Latest News

फ्लिपकार्टच्या रिटर्न पॉलिसीत बदल

ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने आता खरेदी केलेली एखादी वस्तू परत करण्याच्या पॉलिसीत बदल केला आहे. 
संकेतस्थऴावर ग्राहकांनी एखादी वस्तू घेतल्यास आणि ती पसंत न पडल्यास, ती वस्तू परत करण्याची मुदत फ्लिपकार्टने ठेवली आहे. या मुदतीचा कालावधी सध्या ३० दिवसांचा आहे. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून सर्वाधिक जास्त म्हणजेच मोबाईल, इलेक्ट्रानिक्स आणि बुक अशा वस्तूंचा परतावा करण्याचा कालावधी कमी करण्यात येणार आहे. हा कालावधी अवघ्या १० दिवसांचा असणार आहे. तर, फुटवेअर, आयवेअर, ज्वेलरी, कपडे, घड्याळ आणि सौंदर्य प्रसाधने या वस्तूंवरील परत करण्याची मुदत सध्या लागू आहे तशीच म्हणजे ३० दिवसांची राहणार आहे.   
याचबरोबर फिल्पकार्टच्या नवीन बदलानुसार विक्रेत्यांना  फिल्पकार्टला  जास्त कमिशन द्यावे लागणार आहे. दरम्यान, या नव्या फिल्पकार्टच्या नव्या पॉलिसीची अंमलबजावणी येत्या २० जूनपासून करण्यात येणार आहे.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.