Latest News

मुंबईच्या पावसावर लागला ५०० कोटींचा सट्टा

गेली दोन वर्षे मान्सूनमधील अनिश्चतता सट्टेबाजांना लाभाची ठरली असून यंदा मुंबईच्या पावसावर सुमारे ५०० कोटींचा सट्टा खेळला जात असल्याचे समजते. अर्थात पोलिसांच्या ससेमिर्‍यापासून सुटका करून घेण्यासाठी सट्टोडियांनी मुंबईबाहेरून ऑनलाईन वर हा सट्टा सुरू केला आहे असेही सांगितले जात आहे.
यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज हवामान खात्यासह विविध हवामान वृत्त संस्थांनीही जाहीर केला आहे. पाऊस कमी होवो वा अधिक होवो सट्टामुळे सटोडियांवर भरभरून रूपयांचा वर्षाव होणार हे नक्की झाले आहे. मान्सून कधी येणार, जूनच्या कोणत्या तारखेला पाऊस बरसणार, पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार की अधिक व कोणत्या महिन्यात किती पाऊस होणार अशा विविध कॅटेगरीत सट्टा खेळला जात आहे. 
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस होईल याच्यासाठीचा रेट ४५ पैसे ते दीड रूपयांपर्यंत आहे.सामान्य पावसासाठी ७५ पैसे, जादा पावसासाठी ६० पैसे, कमी पावसासाठी ७० पैसे असे अ्रन्य दर निघाले असल्याचेही समजते.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.