नासाचे गुरूच्या दिशेने निघालेले ज्युनो यान अखेर त्याच्या चुंबकावरणाच्या कक्षेत पोहोचले असून, त्या भागातील अवकाशीय कणांचे नियंत्रण गुरूच्या आंतरक्रियांवर अवलंबून असते. सॅन अँटानियो येथील साऊथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे ज्युनो मोहिमेतील मुख्य संशोधक स्कॉट बोल्टन यांनी सांगितले, की गुरूची सीमा ओलांडली आहे. वेगाने यान गुरूच्या दिशेने जात असून महत्त्वाची माहिती हाती येत आहे.
ज्युनो यान ४ जुलैला गुरूच्या क क्षेत जात आहे. त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने तेथील कण व चुंबकीय व इतर क्षेत्रांच्या गुणधर्मात बदल दिसत आहेत. आंतरग्रहीय सौर वारे व गुरूचे चुंबकावरण यांचा तेथील पर्यावरणावर मोठा परिणाम आहे.
ज्युनोच्या लहरी तपासणी केंद्राकडून माहिती येत असून ,२४ जूनला यान बरेच जवळ गेले आहे. २५ जूनला ते चुंबकावरणात पोहोचले आहे. आयोवा विद्यापीठाचे विल्यम कुर्थ यांच्या मते सॉनिक बूमप्रमाणे तेथे बो शॉक नावाचा परिणाम दिसतो. सौर वारे सर्व ग्रहावर काही लाखो मैल वेगाने वाहतात, पण गुरूवर त्यांना अडथळे निर्माण होतात. गुरूच्या चुंबकावरणामुळे ते घडते. जर गुरूचे चुंबकावरण प्रकाशित असते तर ते आपल्या पूर्ण चंद्राच्या दुप्पट आकाराचे दिसले असते.
पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतराच्या पाचपट अंतराचे चुंबकावरण गुरूच्या मागे असले तरी ते लांबून खूप लहान भासते. सौर वारे असूनही घनइंचाला १६ कण इतकी तीव्रता असतानाही ज्युनो यान गुरूजवळ गेले आहे. तेथील कणांची प्रवास गती ही गुरूच्या चुंबकीय क्षेत्राला नियंत्रित करीत असते.
सौर वाऱ्यापासून चुंबकावरणापर्यंतच्या रूपांतराच्या प्रक्रियेपर्यंत दोन भाग गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्युनो यानामुळे गुरूच्या अंतरंगाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.