाते. १३० वर्षांपासून आपल्या पुढच्या पिढीकडे पिढ्यान्‌पिढ्या स्वच्छतेचे महत्त्व संक्रमित केले जात आहे.
* स्वच्छतेसह या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्‍के शौचालयाचा वापर हे होय. .
* ‘डिस्कव्हर इंडिया’ मासिकाने आशियातील स्वच्छ गाव म्हणून घोषित केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या आपसूक वाढू लागली आहे.
जर्मनीतील थ्युरिंगियाबरोबर महाराष्ट्राचा सामंजस्य करार
* व्यापार आणि परकी गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि जर्मनीच्या थ्युरिंगिया फेडरल स्टेट या दोन राज्यांतील संबंध दृढ करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.
* येथील एका कार्यक्रमात राज्याचे उद्योग व खाणमंत्री सुभाष देसाई आणि जर्मनीचे राज्य सचिव जॉर्ज मेअर यांनी करारावर सह्या केल्या.
* "क्रिसेन्डो वर्ल्डवाईड‘तर्फे आयोजित "थ्युरिंगिया ट्रेड मिशन‘ या कार्यक्रमात हा करार झाला.
* राज्यात गुंतवणूक करणे आणि उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी थ्युरिंगन कंपन्यांना मदत करणे, विविध क्षेत्रांमधील तंत्रज्ञान आणि माहिती महाराष्ट्रातील कंपन्यांना देणे, थ्युरिंगिया येथे उत्पादन केंद्र, विक्री कार्यालये सुरू करणे, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मदत करणे; तसेच शिक्षण, संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रातील देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.
* वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान, एम्बेडेड टेक्‍नॉलॉजी, ग्लास, इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकल क्षेत्रातील पंधरा थ्युरिंगन कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नुकतीच शहराला भेट दिली.
* पुण्यासह गुडगाव, दिल्ली, बंगळूर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, हरयाना अशा देशांतील एकूण २५० कंपन्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* "टेकएक्‍स्पर्ट इंजिनिअरिंग‘ कंपनी व जीबी न्यूहास यांच्यात नॅनो कोटिंग तंत्रज्ञानासंदर्भात करार झाला.
* ‘नॅनो कोटिंग तंत्रज्ञान अतिशय नावीन्यपूर्ण आणि विकासाच्या मार्गावर आहे.
*  या तंत्रज्ञानामुळे बॅक्‍टेरियासारख्या जीवाणूंपासून संरक्षण करणे शक्‍य होणार आहे. गंजप्रतिबंधक म्हणूनही याचा उपयोग होणार आहे.
* औषधनिर्माण, दवाखाने, अन्न व प्रक्रिया उत्पादन क्षेत्र आणि ऑटोमोबाईल यांसह इतर क्षेत्रांत हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
ब्राझीलमध्ये सापडला महाकाय साप
* तब्बल ३३ फूट लांबीचा महाकाय साप ब्राझीलमध्ये सापडला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अॅनाकोंडा असल्याचे म्हटले जात आहे.
* हा अॅनाकोंडा इतका मोठा आहे की याला उचलण्यासाठी एका मोठ्या क्रेनची आणि साखळ्यांची मदत घ्यावी लागली.
* साधारण ४०० किलो एवढे या सापाचे वजन आहे. तर सापाची लांबी १ मीटर आहे.
* उत्तर ब्राझिलमध्ये एका साईटवर काम करत असलेल्या कामगारांनी काम करत असताना एक आवाज ऐकला. आवाजाच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तिथे त्यांना एक भला मोठा अॅनाकोंडा पाहायला मिळाला.
* याआधी युएसच्या कन्नास सिटीमधील २५ फूट लांबीच्या सापाची गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती.
* कामाच्या ठिकाणी आढळलेल्या या सापामुळे तेथील काम थांबवण्यात आले होते.
 राष्ट्रीय
भारताची ऐतिहासिक अवकाश भरारी
* भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो)  हवामान उपग्रह स्कॅटसॅट-१ आणि अन्य सात उपग्रहांसह प्रक्षेपण यान पीएसएलव्ही-सी ३५ अवकाशात यशस्वीपणे झेपावले.
* आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी आठ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तयार केलेला "प्रथम‘ हा उपग्रहही या रॉकेटमधून अवकाशात रवाना झाला.
* श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी ९.१२ वाजता "इस्त्रो‘च्या "पीएसएलव्ही-सी ३५‘ या प्रक्षेपकाने अवकाशात उड्डाण केले.
* २ तास १५ मिनिटे अवकाशात राहून सर्व आठ उपग्रहांना दोन वेगळ्या कक्षांमध्ये सोडण्याचे यापूर्वी कधीच न केलेले काम या वेळी पीएसएलव्ही यानाने चोख बजावले.
* सर्वप्रथम यानाने "स्कॅटसॅट-१‘ उपग्रहाला त्याच्या कक्षेत नेऊन सोडले अणि त्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करून उर्वरित सात उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापित केले.
* आठही उपग्रहांचे एकूण वजन सुमारे ६७५ किलोग्रॅम आहे.
* आठ उपग्रहांमध्ये भारताचे तीन, अमेरिका आणि कॅनडाचे प्रत्येकी एक; तर अल्जेरियाच्या ३ उपग्रहांचा समावेश आहे.
* भारताच्या तीनपैकी "स्कॅटसॅट1‘ हा एक भारतीय उपग्रह असणार आहे. या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल.
* या उपग्रहांमुळे सागरी; तसेच हवामानासंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे; तर मुंबई आयआयटीचे "प्रथम‘ या १० किलोच्या आणि बंगळूरच्या पीएसई महाविद्यालयाच्या "पीआयसॅट‘ या उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे.
* अल्जेरियाच्या अल्सेट-१ बी, अल्सेट-२ बी आणि अल्सेट-1एन या तीन उपग्रहांचाही यात समावेश आहे.
* * समुद्र, हवामानाबाबत माहिती..
* भारताचा स्कॅटसॅट उपग्रह हवामान आणि समुद्रात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवेल. तसेच त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देईल. या उपग्रहाद्वारे हवामानाचा अंदाज आणि चक्री वादळांची माहिती मिळणार आहे.
* मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "प्रथम‘ या उपग्रहामुळे विद्युत परमाणू मोजता येणार असून त्यामुळे जीपीएस प्रणाली आणखी सक्षम होईल. अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.
* बंगळूरच्या पीईएस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेला "पीआयसॅट‘ हा ५.२५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह पृथ्वीची छायाचित्रे घेणार असून, तो रिमोट सेंसिंगसाठी तयार करण्यात आला आहे.
* * आठ उपग्रह अवकाशात
* स्कॅटसॅट-१ या ३७१ किलोच्या उपग्रहाबरोबरच "प्रथम‘ आणि "पीआयसॅट‘ हे शैक्षणिक उपग्रह (दोन्ही भारत), अलसॅट-१ बी, अलसॅट-२ बी आणि अलसॅट-१ एन (सर्व अल्जेरिया) आणि पाथफाइंडर-१ व एनएलएस-१९ हे अनुक्रमे अमेरिका आणि कॅनडाचे उपग्रह अवकाशात सोडले गेले.
महाराष्ट्र
स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातीत बीग बी आणि सचिन
* स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर दिसणार असून केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज या जाहिरातींचे व्हिडीओ रिलीज केले आहेत.
* स्वच्छ भारत अभियानाचे अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर सदिच्छा दूत असतील. त्यांच्यापूर्वी अभिनेत्री विद्या बालन स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत होती.
* स्वच्छ भारत अभियानाचे व्हिडीओ हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमधून दिसतील.
* दोघेही मान्यवर स्वच्छ भारत अभियानासाठी समर्पित भावनेने काम करण्यास इच्छुक आहेत. तसेच या दोघांनीही स्वच्छ भारत अभियानासाठी गरज असेल तेव्हा वेळ देण्याची तयारी दर्शविली असल्याचे केंद्रीय स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
* २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झालेल्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे ८५ हजार गावांमध्ये शौचालय बांधून पूर्ण झाली असून २०१९ पर्यंत भारतातील सर्व गावे निर्मल करणार असल्याचेही तोमर म्हणाले.
महाबॅंकेचे अध्यक्ष मुहनोत यांना हटविले!
* महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची केंद्र शासनाने कुठलेही कारण न देता तातडीने हकालपट्टी केली आहे़.
त्यांच्या निवृत्तीला चार दिवस बाकी असताना ही कारवाई झाली आहे़.
* त्यांच्या जागी रवींद्र मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ ते बँक आॅफ इंडियाचे कार्यकारी संचालक आहेत.
* मुहनोत यांची नोव्हेंबर २०१३ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती़ अध्यक्ष असताना त्यांनी पुण्यातील बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च केला होता़.
* बँकेच्या अधिकारातील मुंबईतीलही एक निवासस्थान ताब्यात ठेवले होते़ अर्थमंत्रालयाने त्यांना नुकतीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती़
दहावी-बारावी विद्यार्थ्यांना आधारकार्ड अनिवार्य
* आगामी दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांंना आधारकार्ड क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) तर्फे या निर्णयाबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण मंडळांना सुचित करण्यात आले आहे.
* यंदा या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अनिवार्य ठरली आहे. याविषयी विभागीय शिक्षण मंडळांनी फे ब्रुवारी-मार्च २०१७ च्या परीक्षेचे अर्ज भरतांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांकाचा त्यात उल्लेख करण्याबाबत मुख्याध्यापक व संबंधित प्राचार्यांना कळविण्याचे निर्देश दिले आहेत.
* मात्र, ही बाब कितपत अंमलात येईल, याविषयी साशंकता आहे. कारण, राज्यभरातील अशा विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही.
* बऱ्याच आधारकार्डधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या आधारकार्डातील जन्मतारीख, नाव, पत्ता याबाबतच्या त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत.
* त्यासाठी अनेक शाळांचा पाठपुरावा सुरू आहे. याविषयी विचारणा केल्यावर नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर म्हणाले की, आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले असून मुख्याध्यापक त्याबाबत जबाबदार राहतील, पण याविषयी प्रथम सर्व विद्यार्थ्यांचा आढावा घेतला जाईल.
* आधारकार्ड नसलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून पर्याय देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो.
ज्येष्ठ रंगकर्मी रेखा सबनीस यांचे निधन
* मराठी व हिंदी नाटकांत विविध भूमिका रंगवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस (७४) यांचे सोमवारी गिरगावातील इंदिरा निवास येथे कर्करोगाने निधन झाले.
* रेखा सबनीस यांची ‘रथचक्र’ या नाटकातली भूमिका विशेष गाजली होती.
* प्रायोगिक रंगभूमीवरसाठीही त्यांनी योगदान दिले होते. ‘अभिव्यक्ती’ ही स्वत:ची नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली होती.
मुंबई मराठी साहित्य संघाचा नाट्यविभाग त्यांनी बराच काळ चालवला. ‘भूमिका’, ‘द स्क्वेअर सर्कल’, ‘पार्टी’ या चित्रपटांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.
* ९ आॅगस्ट १९४७ रोजी त्यांच्या निवासस्थानी युवक बिरादरीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

* युवक बिरादरीच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
२८.०९.२०१६
अर्थसत्ता
काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानी पुणे
* काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या यादीत पुण्याचा देशात सहावा क्रमांक लागला असून ही माहिती आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्किममध्ये पुढे आली आहे.
* जून २०१६ला आयकर विभागाने काळा पैसा जाहीर करण्यासाठी इन्कम डिक्लेरेशन स्किमची घोषणा केली. ही योजना चार दिवसांनी म्हणजे ३० सप्टेंबरला संपत आहे.
* या योजनेअंर्तगत देशात सर्वाधिक काळा पैसा मुंबईकरांनी जाहीर केला आहे. तर, काळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुणे सहाव्या क्रमांकावर आहे.
* केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे संचालक आर. सी. मिश्रा यांनी ही माहीती दिली.
* जाहीर केलेल्या काळ्या पैशा पैकी ४५ टक्के रक्कम सरकार जमा होणार आहे.
* मात्र, ही ४५ टक्के रक्कम भरण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच, हे पैसे वर्षभर वापरायला मिळणार असल्यामुळे काळ्या पैशापैकी जरी ४५ टक्के रक्कम भरावी लागणार असली तरी, एक वर्षाची मुदत पाहता प्रत्यक्षात ४० टक्केच रक्कम सरकारकडे भरावी लागणार आहे.
बँकेपाठोपाठ रिटेल क्षेत्रात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण सर्वाधिक
* देशातील किरकोळ विक्री क्षेत्र हे बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रानंतरचे सायबर हल्ल्यांद्वारे सर्वाधिक सावज मिळविणारे क्षेत्र ठरले  आहे, असे निरीक्षण येथे सुरू असलेल्या ‘इंडिया रिटेल फोरम २०१६’ नावाच्या परिसंवादामध्ये उपस्थित तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.
* डाऊनलोड केल्या जाणाऱ्या एकूण मोबाइल अ‍ॅपपैकी ९२ टक्के अ‍ॅप हे सायबर हल्ल्यांना सहजरीत्या बळी पडतील, असे असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे.
* खरेदी सुलभरीत्या व्हावी यासाठी अनेकदा ग्राहक संबंधित कंपनीचे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करतात.
* या अ‍ॅपपैकी ९२ टक्के अ‍ॅप हे सायबर हल्ल्यांना सहजरीत्या बळी पडतील अशी आढळून आली आहे.
* परिषदेला या क्षेत्रातील देश – विदेशातील १,३०० सदस्य उपस्थित होते.
* डिजिटल तंत्रज्ञानामुळे किरकोळ विक्री दुकानांचे अस्तित्व कमी झाले असल्याचे यंदाच्या किरकोळ विक्री परिषदेचे अध्यक्ष व ‘वॉलमाट इंडिया’चे मुख्य कार्यकरी अधिकारी क्रिश अय्यर यांनी सांगितले.
* अमेरिकेत २०१४ मध्ये झालेल्या एकूण विक्रीपैकी ४९ टक्के विक्रीवर डिजिटल तंत्राचा दबाव होता.
* यामध्ये वाढ होऊन २०१५ मध्ये एकूण खरेदीच्या ६४ टक्के डिजिटल तंत्राच्या साहाय्याने झाली.
हवाई उड्डाणात १८ टक्क्यांची वाढ
* देशातील नागरी हवाईउड्डाण क्षेत्रात गेल्या वर्षी १८ टक्क्यांची वाढ नोंदली आहे.
* जागतिक स्तरावर भारताने नागरी हवाईउड्डाण क्षेत्रात घेतलेली झेप सर्वोत्तम गणली गेली आहे.
* ‘१२५ कोटी नागरिकांसाठी दर्जात्मक सुधारणा’ संकल्पनेवर आधारित या परिषदेत सिन्हा यांनी म्हटले की, देशातील काही काही विमानतळे जगात सर्वोत्तम आहेत आणि हवाई नागरी महासंचालनालय व इतर नियामक संस्थांच्या माध्यमातून सरकार प्रवासीस्नेही उपाययोजना हाती घेत प्रवाशांच्या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे.
* भारताने २०१६ च्या ऑगस्टमध्येही या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना २४ टक्के प्रवासी वाढ नोंदविली आहे.
* या कालावधीत ८३ लाख प्रवाशांची वाहतूक देशातील हवाई सेवेने केल्याचे नागरी हवाई महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.
* छोटय़ा शहरांना हवाई सेवेद्वारे जोडणाऱ्या क्षेत्राय हवाई जोड योजनेला जानेवारी २०१७ पासून सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी मंगळवारी केली.
क्रीडा
भारतीय महिलांना कबड्डीमध्ये जेतेपद
* व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.
* मात्र पुरुष संघाला पाकिस्तानकडून हरल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, अशी माहिती भारतीय हौशी कबड्डी असोसिएशनने दिली आहे.
* महिलांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने थायलंडला ४१-३१ अशा फरकाने नामोहरम केले.
* पुरुषांच्या सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत रंगत टिकून होती. मात्र पाकिस्तानने दोन गुणांनी बाजी मारली.
सानिया मिर्झा जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर वन
* भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाने महिला डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असून चेक रिपब्लीकच्या बार्बोरा स्ट्राईकोव्हासह तिने टोक्कियोतील पॅन पॅसिफिक ओपन किताब जिंकत ९७३० अंक मिळविले आहेत.
* सानियाची पूर्वीची जोडीदार मार्टिना हिंगिस या क्रमवारीत दोन नंबरवर आहे. तिचे गुण आहेत ९७२५.
* सानिया व स्ट्राईकोव्हा यांची जोडी सिनसिनाटी येथे जमल्यापासून त्यांनी आत्तापर्यंत एकच पराभव पत्करला आहे.
* यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात त्यांनी धडक मारली तर पॅन पॅसिफिक ओपन जिंकली आहे.
* पुरूष डबल्समध्ये भारताचा रोहन बोपण्णा १८ व्या तर लिएंडर पेस ६० व्या स्थानावर आहेत.
भारताचा २५०वा सामना
* कानपूरच्या ग्रीन पार्कवर ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ आता शुक्रवारी कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळण्यासाठी उतरेल. त्या वेळी टीम इंडियाचा मायदेशातील हा २५० वा कसोटी सामना असेल.
* भारताने मायदेशात जास्तीत जास्त सामने स्वातंत्र्यानंतर खेळले आहेत.
* १९४७ पूर्वी भारताने मायदेशात केवळ तीन सामने खेळले होते. त्यात दोन सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
* पहिला सामना १५ डिसेंबर १९३३ रोजी इंग्लंडविरुद्ध मुंबई जिमखाना मैदानावर खेळला गेला होता. त्या लढतीत भारताला ९ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
* मायदेशात भारताने ५० वा कसोटी सामना फेबु्रवारी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध दिल्लीमध्ये खेळला होता. ही लढत अनिर्णीत संपली होती.
* भारताने मायदेशात १०० वा कसोटी सामना नोव्हेंबर १९७९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळला होता. ही लढत अनिर्णीत राहिली होती.
* १५० वा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मार्च १९९३ मध्ये दिल्लीमध्ये खेळला गेला होता. भारताने एक डाव १३ धावांनी विजय मिळवला होता.
* भारताचा मायदेशातील २०० वा कसोटी सामना योगायोगाने कोलकातामध्येच खेळला गेला होता. भारताने या लढतीत १९५ धावांच्या फरकाने मोठा विजय साकारला होता.
* भारताने मायदेशातील सर्वाधिक कसोटी सामने ईडनगार्डन्सवर खेळले आहेत, हे विशेष.
मनोरंजन
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सैराट’ला दोन पुरस्कार
* जर्मनीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अवघ्या महाराष्ट्राला याडं लावणा-या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ला पुरस्कार मिळाला आहे.
* सैराटने जर्मनीतील लुकास चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार पटकावले आहेत.
* ‘ऑडियन्स चॉईस’ अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीचा आणि ‘स्पेशल मेन्शन’ अर्थात ‘विशेष उल्लेखनीय’ अशा दोन पुरस्कारांवर नागराज मंजुळेंच्या सैराटने मोहोर उमटवली आहे.
तंत्र-विज्ञान
यू ट्यूब लाँच करणार डेटा वाचवणारं अॅप
* ऑनलाइन व्हिडीयोसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या यू ट्यूबने यु ट्यूब गो हे अॅप लाँच करण्याची घोषणा केली आहे.
* या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे यू ट्यूबवरचे व्हिडीयो सेव्ह करून ऑफलाइन पाहता येणार आहेत, तसेच ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शनच नाहीये अशांसोबतही हे डाऊनलोड केलेले व्हिडीयो शेअर करता येणार आहेत.
* या नव्या सेवेमध्ये व्हिडीयोचा प्री व्ह्यू बघता येण्याची सोय आहे, तसेच व्हिडीयो किती मोठा आहे, किती एमबी डेटा घेईल हे देखील डाउनलोड करायच्या आधी समजणार आहे.
* दिल्लीमध्ये 'गुगल फॉर इंडिया' या कार्यक्रमात कंपनीने याबाबतची घोषणा केली.
* जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ शेअरींग सर्विससोबत जोडणं हा या अॅप मागील मुख्य उद्देश आहे.
* स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तरी अगदी आरामात ग्राहक ऑफलाइन व्हिडीओ सेव करू शकतात असा कंपनीचा दावा आहे.
* 'मजा घ्या, डेटा वापरू नका' अशी टॅगलाइन या अॅपला देण्यात आली आहे.
* कोणत्या क्वालिटीचा आणि किती साइजचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे हे युजर्स ठरवू शकतो.
* तसेच त्यासाठी किती डेटा वापरला जाणार आहे हे देखील युजरला कळणार आहे. प्ले-स्टोअरमधून हे अॅप डाउनलोड करता येणार आहे.
* येत्या दोन महिन्यात हे अॅप दाखल करण्यात येणार आहे. सध्या हे अॅप ५ भारतीय भाषांना सपोर्ट करतं मात्र येणा-या काही दिवसात १० भाषांना अॅप सपोर्ट करेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
सर्च इंजिन गुगल सज्ञान झाले
* सर्च इंजिन गुगलने २७ सप्टेंबरला आपला १८ वा वाढदिवस साजरा करताना खास अॅनिमेटेड डुडल सादर केले आहे.
* गुगलला १८ वर्ष झाली म्हणजे भारतीय कायद्यानुसार गुगल सज्ञान झाले असे म्हणता येईल. अर्थात गुगलने चार वेगवेगळ्या तारखांना त्यांचा वाढदिवस आत्तापर्यंत साजरा केला आहे व १५ व्या वाढदिवशी त्यांचा वर्धापन दिन नक्की कोणता हे माहित नसल्याची कबुलीही दिली होती.
* आत्तापर्यंत या १८ वर्षांच्या कारकीर्दीत गुगलने ७, ८, २६ य २७ सप्टेंबर अशा चार तारखांना त्यांचा वर्धापनदिन साजरा केला आहे.
* २७ सप्टेंबरला त्यांचा चौथा वर्धापनदिन साजरा केला गेला होता त्यानंतर तो ७ व ८ तारखेला केला गेला.
* २००६ पासून मात्र २७ सप्टेंबरलाच तो साजरा केला जात आहे. गुगल डॉट काॅमचे डोमेन १५ सप्टेंबर १९९५ रोजी रजिस्टर केले गेले होते त्यामुळे हा दिवसही त्यांचा वर्धापनदिन ठरू शकतो.
गुगलचे संस्थापक लॅरी पेज व सर्जी बिन यांनी ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनी रजिस्टर केली होती व याच दिवशी कंपनीचे पहिले बँक अकौंट उघडले गेले.
* ३० ऑगस्ट रोजी कंपनीने पहिले डुडल सादर केले होते.
आंतरराष्ट्रीय
हुवाईच्या भारतगमनामुळे चीनी मिडीयाला चिंता
* चीनची बडी टेलिकॉम कंपनी हुवाईने त्यांचा उत्पादन प्रकल्प भारतात सुरू केल्यामुळे चिनी मिडीयात चिंता व्यक्त केली जात असून चीन सरकारला चीनमधील कंपन्या उत्पादन प्रकल्पांसाठी भारतात प्रस्थान करत असल्याची बाब गंभीर असल्याचा इशारा दिला आहे.
* या ट्रेंडमुळे चीनमधील रोजगारावर विपरित परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
* ग्लोबल टाईम्सने या संदर्भात अनेक चीनी कंपन्या भारताला प्राधान्य देऊन तेथेच कारखाने काढण्यात रस दाखवित असल्याचे चिनी सरकारच्या नजरेस आणून दिले आहे.
* ही बाब बिजिंगसाठी कशी चिंतेची आहे हे नमूद करताना या पेपरने भारताचे जगातील दहा टॉप मॅन्यफॅक्चरिंग देशातील स्थान ९ वरून ६ वर आल्याचेही निदर्शनास आणले आहे.
* भारतातील चिनी कंपन्यांची वाढती गुंतवणूक या दोन देशातील आथिर्क स्पर्धा नव्या वळणावर नेत असल्याचेही म्हटले जात आहे.
* चीनमधील स्मार्टफोन व्हेंडर्सनीही या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
* चीनी टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी आत्तापर्यंत भारतात ८७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे असे आकडेवारी सांगते.
भारत-इस्रायल मैत्री लाभदायी
* भारत आणि इस्रायलमध्ये अनेक बाबतींत समानता आहे.
* दोन्ही देशांपुढील बहुतांश आव्हानेही सारखीच आहेत.
* हे देश एकमेकांचे स्वाभाविक मित्र असून गेल्या पंचवीस वर्षांपासूनच्या मैत्रिपूर्ण संबंधांचा लाभ कृषी, उद्योग, जलव्यवस्थापन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांत उभय राष्ट्रांना झाला आहे, असे प्रतिपादन इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कॅरमन यांनी केले.
* कॅरमन यांच्यासह इस्रालयचे कॉन्सेल जनरल डेव्हिड अकोव्ह आणि राजकीय सचिव अ‍ॅडव्हा विल्चिन्स्कि यांनी परस्पर सहकार्याने भारतात सुरू असलेल्या इस्रायलच्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.
* बागायती शेती उत्पादनांसाठी इस्रायलने राज्यात दापोली (रत्नागिरी), औरंगाबाद, नागपूर आणि राहुरी (अहमदनगर) येथे चार केंद्र स्थापन केली आहेत.
* शेतीसंदर्भातील संशोधन, उत्पादकांना मार्गदर्शन, काही प्रमाणात उत्पादनांची खरेदी अशी कामे या केंद्रावर केली जातात.
* देशभरात अशा प्रकारची १५ केंद्र सध्या सुरू असून येत्या काळात त्यात आणखी २५ केंद्राची भर घालण्यात येणार असल्याचेही माहिती या वेळी कॅरमन यांनी दिली.
* तसेच भारत-इस्रायल सहकार्याने देशभर सुरू असणाऱ्या कृषीविषयक उपक्रमांचे जगभरात कौतुक होत आहे.
‘क्षेपणास्त्र साठय़ामुळे जगात चीनचे स्थान टिकून’
* आमच्याकडे असलेल्या क्षेपणास्त्र साठय़ामुळे चीनचे स्थान जगाला नाकारता येणार नाही, शिवाय क्षेपणास्त्रांमुळेच आम्ही युद्धाच्या धमक्यांना घाबरत नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी म्हटले आहे.
* पीपल्स लिबरेशन आर्मीच्या संचलनाचे निरीक्षण करताना त्यांनी सैन्यदलांमुळेच चीनचा जगात दबदबा कायम असल्याचे म्हटले आहे.
* ‘पीएलए रॉकेट फोर्स’ची स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली असून तो लष्कराच्या सुधारणांचा एक भाग आहे. चीनचे सैन्य २२८५००० आहे.
* जगातील सर्वात मोठे खडे सैन्य त्या देशाकडे आहे. बदलत्या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने असताना ‘रॉकेट फोर्स’ची भूमिका प्रमुख आहे. त्यामुळे चीनच्या सुरक्षेस मदत झाली आहे असे जीनपिंग यांनी सांगितले.
* ‘रॉकेट फोर्स’ने त्यांची सामरिक क्षमता आणखी वाढवावी व देशाच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. चीनने सुरक्षा चिंता वाटत असल्याने लढाऊ विमानांचा ताफा जपानजवळील ओकिनावा किनाऱ्यावर पाठवला आहे.
* अमेरिकेने व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई व तैवान या देशांना चीन विरोधात पाठिंबा दिला आहे.
*  ‘टर्मिनल हाय अल्टिटय़ूड डिफेन्स’ ही क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली उभारण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावास चीनने विरोध केला आहे.
* ही प्रणाली दक्षिण कोरियात बसवली जाणार आहे पण त्याचा उद्देश उत्तर कोरियापासून संरक्षणाचा आहे.
* आंतरराष्ट्रीय लवादाने काही बेटांवरील चीनचा दावा फेटाळल्याने दक्षिण चीन सागरातील कारवायांत त्या देशाला फटका बसला आहे.
राष्ट्रीय
पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जा भारत काढून घेणार ?
* पाकिस्तानला दहशतवादी कारवायांपासून रोखण्यासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर भारत अजून एक पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
* पाकिस्तानला देण्यात आलेल्या  'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जावर पुनर्विचार करण्यात येणार आहे.
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २९ सप्टेंबरला बैठक बोलावली आहे.
* सिंधू नदीच्या पाण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बैठक बोलावली होती.
* १९६०मध्ये झालेला सिंधू नदी पाणीवाटप करार रद्द करणे शक्य नसले तरी भारताने स्वत:च्या वाट्याचे पाणी पूर्णपणे वापरून पाकिस्तानची कोंडी करावी, असा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले.
भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार
* उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली तीव्र भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकला.
* ‘इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत,’ असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज स्पष्ट करण्यात आले.
* भारताच्या या भूमिकेनंतर बांगलादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला.
* अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.
* * व्यापाराच्या आघाडीवर...
* ६४१ अब्ज डॉलर भारताचा वार्षिक व्यापार
* २.६७ अब्ज डॉलर पाकबरोबरचा व्यापार
* २.१७ अब्ज डॉलर भारताची पाकला निर्यात
* ५० कोटी डॉलर पाकमधून होणारी आयात
महाराष्ट्र
अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या सायकल प्रवासाची गिनिज बुकमध्ये नोंद
* तब्बल ७४२४ किलोमीटरचा प्रवास सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सायकलवरून केल्याची नोंद गिनिज बुकमध्ये नुकतीच करण्यात आली.
* ‘द सन पेडल राईड’ या प्रकल्पाअंतर्गत मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) माजी विद्यार्थी सुशील रेड्डीने सौरऊर्जेवर चालणाऱ्या सायकलवरून हा पराक्रम केला आहे.
* ८ मे ते २५ जुल या ७९ दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेश या नऊ राज्यांमधून सौर ऊर्जेबाबत जागृती करत त्याने हा प्रवास केला.
* या प्रकल्पासाठी सुशीलने तामिळनाडूतील हुलीक्कल इंडिया या ई-बाइक कंपनीकडून खास सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार करून घेतली होती.
* २१ गिअरच्या या सायकलला दोनचाकी ट्रेलर जोडण्यात आलेला आहे.
* त्याला १५ हजार रुपये किमतीचे, तीन किलो वजनाचे आणि २५ वष्रे वॉरंटी असलेले २४० वॉटचे सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत.
* दिवसाला १.२ युनिट याप्रमाणे साठ दिवसांच्या सायकल प्रवासातून ७८ युनिट वीजही यातून तयार करून ती सायकल चालवण्यासाठी वापरण्यात आली.
* सुशिलच्या आधी प्रसाद नानासाहेब इरांडे यांनी देशात साध्या सायकलवरून १४ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याची नोंद गिनिज बुकात आहे.
* कुठल्याही ऊर्जेवर चालणा-या सायकलवर इतक्या लांबचा प्रवास करणारा सुशिल रेड्डी हा पहिला भारतीय ठरला आहे.
महाड दुर्घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती शहा यांची नियुक्ती
* मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. के. शहा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
* येत्या काही दिवसांतच ही चौकशी सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
* * समितीची कार्यकक्षा
* १९२८ साली बांधण्यात आलेला हा जुना पूल वाहून जाण्यास कारणीभूत झालेली परिस्थिती, ही घटना नैसर्गिक आपत्तीमुळे की मानवी चुकीमुळे घडली याची पडताळणी, दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकाचे अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे
* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने आज सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून, त्याचे अध्यक्षपद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
* शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई हे या ट्रस्टचे सदस्य सचिव असतील.
* भाजपाच्या खासदार पूनम महाजन, उद्धव यांचे पुत्र आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आर्किटेक्ट शशी प्रभू हे सदस्य असतील.
* याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे (२) सचिव, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि पालिकेचे आयुक्त हे या ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य असतील.
* ट्रस्टची रीतसर स्थापना झाल्यानंतर त्याच्या सर्वसाधारण सदस्यांमधून एक आणि आजीव सदस्यांमधून एक असे दोन सदस्य निवडण्यात येतील. तूर्तास या दोन्ही जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
* महापौर बंगल्याच्या जागेवर हे स्मारक उभारण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.
* मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही जागा निश्चित केली होती.
मनोधैर्य योजनेसाठी निधी
* राज्यातील अकराशे प्रलंबित प्रकरणांसाठी २७ कोटी ६६ लाखांचा निधी तातडीने आकस्मिकता निधीतून उपलब्ध केला आहे.
* बलात्कार, लैंगिक अत्याचारपीडित महिला तसेच बालकांना आधार देण्यासाठी सरकारने २०१३ मध्ये ही योजना लागू केली.
* पहिल्याच वर्षात तोकडी तरतूद केल्याने सरकारवर टीकेची झोड उठली होती.
* बलात्कार झालेल्या महिलेला, अत्याचारपीडित १८ वर्षांखालील मुलांना यानुसार दोन लाख रुपये दिले जातात. अपवादात्मक परिस्थितीत ही रक्‍कम तीन लाखांपर्यंत आहे.
* ऍसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख, तर जखमी झाल्यास ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
* यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली "जिल्हा क्षती साहाय्य व पुनर्वसन मंडळ‘ कार्यरत आहे.
* संबंधित अत्याचाराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याची माहिती समितीकडे येते. अर्थात अशा गुन्ह्यांची स्वत: दखल घेण्याचेही शासनाने बजावलेले आहे.
* अशी घटना घडल्यानंतर या मंडळाची तातडीने बैठक घेऊन अत्याचारपीडितांना तातडीने दिलासा देण्याचा उद्देश त्यामागे आहे.
* * तीन वर्षांची "एफडी‘
* अत्याचारपीडितांना हा निधी देताना २५ टक्‍के रोख स्वरूपात दिला जातो. ७५ टक्‍के रक्‍कम संबंधिताच्या नावे बॅंकेत तीन वर्षांची मुदतठेव स्वरूपात ठेवली जाते.
* ऍसिड हल्ल्यातील फिर्यादींना ७५ टक्‍के रोख स्वरूपात, तर २५ टक्‍के रक्‍कम तीन वर्षांच्या ठेवरूपात दिली जाते.
४ वर्षात पूर्ण होणार मेट्रो २ आणि मेट्रो ४ !
* मुंबई कारण मेट्रो दोनच्या उर्वरित टप्प्याला मंजुरी मिळाली असून राज्य सरकारने मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ या मार्गाला मंजुरी दिली आहे.
* मेट्रो २ च्या डीएन नगर-वांद्रे-मानखुर्द या २४ किमीच्या मार्गाला मंजुरी मिळाली.
* वडाळा- घाटकोपर -ठाणे- कासारवडवली असा मेट्रो ४चा ३३किमीचा मार्ग असेल.
* मेट्रो मार्ग-२ ब मध्ये डीएन नगर ते मंडाळे या २४ कि.मी.च्या मार्गावर २२ स्थानके असणार आहेत.
* १० हजार ९७०कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित असून एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीत हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे.
* वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या ३३ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्ग-४ वर ३२ स्थानके असणार आहेत.
* १४ हजार ५४९ कोटींचा निधी हा मार्ग पूर्ण करण्यासाठी लागणार आहे.

हा प्रकल्प एप्रिल २०१७ ते जुलै २०२१ या ५२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.
२९.०९.२०१६
अर्थसत्ता
डिसेंबरपासून काढा ‘पीएफ’चे ऑनलाईन पैसे
* सातत्याने नोकरी बदलण्याच्या युगात नोकरी सोडल्यानंतर अनेकांना आपला ‘पीएफ’ काढणे अडचणीचे वाटत असते.
* आता मात्र तुम्ही आरामात घरबसल्या तुमचे पीएफचे पैसे काढू शकणार आहात.
* डिसेंबर महिन्यापासून खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकणार आहेत.
* सध्या ईपीएफओ त्यासाठी डेटा इंटिग्रेशनवर काम करीत आहे. यासाठी संगणक प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी त्यांचे पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकतील.
* सध्या वैश्विक खाते क्रमांक असलेल्या ३.६ कोटी वापरकर्त्यांना याचा लाभ होऊ शकणार आहे.
अंबानी बंधूंची हातमिळवणी !
* मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओशी अनिल धीरूभाई अंबानी समुहाच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने हात मिळवणी केली असल्याची घोषणा अनिल अंबानी यांनी केली आहे.
* सर्व प्रात्यक्षिक कारणांसाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स जिओनी करार केले असून आम्ही ‘वर्च्युयल मर्जर’ केले असल्याची घोषणा अनिल अंबानींनी वार्षिक आढावा बैठकीत केली.
* दोन्ही भाऊ धीरूभाई अंबानींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार असल्याचे अंबानी म्हणाले.
* २ जी, ३ जी, ४ जी सेवा देण्यासाठी आमच्याकडे आवश्यक ते स्पेक्ट्रम्स आहेत, आमचे टॉवर्स एक असणार आहेत, आमचा आवाज एक असणार आहे सर्व काही गोष्टी या प्रकल्पामध्ये एकच असणार असल्याचे अंबानी म्हणाले.
वस्त्र निर्यातीत ३० अब्ज डॉलरचे लक्ष्य
* वस्त्र आणि तयार कपडय़ांच्या क्षेत्रात भारत आणि चीन दरम्यान सामंजस्य करारावर, वस्त्रनिर्मात्यांची संघटना सीएमएआय तसेच इंटरनॅशल अ‍ॅपरल फेडरेशनचे अध्यक्ष राहुल मेहता आणि चायना चेंबर ऑफ कॉमर्स (सीसीसीटी)चे जियांग हुई यांच्याकडून उभयपक्षी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
* आंतरराष्ट्रीय तयार वस्त्र निर्मात्या महासंघाकडून आशियात पहिल्यांदाच म्हणजे मुंबईत आयोजित दोन दिवसांच्या परिसंवादाची हा सामंजस्य करार एक मोठी फलश्रुती ठरली आहे.
* चीनने जास्त मनुष्यबळावर आधारित उद्योगांवरील मदार कमी केली असून, यात वस्त्रोद्योग आणि तयार वस्त्रनिर्मिती क्षेत्राचा समावेश आहे.
* चीनच्या जाण्याने या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी ही भारतीय वस्त्रोद्योगासाठी मोठी सुसंधी आहे, असे या प्रसंगी बोलताना राहुल मेहता म्हणाले. हा करार त्या दिशेने पडलेले मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
* या प्रसंगी मफतलाल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी अनिरुद्ध देशमुख हेही उपस्थित होते.
* महानगरांव्यतिरिक्त दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या वस्त्र विक्रेत्यांना (रिटेलर्स) मोठय़ा संधी खुणावत असून, फ्रँचाइजी तत्त्वावर या क्षेत्रातच आगामी विस्ताराच्या संधी अजमावून पाहिल्या जातील, असे सांगितले.
* तयार वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (एईपीसी)चे अध्यक्ष अशोक राजानी यांनी पुढील तीन वर्षांमध्ये देशातील तयार वस्त्रांची निर्यात उलाढाल ३० अब्ज अमेरिकी डॉलरचे लक्ष्य गाठेल, असा कयास व्यक्त केला.
* या लक्ष्याचा पाठलाग करताना, उद्योगांकडून ११ अब्ज डॉलरची गुंतवणूकही होईल, असा अंदाज त्यांनी वर्तविला.
क्रीडा
जलतरण स्पर्धेत मार्मडे यांना ४ सुवर्ण, २ रौप्य पदक
* तेलंगाणा मास्टर्स स्विमींग असोसिएशनतर्फे हैद्राबाद येथे आयोजित केलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय मास्टर्स अँक्वॅटिक चॅम्पियनशिप २०१६ हय़ा जलतरण स् पर्धांंमध्ये स्थानिक राजे छत्रपती कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.डॉ.कामीनी मार्मडे यांनी नेत्रदिपक कामगिरी करत ४ सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केली आहेत.
* मार्मडे त्यांना ५० मिटर फ्रि स्टाईल, १०० मिटर फ्रि स्टाईल, ४० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक, आणि ५० मिटर बटर फ्लाय मध्ये ४ सुवर्ण पदके तर ४ बाय ५० मिटर फ्री स्टाईल करणे व ४ बाय ५० मिटर मिडले रिलेमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक मिळाले आहे. त्या अविरत परिङ्म्रमातून व सातत्यामधून त्यांना ही कामगिरी करता आली.
कसोटी क्रमवारीत अश्निनची दुसऱ्या स्थानी झेप
* टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात विश्व विक्रम केला.
* अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय गोलंदाजांमध्ये अश्विन जलद २०० विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम करायला अश्विनला ३७ कसोटी सामने खेळावे लागले.
* ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेटने ३६ कसोटीमध्ये २०० विकेटचा पल्ला गाठला होता.
* हाच रेकॉर्ड करायला डेनिस लिली आणि वकार युनुसला ३८ कसोटी तर डेल स्टेनला ३९ कसोटी सामने खेळावे लागले होते.
* त्याचबरोबर आता आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये अश्विनने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
* अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये १० विकेट घेतले होते. यामुळेच अश्विनने ८७१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
* इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला एक अंकाने मागे टाकत त्याने दुसरा क्रमांक मिळवला.
* अश्विन हा पहिल्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिेकेच्या डेल स्टेनपासून फक्त ७ गुणांनी मागे आहे.
* याशिवाय अश्विन टेस्ट ऑलराउंडर रँकिंगमध्ये ४५० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
तंत्र-विज्ञान
तीन डीएनएच्या संयोगातून जन्मले जगातले पहिले बाळ
* जगातले पहिले बाळ तीन व्यक्तींच्या डीएनए संयोगातून जन्मास घालण्यास अमेरिकी डॉक्टरांना यश मिळाले आहे.
* या बाळात दोन महिला व १ पुरूष यांच्यातील डिएनए आहेत.
* पाच महिन्यांचा हा मुलगा आई वडील तसेच दानकर्त्याचा अनुवंशिक डीएनए घेऊन जन्मास आला आहे.
* या बाळाला जन्म देणारी महिला जॉर्डनची असून हा प्रयोग मेक्सिकोत केला गेला कारण अशा प्रयोगांना अमेरिकेत बंदी आहे.
* मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या डीएनएत मायटोकाँड्रीया हा दोष होता.
* या महिलेचे पूर्वी पाच गर्भपात झाले आहेत व दोन मुले जन्मताच मरण पावली आहेत.
* डीएनएतील या दोषामुळे जन्मणार्‍या बालकाच्या मेंदूत दोष येतो व त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
* आज जगातील ४० हजार बालकांमागे १ असे या दोषाचे प्रमाण आहे.
* डॉक्टरांनी केलेल्या प्रयोगात या महिलेच्या मायटोकाँड्रीया पेशी तून केंद्र वेगळे केले गेले व दाता महिलेच्या मायटोकाँड्रीया पेशीतून वेगळे केलेले केंद्र यात ट्रान्सप्लाँट केले गेले.
* त्यामुळे आई वडील व दाता महिला असे तीन डीएनएतून या मुलाचा जन्म झाला असून तो आनुवंशिक दोषापासून मुक्त झाला आहे.
* या प्रयोगामुळे अनुवंशिक दोष घेऊन जन्मास येणार्‍या मुलांसाठी क्रांती घडेल व दुर्लभ दोषांपासून मुक्ती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गुरूच्या युरोपा या चंद्रावर पाण्याच्या वाफा
* गुरूच्या युरोपा या चंद्रावर पाण्याच्या वाफा असल्याचे दिसून आले असून नासाच्या हबल अवकाश दुर्बीणीच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले आहे.
* या चंद्रावर सूक्ष्मजीवसृष्टी असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
* अॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून युरोपाच्या संशोधनासाठी जर यान पाठवले तर तेथील काही मैलांच्या प्रदेशातील बर्फाचे उत्खनन न करताही महासागराचे निरीक्षण करता येईल.
* नासाचे सहायक प्रशासक जॉफ योडर यांनी सांगितले की, युरोपा चंद्रावरील सागर हा जीवसृष्टीस पोषक असू शकतो. तेथील पाण्याच्या वाफांमुळे त्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
* गुरूच्या ६७ चंद्रांपैकी युरोपा हा सर्वात मोठा चंद्र असून २०१३ च्या अखेरीस तेथे पाण्याच्या वाफा हबल दुर्बीणीला दिसून आल्या होत्या.
* वैज्ञानिक जगतात हा उत्कंठावर्धक शोध मानला जात आहे. पाण्याच्या वाफा २०० कि.मी. उंचीवर जातात. त्यामुळे तेथे पाऊसही पडतो.
* स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिटय़ूटचे विल्यम स्पार्कस यांनी सांगितले की, पाण्याच्या वाफांचे प्रवाह बोटांच्या आकाराचे पण मोठे दिसतात.
* युरोपावर वातावरण आहे का हे शोधण्याचा या मोहिमेचा हेतू होता. युरोपा चंद्राभोवती पातळ वातावरण असून त्यात गुरूचा प्रकाश रोखण्याची क्षमता आहे.
* त्यामुळे सावलीसारखे दृश्य दिसते. युरोपा गुरूसमोरून तीन वेळा तरी जातो.
* पंधरा महिने तो गुरूसमोरून जात असताना निरीक्षण केले असता त्यात पाण्याच्या वाफा दिसल्या. जर हा निष्कर्ष खरा ठरला तर पाण्याच्या वाफा असलेला तो सौरमालेतील दुसरा चंद्र असणार आहे.
* दरम्यान नासा युरोपा चंद्रावर संशोधनासाठी यान पाठवणार असून त्यात पाण्याच्या वाफांच्या शक्यतेचा उलगडा होईल.
आंतरराष्ट्रीय
पाकिस्तानला जबर धक्का, इस्लामाबादमध्ये होणारं सार्क संमेलन रद्द?
* पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणारं १९ वं 'सार्क' संमेलन रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
* नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीत होणा-या सार्क संमेलनावर भारताने बहिष्कार टाकला असून शेजारील देश बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान यांनी देखील संमेलनात भाग घेणार नसल्याचं वृत्त समोर येत आहे.
* दहशतवादाच्या मुद्द्यावरून या तीन देशांनी इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क संमेलनाला विरोध केला आहे.
* त्यामुळे पाकिस्तानच्या जागी दुस-या ठिकाणाची निवड करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
* पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी बनविण्यात आलेल्या रणनितीचा हा एक मोठा हिस्सा असू शकतो.
* दक्ष‍ि‍ण आशि‍यातील ८ देशांच्या या संमेलनात आता पाकिस्तानसोबत केवळ नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव हेच देश आहेत.
इस्रायलचे माजी अध्यक्ष शिमॉन पेरेझ यांचे निधन
* इस्त्रायलचे माजी अध्यक्ष व पॅलेस्टाइनसोबतच्या संघर्षांला पूर्णविराम देण्यासाठी अथक प्रयत्न केल्याने शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले शिमॉन पेरेझ यांचे बुधवारी निधन झाले.
* शिमॉन यांचे पूत्र शेमी यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. शिमॉन यांचे निधन झाले असून, त्यांचे विचार इस्त्रायलसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील, असे शेमी म्हणाले.
* इस्त्रायलचे दोनदा पंतप्रधान बनलेल्या आणि अध्यक्षपद भूषविलेल्या शिमॉन पेरेझ यांनी पॅलेस्टाइनसोबतचा संघर्ष मिटविण्यासाठी अथक प्रयत्न केले.
* ओस्लो करारासाठी शिमॉन यांच्याबरोबरच तत्कालीन पंतप्रधान यित्झक राबीन आणि पॅलेस्टाइनचे यासर अराफत यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
* जवळपास सात दशकांच्या राजकीय कारकिर्दीत शिमॉन यांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला.
स्पर्धात्मक निर्देशांकात पाकिस्तान पिछाडीवर
* दहशतवादी कारवायांमुळे जागतिक पातळीवर खलनायक ठरलेल्या पाकिस्तानला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत आहे.
* वैश्‍विक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारतास ३९ वे स्थान मिळाले असून पाकिस्तान १२२ व्या स्थानावर फेकला गेला आहे.
* "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम‘ने जगभरातील १२२ देशांचा अभ्यास करून हा निर्देशांक तयार केला.
* या निर्देशांकामध्ये श्रीलंका ७१n व्या स्थानी, भूतान ९७, नेपाळ ९८ आणि बांगलादेश १०६ व्या स्थानावर आहे, असे पाकिस्तानमधील आघाडीचे दैनिक "बिझिनेस रिपोर्टर‘ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
* देशातील संघटना, त्यांची ध्येयधोरणे आदी घटकांवर देशाची निर्मितीक्षमता अवलंबून असते.
* या अहवालाच्या निर्मितीसाठी आर्थिक प्रगतीमधील सोळा महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करण्यात आला होता.
* यामध्ये पायाभूत सुविधा, समग्र आर्थिक वातावरण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, वस्तू बाजारपेठ क्षमता, कामगार बाजारपेठ क्षमता, आर्थिक बाजारपेठ विकास आदी घटकांचा समावेश होतो.
हिंदू विवाह कायद्याला पाक संसदेची मंजुरी
* पाकिस्तानाच्या संसदेने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हिंदू विवाह विधेयकाला संमती दिली आहे. यामुळे अल्पसंख्य हिंदू महिलांच्या अधिकारांचे रक्षण होऊ शकणार आहे.
* पाकिस्तानच्या संसदेत मानवाधिकार मंत्री कामरान मायकेल यांनी या विधेयकाचा प्रस्ताव सादर केला होता.
* मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख जोहरा युसूफ यांनी हिंदू विवाह नोंदणी कायद्यामुळे हिंदू महिलांना अनेक सुरक्षा अधिकार प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
* या नव्या कायद्यामुळे हिंदू महिलांना विवाहाचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध होणार आहे कारण विवाहांची नोंदणी येथे केली जाणार आहे. तसेच हिंदू विधवांनाही कायद्यानुसार मिळणार्‍या सुविधा मिळू शकणार आहेत.
* घरात उपेक्षा, नवर्‍याचे परस्त्रीशी संबंध अथवा १८ वर्षांपूर्वी विवाह या संदर्भात हिंदू महिलांना घटस्फोटाचा अधिकारही यामुळे मिळणार आहे.
* भारताप्रमाणेच पहिली बायको जिवंत असताना दुसरे लग्न करणे हा पाकिस्तानातही गुन्हा आहे. सध्या पाकिस्तानात १.६ टक्के हिंदू आहेत. त्यांना विवाहाची नोंदणी १५ दिवसांत करावी लागेल. तसेच विवाह करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असावी लागतील.
* १ वर्ष नवराबायको वेगळे राहात असतील व पुढे एकत्र राहण्याची इच्छा नसेल तर त्यांना घटस्फोट घेता येणार आहे. तसेच विधवा महिलांना पतीच्या निधनानंतर ६ महिन्यांनी इच्छा असल्यास पुनर्विवाह करता येणार आहे.
पॅरिस हवामान करारास मंत्रिमंडळाची मान्यता
* पॅरिस येथील ऐतिहासिक हवामान करारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
* महात्मा गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबर रोजी त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे.
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले, की पॅरिस कराराला आज मान्यता देण्यात आली आहे.
* हा करार अमलात आणणाऱ्या देशात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे भारताला पर्यावरण काळजी व हवामानविषयक काळजी आहे हेच या निर्णयातून सूचित केले आहे.
* आतापर्यंत ६१ देशांनी हा करार मान्य केला आहे.
* भारताने कार्बन उत्सर्जन ५१.८९ टक्के इतके खाली आणण्याचे मान्य केले आहे. तापमानवाढ २ अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्याचा हेतू या करारात आहे.
* * कोरिया-भारत करार
* एकमेकांच्या सागरी शिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या दक्षिण कोरियाबरोबरच्या कराराला मान्यता देण्यात आली.
* १९७८ मधील प्रमाणित सागरी प्रशिक्षण जाहीरनाम्यानुसार हा करार करण्यात आला आहे.
* * नवप्रवर्तनास उत्तेजन
* भारत व सिंगापूर यांच्यात नवप्रवर्तनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या समझोता करारास मान्यता देण्यात आली आहे.
* औद्योगिक मालमत्ता पेटंट, व्यापारचिन्हे या मुद्दय़ांवर द्विपक्षीय सहकार्याचा यात समावेश आहे.
* * हिंदुस्थान केबल्सला पॅकेज
* हिंदुस्थान केबल्स लि. या कंपनीला सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभ व सरकारी कर्जाचे समभागात रूपांतर करण्यासाठी ४७७७.०५ कोटी रुपयांचे साहाय्य मंजूर केले आहे.
* कोलकाता येथील ही कंपनी बंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रीय
केंद्राकडून १२६९ कोटी अर्थसाह्य!
* महाराष्ट्रातील गतवर्षाच्या दुष्काळासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने, बुधवारी १,२६९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
* दुष्काळासाठी केंद्रीय साहाय्य म्हणून अनुदान स्वरूपात मिळणाऱ्या या रकमेत खरीप पिकांसाठी ५८९.४७ कोटींची तर रब्बी पिकांसाठी ६७९.५४ कोटींची तरतूद आहे.
* पिकांच्या नुकसानभरपाईच्या स्वरूपात ही मदत केंद्रातर्फे राज्य सरकारच्या हवाली करण्यात येईल.
वायू प्रदुषणामुळे भारतातील ७५ टक्के मृत्यू : जागतिक आरोग्य संघटना
* भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार वायू प्रदुषणामुळे वर्षभरात ६ लाख २१ हजार १३८लोकांचा मृत्यू होतो.
* भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू वायू प्रदुषणाशी संबंधित असतात.
* बहुतांश लोकांना श्वसनाचे विकार, हृदयरोग, तसेच फुफ्फुसाशी संबंधित आजार झाले आहेत.
* भारतात हृदयरोगामुळे २०१२च्या आकडेवारीनुसार २ लाख ४९ हजार ३८८ जणांचे मृत्यू होतात.
* जगभरात प्रत्येक १० पैकी ९ जण घातक हवेचे श्वसन करत आहेत.
* वायू प्रदुषणामुळे होणारे ९० टक्के मृत्यू हे मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत.
महाराष्ट्र
प्रतापराव पवार यांना महर्षी पुरस्कार जाहीर
* सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा "महर्षी पुरस्कार‘ "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे.
* माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
* श्री लक्ष्मीमातेची चांदीची प्रतिमा, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
* यापूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पं. जसराज, शिल्पकार बी. आर. खेडकर, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अनंत दीक्षित यांना जवाहरलाल दर्डा पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना जाहीर झाला आहे.
* राज्याचे महसूल, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ‘लोकमत’ चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते गुरूवारी (दि. २९) या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
* पन्नास हजार रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

* यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनाही गौरविण्यात येणार आहे.
३०.०९.२०१६
अर्थसत्ता
मुंबापुरी देशातील सर्वात श्रीमंत शहर
* भारताची आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.
* न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार मुंबई हे देशातील सर्वात श्रीमंत तर त्यापाठोपाठ दिल्ली व बंगलोर ही अनुक्रमे दोन व तीन नंबरची श्रीमंत शहरे आहेत.
* अर्थात या अहवालानुसार देशाची एकूण संपत्ती ३७५,२०००,२००० कोटी रूपये इतकी आहे.
* हा अहवाल तयार करताना प्रॉपर्टी, रोकड, शेअर्स, व्यवसायातील कमाई यांचा विचार केला गेला आहे.
* त्यानुसार मुंबईची संपत्ती ५४,९४,०००० कोटी म्हणजे ८२० अब्ज डॉलर्स आहे.
* मुंबईत ४५००० करोडपती तर २८ अब्जाधीश आहेत.
* दिल्लीची संपत्ती ३०,१५,००० कोटी असून येथे २२००० कोट्याधीश व १८ अब्जाधीश आहेत.
* बंगलोरची संपत्ती आहे २१,४४,००० कोटी.येथे ७५०० कोट्याधीश तर ८ अब्जाधीश आहेत.
* एकूण देशाचा विचार केला तर भारतात २६,४०० कोट्याधीश व ९५ अब्जाधीश आहेत.
* आर्थिक विकासात सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, चंदिगढ, जयपूर, बडोदा ही शहरे वेगाने विकास करत आहेत तर हैद्राबाद, पुणे या शहरातही आर्थिक विकास दर चांगला आहे.
* पुण्याची संपत्ती १८० अब्ज म्हणजे १२.०६,००० कोटी असून त्यात ३९०० कोट्याधीश व ५ अब्जाधीश आहेत.
तेल उत्पादन कमी करण्याचा 'ओपेक’चा निर्णय
* कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन ७ लाख ५० हजार बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय ‘ओपेक‘ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने घेतला आहे.
* या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी पाच टक्के वाढ झाली.
* अल्जायर्स येथे सुरू असलेल्या ‘ओपेक‘च्या बैठकीत कोणताही तोडगा निघण्याची आशा आंतरराष्ट्रीय बाजाराला वाटत नव्हती. यातच अनपेक्षितपणे ‘ओपेक"ने तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे भाव वाढले.
* लंडनमध्ये ब्रेंट नॉथ सी क्रूड तेलाचा भाव प्रतिबॅरल २.७२ डॉलरने वाढून ४८.६९ डॉलरवर गेला.
* न्यूयॉर्कच्या वेस्ट टेक्‍सास इंटरमिजिएटचा भाव प्रतिबॅरल २.३८ डॉलरने वाढून ४७.०५ डॉलरवर पोचला.
* ‘ओपेक‘चे सदस्य देश जगभरातील कच्च्या तेलापैकी ४० टक्के उत्पादन करतात. नोव्हेंबरपासून त्यांनी प्रतिदिन ३. २५ कोटी बॅरलपर्यंत उत्पादन कमी करण्यावर सहमती दर्शविली आहे.
धर्मा प्रॉडक्शनसोबत अॅमेझॉनचा अनोखा करार
* करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा कॅटलॉग ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन बनवणार असून त्यानंतर अॅमेझॉन डिजीटल स्ट्रिमिंग सेवेच्या अंतर्गत हे चित्रपट सबस्क्रिप्शनवर उपलब्ध होतील.
* धर्मा प्रॉडक्शनचे ‘ये दिल है मुश्किल’, ‘ओके जानू’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हे आगामी चित्रपट असून यापूर्वी प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट या सेवे अंतर्गत उपलब्ध होतील.
* धर्मा प्रॉडक्शनचे चित्रपट सर्व थरातील प्रेक्षकांच्या पसंतीचे असतात. तरुणाईलाही या चित्रपटांची भुरळ पडलेली असते.
* त्यामुळे या प्रॉडक्शन हाऊससोबत करार झाल्याचे अॅमेझॉन व्हिडिओ इंडियाच्यावतीने सांगण्यात आले.
उच्च न्यायालयाचा आदेश पाळायला व्हॉट्स अॅपचा नकार
* दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्स अॅपला सर्व ग्राहकांची माहिती तसेच त्यांचा डेटा लगेचच काढून टाकण्यात यावा. असा आदेश दिला होता. मात्र, व्हॉट्स अॅपने उच्च न्यायालयाचा आदेश मानायला नकार दिला आहे.
* उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आमच्या पॉलिसीमध्ये कोणताच फरक पडणार नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे युजर्सची माहिती फेसबुकसोबत शेअर करणारच असं व्हॉट्स अॅपचे प्रवक्ते ऐन येह यांनी 'मेशेबल इंडिया'शी बोलताना सांगितलं .
* काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आणि युजर्सची माहिती  फेसबुकसोबत शेअर करायला सुरूवात केली आहे.
क्रीडा
विश्वनाथन आनंद व गिरी यांचे दिमाखदार विजय
* मॉस्को, रशिया येथे खेळवल्या जाणाऱ्या ‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने शख्रीयर मामेद्यारोव वर विजय मिळवला.
* या स्पर्धेत आनंदचा हा पहिलाच विजय असून, पहिल्या डावात त्याला अनीष गिरी विरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
* तसेच नेदरलँड्सच्या अनीष गिरी ने काळ्या मोहऱ्यांनी खेळतांना गेल्फंड वर आक्रमक विजय मिळवला.
* अनुक्रमे क्रॅमनिक आणि ली चाओ, टोमाशेवस्की आणि अरोनियन, स्विडलर आणि नेपोम्नियाची यांच्यातील लढती बरोबरीत सुटल्या.
भारताच्या अंडर १८ हॉकी टीमने आशिया चषकात पाकला लोळवले
* भारतीय हॉकी संघाने बांगलादेशात सुरु असलेल्या अंडर १८ आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली असून भारताने या सामन्यात पाकिस्तानला ३-१ असे नमवले. या विजयामुळे भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
* भारत आणि पाकिस्तानचे वरिष्ठ हॉकी संघ पुढील महिन्यात मलेशिया येथे आयोजित कऱण्यात आलेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत एकमेकांशी भिडणार आहेत.
* उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतात वातावरण चांगलेच तापले आहे.
* या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला नमवण्याचा निश्चय भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केला होता.
आंतरराष्ट्रीय
भारत-पाकिस्तान अणवस्त्र युद्धाची किंमत जगाला चुकवावी लागेल
* भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल.
* भारताने गुरुवारी पाकव्याप्त काश्मिरमधील लष्करी तळांवर हल्ले करुन  उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
* त्यानंतर पुन्हा एकदा अणवस्त्र युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काय परिणाम होतील याचा घेतलेला आढावा.
* भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांपैकी निम्म्या १०० अणवस्त्रांचा जरी परस्परांविरुद्ध वापर केला तर एकाचवेळी दोन्ही देशांतील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल.
* अणवस्त्र वापरल्यामुळे पृथ्वीचे रक्षण करणारा निम्मा ओझोनचा थर नष्ट होईल.
* दोन्ही देशांकडे असलेला प्रत्येक अणूबॉम्ब जवळपास १५ किलो टन वजनाचा आहे. अमेरिकेने हिरोशिमावर १५ किलो टन वजनाचा अणूबॉम्ब टाकला होता. दोन्ही देशातील अणवस्त्र युद्धामुळे मान्सूनच्या पावसामध्ये बदल होऊन जगभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम होईल.
* अणवस्त्र हल्ल्यानंतर पहिल्या आठवडयातच भाजल्यामुळे, किरणोत्सारामुळे दोन्ही देशातील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल.
* मागच्या नऊ वर्षात दहशतवादी हल्ल्यात जितके भारतीय नागरीक आणि सुरक्षा जवान मारले गेले त्यापेक्षा २२२१ पट नागरीक एकाचवेळी मारले जातील.
* उपखंडात झालेल्या अणवस्त्र वापरानंतर वातावरणातील बदलांमुळे जगभरातील दोन अब्ज लोकांना उपासमार आणि अन्य परिणाम भोगावे लागतील.
* पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला ११० ते १३० च्या आसपास अणवस्त्रे आहेत. भारताकडे असलेल्या अणवस्त्रांची संख्याही ११० ते १२० च्या घरात आहे.
* भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाल्यास त्याचे काय परिणाम होतील यासंबंधी २००७ साली अमेरिकेतील तीन विद्यापीठांनी संशोधन करुन हे निष्कर्ष नोंदवले आहेत.
अमेरिकेने भारताकडे व्यक्त केली भूमिका
* पाकिस्तानने दहशतवादाशी लढावे तसेच संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यांसारख्या संघटनांना बेकायदेशीर ठरवावे, अशी भूमिका अमेरिकेने भारताकडे व्यक्त केली आहे.
* १८ सप्टेंबर रोजी पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या उरी येथील ब्रिगेड मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राईस यांनी काल भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी बातचीत केली. त्या वेळी राईस यांनी ही भूमिका मांडली.
* अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ता नेड प्राईस यांनी ही माहिती दिली.
* प्राईस यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाशी लढण्यासाठी तसेच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यांच्यासह संयुक्त राष्ट्रांनी अतिरेकी घोषित केलेल्या संघटनांची वैधता संपविण्यासाठी पाकिस्तानने प्रभावी कृती करावी, या अमेरिकेच्या भूमिकेचा राईस यांनी पुनरुच्चार केला आहे.
* राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनातर्फे सुझान राईस यांनी नमूद केले की, जगातील सर्वच ठिकाणच्या अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत असून, विभागीय शांतता आणि स्थैर्याचा पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
* याबाबत राईस यांनी भारताशी चर्चा केली. दहशतवादाच्या मुद्द्यावर सहकार्य वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.
डोनाल्ड ट्रम्पकडे ३.७ अब्ज डॉलर संपत्ती
* फोर्ब्ज मासिकेने रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उमेदवार आणि रिअल इस्टेटचे वजनदार व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती ३.७ अब्ज डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला असून १.१३ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त कर्ज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असल्याची माहिती फोर्ब्ज मासिकेने दिली.
* या मासिकातील वृत्तानुसार कराचा परतावा सार्वजनिक करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला.
* यामागे अंतर्गत महसूल सेवा त्यांच्या उत्पन्नाचे ऑडिट करत असल्याचे कारण त्यांनी दिले.
* ट्रम्प यांच्या संपत्तीत मागील काही वर्षापासून ८०० दक्षलक्ष डॉलरने घट झाल्याचा माहिती एका स्पॅनिश वृत्तसंस्थेने दिली आहे.
राष्ट्रीय
भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?
* उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
* दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून,एकमेकांना हवाई हद्दींचा वापर करण्याची परवानगीही दिली आहे. हे यापुढे सुरू ठेवायचा की नाही याचा विचार मोदी सरकार करीत आहे.
* पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला उभय देशांमधील द्विपक्षीय उड्डयण करार आणि आमच्या हवाई हद्दीतून उडणाऱ्या पाकिस्तानी विमानसेवांबद्दल सविस्तर माहिती मागितली असून यासंदर्भातील अंतिम निर्णय पीएमओ स्तरावरच घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
* भारतीय विमान कंपनी पाकिस्तानात उड्डाणसेवा देत नाही. परंतु पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तानातील विमानसेवांना एकमेकांच्या देशात आठवड्यात २८ वेळा सेवा संचलनाची परवानगी मिळाली आहे.
* भारताने २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत हवाई संपर्क तोडला होता.
* त्यावेळी तत्कालीन इंडियन एअरलाईन्सने पाकिस्तानला जाणारी विमाने बंद केली होती.
* सरकारने पाकिस्तानी एअरलाईन्सलाही भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्यास मज्जाव केला होता. याच्या प्रत्युत्तरात पाकनेही भारतीय विमान कंपन्यांवर निर्बंध घातले होते.
भारताकडून २५ देशांना कारवाईची माहिती
* भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आज केलेल्या लष्करी कारवाईची माहिती सरकारने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्ससह महत्त्वाच्या २५ देशांच्या राजदूतांना दिली.
* कोणत्या परिस्थितीत ही कारवाई करण्यात आली, याबाबत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी "साउथ ब्लॉक‘मध्ये राजदूतांना ही माहिती दिली.
* या वेळी जयशंकर म्हणाले, ‘लष्कराची आजची कारवाई म्हणजे दहशतवाद विरोधी कारवाईचे उत्तम उदाहरण आहे.
* जम्मू - काश्‍मीरसह, भारतीय शहरांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली.
* आणखी कारवाई करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. मात्र लष्कर दहशतवाद्यांना आणखी हल्ले करू देणार नाही.‘‘
बंगळुरुत धावणार सरकारच्या बाईक-टॅक्सी
* वाहतुककोंडीवर उपाय म्हणून कर्नाटक सरकारकडून शहरात बाईक-टॅक्सी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
* सुरुवातीला ही सुविधा रास्त दरात उपलब्ध असल्याने एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.
* एक मोबाईल अॅपदेखील या बाईक-टॅक्सीसाठी सुरू केले जाणार आहे. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बाईक-टॅक्सीचे बुकींग करता येईल.
* सुरुवातीच्या २ किमीपर्यंत ६ रुपये तर त्यापुढील प्रवासासाठी प्रत्येक किमीसाठी ५ रु. भाडे आकारण्यात येणार आहे.
* या बाईक-टॅक्सीची नंबर प्लेट पिवळ्या रंगामध्ये असणार आहे. बाईक कंपनीकडूनच प्रवाशाला हेल्मेट पुरवले जाईल.
याआधी बंगळुरुमध्ये बाईक अँब्युलन्सची सुविधा देखली सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
जलयुक्त शिवारात ठाणे आघाडीवर
* जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत.
* ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ वनराई बंधारे झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
* कोकण विभागातील ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात आढावा घेतला.
* विभागात वनराई बंधाऱ्यांचे काम उत्तम झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ बंधारे झाले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाच जिल्ह्यांमधील १७ हजार ४४२ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
* कोकणातील ५० हजार हेक्टर पडीक जमिनीवर नरेगाची कामे घेतली जाणार आहेत. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
* आंबालागवडीसाठी पाच बाय पाच ही नवीन अट लागू केली आहे. यानुसार, आंबापीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान नरेगाद्वारे दिले जाणार आहे.
* मागेल त्या शेतकऱ्यास शेततळ्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘ठाणे सहज’ या मोबाइल अ‍ॅपचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
‘जितो’च्या अध्यक्षपदी मोतीलाल ओसवाल
* जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो) या जागतिक शिखर संघटनेच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार मोतीलाल ओसवाल यांची अध्यक्षपदी, तर प्रेसिडेंटपदी शांतीलाल कवाड यांची निवड झाली.
* ‘जितो’ ही जगभरातील जैन उद्योजक आणि उद्योगपतींची, तसेच ज्ञानसाधकांची संघटना आहे. सामाजिक- आर्थिक उन्नती, तसेच याबाबतीत सबलीकरण, मूल्याधिष्ठित शिक्षण या क्षेत्रांत काम करणाऱ्या या संघटनेची धुरा आता ओसवाल वाहणार आहेत.
* संपत्ती आणि मालमत्तांचे व्यवस्थापन, रोखे व शेअर बाजारातील गुंतवणूक, तसेच गृहकर्जाच्या व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या ३० वर्षांत नावलौकीक मिळविलेल्या ओसवाल यांच्याकडे ‘जितो’चे अध्यक्षपद आल्याने उद्योग-व्यवसायातील सहकार्याच्या बरोबरीने जागतिक स्नेहभाव आणि आध्यत्मिक उन्नती या बाबतीतही नवा आयाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.