कोहीमा- नागालॅंड सरकार राज्यात कुत्र्याच्या मांसावर बंदी घालण्याचा विचार करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जिवंत कुत्र्यांची विक्री व त्यांच्या मांसाची विक्री थांबविण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली असून, कुत्र्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर प्रेम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, कुत्र्याच्या मांसावर लवकरच बंदी आणण्याचा निर्णय सरकार घेणार आहे.‘
दरम्यान, नागालॅंडमध्ये मोठ्या प्रमाणात कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. कुत्र्याचे मांस 300 रुपये किलो आहे. विविध हॉटेलसह घरगुती जेवणामध्येही कुत्र्याचे मांस वापरले जाते. शिवाय, विविध राज्यांमधून कुत्र्यांची आयात केली जाते.