'इराक आणि सिरियामधून इसीसचं अस्तित्व कमी होत असून परदेशी हल्लेखोर या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याचं प्रमाणही कमी झाल्याचा', दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. 'इसीस आपली जमीन गमावत आहेत.
सोबतच या दहशतवादी संघटनेला जिवंत ठेवण्याचा महत्वाचा वाटा असलेला पैसा मिळणंही बंद झालं असल्याचं', बराक ओबामा बोलले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना बराक ओबामा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'आपण त्यांच्या तेलसाठ्यांच्या ठिकाणावर केलेल्या हल्ल्यांमुळे महिन्यामागे त्यांना मिळणारा लाखो डॉलर्सचा महसूल आपण रोखला आहे. पैसे ठेवण्याची त्यांची ठिकाणंही आपण उद्ध्वस्त केली आहेत, ज्यांमुळे त्यांच आर्थिक नुकसान वाढलं असल्याचंही', बराम ओबामा बोलले आहेत.' इसीसला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणारी आर्थिक मदतही मिळणं बंद झाली असल्याचा', दावा बराक ओबामांनी केला आहे.