Latest News

कोटींच्या घरात मिळतो टीम इंडियाच्या शिलेदारांना पगार

जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यावधींच्या घरात असते. या खेळाडूंना बीसीसीआयही प्रत्येक सामन्याचे वेतन देते. तुम्हीही या खेळाडूंचे वेतन ऐकून हैराण व्हाल. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंची अ, इ आणि उ अशा तीन ग्रेडमध्ये विभागणी केली आहे.
ग्रेड अ : अ ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला एक कोटी रुपये एवढा पगार मिळतो. याशिवाय या खेळाडूंना एका टेस्ट मॅचचे पाच लाख रुपये, एका वनडेचे तीन लाख रुपये आणि एका टी २० चे दीड लाख रुपये मिळतात. सध्या भारतीय क्रिकेट टीमच्या अ ग्रेडमध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि आर.अश्विन हे चार खेळाडू आहेत.
ग्रेड इ : ग्रेड इ मध्यल्या खेळाडूंना बीसीसीआय वर्षाला ५० लाख रुपये पगार देतं. याशिवाय या खेळाडूंना एका टेस्टसाठी तीन लाख रुपये, एका वनडेसाठी दोन लाख रुपये आणि एका टी २० साठी दीड लाख रुपये मिळतात. ग्रेड इ मध्ये सुरेश रैना, रोहित शर्मा, अंबाती रायडू, मुरली विजय, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद शामी हे दहा खेळाडू आहेत.
ग्रेड उ : ग्रेड उ मधल्या खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षाला २५ लाख रुपये एवढा पगार मिळतो. याबरोबरच या खेळाडूंना एका टेस्टसाठी तीन लाख रुपये, एका वनडेसाठी दोन लाख रुपये आणि एका टी २० साठी दीड लाख रुपये मिळतात. ग्रेड उ मध्ये अमित मिश्रा, अक्सर पटेल, स्टुअर्ट बिनी, वृद्धीमान साहा, मोहित शर्मा, वरुण अ‍ॅरोन, करण शर्मा, रविंद्र जडेजा, के.एल. राहुल, धवल कुलकर्णी, हरभजन सिंग आणि श्रीनाथ अरविंद हे बारा खेळाडू आहेत.
बोनस : याबरोबरच कोणत्याही ग्रेडमधल्या खेळाडूने टेस्ट किंवा वनडेमध्ये सेंच्युरी मारली तर त्याला ५ लाख रुपये बोनस दिला जातो. टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी मारल्यावर सात लाख रुपये, पाच विकेट घेतल्यावर ५ लाख रुपये आणि टेस्ट क्रिकेटमध्ये दहा विकेट घेतल्यावर सात लाख रुपये बोनस दिला जातो.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.