दि. ३० जुल २०१७ रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या केंद्रांवर महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा, २०१७ घेणार आहे.
रिक्त पदांची संख्या एकूण ७९ (अज -२१, विजा (अ) – २, भज (ब) – ११, अज (ड) – १, इमाव – ११, खुला – ३३).
पात्रता – कृषी/कृषी अभियांत्रिकी/उद्यानविद्या/कृषी जैव तंत्रज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/गृह विज्ञान/
फूड टेक्नॉलॉजी बीएफएस्सी पदवी उत्तीर्ण. अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
परीक्षेचे टप्पे – तीन (१) पूर्वपरीक्षा – २०० गुण (२) मुख्य परीक्षा – ४०० गुण (३) मुलाखत – ५० गुण.
परीक्षा शुल्क – रु. ३७३/- (अमागास), रु. २७३/- (मागासवर्गीय). वय – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी ३८ वष्रेपर्यंत (मागास ४३ वष्रे) ऑनलाइन अर्ज <https://mahampsc.mahaonline.gov.in/> या संकेतस्थळावर
दि. २ मे २०१७ पर्यंत करावेत.