Latest News

चीनने पहिल्यांदाच स्वीकारले २६/११ हल्ल्यांमागे पाकिस्तानच

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचाच मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात असल्याची वस्तुस्थिती चीनने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे स्वीकारली आहे. सर्व देशांनी दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचे आंधळे समर्थन करणे महागात पडू शकते, हे दिसू लागल्यानेच चीनने या वस्तुस्थितीचा जाहीरपणे स्वीकार केल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानातील ‘लष्करे तैय्यबा’चा हात असल्याचे चीनमधील राष्ट्रीय वाहिनीवरून प्रदर्शित झालेल्या एका माहितीपटामध्ये दाखविण्यात आले. चीनने या माहितीपटामध्ये हा हल्ला इतका क्रूर आणि भयानक होता की त्यामुळे संपूर्ण जग हादरल्याचे दाखवले. या हल्ल्यांमागे पाकिस्तान असल्याचे चीनने या माहितीपटाच्या माध्यमातूनच पहिल्यांदाच मान्य केले. चीनच्या या बदलत्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.