Latest News

प्रसुतीवेळी प्रत्येक वर्षी सुमारे ५ लाख २९ हजार महिलांचा मृत्यू

दर ५ मिनिटाला एका मातेचा गर्भावस्थेत वेगवेगळ्या कारणाने मृत्यू होत असल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) केला असून प्रत्येक वर्षी सुमारे ५ लाख २९ हजार महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू होता. भारतात १ लाख ३६ हजार अर्थात २५.७ टक्के महिलांचा मृत्यू होता.
मुल जन्माला आल्यानंतर जवळपास दोन तृतीअंश महिला मृत्युमुखी पडतात. प्रसुतीनंतर रक्तस्रावाची समस्या वाढते. सिजर झाल्यानंतर गर्भशय फाटल्यामुळे एक लाख महिलांमागे ८३ महिलांचा मृत्यू होतो. मातृत्व मृत्यू दर १७.७ टक्के असून नवजात मृत्यू दर ३७.५ टक्के आहे. मुल जन्माला आल्यानंतर २४ तासांच्या आत ५०० मिली लिटर किंवा १ हजार मिली लिटर रक्त निघाल्यानंतर ते पीपीएच संज्ञेत मोडते.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.