
रोबोट, वेगात धावणारी रेसिंग कार अशा विविध प्रकारच्या शोधात आघाडी घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी चक्क उपग्रह तयार केला आहे. हा उपग्रह येत्या बुधवारी इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपणतळावरून इतर २० उपग्रहांसोबत झेपावणार आहे.
येथील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी ही डोळे दीपवणारी कामगिरी केली आहे. त्यांनी या उपग्रहाला ‘स्वयम्’ असे नाव दिले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेला भारतीय बनावटीचा हा पहिलाच लघू उपग्रह आहे. तसेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कमी वजनाचा उपग्रह म्हणूनही ‘स्वयम्’चे वेगळेपण आहे.
साधारणपणे एक वर्ष हा उपग्रह कार्यरत राहील. प्रक्षेपण झाल्यानंतर ४५ मिनिटांनी अॅन्टिना निश्चित जागेवर येईल. त्यानंतर उपग्रह व सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागेल.
२० उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवणार

यामध्ये १८ उपग्रह हे विदेशी आहेत, तर तामिळनाडू येथील सत्यभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. शिवाय पुण्याच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वयम्’ही असणार आहे