खेळातील संतुलन कायम ठेवण्यासाठी क्रिकेटचे नियमन करणाऱ्या इंग्लंडमधील ‘मेरिलेबॉन क्रिकेट क्लब’ने बॅटच्या आकाराचे परिमाण व मर्यादेचा विचार करण्याचा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिला.
क्रिकेटमध्ये सध्या चेंडूंसाठी विविध नियम आहेत मात्र बॅटवर कसलेच निर्बंध नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे जड, लहान-मोठे, ‘मंगूस’ बॅट्स वापरल्या जातात. गेल्या काही काळात क्रिकेट हा फक्त फलंदाजांचाच खेळ बनला आहे. बॅट व बॉलच्या खेळात बॅट जास्त ताकदवान बनल्याचे दिसून येते. ही गंभीर बाब असल्यामुळे खेळात संतुलन आणण्यासाठी बॅटच्या आकाराचे एक परिमाण बनवले पाहिजे. त्याकरता एमसीसीने आवश्यक ते बदल करावेत असे अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली राहुल द्रविड, महेला जयवर्धने, अॅंड्रयू स्ट्रॉस यांच्या समितीने सुचवले आहे.