Latest News

‘आयफोन’च्या विक्रीत अंदाजापेक्षा ७०% जास्त घट

हातात आयफोन असणं हे आता प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. बाकीच्या मर्त्य मानवांपेक्षा ‘डिफरंट’ आहोत हे दाखवण्यासाठी आयफोन घेणं हा शाॅर्टकट आहे. त्या स्टायलिश फोनच्या मागचा ‘अॅपल’चा लोगो दाखवत बोलत राहणं म्हणजे काय आनंद असतो तो या आयफोनच्या चाहत्यांनाच माहिती. ‘अॅपल’चे हे चाहते एकदम हार्डकोअर असतात. त्यांना अॅपलविषयी एक वाकडा शब्द काढलेला आवडत नाही. काय तो आयफोन, काय त्यावरचे अॅप्स, सगळंच मस्त असतं.
आता अशाच ‘अॅपल’ प्रेमींसाठी काहीशी वाईट बातमी म्हणजे अॅपलचं भारतीय बाजारपेठेमधलं सेल्स टार्गेट हुकलंय. आणि थोडथोडकं नाही तर तब्बल ७० ट्क्यांनी चुकलंय. ‘बँक आॅफ अमेरिका-मेरिल लिंच ग्लोबल’ यांच्या अहवालामध्ये हे नमूद केलंय.
‘अॅपल’ने यंदा भारतात १ कोटी आयफोन्स विकायचेच असं टार्गेट समोर ठेवलं होतं. पण यंदा फक्त २० लाखच आयफोन्स विकले गेले. त्यामुळे त्यांचा अंदाज सपशेल चुकला आहे.
आयफोन्सची किंमत अँड्राॅईड फोन्सपेक्षा खूपच जास्त असते. आणि भारतासारख्या बाजारपेठेमध्ये ग्राहक किंमतीला जास्त महत्त्व देतात त्यामुळे आयफोनची विक्री कमी होते.
आयफोनच्या नव्या माॅडेल्सना अॅपल प्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी आयफोन ७ लाँच झाल्यावर हा फोन फारच महाग असल्याची कुरकूर डायहार्ड अॅपल फॅन्सकडूनही झाली. य़ा फोनची काही हाय एंड व्हर्जन्स १ लाखांपेक्षा जास्त किमतीची असल्यामुळे अनेकांनी आखडता हात घेतला. आयफोन ७ ला चांगला प्रतिसाद मिळाला खरा पण त्याचवेळी अॅपल आयफोन्स खूपच महाग होत गेल्याची तक्रार भारतीय बाजारपेठेमध्ये झाली होती. आता त्याचा फटका अॅपलला बसल्याचं दिसतंय.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.