Latest News

बीएसएनएलचा जम्बो प्लान, 333 रुपयांमध्ये 270 GB डाटा

रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्याच्या हेतूने बीएसएनएलने सर्वात स्वस्त प्लान आणले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी आपले 333 रुपयांपासून ते 395 पर्यंतचे तीन नवे प्लान लाँच केले आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारख्या सुविधा मिळणार आहेत. फरक फक्त इतकाच आहे की जिथे एअरटेल, जिओ, आयडिया आणि व्होडाफोन 4G डाटा देत आहेत तिथे बीएसएनएल ग्राहकांना हायस्पीड 3G डाटा देणार आहे. 
बीएसएनएलच्या या नव्या 'ट्रिपल एस' प्लान अंतर्गत ग्राहकांना 333 रुपयांत 90 दिवसांसाठी 3जीबी 3G डाटा मिळणार आहे. याचा अर्थ कपंनी 333 रुपयांत 270 जीबी हायस्पीड 3G डाटा देणार आहे. अशा रितीने ग्राहकांना 1GB डाटा खर्च करण्यासाठी फक्त एक रुपया 23 पैसे द्यावे लागणा आहे. 
बीएसएनएलने 'दिल खोल के बोल' प्लानदेखील लाँच केला आहे. 349 रुपयांच्या या प्लानअंतर्गत ग्राहक अनलिमिटेड लोकल कॉल आणि एसटीडी कॉल करु शकणार आहेत. त्यांना दर दिवशी 2 जीबी 3G डाटा स्पीडवर मिळणार आहे. मात्र त्यानंतर स्पीड 80 kbps होईल. हा प्लान जिओच्या धन धना धन ऑफरशी मिळता जुळता आहे, ज्यामध्ये ग्राहकांना फ्री नॅशनल रोमिंग, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डाटा मिळतो. 
तिसरा प्लान 395 रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना बीएसएनएल नेटवर्कवर 3000 मिनिटं आणि इतर नेटवर्कवर 1800 मिनिटं फ्री मिळणार आहेत. सोबतच रोज 2 जीबी 3G डाटा वापरु शकणार आहेत. 
 source- Lokmat

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.