Latest News

मुंबईत लोकल पकडण्यासाठी आता रांगेत राहा उभे


मुंबई : लोकलने प्रवास करताना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आजपासून रेल्वे पकडण्यासाठी रांगेत राहण्याचा नियम केलाय.

रांगेतच रेल्वे पकडावी लागणार

रेल्वे प्रशासनाने सीएसटीसह सर्व महत्वाच्या स्थानकांवर प्रवाशांनी रांगेचा प्रस्ताव लागू केलाय. त्यामुळे रांगेतच रेल्वे पकडावी लागणार आहे. तसा नियमच लागू केला आहे. रांगेची ही शिस्त प्रवाशांनी स्वतःहून स्वीकारली नाही तर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रवाशांची रांग तयार करणार आहेत. 

रेटारेटीमुळे अनेकदा अपघात

मध्य रेल्वेवरील गर्दी असणाऱ्या स्टेशनवर लोकल प्लॅटफॉर्मवर आली की आतील प्रवासी उतरायच्या आतच चढणाऱ्यांची रेटारेटी सुरु होते. अनेकांना गाडीतून उतरताच येत नाही. तसेच गर्दीच्या या रेटारेटीमुळे अनेकदा अपघात होतातही.

असा आदर्श

दरम्यान, मुंबईत पश्चिम रेल्वेवरील मीरा भाईंदर स्थानकावरील प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे लोकल पकडण्यासाठी रांग लावायला सुरूवात केली. तसेच बदलापूर आणि कल्याण स्टेशनवरून लोकल पकडणाऱ्या प्रवाशांनी हाच कित्ता गिरवला. यापूर्वी डोंबिवली स्थानकावर महिला प्रवासी रांगेतच लोकल पकडतात.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.