जगातील सर्वांत लहान आकाराचे इंजिन तयार करण्यात शास्त्रज्ञांच्या एका गटाला यश आले आहे.
एका मीटरच्या काही अब्जावा भाग इतके लहान हे इंजिन आहे. प्रकाशाच्या ऊर्जेवर हे चालते.
तसेच या इंजिनचा वापर करून नॅनो यंत्रे बनवता येतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
अशी यंत्रे पाण्यामध्ये सोडून पर्यावरणाचा अभ्यास करता येईल; तसेच पेशींमध्येही हे यंत्र बसवून रोगांबाबत संशोधन करता येईल.
हे इंजिन सध्या प्रायोगिक तत्त्वावर तयार केले असले तरी त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होईल.
शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे छोटे इंजिन सोन्याच्या भारीत कणांपासून तयार केले आहे.
जेलच्या स्वत्त्रूपातील पॉलिमरच्या साह्याने त्यांना एकत्र बांधून ठेवले आहे. लेझरच्या साह्याने हे नॅनो इंजिन तापविले जाते, त्या वेळी काही सेकंदांच्या अवधीत हे इंजिन मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवून ठेवते.केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.