Latest News

वयाच्या ५२व्या वर्षी महापौर झाले १०वी उत्तीर्ण

शिकण्याला वयाची गरज नसते असे म्हणतात अशा आशयाची म्हण आपल्यात प्रचलित आहे. या म्हणीला हुबेहूब शोभेल असे काही भरतपूरचे महापौर शिव सिंह यांच्या सोबत घडले आहे. वयाच्या ५२व्या वर्षी शिव सिंह हे राजस्‍थान माध्‍यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सिंह यांनी विज्ञान विषयात सर्वाधिक ५३ गुण मिळवत ४४.८३ टक्क्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. याबाबत माहिती देताना सिंह यांनी सांगितले कि, महापौर असल्यामुळे मला अभ्यास करिता वेळ मिळत नव्हता. त्याकरिता मी दररोज रात्री दोन तास अभ्यास करण्याचे नक्की केले. त्याचबरोबर १९७१-७२साली त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळे शिक्षण सोडावे लागले होते.


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.