तिबेटचे आध्यात्मिक नेता दलाई लामा यांनी अमेरिकेतील ओरलँडो गोळीबारात बळी पडलेल्यांसाठी प्रार्थना करून धार्मिक उदारतेच्याबाबतीत भारताकडून जगाने शिकावे असा उपदेश केला. भारतात २ हजाराहून अधिकवर्षे धार्मिक उदारतेचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.
अमेरिकेने स्थापन केलेल्या ‘यूएस इन्स्टिटय़ूट ऑफ पीस’ या संस्थेत बोलताना ते म्हणाले की ओरलँडोमध्ये घडलेली गोळीबाराची घटना गंभीर असल्याने थोडय़ा वेळाकरता आपण मौन पाळून प्रार्थना करु या. भारतात जगातील प्रमुख धर्मांची तीर्थक्षेत्रे आहेत. आणि लोक त्याठिकाणी मित्रत्वाच्या भावनेने वागतात. हा उदारपणा जगाने भारताकडून शिकावा. समस्या असल्या तरी भारतातील उदारता अवर्णनीय आहे, असेही ते म्हणाले.