त्यानुसार आपण तो बघितल्यावर मलाही धक्का बसला. माझ्या कादंबरीत मुलगा उच्च वर्गातील तर मुलगी ही गरीब व दुय्यम वर्गातील दाखवली आहे. सराटमध्ये फक्त ही पात्रांची अदलाबदल केलेली दाखवली आहे. उर्वरित कथानक तेच आहे. माने यांनी केलेल्या दाव्यानुसार, चित्रपट काढण्यासाठी पहिल्यांदा ‘एसेल ग्रुप’चे निर्माते निशांत रॉय बंबार्डे यांच्याशी संवाद साधला. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांना ‘ईमेल’द्वारे माने यांनी त्यांना ही कथा पाठवली. नंतर त्यांना पुस्तकाची एक प्रतही पाठवली. त्यानंतर माने हे ‘एसेल ग्रुप’चे सहनिर्माते निखिल साने यांच्याकडेही गेले. या वेळी त्यांनी हा चित्रपट बनविण्यात रस नसल्याचे सांगितले. 
प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा मराठी चित्रपट सैराट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नवनाथ माने यांच्या ‘बोभाटा’ या कादंबरीवरुन सराटची कथा, पटकथा लिहिली असल्याचा दावा या कादंबरीच्या लेखकाने केला आहे. याबाबत त्यांनी स्वामित्व हक्क (कॉपीराईट अॅक्ट) भंग केल्याप्रकरणी पनवेल येथील न्यायालयात याचिका दाखल केली असून २४ जून रोजी याची सुनावणी होणार आहे.
साताऱ्यानजीक खटाव येथील मूळचे रहिवासी असलेले माने हे सध्या मुंबईत स्थायीक आहेत. त्यांच्या मते, ‘बोभाटा’ या कथेची निर्मिती त्यांनी २००९ साली केली. तसेच, ‘संस्कृति प्रकाशन’च्या मार्फत १६ मार्च २०१० साली तिचे प्रकाशन करण्यात आले आहे. या कथेला प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या वेळी त्यांनी यावर एक सुंदर चित्रपट निघेल असेही सांगितले होते. यानुसार आपण असा चित्रपट काढण्यासाठी खूप खटपट केली पण त्यात यश आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मित्रांनी दूरध्वनीवरुन तुझ्या कथेशी मिळतीजुळती कथा असलेला ‘सराट’ नावाचा चित्रपट बघितल्याचे सांगितले.
दरम्यान काही दिवसांनीच आपल्या या कथेवर ‘सैराट’ नावाचा चित्रपट तयार झाल्याचे दिसून आले. या सर्व प्रकाराबद्दल माने यांनी पनवेल येथील न्यायालयात एसेल व्हिजन प्रॉडक्शन लि., निशांत रॉय बंबार्डे, निखिल साने, नितीन केणी, नागराज मंजुळे, आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ यांच्या विरोधात स्वामित्व हक्क (कॉपीराईट अॅक्ट) भंग प्रकरणी याचिका दाखल केली आहे.