Latest News

म्हणून जॉन सीनाने गर्लफेंडसोबत केला न्यूड डान्स, व्हिडिओ व्हायरल

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये लोकप्रिय असलेला स्टार खेळाडू जॉन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही न्यूड झाले असून त्यांनी कॅमेऱ्यासमोर डान्सही केला.
जॉन सीना आणि निक्की बेला यांच न्यूड होण्याच कारण म्हणजे त्यांच्या युटयूब चॅनलला मिळालेले सब्सक्राईबर होय. ज्यावेळी त्यांनी युट्यूब चॅनल सुरु केला होता त्यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना वचन दिले होते की, ज्यावेळी 5 लाख सब्सक्राईब होतील तेव्हा एक प्राइव्हेट व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्यांच्या युट्यूब चॅलनचे नाव 'द बेला ट्विन्स' असे आहे. 'द बेला ट्विन्स' या त्यांच्या युट्यूब चॅनलला तब्बल 5 लाखांहुन अधिक लोकांनी सब्सक्राईब्स केलं आहे. त्यामुळे दोघांनी वचन दिल्याप्रमाणे एक प्राईव्हेट व्हिडिओ शेअऱ केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला हहए सुपरस्टार जॉन सीनाने 'रेसलमेनिया 33' दरम्यान रिंगमध्येच गर्लफ्रेंड निक्की बेलाला प्रपोज केलं. यावेळी बॉक्सिंगऐवजी रोमँटिक वातावरण निर्माण झालं होतं. शिवाय, अशा पद्धतीने निक्कीला प्रपोज करुन त्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामना संपल्यानंतर जॉन सीनाने निक्कीला रिंगमध्ये प्रपोज करुन अंगठी घातली होती. जॉन अशा पद्धतीने आपल्याला प्रपोज करणार आहे, याची कल्पनाही निक्कीने केली नव्हती. जॉननं निक्कीच्या बोटात अंगठी घातल्यानंतर या भावनिक क्षणी निक्की आपले अश्रू आवरू शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी जॉनची आईदेखील तेथे उपस्थित होती.
जॉन सीना याने 2015 मध्ये आलेल्या 'डॅडीज होम' या चित्रपटात लहानशी भूमिका साकारली होती. आता पुन्हा याच चित्रपटाचा सीक्वल 'डॅडीज होम-2' येणार आहे. यामध्ये जॉन सीना दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात जॉन सीना याच्यासोबत अभिनेता विल फेरेल आणि मार्क वाल्बर्ग सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, 'डॅडीज होम-2' या चित्रपटाचे चित्रीकरण बोस्टन येथे सुरू होणार असून येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
- lokmat

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.