टी ट्वेंटी व कसोटी मालिकांच्या तुलनेत वन डे मॅचेसची घटत चाललेली लोकप्रियता पाहून हे सामने अधिक आकर्षक करण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. २०१९ मध्ये जगातल्या टॉप १३ टीम्स असलेली वन डे लीग आयसीसी सुरू करणार असून त्या संदर्भातला अंतिम निर्णय या महिनाअखेर एडीनबर्ग येथे होत असलेल्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे समजते.
नवीन आराखड्यानुसार वन डेसाठी सर्व टीम तीन वर्षे एकमेकांत ३-३ मॅच सिरीज खेळणार आहेत. प्रत्येक टीम स्वदेशात ६ सिरीज व परदेशात ६ सिरीज असे ३६ सामने खेळेल. त्यात १० कसोटी टीम असतीलच त्याचबरोबर अफगाणिस्तान, आयर्लंड, व एक असोसिएट टीम असेल. या टीममध्ये छोट्या देशांचा समावेश असेल. यामुळे छोट्या देशांना जादा सामने खेळण्याची संधी मिळेल व खेळाची पातळीही उंचावली जाईल असा अंदाज आहे.