Latest News

'त्या' जाहिरातीविषयी सनी लीओनीचे प्रत्युत्तर


सनी लिओनी 'मॅनफोर्स कंडोम' च्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही जाहिरात अनैतिकता आणि अश्लिलतेचा प्रचार करणारी तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी केली आहे.
 मात्र, याविषयी गप्प न राहता सनीने  प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणते 'लोकशाही आणि बोलण्याचे स्वातंत्र्य या भारतातील सर्वांत महान गोष्टी आहेत. जर लोकांना माझ्याविरोधात आवाज उठवायचा असल्यास ते तसे करू शकतात. मात्र लोकांसाठी काय योग्य -अयोग्य आहे याचा निर्णय सरकारच घेऊ शकते'.
 'जेव्हा मी एखाद्या ब्रँडसोबत काम करते तेव्हा त्याची नैतिक जबाबदारीही स्वीकारते. कोणतेही जोडपे बाळ जन्माला घालण्याचे तेव्हाच नियोजन करते जेव्हा ते पूर्णतः त्याबाबतची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असतात. मी स्वीकारत असलेल्या जाहिरातींबाबतही माझा अशाच प्रकारचा दृष्टीकोन असतो.  मी या जाहिराती केवळ पैसा कमावण्यासाठी करत नाही', असे म्हणत मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीला विरोध करणा-यांना सनीने प्रत्युत्तर दिले आहे. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.