जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने 30 विकसनशील देशांच्या यादीत 13 क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ व थेट परकी गुंतवणुकीमध्ये पारदर्शीपणा या निकषांवर भारताने या यादीमध्ये दुसरे स्थान मिळविले आहे.
गुंतवणूकदारांची पसंती
भारताच्या किरकोळ बाजारात गतीने वाढ होत आहे. थोडक्यात, भारत आगामी काळातील आर्थिक महासत्ता आहे. 2013 ते 2016 या आर्थिक वर्षांदरम्यान यामध्ये 8.8 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच, वार्षिक विक्रीचा आकडा 10 अब्ज डॉलरच्यावर (1 ट्रिलीयन) गेल्याचे लंडनस्थित व्यवसाय सल्लागार ए. टी. किअर्नी यांनी सांगितले. जगभरातील विकसनशील देशांमध्ये उद्योगांना पूरक अशा देशांमध्ये भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. उद्योगांना पोषक वातावरण, निर्धोक गुंतवणूक यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची भारताला पसंती लाभत आहे.
कोण करते उद्यमशील देशांचे मानांकन
जागतिक बॅंकिंग समूह ज्या देशामध्ये उद्योगाला पोषक वातावरण असते, तसेच गुंतवणुकीला अधिकाधिक वाव असतो, अशा देशांना उद्यमशील देशांमध्ये अग्रमानांकन मिळते. यासोबतच उद्योगधंद्यांना कायदेशीर संरक्षण, मौलिक अधिकार यावरही त्या देशातील उद्यमशील वातावरणाचे मानांकन ठरते. तसेच, उद्योगांची गुणवत्ता टिकवणे व कार्यक्षमता वाढवणे यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
काय आहेत प्राथमिक निकष
1. उद्योग सुरू करण्यास लागणारे वातावरण
2. बांधकाम परवान्यांची उपलब्धता
3. विजेची उपलब्धता
4. संबंधित देशांमध्ये मिळणारी पत
5. अल्पसंख्याक गुंतवणूकदारांना संरक्षण
6. करभरणा
7. व्यापक व्यापार विचार
8. करारांची काटेकोर अंमलबजावणी
9. दिवाळखोरीचे निराकरण
उद्यमशीलतेमध्ये सातत्य दाखवणारे पहिले पाच देश
चीन, भारत, रशिया, व्हिएतनाम, चिली
जागतिक बाजारातील प्रमुख रिटेलर्स
कॅरेफोर
मेट्रो ग्रुप
टिस्को
वॉलमार्ट
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे
बाजाराची निवड ही एक कला व शास्त्र
जागतिक विस्तार हा गुंतवणुकीचा खेळ
विकसनशील देशांच्या बाजारपेठांमधील ग्राहक सूक्ष्म निरीक्षण करणारे
स्थानिक बाजारपेठांमध्ये स्पर्धात्मक चुरस
जागतिक व स्थानिक गुंतवणूकदारांसाठीच्या नियमांमध्ये फरक
स्थानिक बुद्धिकौशल्याला प्राधान्य
विस्तारासाठी दूरदर्शीपणाची गरज