Latest News

स्ट्रॉबेरीमुळे स्तन कर्करोगाशी लढण्यास मदत


स्ट्रॉबेरीचा अर्क घेतल्यामुळे वेगाने पसरणाऱ्या स्तन कर्करोगाच्या पेशी आणि वाढत जाणारी गाठ (टय़ुमर) कमी होण्यात मदत होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. हे याबाबतचे पहिलेच संशोधन आहे.
प्रयोगशाळेत वाढवलेल्या स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी स्टॉबेरीचा अर्क फायदेशीर ठरत असल्याचे संशोधकांना दिसून आले. एवढेच नाही तर स्ट्रॉबेरीचा अर्क टय़ुमर कमी करण्यासही मदत करत असल्याचे संशोधकांना आढळले.
प्रत्येक दिवशी दहा ते बारा स्ट्रॉबेरी (५०० ग्रॅम) खाल्यामुळे अँटिऑक्सिडेंट आणि दाहविरोधी फायदे मिळण्यासह शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होत असल्याचे संशोधकांना मागील अभ्यासात दिसून आले होते. नवीन अभ्यासात फळ खाल्यामुळे स्तनाच्या कर्करोगावर फायदेशीर उपचार होत असल्याचे दिसत आहे.
स्ट्रॉबेरीचा अर्क वापरून स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यात आम्हाला यश आले असून, या संशोधनाचा येत्या काळात मोठा फायदा होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. स्ट्रॉबेरीचा अर्क कर्करोगाशी संबंधित अनेक जनुकांची वाढ रोखतो. त्यामुळे स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
हे संशोधन ‘वैज्ञानिक अहवाल’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.